2 Samuel 22
Marathi Bible (GL_MARATHI) vs ARIB
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून देवाने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले.
1 Davi dirigiu ao Senhor as palavras deste cântico, no dia em que o Senhor o livrou das mãos de todos os seus inimigos e das mãos de Saul, dizendo:
2 परमेश्वर हा माझा दुर्ग माझा गड माझ्या सुरक्षिततेचा आधार
2 O Senhor é o meu rochedo, a minha fortaleza e o meu libertador.
3 तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
3 É meu Deus, a minha rocha, nele confiarei; é o meu escudo, e a força da minha salvação, o meu alto retiro, e o meu refúgio. O meu Salvador; da violência tu me livras.
4 त्यांनी माझी चेष्टा केली. पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
4 Ao Senhor invocarei, pois é digno de louvor; assim serei salvo dos meus inimigos.
5 (शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता) मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
5 As ondas da morte me cercaram, as torrentes de Belial me atemorizaram.
6 कबरीचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
6 Cordas do Seol me cingiram, laços de morte me envolveram.
7 तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो. देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
7 Na minha angústia invoquei ao Senhor; sim, a meu Deus clamei; do seu templo ouviu ele a minha voz, e o meu clamor chegou aos seus ouvidos.
8 तेव्हा धरती डळमळली, हादरली स्वर्गाचा पाया थरथरला कारण देवाचा कोप झाला होता.
8 Então se abalou e tremeu a terra, os fundamentos dos céus se moveram; abalaram-se porque ele se irou.
9 त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.
9 Das suas narinas subiu fumaça, e da sua boca um fogo devorador, que pôs carvões em chamas.
10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काव्व्याकुटृ ढगावर उभा राहिला.
10 Ele abaixou os céus, e desceu; e havia escuridão debaixo dos seus pés.
11 करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. वाऱ्यावर स्वार झाला होता.
11 Montou num querubim, e voou; apareceu sobre as asas do vento.
12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
12 E por tendas pôs trevas ao redor de si, ajuntamento de águas, espessas nuvens do céu.
13 त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की निखारे धगधगू लागले.
13 Pelo resplendor da sua presença acenderam-se brasas de fogo.
14 परमेश्वर आकाशातून गरजला त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला
14 Do céu trovejou o Senhor, o Altíssimo fez soar a sua voz.
15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले
15 Disparou flechas, e os dissipou; raios, e os desbaratou.
16 परमेश्वरा, तुझ्या घनगंभीर आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या उच्छ्वासाने (समुद्राचे पाणीही मागे हटले) समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
16 Então apareceram as profundezas do mar; os fundamentos do mundo se descobriram, pela repreensão do Senhor, pelo assopro do vento das suas narinas.
17 मला परमेश्वराने आधार दिला वरुन तो खाली आला. मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
17 Estendeu do alto a sua mão e tomou-me; tirou-me das muitas águas.
18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता पण परमेश्वराने मला वाचवले.
18 Livrou-me do meu possante inimigo, e daqueles que me odiavam; porque eram fortes demais para mim.
19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण देवाने मला आधार दिला.
19 Encontraram-me no dia da minha calamidade, porém o Senhor se fez o meu esteio.
20 परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
20 Conduziu-me para um lugar espaçoso; livrou-me, porque tinha prazer em mim.
21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
21 Recompensou-me o Senhor conforme a minha justiça; conforme a pureza e minhas mãos me retribuiu.
22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही आपराध मी केला नाही.
22 Porque guardei os caminhos do Senhor, e não me apartei impiamente do meu Deus.
23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
23 Pois todos os seus preceitos estavam diante de mim, e dos seus estatutos não me desviei.
24 माझे आचरण शुध्द आणि निर्दोष आहे.
24 Fui perfeito para com ele, e guardei-me da minha iniqüidade.
25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.
25 Por isso me retribuiu o Senhor conforme a minha justiça, conforme a minha pureza diante dos meus olhos.
26 एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करु. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
26 Para com o benigno te mostras benigno; para com o perfeito te mostras perfeito,
27 परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि बदमाशांशी तूही कुटिलतेने वागतोस.
27 para com o puro te mostras puro, mas para com o perverso te mostras avesso.
28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस
28 Livrarás o povo que se humilha, mas teus olhos são contra os altivos, e tu os abaterás.
29 परमेश्वरा, तू माझा दीप आहेस माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस
29 Porque tu, Senhor, és a minha candeia; e o Senhor alumiará as minhas trevas.
30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करु शकतो. देवाच्या मदतीनेचमी शत्रूंची भिंतसुध्दा पार करु शकतो.
30 Pois contigo passarei pelo meio dum esquadrão; com o meu Deus transporei um muro.
31 देवाची सत्ता सर्वंकष आहे. देवाचे वचन कसोटीला उतरलेले आहे. जे त्याच्यावर भरवसा टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
31 Quanto a Deus, o seu caminho é perfeito, e a palavra do Senhor é fiel; é ele o escudo de todos os que nele se refugiam.
32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्क म दुर्ग कोण?
32 Pois quem é Deus, senão o Senhor? e quem é rocha, senão o nosso Deus?
33 देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांना तो आपल्या मार्गाने नेतो.
33 Deus é a minha grande fortaleza; e ele torna perfeito o meu caminho.
34 देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो उच्च स्थानावर तो मला अढक ठेवतो.
34 Faz ele os meus pés como os das gazelas, e me põe sobre as minhas alturas.
35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करु शकतात.
35 Ele instrui as minhas mãos para a peleja, de modo que os meus braços podem entesar um arco de bronze.
36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
36 Também me deste o escudo da tua salvação, e tua brandura me engrandece.
37 माझ्या पायांत बळ दे म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.
37 Alargaste os meus passos debaixo de mim, e não vacilaram os meus artelhos.
38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
38 Persegui os meus inimigos e os destruí, e nunca voltei atrás sem que os consumisse.
39 त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.
39 Eu os consumi, e os atravessei, de modo que nunca mais se levantaram; sim, cairam debaixo dos meus pés.
40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.
40 Pois tu me cingiste de força para a peleja; prostraste debaixo de mim os que se levantaram contra mim.
41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणजे मी त्यांच्यावर वार करु शकेन.
41 Fizeste que me voltassem as costas os meus inimigos, aqueles que me odiavam, para que eu os destruísse.
42 शत्रू मदतीसाठी याचना करु लागले पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी देवाचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
42 Olharam ao redor, mas não houve quem os salvasse; clamaram ao Senhor, mas ele não lhes respondeu.
43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखे ते क:पदार्थ बनले. त्यांचा मी चेंदामेंदा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
43 Então os moí como o pó da terra; como a lama das ruas os trilhei e dissipei.
44 माझ्यावर जे चाल करुन आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस.ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
44 Também me livraste das contendas do meu povo; guardaste-me para ser o cabeça das nações; um povo que eu não conhecia me serviu.
45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात, जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
45 Estrangeiros, com adulação, se submeteram a mim; ao ouvirem de mim, me obedeceram.
46 भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
46 Os estrangeiros desfaleceram e, tremendo, sairam os seus esconderijos.
47 परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
47 O Senhor vive; bendita seja a minha rocha, e exaltado seja Deus, a rocha da minha salvação,
48 त्यानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांना माझ्या शासनामध्ये ठेवले.
48 o Deus que me deu vingança, e sujeitou povos debaixo de mim,
49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.
49 e me tirou dentre os meus inimigos; porque tu me exaltaste sobre os meus adversários; tu me livraste do homem violento.
50 म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
50 Por isso, ó Senhor, louvar-te-ei entre as nações, e entoarei louvores ao teu nome.
51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.
51 Ele dá grande livramento a seu rei, e usa de benignidade para com o seu ungido, para com Davi e a sua descendência para sempre.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar 2 Samuel 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.