Êxodo 16
marc (MARC) vs NVI
1 इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला.
1 Toda a comunidade de Israel partiu de Elim e chegou ao deserto de Sim, que fica entre Elim e o Sinai. Foi no décimo quinto dia do segundo mês, depois que saíram do Egito.
2 त्या रानात सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली.
2 No deserto, toda a comunidade de Israel reclamou a Moisés e Arão.
3 इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.”
3 Disseram-lhes os israelitas: "Quem dera a mão do Senhor nos tivesse matado no Egito! Lá nos sentávamos ao redor das panelas de carne e comíamos pão à vontade, mas vocês nos trouxeram a este deserto para fazer morrer de fome toda esta multidão! "
4 मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी तुमच्यासाठी स्वर्गातून भाकरीची वृष्टी करेन. लोकांनी दररोज बाहेर जाऊन त्या दिवसासाठी पुरेलसे गोळा करावे. म्हणजे ते माझ्या सूचनेप्रमाणे वागतात की नाहीत याची मला परीक्षा करता येईल.
4 Disse, porém, o Senhor a Moisés: "Eu lhes farei chover pão do céu. O povo sairá e recolherá diariamente a porção necessária para aquele dia. Com isso os porei à prova para ver se seguem ou não as minhas instruções.
5 सहाव्या दिवशी ते जे काही आत आणतील ते त्यांनी तयार करावे आणि दररोज ते जेवढे गोळा करतात त्यापेक्षा दुप्पट असावे.”
5 No sexto dia trarão para ser preparado o dobro do que recolhem nos outros dias".
6 मग मोशे व अहरोन यांनी सर्व इस्राएली लोकांना सांगितले, “संध्याकाळच्या वेळी तुम्हाला समजेल की याहवेहनेच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.
6 Assim Moisés e Arão disseram a todos os israelitas: "Ao entardecer, vocês saberão que foi o Senhor quem os tirou do Egito,
7 आणि सकाळी तुम्ही याहवेहचे गौरव बघाल, कारण तुम्ही याहवेहविरुद्ध केलेली कुरकुर त्यांनी ऐकली आहे. आम्ही कोण आहोत की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?”
7 e amanhã cedo verão a glória do Senhor, porque o Senhor ouviu a queixa de vocês contra ele. Quem somos nós para que vocês reclamem a nós? "
8 मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”
8 Disse ainda Moisés: "O Senhor lhes dará carne para comer ao entardecer e pão à vontade pela manhã, porque ele ouviu as suas queixas contra ele. Quem somos nós? Vocês não estão reclamando de nós, mas do Senhor".
9 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “संपूर्ण इस्राएली समुदायाला सांग, ‘याहवेहच्या समोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे.’ ”
9 Disse Moisés a Arão: "Diga a toda a comunidade de Israel que se apresente ao Senhor, pois ele ouviu as suas queixas".
10 अहरोन सर्व इस्राएली लोकांशी बोलत असताना, त्यांनी रानाकडे पाहिले आणि त्यांना याहवेहचे गौरव ढगात प्रकट होत असलेले दिसले.
10 Enquanto Arão falava a toda a comunidade, todos olharam em direção ao deserto, e a glória do Senhor apareceu na nuvem.
11 याहवेह मोशेला म्हणाले,
11 E o Senhor disse a Moisés:
12 “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग, ‘सायंकाळी तुम्ही मांस खाल, व सकाळी तुम्ही भाकरीने तृप्त व्हाल. मग तुम्हाला समजेल की, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
12 "Ouvi as queixas dos israelitas. Responda-lhes que ao pôr-do-sol vocês comerão carne, e ao amanhecer se fartarão de pão. Assim saberão que eu sou o Senhor seu Deus".
13 त्या संध्याकाळी लावे पक्षी त्यांच्या वस्तीवर येऊन उतरले व त्यामुळे छावणी व सभोवतालची सर्व जमीन झाकली गेली आणि सकाळी छावणी सभोवती दवबिंदूंचा थर जमला होता.
13 No final da tarde, apareceram codornizes que cobriram o lugar onde estavam acampados; ao amanhecer havia uma camada de orvalho ao redor do acampamento.
14 जेव्हा दवबिंदू नाहीसे झाले, तेव्हा रानातील भूमीवर हिमकणांएवढे खवल्यांसारखे बारीक तुकडे पसरलेले दिसू लागले.
14 Depois que o orvalho secou, flocos finos semelhantes a geada estavam sobre a superfície do deserto.
15 जेव्हा इस्राएली लोकांनी ते पाहिले, ते एकमेकास म्हणू लागले, “हे काय आहे?” कारण ते काय होते ते त्यांना ठाऊक नव्हते.
15 Quando os israelitas viram aquilo, começaram a perguntar uns aos outros: "Que é isso? ", pois não sabiam do que se tratava. Disse-lhes Moisés: "Este é o pão que o Senhor lhes deu para comer.
16 याहवेहने दिलेली आज्ञा ही: ‘प्रत्येकाने त्यांना लागते तेवढे गोळा करावे. तुमच्या तंबूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओमेर एवढे घ्यावे.’ ”
16 Assim ordenou o Senhor: ‘Cada chefe de família recolha o quanto precisar: um jarro para cada pessoa da sua tenda’ ".
17 इस्राएली लोकांनी जसे त्यांना सांगितले होते तसे केले; काहींनी अधिक तर काहींनी थोडे गोळा केले.
17 Os israelitas fizeram como lhes fora dito; alguns recolheram mais, outros menos.
18 आणि जेव्हा त्यांनी ते ओमेरच्या मापाने मोजले, ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही. प्रत्येकाने त्यांना जितके लागत होते तितकेच गोळा केले होते.
18 Quando mediram com o jarro, quem tinha recolhido muito não teve demais, e não faltou a quem tinha recolhido pouco. Cada um recolheu tanto quanto precisava.
19 मग मोशे त्यांना म्हणाला, “यातील काहीही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये,”
19 "Ninguém deve guardar nada para a manhã seguinte", ordenou-lhes Moisés.
20 तरीही काहींनी मोशेच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही; व त्याचा काही भाग सकाळपर्यंत ठेवला, पण त्यात किडे पडून त्याला दुर्गंधी सुटली होती, तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला.
20 Todavia, alguns deles não deram atenção a Moisés e guardaram um pouco até a manhã seguinte, mas aquilo criou bicho e começou a cheirar mal. Por isso Moisés irou-se contra eles.
21 मग रोज सकाळी प्रत्येकाला लागते तेवढेच ते गोळा करीत असत आणि जेव्हा सूर्य प्रखर होई, तेव्हा ते वितळून जात असे.
21 Cada manhã todos recolhiam o quanto precisavam, pois quando o sol esquentava, aquilo se derretia.
22 आठवड्याच्या सहाव्या दिवशी ते रोजच्यापेक्षा दुप्पट—प्रत्येकी दोन ओमेर अन्न गोळा करीत—आणि सर्व इस्राएली वडीलमंडळींनी येऊन मोशेला याबद्दल हवाला दिला.
22 No sexto dia recolheram o dobro: dois jarros para cada pessoa; e os líderes da comunidade foram contar isso a Moisés,
23 मोशेने त्यांना सांगितले, “याहवेहची आज्ञा हीच आहे: ‘उद्या विसाव्याचा दिवस, याहवेहचा पवित्र शब्बाथ आहे. तर तुम्हाला जे काही शिजवायचे आहे ते शिजवा व जे उकळावयाचे असेल ते उकळून घ्या. जे उरेल ते सकाळपर्यंत ठेवा.’ ”
23 que lhes explicou: "Foi isto que o Senhor ordenou: ‘Amanhã será dia de descanso, sábado consagrado ao Senhor. Assem e cozinhem o que quiserem. Guardem o que sobrar até a manhã seguinte’ ".
24 म्हणून त्यांनी मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे ते सकाळपर्यंत ठेवले तेव्हा त्याला ना दुर्गंधी आली ना त्यात किडे पडले.
24 E eles o guardaram até a manhã seguinte, como Moisés tinha ordenado, e não cheirou mal nem criou bicho.
25 मोशे म्हणाला, “आज हे खा, कारण आज याहवेहचा शब्बाथ आहे. म्हणून तुम्हाला आज त्यातील काही जमिनीवर मिळणार नाही.
25 "Comam-no hoje", disse Moisés, "pois hoje é o sábado do Senhor. Hoje, vocês não o encontrarão no terreno.
26 सहा दिवस तुम्ही ते गोळा करावे, पण सातव्या दिवशी शब्बाथ आहे. या दिवशी ते मिळणार नाही.”
26 Durante seis dias vocês podem recolhê-lo, mas, no sétimo dia, o sábado, nada acharão. "
27 पण काही लोक सातव्या दिवशी सुद्धा ते गोळा करावयाला बाहेर गेले. पण त्यांना काहीही सापडले नाही.
27 Apesar disso, alguns deles saíram no sétimo dia para recolhê-lo, mas não encontraram nada.
28 मग याहवेहने मोशेला म्हटले, “किती काळ तुम्ही माझे नियम व माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार?
28 Então o Senhor disse a Moisés: "Até quando vocês se recusarão a obedecer aos meus mandamentos e às minhas instruções?
29 हे लक्षात घ्या की याहवेहने तुम्हाला हा शब्बाथ दिलेला आहे; म्हणून सहाव्या दिवशी ते तुम्हाला दोन दिवसासाठी भाकर देतात. सातव्या दिवशी प्रत्येकाने ते जिथे आहेत तिथेच थांबावे; कोणीही बाहेर जाऊ नये.”
29 Vejam que o Senhor lhes deu o sábado; e por isso, no sexto dia, ele lhes dá pão para dois dias. No sétimo dia, fiquem todos onde estiverem; ninguém deve sair".
30 म्हणून लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.
30 Então o povo descansou no sétimo dia.
31 इस्राएली लोकांनी त्या भाकरीला मान्ना असे नाव दिले. ते धण्याच्या बीजाप्रमाणे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पापडीप्रमाणे होती.
31 O povo de Israel chamou maná àquele pão. Era branco como semente de coentro e tinha gosto de bolo de mel.
32 मोशे म्हणाला, “याहवेहने अशी आज्ञा दिली आहे: ‘एक ओमेर मान्ना घेऊन तो येणार्या पिढ्यांसाठी ठेवा, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणल्यावर रानामध्ये मी तुम्हाला खायला दिलेली भाकरी ते पाहू शकतील.’ ”
32 Disse Moisés: "O Senhor ordenou-lhes que recolham um jarro de maná e guardem-no para as futuras gerações, para que vejam o pão que lhes dei no deserto, quando os tirei do Egito".
33 मोशेने अहरोनाला सांगितले, “एक पात्र घे व त्यात एक ओमेर मान्ना घाल. मग तो पुढे येणार्या पिढ्यांसाठी याहवेहसमोर ठेव.”
33 Então Moisés disse a Arão: "Ponha numa vasilha a medida de um jarro de maná, e coloque-a diante do Senhor, para que seja conservado para as futuras gerações".
34 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे, अहरोनाने तो मान्ना कराराच्या पाट्यांबरोबर ठेवला, अशासाठी की तो राखून ठेवला जाईल.
34 Em obediência ao que o Senhor tinha ordenado a Moisés, Arão colocou o maná junto às tábuas da aliança, para ali ser guardado.
35 इस्राएली लोक स्थायिक असलेल्या भूमीवर येईपर्यंत, त्यांनी चाळीस वर्षे मान्ना खाल्ला; ते कनान देशाच्या सीमेवर पोहोचेपर्यंत त्यांनी मान्ना खाल्ला.
35 Os israelitas comeram maná durante quarenta anos, até chegarem a uma terra habitável; comeram maná até chegarem às fronteiras de Canaã.
36 (एक ओमेर हा एका एफाचा दहावा भाग आहे.)
36 ( O jarro é a décima parte de uma arroba. )
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.