Mateus 9
marc (MARC) vs BKJ
1 येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले.
1 E, entrando no barco, passou para o outro lado, e chegou à sua cidade.
2 काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्या मनुष्याला म्हणाले, “मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
2 E eis que lhe trouxeram um homem paralítico, deitado em um leito; e Jesus, vendo a fé deles, disse ao paralítico: Filho, tem bom ânimo, teus pecados são perdoados.
3 तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!”
3 E eis que, alguns dos escribas disseram consigo: Este homem blasfema.
4 त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता?
4 Mas Jesus, conhecendo-lhes os pensamentos, disse: Por que pensais mal em vossos corações?
5 यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’
5 Pois, o que é mais fácil, dizer: Os teus pecados são perdoados; ou dizer: Levanta-te e anda?
6 तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”
6 Mas, para que saibais que o Filho do homem tem poder sobre a terra para perdoar pecados (ele disse então ao paralítico): Levanta-te, toma o teu leito, e vai para tua casa.
7 तेव्हा तो मनुष्य उठला आणि आपल्या घरी गेला.
7 E ele levantando-se, foi para sua casa.
8 प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाला भीती वाटली व ज्यांनी मनुष्यास असा अधिकार दिला त्या परमेश्वराची त्या सर्वांनी स्तुती केली.
8 Mas a multidão, vendo isso, maravilhava-se, e glorificaram a Deus, que dera tal poder aos homens.
9 मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला.
9 E passando Jesus dali, viu assentado na coletoria um homem, chamado Mateus, e disse-lhe: Segue-me. E ele, levantando-se, o seguiu.
10 नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते.
10 E aconteceu que, estando Jesus em casa sentado à mesa, eis que, chegaram muitos publicanos e pecadores, e sentaram-se juntamente com Jesus e seus discípulos.
11 ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?”
11 E os fariseus, vendo isso, perguntaram aos seus discípulos: Por que come o vosso Mestre com os publicanos e pecadores?
12 हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.
12 Jesus, porém, ouvindo isso, disse-lhes: Os sãos não têm necessidade de médico, mas sim os que estão enfermos.
13 ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”
13 Ide, pois, e aprendei o que significa isto: Eu quero misericórdia, e não sacrifício; porque eu não vim para chamar os justos, mas os pecadores ao arrependimento.
14 एके दिवशी बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला, “गुरुजी, आम्ही आणि परूशी लोक उपास करतो तसे तुमचे शिष्य का करत नाहीत?”
14 Então vieram ter com ele os discípulos de João, dizendo: Por que nós e os fariseus jejuamos com frequência, mas os teus discípulos não jejuam?
15 येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.
15 E disse-lhes Jesus: Podem os convidados do noivo estar de luto, enquanto o noivo está com eles? Mas dias virão, em que lhes será tirado o noivo, e então hão de jejuar.
16 “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल.
16 Nenhum homem põe remendo de pano novo em roupa velha, porque o remendo rompe a roupa, e faz-se pior a rotura.
17 त्याचप्रमाणे कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात आणि दोन्ही सुरक्षित राहतात.”
17 Nenhum homem coloca vinho novo em odres velhos; do contrário os odres se rompem, o vinho se derrama, e os odres se perdem; mas coloca-se vinho novo em odres novos, e assim ambos se conservam.
18 हे बोलत आहे तोच, सभागृहाचा पुढारी आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल!”
18 Enquanto ele ainda lhes dizia essas coisas, eis que chegou um certo governante e o adorou, dizendo: Minha filha faleceu agora mesmo; mas venha e impõe tua mão sobre ela, e ela viverá.
19 येशू उठून त्याच्याबरोबर गेले आणि त्यांचे शिष्यही त्यांच्याबरोबर निघाले.
19 Levantando-se, pois, Jesus, o seguiu, e também foram os seus discípulos.
20 तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी असलेल्या एका स्त्रीने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.
20 E eis que uma mulher que havia já doze anos, padecia de um fluxo de sangue, chegando-se por detrás dele, tocou na orla de sua veste.
21 कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.”
21 Pois ela dizia consigo: Se eu tão somente tocar a sua veste, eu ficarei sã.
22 येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.
22 Mas Jesus, voltando-se e vendo-a, disse: Tem bom ânimo filha, a tua fé te curou! E naquela mesma hora a mulher ficou sã.
23 येशू त्या सभागृहाच्या अधिकार्याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तिथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते.
23 E Jesus, chegando à casa do governante, e vendo os flautistas e as pessoas em alvoroço,
24 ते म्हणाले, “बाहेर जा. मुलगी मरण पावली नाही पण झोपली आहे!” हे ऐकून ते त्यांना हसू लागले.
24 disse-lhes: Retirai-vos, pois a menina não está morta, mas dorme. E riram dele para o escarnecer.
25 शेवटी सर्व जमाव बाहेर आल्यानंतर येशू त्या मुलीला ठेवले होते तिथे गेले; त्यांनी तिच्या हाताला धरून तिला उठविले आणि ती उठून बसली.
25 Mas quando as pessoas foram colocadas para fora, ele entrou, a tomou pela sua mão, e a menina se levantou.
26 याविषयीची बातमी त्या सर्व प्रदेशात पसरली.
26 E sua fama acerca disto foi por toda aquela terra.
27 येशू तिथून पुढे निघाल्यावर, दोन आंधळे माणसे त्यांच्यामागे आले व मोठ्याने म्हणाले, “अहो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.”
27 E, partindo Jesus dali, seguiram-no dois homens cegos, clamando e dizendo: Filho de Davi, tem misericórdia de nós.
28 जेव्हा ते घरात गेले त्यावेळी ते आंधळे त्यांच्याकडे आले आणि येशूंनी त्यांना विचारले, “मी हे करण्यास समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे काय?”
28 E, quando ele chegou à casa, os homens cegos se aproximaram dele; e Jesus perguntou-lhes: Credes vós que eu possa fazer isto? Disseram-lhe: Sim, Senhor.
29 मग येशूंनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि ते त्यांना म्हणाले, “तुमच्या विश्वासानुसार तुम्हासाठी केले जावो.”
29 Então ele tocou nos seus olhos, dizendo: conforme a vossa fé vos seja feito.
30 आणि त्याच क्षणाला त्यांना दिसू लागले. येशूंनी त्यांना सक्त ताकीद दिली, “याविषयी कोणालाही काहीही सांगू नका,”
30 E seus olhos foram abertos; e Jesus rigorosamente lhes advertiu, dizendo: Vede para que nenhum homem saiba isto.
31 परंतु याउलट त्यांनी येशूंची किर्ती त्या सर्व भागात पसरविली.
31 Mas eles, saindo, espalharam a sua fama por toda aquela terra.
32 ते बाहेर जात असताना, एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले.
32 Enquanto eles saíam, eis que lhe trouxeram um homem mudo possuído por um demônio.
33 येशूंनी तो दुरात्मा त्याच्यामधून हाकलून लावला, तेव्हा त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “असा अद्भुत प्रकार इस्राएलात आम्ही कधीच पाहिला नव्हता.”
33 E, o demônio sendo expulso, o mudo falou; e as multidões se maravilharam, dizendo: Nunca se viu algo assim em Israel.
34 परंतु परूशी लोक म्हणाले, “भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने तो भुते घालवितो.”
34 Os fariseus, porém, diziam: Ele expulsa os demônios pelo príncipe dos demônios.
35 येशू सर्व नगरांत व गावात सभागृहांमध्ये शिक्षण देत, राज्याच्या शुभवार्तेची घोषणा करीत आणि प्रत्येक आजार व विकार बरे करीत फिरले.
35 E Jesus foi por todas as cidades e aldeias, ensinando nas suas sinagogas, pregando o evangelho do reino, e curando todas as enfermidades e todas as doenças entre o povo.
36 त्यांनी समुहाला पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.
36 E, ele vendo as multidões, moveu-se com compaixão delas, porque estavam exaustas e dispersas, como ovelhas que não têm pastor.
37 ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत.
37 Então ele disse aos seus discípulos: A seara verdadeiramente é grande, mas poucos são os trabalhadores.
38 हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून त्यांना विनंती करा.”
38 Orai, pois, ao Senhor da seara, que envie trabalhadores para a sua seara.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Mateus 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.