Salmos 78
Marathi Bible (GL_MARATHI) vs NVT
NVT Nova Versão Transformadora
1 लोकहो! माझी शिकवण ऐका, मी काय सांगतो ते ऐका!
1 Ó meu povo, ouça minhas instruções! Abra os ouvidos para o que direi,
2 मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन. मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन.
2 pois lhe falarei por meio de parábola. Ensinarei enigmas de nosso passado,
3 आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती.
3 histórias que ouvimos e conhecemos, que nossos antepassados nos transmitiram.
4 आणि आम्ही ती विसरणार नाही. आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील. आम्ही परमेश्वराची स्तुती करु आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू.
4 Não esconderemos essas verdades de nossos filhos; contaremos à geração seguinte os feitos gloriosos do S seu poder e suas maravilhas.
5 परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला. देवाने इस्राएलला कायदा दिला. देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या. त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला.
5 Pois ele estabeleceu seus preceitos a Jacó, deu sua lei a Israel. Ordenou a nossos antepassados que a ensinassem a seus filhos,
6 नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल.
6 para que a geração seguinte, os filhos ainda por nascer, a conhecesse, e eles, por sua vez, a ensinarão a seus filhos.
7 म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील. देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत. ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील.
7 Portanto, cada geração deve pôr sua esperança em Deus, não esquecer seus poderosos feitos e obedecer a seus mandamentos.
8 जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत. त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले. त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले. ते लोक फार हट्ी होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते.
8 Assim, não serão como seus antepassados, teimosos, rebeldes e infiéis, que se recusaram a confiar em Deus de todo o coração.
9 एफ्राइमच्या लोकांजवळ शस्त्रे होती. परंतु ते रणांगणावरुन पळून गेले.
9 Os guerreiros de Efraim, embora armados de arcos, deram meia-volta e fugiram no dia da batalha.
10 त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही. त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.
10 Não cumpriram a aliança de Deus, não quiseram viver de acordo com sua lei.
11 एफ्राईमचे लोक देवाने केलेल्या महान गोष्टी विसरले. देवाने दाखवलेल्या अद्भुत गोष्टी ते विसरले.
11 Esqueceram o que ele havia feito, as maravilhas que lhes tinha mostrado,
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात देवाने त्यांच्या वाडवडिलांना त्याची महान शक्ती दाखवली.
12 os milagres que realizara para seus antepassados na planície de Zoã, na terra do Egito.
13 देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले. पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
13 Pois ele dividiu o mar e os conduziu na travessia; fez as águas se erguerem como muralhas.
14 देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा व रात्री अग्रीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
14 Durante o dia, os guiava com uma nuvem, durante a noite, com a luz do fogo.
15 देवाने वाळवंटात पाषाण फोडला त्याने लोकांना पृथ्वीच्या गर्भातून पाणी दिले.
15 No deserto, partiu as rochas para lhes dar água, como a que jorra de um manancial.
16 देवाने खडकातून नदीसारखे खळखळणारे पाणी बाहेर आणले.
16 Da pedra, fez brotar riachos e correr água como um rio.
17 परंतु लोकांनी देवाविरुध्द पाप करणे चालूच ठेवले. ते वाळवंटात सुध्दा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या विरुध्द गेले.
17 Ainda assim, continuaram a pecar contra ele e se rebelaram contra o Altíssimo no deserto.
18 नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
18 Puseram Deus à prova em seu coração e exigiram a comida que tanto queriam.
19 त्यांनी देवाविरुध्द तक्रारी केल्या. ते म्हणाले, “देव आम्हांला वाळवंटात अन्न देऊ शकेल का?
19 Chegaram a falar contra o próprio Deus, dizendo: “Deus não é capaz de nos dar comida no deserto.
20 त्याने दगडाला प्रहार केला आणि त्यातून पुरासारखे पाणी बाहेर येऊ लागले तो आम्हांला भाकरी आणि मांस नक्च देईल.”
20 Sim, ele pode bater numa rocha e dela fazer brotar água, mas não é capaz de dar pão e carne a seu povo”.
21 त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले. देव याकोबावर फार रागावला देव इस्राएलवर फार रागावला.
21 Quando o S enhor os ouviu, se enfureceu; o fogo de sua ira ardeu contra Jacó. Sim, sua ira se levantou contra Israel,
22 का? कारण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. देव त्यांना वाचवील यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
22 pois não creram em Deus nem confiaram em seu cuidado.
23 पण नंतर देवाने ढग बाजूला केले आणि त्यातून त्याने त्यांच्यावर अन्नासाठी मान्नाचा वर्षाव केला. आकाशाचे दरवाजे उघडावेत तसा हा प्रकार होता आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला.
23 Apesar disso, ele deu ordem às nuvens; abriu as portas dos céus.
24 लोकांनी देवदूताचे अन्न खाल्ले. देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले.
24 Fez chover maná para alimentá-los; deu-lhes pão dos céus.
25 देवाने पूर्वेकडचा घोंगावणारा वारा पाठवला आणि त्यांच्यावर लावे पक्षी पावसाप्रमाणे कोसळले देवाने दक्षिणेकडून वारा वाहायला लावला आणि निळे आकाश काळे झाले कारण आकाशात खूप पक्षी होते.
25 Eles comeram o pão dos anjos; receberam comida à vontade.
26 ते पक्षी छावणीच्या अगदी मध्य भागी, त्या लोकांच्या तंबूच्या अवती भोवती पडले.
26 Ele enviou dos céus o vento do leste e, por seu poder, guiou o vento do sul.
27 त्यांच्याकडे भरपूर खायला होते परंतु त्यांनी त्यांच्या भुकेलाच पाप करायला लावले.
27 Fez chover carne como se fosse pó, muitas e muitas aves, como a areia da praia.
28 त्यांना त्यांची भूक आवरली नाही, म्हणून त्यांनी ते पक्षी रक्त काढल्याशिवायच खाल्ले.
28 Fez as aves caírem dentro do acampamento, ao redor de suas tendas.
29 देव त्यांच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांतल्या अनेकांना मारुन टाकले. त्यातल्या अनेक निरोगी तरुण माणसांना देवाने मारले.
29 O povo comeu à vontade; ele atendeu ao desejo deles.
30 परंतु लोकांनी पुन्हा पाप केले. देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांवर ते अवलंबून राहिले नाहीत.
30 Mas, antes que estivessem satisfeitos, enquanto ainda tinham comida na boca,
31 म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे आयुष्य भयानक संकटात संपवले.
31 a ira de Deus se levantou contra eles. Ele matou seus homens mais fortes; feriu mortalmente os jovens de Israel.
32 देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले. ते देवाकडे धावत परतले.
32 Ainda assim, continuaram a pecar; não confiaram em Deus, apesar de suas maravilhas.
33 देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली. सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.
33 Por isso, reduziu a vida deles a um sopro e fez seus dias terminarem em terror.
34 आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले, ते मनापासून बोलत नव्हते.
34 Quando Deus começou a matá-los, finalmente o buscaram; arrependeram-se e levaram Deus a sério.
35 त्यांचे मन खरोखरच देवाजवळ नव्हते. ते कराराशी प्रामाणिक नव्हते.
35 Então lembraram que Deus era sua rocha, que o Deus Altíssimo
36 परंतु देव दयाळू होता. देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. देवाने अनेक वेळा स्व:तचा राग आवरला. त्याने स्व:तला खूप राग येऊ दिला नाही.
36 Contudo, foi só da boca para fora; mentiram para ele com os lábios.
37 ती केवळ माणसेच आहेत याची देवाने आठवण ठेवली. लोक वाऱ्याप्रमाणे आहेत. तो वाहातो आणि ओसरतो.
37 Pois o coração não era leal a Deus; não foram fiéis à sua aliança.
38 त्या लोकांनी वाळवंटात देवाला अनेक संकटांत टाकले त्यांनी त्याला खूप दु:खी केले.
38 E, no entanto, ele foi misericordioso; perdoou seus pecados e não os destruiu. Muitas vezes conteve sua ira e não se enfureceu contra eles.
39 मग लोकांनी पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली, त्यांनी इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला खूप दु:ख दिले.
39 Pois se lembrou de que eram simples mortais; passam como o vento, que não volta mais.
40 ते लोक देवाची शक्ती विसरले. देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले.
40 Quantas vezes se rebelaram contra ele no deserto e o entristeceram naquela terra desolada!
41 मिसर देशातल्या चमत्कारा बाबत ते विसरले. सीअन प्रांतातला चमत्कारही ते विसरले.
41 Repetidamente, puseram Deus à prova e provocaram o Santo de Israel.
42 देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले. मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.
42 Não se recordaram do seu poder, nem do dia em que ele os resgatou de seus inimigos.
43 देवाने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले. ते मिसरमधल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले. त्यांनी मिसरमधल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला.
43 Não se lembraram dos sinais que ele fizera no Egito, das maravilhas realizadas na planície de Zoã.
44 देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली केली आणि इतर झाडांवर टोळ धाड पाठवली.
44 Ele transformou os rios em sangue, para que ninguém bebesse de suas águas.
45 देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने बफर्ाचा उपयोग केला.
45 Enviou enxames de moscas para devorá-los e rãs para destruí-los.
46 देवाने गारांच्या वर्षावाने त्यांच्या प्राण्यांचा नाश केला आणि त्यांच्या पशुधनावर त्याने वीज पाडली.
46 Entregou suas plantações às lagartas e suas colheitas, aos gafanhotos.
47 देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला. त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.
47 Destruiu as videiras com granizo e as figueiras, com geadas.
48 देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला. त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही. त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले.
48 Entregou seu gado à chuva de pedras e seus rebanhos, aos raios.
49 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारुन टाकले. त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले.
49 Lançou sobre eles sua ira ardente, sua fúria, indignação e hostilidade. Enviou contra eles muitos anjos destruidores.
50 नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले. त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
50 Voltou sua ira contra eles; não lhes poupou a vida, mas os devastou com a peste.
51 त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही. देवाने त्यांच्या शत्रूंना लाल समुद्रात बुडविले.
51 Matou todos os filhos mais velhos do Egito, a flor da juventude na terra de Cam.
52 देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
52 Mas conduziu seu povo como um rebanho de ovelhas e os guiou em segurança pelo deserto.
53 देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले. देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला. देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्व:तचे घर दिले.
53 Manteve-os a salvo, e não tiveram medo; o mar cobriu seus inimigos.
54 परंतु त्यांनी सर्वशक्तिमान देवाची परीक्षा घेतली आणि त्याचे त्याला खूप वाईट वाटले. त्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
54 Levou o povo até a fronteira de sua terra santa, à região montanhosa que para eles conquistou.
55 इस्राएलाच्या लोकांनी देवाकडे पाठ फिरवली. जसे त्याचे पूर्वज त्याच्याविरुध्द गेले तसेच ते त्याच्या विरुध्द गेले. ते वाकवलेल्या धनुष्याप्रमाणे अतिशय वाईट होते.
55 Diante deles expulsou as nações e repartiu entre eles sua herança; estabeleceu as tribos de Israel em seus lugares.
56 इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले. त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.
56 Ainda assim, continuaram a pôr à prova o Deus Altíssimo e a se rebelar contra ele; não obedeceram a seus preceitos.
57 देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला, देवाने इस्राएलला पूर्णपणे झिडकारले.
57 Voltaram atrás e foram infiéis, como seus antepassados; mostraram-se indignos de confiança, como um arco defeituoso.
58 देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला. देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला.
58 Provocaram a ira de Deus ao construir altares para outros deuses; com seus ídolos, despertaram nele ciúmes.
59 देवाने इतर देशांना त्याच्या माणसांना पकडू दिले. शत्रूनी देवाचे “सुंदर रत्न” घेतले.
59 Quando Deus os ouviu, se enfureceu e rejeitou por completo Israel.
60 देवाने त्याच्या माणसांवरचा त्याचा राग व्यक्त केला, त्याने त्यांना युध्दात मरु दिले.
60 Abandonou sua habitação em Siló, o tabernáculo onde vivia no meio do povo.
61 तरुण माणसे जळून मेली आणि ज्या मुलींशी ते लग्र करणार होते त्यांनी विवाहाची गाणी म्हटली नाहीत.
61 Deixou que a arca de seu poder fosse capturada, entregou sua glória nas mãos de inimigos.
62 याजक मारले गेले पण विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
62 Permitiu que seu povo fosse morto à espada, pois se enfureceu com eles, sua propriedade.
63 शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा, खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.
63 Os jovens foram consumidos pelo fogo, e as moças não puderam entoar canções de núpcias.
64 देवाने त्याच्या शत्रूंना माघार घ्यायला भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला. देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली.
64 Os sacerdotes foram mortos à espada, e as viúvas não puderam lamentar as mortes.
65 परंतु देवाने योसेफाच्या कुटुंबाला झिडकारले, देवाने एफ्राईमच्या कुटुंबाचा स्वीकार केला नाही.
65 Então o Senhor se levantou, como de um sono, como o guerreiro que desperta da embriaguez.
66 नाही, देवाने यहुदाच्या कुटुंबाला निवडले, देवाने त्याच्या आवडत्या सियोन पर्वताची निवड केली.
66 Fez os inimigos recuarem e os entregou à vergonha para sempre.
67 देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले. देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले.
67 Rejeitou, porém, os descendentes de José; não escolheu a tribo de Efraim.
68 देवाने दावीदला स्व:तचा खास सेवक म्हणून निवडले. दावीद मेंढ्यांच्या वाड्यांचे रक्षण करीत होता. परंतु देवाने त्याला त्याच्या कामापासून दूर नेले.
68 Antes, escolheu a tribo de Judá, o monte Sião, que ele amou.
69 दावीद मेंढ्यांची काळजी घेत होता. परंतु देवाने त्याला त्या कामापासून दूर नेले. देवाने दावीदला त्याच्या माणसांकडे, याकोबाच्या माणसांकडे, इस्राएलाच्या माणसांकडे आणि देवाच्या मालमत्तेकडे लक्ष देण्याचे काम करायला सांगितले.
69 Ali construiu seu santuário, alto como os céus, firme e duradouro como a terra.
70 आणि दावीदने त्यांना शुध्द मनाने मार्ग दाखवला, त्याने त्याना शहाणपणाने मार्ग दाखवला.
70 Escolheu Davi, seu servo, e dos currais o chamou.
71 — ausente —
71 Tirou-o do pastoreio de ovelhas e cordeiros e tornou-o pastor dos descendentes de Jacó, o povo que a Deus pertence, Israel.
72 — ausente —
72 Com coração sincero, Davi cuidou deles e os conduziu com sensatez.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Salmos 78, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.