Gênesis 48
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVI
1 या गोष्टीनंतर “त्याचा बाप आजारी असल्याचे” कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला.
1 Algum tempo depois, disseram a José: "Seu pai está doente"; e ele foi vê-lo, levando consigo seus dois filhos, Manassés e Efraim.
2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला.
2 E anunciaram a Jacó: "Seu filho José veio vê-lo". Israel reuniu suas forças e assentou-se na cama.
3 मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
3 Então disse Jacó a José: "O Deus Todo-poderoso apareceu-me em Luz, na terra de Canaã, e ali me abençoou,
4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’
4 dizendo: ‘Eu o farei prolífero e o multiplicarei. Farei de você uma comunidade de povos e darei esta terra por propriedade perpétua aos seus descendentes’.
5 आणि आता, मी येथे मिसर देशास येण्यापूर्वी, मिसराच्या भूमीमध्ये जे तुझ्या पोटी जन्मलेले हे दोन पुत्र, माझे आहेत. तुझे हे दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम हे आता रऊबेन व शिमोन यांच्याप्रमाणेच माझे होतील.
5 "Agora, pois, os seus dois filhos que lhe nasceram no Egito, antes da minha vinda para cá, serão reconhecidos como meus; Efraim e Manassés serão meus, como são meus Rúben e Simeão.
6 त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील.
6 Os filhos que lhe nascerem depois deles serão seus; serão convocados sob o nome dos seus irmãos para receberem sua herança.
7 परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”
7 Quando eu voltava de Padã, para minha tristeza Raquel morreu em Canaã, quando ainda estávamos a caminho, a pouca distância de Efrata. Eu a sepultei ali, ao lado do caminho para Efrata, que é Belém".
8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले, तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे कोणाचे आहेत?”
8 Quando Israel viu os filhos de José, perguntou: "Quem são estes? "
9 योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “हे माझे पुत्र आहेत. हे मला देवाने येथे दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
9 Respondeu José a seu pai: "São os filhos que Deus me deu aqui". Então Israel disse: "Traga-os aqui para que eu os abençoe".
10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
10 Os olhos de Israel já estavam enfraquecidos por causa da idade avançada, e ele mal podia enxergar. Por isso José levou seus filhos para perto dele, e seu pai os beijou e os abraçou.
11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”
11 E Israel disse a José: "Nunca pensei que veria a sua face novamente, e agora Deus me concede ver também os seus filhos! "
12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरून काढून घेतले. ते पुत्र इस्राएलासमोर उभे राहिले व त्यांनी त्यास लवून नमन केले.
12 Em seguida, José os tirou do colo de Israel e curvou-se, rosto em terra.
13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
13 E José tomou os dois, Efraim à sua direita, perto da mão esquerda de Israel, e Manassés à sua esquerda, perto da mão direita de Israel, e os aproximou dele.
14 परंतु इस्राएलाने आपला उजवा हात पुढे केला आणि एफ्राइमाच्या, म्हणजे जो धाकटा मुलगा होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला. त्याने त्याच्या हातांची अदलाबदल करून ते उजवेडावे केले.
14 Israel, porém, estendeu a mão direita e a pôs sobre a cabeça de Efraim, embora este fosse o mais novo e, cruzando os braços, pôs a mão esquerda sobre a cabeça de Manassés, embora Manassés fosse o filho mais velho.
15 इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे,
15 E abençoou a José, dizendo: "Que o Deus, a quem serviram meus pais Abraão e Isaque, o Deus que tem sido o meu pastor em toda a minha vida até o dia de hoje,
16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”
16 o Anjo que me redimiu de todo o mal, abençoe estes meninos. Sejam eles chamados pelo meu nome e pelos nomes de meus pais Abraão e Isaque, e cresçam muito na terra".
17 आपल्या वडिलाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास ते आवडले नाही. तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरून काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावा म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात घेतला.
17 Quando José viu seu pai colocar a mão direita sobre a cabeça de Efraim, não gostou; por isso pegou a mão do pai, a fim de mudá-la da cabeça de Efraim para a de Manassés,
18 योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.”
18 e lhe disse: "Não, meu pai, este aqui é o mais velho; ponha a mão direita sobre a cabeça dele".
19 परंतु त्याचा वडिलाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
19 Mas seu pai recusou-se e respondeu: "Eu sei, meu filho, eu sei. Ele também se tornará um povo, também será grande. Apesar disso, seu irmão mais novo será maior do que ele, e seus descendentes se tornarão muitos povos".
20 त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हास एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’”
20 Assim, Jacó os abençoou naquele dia, dizendo: "O povo de Israel usará os seus nomes para abençoar uns aos outros: Que Deus faça a você como fez a Efraim e a Manassés! " E colocou Efraim à frente de Manassés.
21 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.
21 A seguir, Israel disse a José: "Estou para morrer, mas Deus estará com vocês e os levará de volta à terra de seus antepassados.
22 तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”
22 E a você, como alguém que está acima de seus irmãos, dou a região montanhosa que tomei dos amorreus com a minha espada e com o meu arco".
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 48, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.