Tiago 4

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय?
1 De onde procedem guerras e contendas que há entre vós? De onde, senão dos prazeres que militam na vossa carne?
2 तुम्ही इच्छा करता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही वध करता. तुम्ही लोभ धरता, परंतु जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही भांडता आणि लढता. तुमच्याकडे नाही कारण तुम्ही परमेश्वराकडे मागत नाही.
2 Cobiçais e nada tendes; matais, e invejais, e nada podeis obter; viveis a lutar e a fazer guerras. Nada tendes, porque não pedis;
3 जेव्हा तुम्ही मागता, तरी तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य हेतूने, विलासाच्या गोष्टींवर खर्च करावा म्हणून मागता.
3 pedis e não recebeis, porque pedis mal, para esbanjardes em vossos prazeres.
4 व्यभिचारी लोकांनो, जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.
4 Infiéis, não compreendeis que a amizade do mundo é inimiga de Deus? Aquele, pois, que quiser ser amigo do mundo constitui-se inimigo de Deus.
5 त्याने जो आत्मा आपल्या ठायी ठेवला आहे तो सौम्य ईर्षेने आपल्यावर नजर ठेवतो, हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते का?
5 Ou supondes que em vão afirma a Escritura: É com ciúme que por nós anseia o Espírito, que ele fez habitar em nós?
6 परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते,
6 Antes, ele dá maior graça; pelo que diz: Deus resiste aos soberbos, mas dá graça aos humildes.
7 तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल;
7 Sujeitai-vos, portanto, a Deus; mas resisti ao diabo, e ele fugirá de vós.
8 तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.
8 Chegai-vos a Deus, e ele se chegará a vós outros. Purificai as mãos, pecadores; e vós que sois de ânimo dobre, limpai o coração.
9 तुम्ही रडा, शोक आणि आकांत करा. तुमचे हसणे शोकात आणि तुमचा आनंद खिन्नतेमध्ये बदलू द्या.
9 Afligi-vos, lamentai e chorai. Converta-se o vosso riso em pranto, e a vossa alegria, em tristeza.
10 प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.
10 Humilhai-vos na presença do Senhor, e ele vos exaltará.
11 प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकमेकांची चहाडी करू नका. जो कोणी आपल्या बंधू किंवा भगिनी विरुद्ध बोलतो अथवा त्यांचा न्याय करतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व न्याय करतो, जेव्हा तुम्ही नियमांविरुद्ध न्याय करता आणि ते पाळीत नाही, तर न्याय करणारे व्हाल.
11 Irmãos, não faleis mal uns dos outros. Aquele que fala mal do irmão ou julga a seu irmão fala mal da lei e julga a lei; ora, se julgas a lei, não és observador da lei, mas juiz.
12 नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहेत, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु आपल्या शेजार्‍याचा न्याय करणारा तू कोण?
12 Um só é Legislador e Juiz, aquele que pode salvar e fazer perecer; tu, porém, quem és, que julgas o próximo?
13 आता ऐका, तुम्ही म्हणता, “आम्ही आज किंवा उद्या या किंवा त्या शहरात जाऊ, तिथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.”
13 Atendei, agora, vós que dizeis: Hoje ou amanhã, iremos para a cidade tal, e lá passaremos um ano, e negociaremos, e teremos lucros.
14 तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते.
14 Vós não sabeis o que sucederá amanhã. Que é a vossa vida? Sois, apenas, como neblina que aparece por instante e logo se dissipa.
15 याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, “जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.”
15 Em vez disso, devíeis dizer: Se o Senhor quiser, não só viveremos, como também faremos isto ou aquilo.
16 जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे.
16 Agora, entretanto, vos jactais das vossas arrogantes pretensões. Toda jactância semelhante a essa é maligna.
17 जर कोणाला चांगले करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप गणले जाते.
17 Portanto, aquele que sabe que deve fazer o bem e não o faz nisso está pecando.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Tiago 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.