Josué 2
marc (MARC) vs VC
1 त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले.
1 Josué, filho de Nun, despachou de Setim secretamente dois espiões: Ide, disse-lhes ele, e examinai a terra e a cidade de Jericó. Em caminho, entraram em casa de uma prostituta chamada Raab, onde se alojaram.
2 तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
2 E foi avisado ao rei de Jericó: Entraram aqui de noite alguns israelitas para explorar a terra.
3 तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.”
3 O rei mandou dizer a Raab: Faze sair esses homens que foram ter contigo e entraram em tua casa; porque vieram espionar a terra.
4 परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते.
4 Mas a mulher ocultou os dois homens e respondeu: Vieram realmente uns homens à minha casa, mas eu não sabia de onde eram.
5 संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.”
5 Pela tarde, quando se iam fechar as portas da cidade, eles partiram. Ignoro para onde foram. Persegui-os vós depressa e os alcançareis.
6 परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्याखाली लपविले होते.
6 Ora, ela os fizera subir ao terraço de sua casa e os ocultara sob palhas de linho que ali havia.
7 तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या.
7 Os homens enviados foram atrás deles pelo caminho, que conduz ao vau do Jordão, e as portas da cidade foram fechadas após a partida da patrulha.
8 रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली
8 Antes que se deitassem, Raab subiu ao terraço junto dos espiões e disse-lhes:
9 आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.
9 Eu sei que o Senhor vos entregou esta terra; o terror de vós apoderou-se de nós, e todos os habitantes da terra estão desanimados por vossa causa.
10 कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्या सीहोन व ओग या दोन अमोर्यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.
10 Ouvimos dizer como o Senhor secou as águas do mar Vermelho diante de vós, quando saístes do Egito, e como, além do Jordão, tratastes os dois reis dos amorreus, Seon e Og, os quais votastes ao interdito.
11 जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.
11 Quando ouvimos isso, nosso coração desfaleceu e ninguém mais tem coragem de vos resistir, porque o Senhor, vosso Deus, é o Deus nas alturas dos céus e aqui embaixo na terra.
12 “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,
12 Agora, vo-lo peço, jurai-me pelo Senhor, que, assim como usei de bondade para convosco, do mesmo modo poupareis a casa de meu pai.
13 की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”
13 Dai-me um sinal seguro de que salvareis meu pai, minha mãe, meus irmãos, minhas irmãs e todos os que lhe pertencem e livrareis as nossas vidas da morte.
14 “आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!” त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.”
14 Eles responderam-lhe: a custa de nossa vida salvaremos a vossa, contanto que não nos atraiçoeis. Quando o Senhor nos entregar esta terra, fiéis {à nossa promessa} tratar-te-emos com bondade.
15 तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते.
15 Então, servindo-se de uma corda, ela desceu-os pela janela, pois a casa em que morava estava sobre o muro da cidade.
16 ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.”
16 Ide para o monte, disse-lhes ela, para que não vos encontrem os vossos perseguidores. Ocultai-vos ali durante três dias, até que eles voltem; depois retomareis o vosso caminho.
17 — ausente —
17 Os homens disseram-lhe: Eis como havemos de cumprir o juramento a que nos obrigastes:
18 — ausente —
18 quando tivermos entrado na terra, porás este cordão vermelho na janela por onde nos fizeste descer; reúne em torno de ti, em tua casa, teu pai, tua mãe, teus irmãos, e toda a família de teu pai.
19 जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल.
19 Se alguém ultrapassar a porta de tua casa e sair para fora, este será responsável pelo que acontecer, e nós seremos inocentes. Mas se alguém puser a mão sobre quem quer que seja que se encontrar contigo em tua casa, é sobre nós que isto cairá.
20 परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.”
20 Se divulgares, porém, o que combinamos contigo, estaremos desobrigados do juramento que nos fizeste fazer.
21 “मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.”
21 Seja como dissestes, respondeu ela. Depois os despediu, e eles partiram. E ela pendurou o cordão vermelho na janela.
22 जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले.
22 Eles foram para o monte, onde permaneceram durante três dias, até que voltassem os que os perseguiam. Estes, tendo buscado por todo o caminho os espiões, não os encontraram.
23 नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.
23 Os dois homens desceram então do monte e, voltando, passaram o Jordão. Foram para junto de Josué, filho de Nun, e contaram-lhe tudo o que se tinha passado.
24 ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.”
24 O Senhor, disseram-lhe eles, entregou toda essa terra nas nossas mãos, pois todos os seus habitantes tremem diante de nós.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.