Deuteronômio 32

marc (MARC)

1 अहो आकाशमंडळांनो, ऐका आणि मी बोलेन;

2 माझे शिक्षण तुमच्या कानावर पावसाच्या सरीप्रमाणे पडो,

3 मी याहवेहचे नाव जाहीर करेन.

4 तेच आमचे खडक आहेत, त्यांचे कार्य परिपूर्ण आहे.

5 ती आता त्यांची लेकरे राहिली नाहीत, कारण ती भ्रष्ट झाली आहेत;

6 अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो,

7 पूर्वीच्या काळातील दिवस आठवा;

8 जेव्हा सर्वोच्चांनी पृथ्वीवरील राष्ट्रांना त्यांचे वतन दिले,

9 कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती,

10 एका मरुभूमीत त्यांना ते भेटले

11 गरुडपक्षीण आपले घरटे हालविते

12 तसे फक्त याहवेहच याकोबाला चालवित होते;

13 याहवेहने त्याला देशातील उंचीवर स्वार केले,

14 त्यांनी त्याला कळपातील गाईंचे दही-दूध,

15 लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला;

16 त्यांनी परदेशी दैवतांच्या नादी लागून याहवेहला ईर्षेस पेटविले

17 जे परमेश्वर नाहीत अशा खोट्या दैवतांना अर्पणे वाहिली—

18 ज्या खडकाने तुम्हाला जन्म दिला, त्याचाच तुम्ही त्याग केला;

19 हे याहवेहने बघितले आणि त्यांनी त्यांना नाकारले

20 तेव्हा ते म्हणाले, “मी त्यांच्यापासून माझे मुख लपवेन,

21 जे देव नाहीत त्याद्वारे त्यांनी मला ईर्षेस पेटविले आहे

22 कारण माझा क्रोधाग्नी प्रदीप्त होत आहे,

23 “मी त्यांच्यावर संकटांची रास रचेन,

24 मी पाठविलेल्या दुष्काळाने ते दुर्बल होतील,

25 घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल;

26 मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार

27 पण मला शत्रूच्या फुशारक्यांची धास्ती वाटली,

28 ते एक असमंजस राष्ट्र आहे,

29 हे लोक सुज्ञ असते आणि जर त्यांना हे कळले असते तर किती बरे झाले असते,

30 हे कसे शक्य आहे, केवळ एक मनुष्य हजार लोकांचा,

31 कारण त्यांचा खडक आमच्या खडकासारखा नाही,

32 त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते,

33 त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष,

34 “यांना मी राखून ठेवलेले नाही काय,

35 सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन.

36 याहवेह आपल्या लोकांचा न्याय करतील,

37 मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत,

38 ज्या दैवतांनी त्यांच्या यज्ञातील चरबीचे सेवन केले

39 “आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे!

40 मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो

41 जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन

42 वधलेल्या व कैद केलेल्यांच्या रक्ताने,

43 अहो राष्ट्रांनो, त्यांच्या लोकांबरोबर जयजयकार करा,

44 मोशे नूनाचा पुत्र होशा सोबत आला आणि या गीताचे सर्व शब्द लोकांना ऐकू जातील असे म्हणून दाखविले.

45 जेव्हा मोशेने गीताचे हे सर्व शब्द सर्व इस्राएलींसमोर बोलून संपविले,

46 तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा.

47 कारण हे केवळ पोकळ शब्द नाहीत—तर ते तुमचे जीवन आहे. त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडे असलेला जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल जगाल.”

48 त्याच दिवशी याहवेह मोशेला म्हणाले,

49 “तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.

50 तुझा भाऊ अहरोन होर पर्वतावर मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला, तसा तू देखील नबो पर्वतावर चढून गेल्यावर व कनान देश पाहिल्यावर मरशील आणि आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील.

51 कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्‍याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.

52 तर तो देश तू दुरून पाहशील; पण मी जो देश इस्राएली लोकांना देणार आहे, त्यात तू प्रवेश करणार नाहीस.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Deuteronômio 32, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.