Provérbios 31
Marathi Bible (GL_MARATHI) vs ARIB
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 ही लमुएल राजाची नीतिसूत्रे आहेत त्याच्या आईने त्याला या गोष्टी शिकवल्या.
1 As palavras do rei Lemuel, rei de Massá, que lhe ensinou sua mãe.
2 तू माझा मुलगा आहेस. मी प्रेम करत असलेला मुलगा. ज्यासाठी मी प्रार्थना केली होती तोच मुलगा तू आहेस.
2 Que te direi, filho meu? e que te direi, ó filho do meu ventre? e que te direi, ó filho dos meus votos?
3 तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस.
3 Não dês às mulheres a tua força, nem os teus caminhos às que destroem os reis.
4 लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. मद्याची इच्छा धरणे हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते.
4 Não é dos reis, ó Lemuel, não é dos reis beber vinho, nem dos príncipes desejar bebida forte;
5 ते कदाचित् खूप पितील आणि कायदा काय म्हणतो ते विसरुन जातील. नंतर ते गरीबांचे सर्व हक्क काढून घेतील.
5 para que não bebam, e se esqueçam da lei, e pervertam o direito de quem anda aflito.
6 गरीब लोकांना मद्य द्या. जे लोक संकटात आहेत त्यांना द्राक्षारस द्या.
6 Dai bebida forte ao que está para perecer, e o vinho ao que está em amargura de espírito.
7 ते नंतर पितील आणि ते गरीब आहेत हे विसरुन जातील. ते पितील आणि त्यांची सर्व संकटे विसरतील.
7 Bebam e se esqueçam da sua pobreza, e da sua miséria não se lembrem mais.
8 जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.
8 Abre a tua boca a favor do mudo, a favor do direito de todos os desamparados.
9 ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा.
9 Abre a tua boca; julga retamente, e faze justiça aos pobres e aos necessitados.
10 सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे. पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे.
10 Álefe. Mulher virtuosa, quem a pode achar? Pois o seu valor muito excede ao de jóias preciosas.
11 तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो. तो कधीही गरीब होणार नाही.
11 Bete. O coração do seu marido confia nela, e não lhe haverá falta de lucro.
12 ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते. ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही.
12 Guímel. Ela lhe faz bem, e não mal, todos os dias da sua vida.
13 ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात मग्न असते.
13 Dálete. Ela busca lã e linho, e trabalha de boa vontade com as mãos.
14 ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते. ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते.
14 Hê. É como os navios do negociante; de longe traz o seu pão.
15 ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते.
15 Vave. E quando ainda está escuro, ela se levanta, e dá mantimento à sua casa, e a tarefa às suas servas.
16 ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.
16 Zaine. Considera um campo, e compra-o; planta uma vinha com o fruto de suas mãos.
17 ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे. आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे.
17 Hete. Cinge os seus lombos de força, e fortalece os seus braços.
18 तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो. आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते.
18 Tete. Prova e vê que é boa a sua mercadoria; e a sua lâmpada não se apaga de noite.
19 ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते.
19 Iode. Estende as mãos ao fuso, e as suas mãos pegam na roca.
20 ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते.
20 Cafe. Abre a mão para o pobre; sim, ao necessitado estende as suas mãos.
21 जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात.
21 Lâmede. Não tem medo da neve pela sua família; pois todos os da sua casa estão vestidos de escarlate.
22 ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते.
22 Meme. Faz para si cobertas; de linho fino e de púrpura é o seu vestido.
23 लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात. तो देशाचा एक नेता असतो.
23 Nune. Conhece-se o seu marido nas portas, quando se assenta entre os anciãos da terra.
24 ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते.
24 Sâmerue. Faz vestidos de linho, e vende-os, e entrega cintas aos mercadores.
25 ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात ती भविष्याबद्दल विश्वास आहे.
25 Aine. A força e a dignidade são os seus vestidos; e ri-se do tempo vindouro.
26 ती शहाणपणाचे बोल बोलते. ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते.
26 Pê. Abre a sua boca com sabedoria, e o ensino da benevolência está na sua língua.
27 ती कधीही आळशी नसते. ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते.
27 Tsadê. Olha pelo governo de sua casa, e não come o pão da preguiça.
28 तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात. तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो,
28 Côfe. Levantam-se seus filhos, e lhe chamam bem-aventurada, como também seu marido, que a louva, dizendo:
29 “चांगल्या स्त्रिया खूप आहेत. पण तू सर्वांत चांगली आहेस.”
29 Reche. Muitas mulheres têm procedido virtuosamente, mas tu a todas sobrepujas.
30 मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल. पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशांसा केली पाहिजे.
30 Chine. Enganosa é a graça, e vã é a formosura; mas a mulher que teme ao Senhor, essa será louvada.
31 तिला साजेसे बक्षीस तिला द्या. लोकांमध्ये तिची प्रशंसा करा. तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा.
31 Tau. Dai-lhe do fruto das suas mãos, e louvem-na nas portas as suas obras.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Provérbios 31, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.