Romanos 2
marc (MARC) vs NAA
1 जे तुम्ही दुसर्यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही.
1 Por isso, você é indesculpável quando julga os outros, não importando quem você é. Pois, naquilo que julga o outro, você está condenando a si mesmo, porque pratica as mesmas coisas que condena.
2 आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे.
2 Bem sabemos que o juízo de Deus é segundo a verdade contra os que praticam tais coisas.
3 तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का?
3 E você, que condena os que praticam tais coisas, mas faz o mesmo que eles fazem, pensa que conseguirá se livrar do juízo de Deus?
4 त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का?
4 Ou será que você despreza a riqueza da bondade, da tolerância e da paciência de Deus, ignorando que a bondade de Deus é que leva você ao arrependimento?
5 तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.
5 Mas, por ser teimoso e ter um coração impenitente, você acumula contra si mesmo ira para o dia da ira e da revelação do justo juízo de Deus,
6 परमेश्वर “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे योग्य ते प्रतिफळ देतील.”
6 que retribuirá a cada um segundo as suas obras:
7 जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.
7 a vida eterna aos que, perseverando em fazer o bem, procuram glória, honra e incorruptibilidade;
8 पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील.
8 mas ira e indignação para os egoístas, que desobedecem à verdade e obedecem à injustiça.
9 वाईट करणार्या प्रत्येक मनुष्यावर; प्रथम यहूदीयावर आणि मग गैरयहूदीयांवर क्लेश आणि संकटे येतील.
9 Tribulação e angústia virão sobre todo aquele que faz o mal, ao judeu primeiro e também ao grego;
10 परंतु सर्व चांगले काम करणार्यांना; प्रथम यहूदी, नंतर गैरयहूदीयांना परमेश्वराकडून गौरव, सन्मान व शांती ही लाभतील.
10 mas haverá glória, honra e paz a todo aquele que pratica o bem, ao judeu primeiro e também ao grego.
11 कारण परमेश्वर पक्षपात करीत नाहीत.
11 Porque Deus não trata as pessoas com parcialidade.
12 नियमशास्त्राशिवाय ज्या सर्वांनी पाप केले त्यांचा नाश नियमशास्त्राशिवाय होईल, आणि ज्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले असेल त्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार केला जाईल.
12 Assim, todos os que pecaram sem lei também sem lei perecerão; e todos os que pecaram sob a lei serão julgados pela lei.
13 नियमशास्त्र केवळ ऐकणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरत नाहीत, परंतु जे नियमशास्त्र पाळणारे आहेत, त्यांना नीतिमान म्हणून घोषित केले जाईल.
13 Porque justos diante de Deus não são aqueles que somente ouvem a lei, mas os que praticam a lei é que serão justificados.
14 निश्चितच, जेव्हा गैरयहूदी लोकांजवळ नियमशास्त्र नव्हते, तरी जे नियमशास्त्रात आहे ते नैसर्गिकरित्या पाळीत होते, त्यांच्याजवळ नियम नव्हते तरी ते स्वतः नियम असे झाले.
14 Quando, pois, os gentios, que não têm a lei, fazem, por natureza, o que a lei ordena, eles se tornam lei para si mesmos, embora não tenham a lei.
15 ते प्रदर्शित करतात की नियम त्यांच्या अंतःकरणात लिहिलेले आहे; त्यांची विवेकबुद्धीच त्यांना साक्ष देते आणि त्यांचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवितात.
15 Estes mostram a obra da lei gravada no seu coração, o que é confirmado pela consciência deles e pelos seus pensamentos conflitantes, que às vezes os acusam e às vezes os defendem,
16 हे त्या दिवशी घडेल जेव्हा माझ्या शुभवार्तेनुसार परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाच्या गुप्त रहस्यांचा न्याय करतील.
16 no dia em que Deus, por meio de Cristo Jesus, julgar os segredos das pessoas, de acordo com o meu evangelho.
17 आता, जर तुम्ही स्वतःला यहूदी समजता व नियमशास्त्रावर अवलंबून राहता आणि परमेश्वरामध्ये प्रौढी मिरवता;
17 Mas, se você diz que é judeu, confia na lei e se gloria em Deus;
18 तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता;
18 se você conhece a vontade de Deus e aprova as coisas excelentes, sendo instruído na lei;
19 तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही एखाद्या आंधळ्याला मार्गदर्शक व्हाल व अंधारात इतरांना प्रकाश असे व्हाल.
19 se você está convencido de que é guia dos cegos, luz dos que se encontram em trevas,
20 नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते.
20 instrutor de insensatos, mestre de crianças, tendo na lei a forma da sabedoria e da verdade —
21 जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता?
21 você, pois, que ensina os outros, não ensina a si mesmo? Você, que prega que não se deve roubar, rouba?
22 जे तुम्ही लोकांनी व्यभिचार करू नये, असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार करता का? जे तुम्ही मूर्तीचा विटाळ मानणारे, तुम्ही मंदिर का लुटता?
22 Você, que diz que não se deve cometer adultério, adultera? Você, que detesta ídolos, rouba os templos?
23 जे तुम्ही नियमशास्त्राचा गर्व असणारे, ते तुम्ही नियम मोडून परमेश्वराचा अपमान का करता?
23 Você, que se gloria na lei, desonra a Deus pela transgressão da lei?
24 मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.”
24 Pois, como está escrito: “O nome de Deus é blasfemado entre os gentios por causa de vocês.”
25 नियम पाळत असाल तर सुंतेला काही मोल आहे; पण तुम्ही नियम पाळीत नसाल, तर सुंता न झाल्यासारखे आहात.
25 A circuncisão tem valor se você pratica a lei; mas, se você é transgressor da lei, a sua circuncisão já se tornou incircuncisão.
26 जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय?
26 Portanto, se a incircuncisão observa os preceitos da lei, não será essa incircuncisão considerada como circuncisão?
27 ज्यांच्या शरीराची सुंता झालेली नसून नियम पाळतात ते तुम्हाला दोषी ठरवतील, कारण तुमच्याजवळ लेखी नियम आहेत आणि सुंता झालेली असतानाही तुम्ही नियम तोडता.
27 E, se aquele que é incircunciso por natureza cumpre a lei, certamente ele julgará você, que, embora tenha a letra da lei e a circuncisão, é transgressor da lei.
28 कारण केवळ बाह्य स्वरूपाने कोणी यहूदी होत नाही, सुंता ही केवळ शारीरिक आणि बाह्य नाही.
28 Porque não é judeu quem o é apenas exteriormente, nem é circuncisão a que é somente na carne.
29 तोच खरा यहूदी, जो मनाने यहूदी आहे आणि सुंता ही अंतःकरणाची सुंता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. अशा व्यक्तीची प्रशंसा इतर लोकांकडून नव्हे, तर परमेश्वरापासून होईल.
29 Porém judeu é aquele que o é interiormente, e circuncisão é a do coração, pelo Espírito, não segundo a letra, e cujo louvor não procede de seres humanos, mas de Deus.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Romanos 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.