Gênesis 49

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”

2 “याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका,

3 रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस,

4 परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत.

5 “शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत.

6 माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको;

7 त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात.

8 यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील.

9 यहूदा सिंहाचा छावा आहे.

10 शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही,

11 तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस,

12 त्याचे डोळे द्राक्षरसापेक्षा अधिक लालबुंद होतील.

13 जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल.

14 “इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये दबून बसला आहे.

15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे,

16 इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील.

17 तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे,

18 हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे.

19 गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल,

20 आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.

21 नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे.

22 योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे.

23 तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला.

24 तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील,

25 कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील,

26 तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील,

27 बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”

28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.

29 मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे,

30 ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.

31 अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.

32 ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.”

33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 49, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.