Êxodo 24

प्रेम संदेश (AHR)

1 मंग त्यानी मोशेले सांग, तु, अहरोन, नादाब, अबीहू अनी इस्त्राएलसना वडीलसमाईन सत्तर जण मिळीसनी परमेश्वरकडं वर येईसनी त्याले दुरतीन दंडवत घाला.

2 एकला मोशेनी परमेश्वरनीजोडे येवानं; बाकीना जोडे येवानं नही अनी इतर लोकेसनी ते त्यानासंगे वर चढीसनी येवानं नही.

3 मंग मोशे लोकसनीजोडे जाईसनी परमेश्वरनं बठा वचन अनी बठा नियम त्यासले सांगं, तवय बठा लोके एक आवाजमा बोलनात की ज्या वचन परमेश्वरनी सांगेल शेतस त्याप्रमानं आम्ही वर्तन करसुत.

4 मोशेनी परमेश्वरना बठा वचन लिखी काढ अनी पहाटमास उठीसनी डोंगरनं पायथाले एक वेदी अनी इस्त्राएलनं बारा वंशपरमानं बारा खांब उभारं.

5 त्यानी इस्त्राएल लोकेसमाईन काही तरुणसले धाडं, त्यासनी परमेश्वरले होमबली अनी बैलनं शांतीर्पण करं.

6 मोशेनी अर्धा रंगत लयीसनी वाटकामा ठेवं अनी अर्धा वेदीवर शितडं.

7 मंग त्यानी करार पुस्तक लयीसनी लोकेसले वाची दखाडं; ते आयकीसनी त्या बोलनात, जे काही परमेश्वरनी सांगेल शे ते बठं आम्ही करसुत अनी त्यानी आज्ञामा राहासुत.

8 मोशेनी रंगत लयीसनी लोकेसवर शितडं अनी त्यासले सांगं की दखा, परमेश्वरनी हाई बठा आज्ञानी शर्तवर तुम्हनासंगे जे करार करेल शे त्यानं हाई रंगत शे.

9 मंग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू अनी इस्त्राएलमाईन सत्तर वडील वर चढीसनी गयात.

10 त्यासनी इस्त्राएलनं देवनं दर्शन लिधं; त्याना चरनमा नीलमणीना चौरंगनागतक दखायनं जे आकाशनासारखा स्वच्छ व्हतं.

11 इस्त्राएल लोकेसना सरदारसवर त्यानी हात उगारं नही; त्यानी परमेश्वरनं दर्शन लिधं अनी खावापेवानं कार्यक्रम करं.

12 मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; पर्वतवर चढीसनी मनाजोडे ये अनी तठे राहाय; मी तुले दगडन्या पाटया अनी लोकेसना शिक्षणकरता स्वतः लिखीसनी नियम अनी आज्ञा देस.

13 मोशे अनी त्याना सेवक यहोशवा हया देवना पर्वतवर चढीसनी वर गयात.

14 मोशे वडीलसले बोलना; आम्ही तुम्हनाकडे परत येतस तोपावत आठे तुम्ही वाट दखत राहावानं; दखा, अहरोन अनी हूर हया तुम्हनासंगे शेतस; कोण काही परकरन व्हयीते ते त्यानाकडे लयी जावानं.

15 मोशे पर्वतवर चढी गया अनी ढगसघाई पर्वत झाकाई गया.

16 परमेश्वरनं तेज सीनाय पर्वतवर राहीनं अनी ढगसनी सव रोज ते ढाकी टाकं अनी सातवा रोजले ढगमाईन परमेश्वरनी मोशेले हाक मारी.

17 परमेश्वरनं तेज पर्वतना माथावर धगधगनारा आगप्रमाणं इस्त्राएल लोकेसले दखायनं.

18 हाई प्रकारं मोशे ढगमा जाईसनी पर्वतवर चढी गया; मंग तो पर्वतवर चाळीस दिवस अनी चाळीस रात व्हता.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 24, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.