Neemias 4

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 आम्ही कोटाची पुन्हा बांधणी करीत आहोत, हे सनबल्लटाला समजले, तेव्हा तो संतापला आणि अत्यंत कृद्ध झाला. त्याने यहूदी लोकांचा उपहास केला.
1 Tendo Sambalate ouvido que edificávamos o muro, ardeu em ira, e se indignou muito, e escarneceu dos judeus.
2 आपले सोबती व शोमरोनचे सेनाधिकारी यांच्यादेखत थट्टा करीत तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करीत आहेत? ते तटाची पुनर्बांधणी करू शकतील काय? ते अर्पणे वाहू शकतील काय? एका दिवसात ते कामे संपवू शकतील काय? मातीच्या ढिगार्‍यातून उपसून काढलेल्या दगडात ते प्राण घालू शकतील काय—ते तर पार जळून गेलेले दगड!”
2 Então, falou na presença de seus irmãos e do exército de Samaria e disse: Que fazem estes fracos judeus? Permitir-se-lhes-á isso? Sacrificarão? Darão cabo da obra num só dia? Renascerão, acaso, dos montões de pó as pedras que foram queimadas?
3 तोबीयाह अम्मोनी त्याच्या जवळच उभा होता. तो बोलला, “काय तरी यांचे बांधकाम—एखादा कोल्हा जरी यांच्या त्या तटावरून चालत गेला तरी तो दगडी तट कोसळेल!”
3 Estava com ele Tobias, o amonita, e disse: Ainda que edifiquem, vindo uma raposa, derribará o seu muro de pedra.
4 आमच्या परमेश्वरा, आमचे ऐका, कारण आमचा उपहास होत आहे. त्यांची थट्टा त्यांच्याच शिरी उलटो आणि एखाद्या परकीय देशात बंदिवान म्हणून त्यांची लूट होऊ द्या.
4 Ouve, ó nosso Deus, pois estamos sendo desprezados; caia o seu opróbrio sobre a cabeça deles, e faze que sejam despojo numa terra de cativeiro.
5 त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्‍यांना त्यांनी अपमानित केले आहे.
5 Não lhes encubras a iniquidade, e não se risque de diante de ti o seu pecado, pois te provocaram à ira, na presença dos que edificavam.
6 शेवटी मूळ उंचीच्या अर्ध्या उंचीपर्यंतचा तट पूर्ण झाला, कारण लोकांनी अगदी मन लावून काम केले होते.
6 Assim, edificamos o muro, e todo o muro se fechou até a metade de sua altura; porque o povo tinha ânimo para trabalhar.
7 पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले.
7 Mas, ouvindo Sambalate e Tobias, os arábios, os amonitas e os asdoditas que a reparação dos muros de Jerusalém ia avante e que já se começavam a fechar-lhe as brechas, ficaram sobremodo irados.
8 त्यांनी यरुशलेममध्ये दंगे व गोंधळ निर्माण करण्याचा कट केला.
8 Ajuntaram-se todos de comum acordo para virem atacar Jerusalém e suscitar confusão ali.
9 पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला.
9 Porém nós oramos ao nosso Deus e, como proteção, pusemos guarda contra eles, de dia e de noite.
10 नंतर यहूदीयाचे लोक म्हणाले, “कामकऱ्यांची शक्ती घटत चालली आहे आणि दगडविटांचे इतके खच पडले आहेत की पुढील भिंत बांधणे अशक्यच वाटते.”
10 Então, disse Judá: Já desfaleceram as forças dos carregadores, e os escombros são muitos; de maneira que não podemos edificar o muro.
11 आमच्या शत्रूंनी हे देखील म्हटले, “त्यांना काही कळण्याआधी व ते आपल्याला पाहण्याआधी, आपण त्यांच्यामध्ये जाऊ, अचानक हल्ला करून आपण त्यांना ठार करू व त्यांचे काम बंद करू.”
11 Disseram, porém, os nossos inimigos: Nada saberão disto, nem verão, até que entremos no meio deles e os matemos; assim, faremos cessar a obra.
12 तेव्हा जवळपास राहणारे यहूदी लोक आले व आम्हाला दहा वेळेस येऊन सांगून गेले, “तुम्ही ज्या दिशेने जाल, हे लोक त्या दिशेने तुमच्यावर हल्ला करतील.”
12 Quando os judeus que habitavam na vizinhança deles, dez vezes, nos disseram: De todos os lugares onde moram, subirão contra nós,
13 याकारणास्तव मी प्रत्येक कुटुंबानुसार काही लोक निवडले व त्यांना तलवारी, भाले व धनुष्‍यबाण देऊन तटाच्या खालच्या मागील खुल्या जागी त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांना पहारेकरी म्हणून बसविले.
13 então, pus o povo, por famílias, nos lugares baixos e abertos, por detrás do muro, com as suas espadas, e as suas lanças, e os seus arcos;
14 संपूर्ण परिस्थितीकडे नजर टाकल्यावर, मी उभा राहिलो व सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व बाकी लोकांना एकत्र बोलाविले आणि त्यांना म्हणालो, “त्यांना भिऊ नका! महान व भयावह परमेश्वराची आठवण ठेवा. आपल्या कुटुंबांसाठी, तुमच्या पुत्रांसाठी, तुमच्या कन्यांसाठी, तुमच्या पत्नीसाठी आणि घरांसाठी लढा!”
14 inspecionei, dispus-me e disse aos nobres, aos magistrados e ao resto do povo: não os temais; lembrai-vos do Senhor, grande e temível, e pelejai pelos vossos irmãos, vossos filhos, vossas filhas, vossa mulher e vossa casa.
15 आमच्या शत्रूंनी ऐकले की आम्हाला त्यांचा कट समजला आहे आणि परमेश्वराने त्यांच्या सर्व योजना व्यर्थ केल्या आहेत. मग आम्ही तट बांधण्याच्या कामाला पुन्हा लागलो.
15 E sucedeu que, ouvindo os nossos inimigos que já o sabíamos e que Deus tinha frustrado o desígnio deles, voltamos todos nós ao muro, cada um à sua obra.
16 पण त्या दिवसापासून पुढे माझे फक्त अर्धेच पुरुष काम करीत असत व बाकी अर्धे पाठीमागे भाले, ढाली, धनुष्य व शस्त्रे घेऊन होते. हे अधिकारी जे यहूदीयाचे लोक
16 Daquele dia em diante, metade dos meus moços trabalhava na obra, e a outra metade empunhava lanças, escudos, arcos e couraças; e os chefes estavam por detrás de toda a casa de Judá;
17 बांधकाम करीत होते त्यांच्यामागे उभे राहिले. जे कामकरी सामान नेआण करीत, ते आपली लढाईची शस्त्रे एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने कामे करीत असत.
17 os carregadores, que por si mesmos tomavam as cargas, cada um com uma das mãos fazia a obra e com a outra segurava a arma.
18 आपल्या कमरेला तलवारी लटकवून प्रत्येकजण काम करीत असत. मात्र रणशिंग वाजविणारा माझ्याजवळच असे.
18 Os edificadores, cada um trazia a sua espada à cinta, e assim edificavam; o que tocava a trombeta estava junto de mim.
19 मग मी प्रतिष्ठित लोक, अधिकारी आणि इतर लोकांना समजावून सांगितले, “काम इतके मोठे व विस्तृत आहे की त्यामुळे आपण भिंतीशी बांधकाम करीत असताना एकमेकांपासून लांब लांब असतो.
19 Disse eu aos nobres, aos magistrados e ao resto do povo: Grande e extensa é a obra, e nós estamos no muro mui separados, longe uns dos outros.
20 म्हणून तुम्ही रणशिंगाचा आवाज ऐकाल, तेव्हा तुम्ही आम्ही असलेल्या जागी धावत आले पाहिजे आणि आपले परमेश्वर आपल्यासाठी लढतील!”
20 No lugar em que ouvirdes o som da trombeta, para ali acorrei a ter conosco; o nosso Deus pelejará por nós.
21 आम्ही सूर्योदयापासून कामाला सुरुवात करून तारे दिसेपर्यंत करीत असू आणि अर्धे लोक भाले घेऊन नेहमीच असत.
21 Assim trabalhávamos na obra; e metade empunhava as lanças desde o raiar do dia até ao sair das estrelas.
22 त्यावेळी मी सर्व लोकांना सांगितले, “प्रत्येकाने रात्रीच्या मुक्कामाला यरुशलेमच्या आतच राहावे, म्हणजे ते रात्री पहार्‍याचे व दिवसा तटाच्या बांधकामाचे कार्य करू शकतील.”
22 Também nesse mesmo tempo disse eu ao povo: Cada um com o seu moço fique em Jerusalém, para que de noite nos sirvam de guarda e de dia trabalhem.
23 याकाळात आमच्यापैकी कोणीही, मी किंवा माझे बांधव, माझी माणसे किंवा माझ्याबरोबर असणारे पहारेकरी, कोणीही आपले कपडे बदलले नाहीत आणि जलाशयाला जाते वेळी देखील आम्ही आमची शस्त्रे नेहमीच आमच्याबरोबर बाळगत असू.
23 Nem eu, nem meus irmãos, nem meus moços, nem os homens da guarda que me seguiam largávamos as nossas vestes; cada um se deitava com as armas à sua direita.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Neemias 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.