2 Reis 17

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 यहूदाचा राजा आहाज याच्या बाराव्या वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने नऊ वर्षे राज्य केले.
1 Oseias, filho de Elá, começou a reinar em Israel no décimo segundo ano do reinado de Acaz, rei de Judá. Reinou em Samaria por nove anos.
2 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच तो करत असे, पण त्याच्या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.
2 Fez o que era mau aos olhos do S enhor , mas não tanto quanto os reis que governaram Israel antes dele.
3 अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करून आला. तेव्हा होशे त्याचा दास बनला आणि त्याने त्यास खंडणी भरून दिली.
3 Salmaneser, rei da Assíria, atacou o rei Oseias e o obrigou a lhe pagar tributos.
4 पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले.
4 Oseias, porém, conspirou contra o rei da Assíria. Deixou de pagar o tributo anual e pediu ajuda a Sô, rei do Egito. Quando o rei da Assíria descobriu a traição de Oseias, mandou colocá-lo na prisão.
5 मग अश्शूरचा राजा सर्व देशावर चाल करून आला व शोमरोनावर चढून येऊन त्याने शोमरोनला तीन वर्षे वेढा घातला.
5 O rei da Assíria ocupou todo o território de Israel e, durante três anos, cercou a cidade de Samaria.
6 होशेच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्राएल लोकांस त्याने कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य लोकांच्या नगरात ठेवले.
6 Por fim, no nono ano do reinado de Oseias, o rei assírio conquistou Samaria e exilou os israelitas na Assíria. Criou assentamentos para eles em Hala, ao longo das margens do rio Habor, em Gozã, e nas cidades da Média.
7 परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरुध्द पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले.
7 Isso aconteceu porque os israelitas adoraram outros deuses. Pecaram contra o S enhor , seu Deus, que os havia tirado da terra do Egito e os livrado do poder do faraó, o rei do Egito.
8 आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएली लोकांपुढून हुसकावून लावली होती, त्यांच्या नियमांप्रमाणे आणि इस्राएलाच्या राजांनी जे नियम केले होतो त्याप्रमाणे ते चालत.
8 Seguiram as práticas das nações que o S enhor tinha expulsado de diante deles, bem como as práticas introduzidas pelos reis de Israel.
9 इस्राएल लोकांनी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या त्यांनी परमेश्वर देवाविरुध्द चोरुन केल्या. पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या नगरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थाने बांधली.
9 Os israelitas também fizeram, em segredo, muitas coisas que não eram corretas diante do S enhor , seu Deus. Construíram santuários idólatras em todas as cidades, desde o menor posto de vigilância até a maior cidade murada.
10 प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतीस्तंभ आणि अशेरा देवीचे खांब उभारले.
10 Ergueram colunas sagradas e postes de Aserá no alto de todo monte e debaixo de toda árvore verdejante.
11 आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती, त्यांच्यासारखेच त्यांनी उंचस्थानावर धूप जाळला आणि परमेश्वरास संताप येईल आशाप्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला.
11 Queimaram incenso no topo dos montes, como faziam as nações que o S enhor havia expulsado de diante deles. Os israelitas praticaram muitos atos perversos que provocaram a ira do S enhor .
12 त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “त्यांची सेवा कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.
12 Adoraram ídolos, apesar das advertências claras do S enhor contra isso.
13 इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.”
13 Repetidamente, o S enhor enviou profetas e videntes para advertirem Israel e Judá, com esta mensagem: “Afastem-se de seus maus caminhos. Obedeçam a meus mandamentos e decretos, a toda a lei que ordenei a seus antepassados e que lhes entreguei por meio de meus servos, os profetas”.
14 पण त्यांनी काही एकले नाही. उलट आपल्या पूर्वजांसारखाच, ज्यांचा परमेश्वर आपला देव याच्यावर विश्वास नव्हता हट्टीपणा केला.
14 Mas os israelitas se recusaram a ouvir. Foram tão teimosos quanto seus antepassados que não quiseram crer no S enhor , seu Deus.
15 परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते.
15 Rejeitaram seus decretos e a aliança que ele havia feito com seus antepassados e desprezaram todas as suas advertências. Adoraram ídolos inúteis, de modo que eles próprios se tornaram inúteis. Seguiram o exemplo das nações ao redor e desobedeceram à ordem do S enhor para que não as imitassem.
16 आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली.
16 Rejeitaram todos os mandamentos do S enhor , seu Deus, e fizeram dois bezerros de metal. Ergueram um poste de Aserá e adoraram Baal e todos os astros do céu.
17 त्यांनी आपल्या मुला व मुलींना ही अग्नीत होम करून अर्पिली. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि ज्योतिषी यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला.
17 Chegaram a sacrificar os próprios filhos e filhas no fogo. Consultaram adivinhos, praticaram feitiçaria, venderam-se para fazer o que é mau aos olhos do S enhor e provocaram sua ira.
18 म्हणून परमेश्वर इस्राएलवर फार संतापला आणि त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवले, फक्त यहूदा वंश सोडून कोणी उरले नाही.
18 O S enhor se indignou muito com Israel e o expulsou de sua presença. Com isso, restou somente a tribo de Judá.
19 यहूदाने देखील परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. याउलट इस्राएलांनी जे नियम केले त्याचे त्यांनी अनुसरण केले.
19 Mesmo o povo de Judá, porém, não obedeceu aos mandamentos do S enhor , seu Deus, pois seguiu as práticas perversas introduzidas por Israel.
20 त्यामुळे परमेश्वराने सर्व इस्राएल वंशजांचा त्याग केला व त्यांना आपणासमोरून हाकलून दृष्टीआड करेपर्यंत, त्याने त्यांना पीडा देऊन लुटारुंच्या हाती दिले.
20 O S enhor rejeitou todos os descendentes de Israel. Como castigo, entregou-os a seus inimigos, até que expulsou Israel de sua presença.
21 त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्राएल फाडून काढला, तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्राएलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले.
21 Pois quando o S enhor arrancou Israel do reino de Davi, os israelitas escolheram Jeroboão, filho de Nebate, como rei. Mas Jeroboão afastou Israel do S enhor e os levou a cometer grande pecado.
22 यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही.
22 E os israelitas continuaram a seguir todos os caminhos maus de Jeroboão. Não se afastaram desses pecados,
23 अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथे आहेत.
23 até que, por fim, o S enhor os expulsou de sua presença, como todos os seus profetas haviam advertido. Assim, Israel foi deportado de sua terra para a Assíria, onde permanece até hoje.
24 अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्राएली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले.
24 O rei da Assíria trouxe povos da Babilônia, de Cuta, de Ava, de Hamate e de Sefarvaim e os estabeleceu nas cidades de Samaria, em lugar dos israelitas. Eles tomaram posse de Samaria e habitaram em suas cidades.
25 आणि असे झाले की ते तेथे वस्ती करून राहू लागले, तेव्हा ते परमेश्वराचा मान राखत नव्हते. म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह सोडले. त्यांनी त्यांच्यातील कित्येकांचा बळी घेतला.
25 Assim que chegaram, esses estrangeiros não adoravam o S enhor , de modo que o S enhor mandou leões, que mataram alguns deles.
26 मग ते अश्शूरच्या राजाला म्हणाले, “जी राष्ट्रे तू नेऊन शोमरोनमधल्या नगरात वसवले, त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. आणि पाहा, सिंह त्या लोकांस मारून टाकत आहे, कारण त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम माहित नाही.”
26 Por isso, enviaram uma mensagem ao rei da Assíria: “O povo que o senhor deportou para as cidades de Samaria não conhece os costumes do deus da terra. Ele mandou leões para destruí-los, porque não conhecem suas exigências”.
27 तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “जे याजक तुम्ही तेथून आणले आहेत, त्यातील कोणाएकाला तिथे घेऊन जा. आणि त्यास तिथे राहू द्यावे व त्यांनी त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम शिकवावा.
27 Então o rei da Assíria deu esta ordem: “Enviem um dos sacerdotes exilados de volta a Samaria. Ele viverá ali e ensinará aos novos habitantes os costumes do deus da terra”.
28 तेव्हा, शोमरोनमधून जे याजक त्यांनी नेले होते, त्यापैकी एकजण बेथेल येथे राहिला. आणि त्याने लोकांस परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.”
28 Um dos sacerdotes exilados de Samaria voltou a Betel e ensinava os novos habitantes a adorarem corretamente o S enhor .
29 परंतू प्रत्येक राष्ट्राने स्वत:चे देव केले, आणि त्यांना शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पूजास्थळामध्ये ठेवले. प्रत्येक राष्ट्राने स्वत:च्या राहण्याच्या नगरात असेच केले.
29 Contudo, cada um desses povos estrangeiros continuou a fazer seus deuses e adorá-los. Em todas as cidades onde habitavam, colocaram seus ídolos nos santuários idólatras que o povo de Samaria havia construído.
30 बाबेल लोकांनी सुक्कोथ-बनोथ ही दैवते केली; कूथातील लोकांनी नेरगल केला; हमाथमधील लोकांनी अशीमा केली,
30 Os da Babilônia adoravam as imagens do deus Sucote-Benote. Os de Cuta adoravam o deus Nergal. Os de Hamate adoravam o deus Asima.
31 अव्वी यांनी निभज आणि तर्ताक केले. सफरवाईम यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्यासाठी आपल्या मुलांचा अग्नीत बली दिला.
31 Os aveus adoravam os deuses Nibaz e Tartaque. E o povo de Sefarvaim até queimava os próprios filhos como sacrifício aos deuses Adrameleque e Anameleque.
32 ते परमेश्वराविषयी आदर बाळगत तरी, उंचस्थानातील पूजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत.
32 Esses novos habitantes adoravam o S enhor , mas também nomeavam qualquer pessoa como sacerdote para oferecer sacrifícios nos lugares de culto.
33 ते परमेश्वराविषयी आदर बाळगत असत आणि आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रा प्रमाणे जेथून त्यांना आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते करीत गेले.
33 E, embora adorassem o S enhor , continuavam a seguir seus próprios deuses, de acordo com os costumes de suas nações de origem.
34 आजही ते लोक त्यांच्या पूर्वीच्या चालीरीतीला चिटकून आहेत. ते परमेश्वराचा आदर बाळगत नसत व ज्याचे नाव इस्राएल ठेवले, त्या याकोबाच्या वंशजास त्याने दिलेल्या आज्ञा, नियम, न्याय व नियमशास्त्र यांप्रमाणे ते आचरण करीत नाही.
34 Até hoje, continuam com suas antigas práticas em vez de adorar verdadeiramente o S enhor e obedecer aos decretos, estatutos, leis e mandamentos que o S enhor deu aos descendentes de Jacó, cujo nome ele mudou para Israel.
35 परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका, आणि त्यांच्या पाया ही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका.
35 Pois o S enhor havia feito uma aliança com eles e ordenado: “Não adorem outros deuses, nem se prostrem diante deles, não os sirvam, nem lhes ofereçam sacrifícios.
36 फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा.
36 Adorem somente o S enhor , que os tirou do Egito com grande força e com braço poderoso. Curvem-se somente diante dele e ofereçam sacrifícios a ele somente.
37 त्याने तुम्हास ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांचे भय धरता कामा नये.
37 Tomem sempre o cuidado de obedecer aos decretos, estatutos, leis e mandamentos que ele lhes prescreveu. Não adorem outros deuses.
38 मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका.
38 Não se esqueçam da aliança que fiz com vocês e não adorem outros deuses.
39 फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हास सर्व संकटातून सोडवील.”
39 Adorem somente o S enhor , seu Deus. Ele os livrará de todos os seus inimigos”.
40 पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले.
40 Mas o povo se recusou a ouvir e continuou com suas antigas práticas.
41 आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वत:च्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुलेबाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.
41 Assim, embora os novos habitantes adorassem o S enhor , também adoravam seus ídolos. E até hoje seus descendentes fazem a mesma coisa.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Reis 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.