Mateus 27
marc (MARC) vs VC
1 प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांच्या वडीलजनांनी येशूंचा वध कसा करता येईल याची योजना केली.
1 Chegando a manhã, todos os príncipes dos sacerdotes e os anciãos do povo reuniram-se em conselho para entregar Jesus à morte.
2 सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
2 Ligaram-no e o levaram ao governador Pilatos.
3 ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली.
3 Judas, o traidor, vendo-o então condenado, tomado de remorsos, foi devolver aos príncipes dos sacerdotes e aos anciãos as trinta moedas de prata,
4 “मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.”
4 dizendo-lhes: Pequei, entregando o sangue de um justo. Responderam-lhe: Que nos importa? Isto é lá contigo!
5 यावर त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला.
5 Ele jogou então no templo as moedas de prata, saiu e foi enforcar-se.
6 महायाजकांनी ते पैसे गोळा केले आणि ते म्हणाले, “हे पैसे आपल्याला मंदिराच्या खजिन्यात भरता येणार नाहीत, हे नियमाविरुद्ध आहे. कारण हे रक्ताचे पैसे आहेत.”
6 Os príncipes dos sacerdotes tomaram o dinheiro e disseram: Não é permitido lançá-lo no tesouro sagrado, porque se trata de preço de sangue.
7 म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
7 Depois de haverem deliberado, compraram com aquela soma o campo do Oleiro, para que ali se fizesse um cemitério de estrangeiros.
8 यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात.
8 Esta é a razão por que aquele terreno é chamado, ainda hoje, Campo de Sangue.
9 हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले,
9 Assim se cumpriu a profecia do profeta Jeremias: Eles receberam trinta moedas de prata, preço daquele cujo valor foi estimado pelos filhos de Israel;
10 आणि प्रभूने मला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला.”
10 e deram-no pelo campo do Oleiro, como o Senhor me havia prescrito.
11 येशू राज्यपालाच्या पुढे उभे होते आणि राज्यपालाने त्यांना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
11 Jesus compareceu diante do governador, que o interrogou: És o rei dos judeus? Sim, respondeu-lhe Jesus.
12 महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले.
12 Ele, porém, nada respondia às acusações dos príncipes dos sacerdotes e dos anciãos.
13 “हे लोक तुझ्यावर अनेक गोष्टींचा दोषारोप करीत आहेत, हे तू ऐकत नाही काय?” पिलाताने येशूंना विचारले,
13 Perguntou-lhe Pilatos: Não ouves todos os testemunhos que levantam contra ti?
14 परंतु येशूंनी एकाही आरोपाचे उत्तर दिले नाही. राज्यपालासाठी ही खूप आश्चर्यचकित गोष्ट होती.
14 Mas, para grande admiração do governador, não quis responder a nenhuma acusação.
15 आता सणामध्ये जमावाच्या निवडीनुसार एका कैद्याला सोडून देण्याची राजपालांची प्रथा होती.
15 Era costume que o governador soltasse um preso a pedido do povo em cada festa de Páscoa.
16 या वर्षी येशू बरब्बास नावाचा एक प्रसिद्ध गुन्हेगार तुरुंगात होता.
16 Ora, havia naquela ocasião um prisioneiro famoso, chamado Barrabás.
17 त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी जमली असताना, पिलाताने लोकांना विचारले, “सणानिमित्त मी तुमच्यासाठी कोणाला सोडून देऊ? येशू बरब्बास किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूंना?”
17 Pilatos dirigiu-se ao povo reunido: Qual quereis que eu vos solte: Barrabás ou Jesus, que se chama Cristo?
18 कारण पिलाताला कळले होते की, लोकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले होते.
18 {Ele sabia que tinham entregue Jesus por inveja.}
19 त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.”
19 Enquanto estava sentado no tribunal, sua mulher lhe mandou dizer: Nada faças a esse justo. Fui hoje atormentada por um sonho que lhe diz respeito.
20 परंतु तोपर्यंत प्रमुख याजकांनी व वडील यांनी “बरब्बाला सोडा” अशी मागणी करून येशूंना जिवे मारावे म्हणून समुदायाचे मन वळविले.
20 Mas os príncipes dos sacerdotes e os anciãos persuadiram o povo que pedisse a libertação de Barrabás e fizesse morrer Jesus.
21 राज्यपालांनी विचारले, “या दोघांपैकी मी तुम्हाकरिता कोणाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे?”
21 O governador tomou então a palavra: Qual dos dois quereis que eu vos solte? Responderam: Barrabás!
22 “मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले.
22 Pilatos perguntou: Que farei então de Jesus, que é chamado o Cristo? Todos responderam: Seja crucificado!
23 “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?”
23 O governador tornou a perguntar: Mas que mal fez ele? E gritavam ainda mais forte: Seja crucificado!
24 पिलाताला समजले की आपण काहीही करू शकत नाही, दंगल वाढत आहे असे त्याने पाहिले, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि सर्व जमावापुढे आपले हात धुतले. “मी या माणसाच्या रक्ताबाबत निर्दोष आहे.” तो म्हणाला, “ही तुमची जबाबदारी आहे.”
24 Pilatos viu que nada adiantava, mas que, ao contrário, o tumulto crescia. Fez com que lhe trouxessem água, lavou as mãos diante do povo e disse: Sou inocente do sangue deste homem. Isto é lá convosco!
25 यावर सर्व जमाव ओरडला, “त्याचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”
25 E todo o povo respondeu: Caia sobre nós o seu sangue e sobre nossos filhos!
26 तेव्हा पिलाताने बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता सैनिकांच्या स्वाधीन केले.
26 — ausente —
27 मग राज्यपालाच्या शिपायांनी येशूंना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना राजवाड्यात प्राइतोरियम येथे नेऊन सर्व सैनिकांच्या टोळीला तिथे एकत्र बोलाविले
27 Os soldados do governador conduziram Jesus para o pretório e rodearam-no com todo o pelotão.
28 तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्यांना किरमिजी रंगाचा झगा घातला.
28 Arrancaram-lhe as vestes e colocaram-lhe um manto escarlate.
29 मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”
29 Depois, trançaram uma coroa de espinhos, meteram-lha na cabeça e puseram-lhe na mão uma vara. Dobrando os joelhos diante dele, diziam com escárnio: Salve, rei dos judeus!
30 ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले.
30 Cuspiam-lhe no rosto e, tomando da vara, davam-lhe golpes na cabeça.
31 येशूंची अशी थट्टा केल्यावर त्यांनी झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता घेऊन गेले.
31 Depois de escarnecerem dele, tiraram-lhe o manto e entregaram-lhe as vestes. Em seguida, levaram-no para o crucificar.
32 ते त्यांना घेऊन क्रूसावर खिळण्याच्या जागेकडे निघाले. वाटेत त्यांना कुरेने गावचा शिमोन नावाचा मनुष्य भेटला. त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.
32 Saindo, encontraram um homem de Cirene, chamado Simão, a quem obrigaram a levar a cruz de Jesus.
33 मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”.
33 Chegaram ao lugar chamado Gólgota, isto é, lugar do crânio.
34 त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही.
34 Deram-lhe de beber vinho misturado com fel. Ele provou, mas se recusou a beber.
35 येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
35 Depois de o haverem crucificado, dividiram suas vestes entre si, tirando a sorte. Cumpriu-se assim a profecia do profeta: Repartiram entre si minhas vestes e sobre meu manto lançaram a sorte {Sl 21,19}.
36 मग क्रूसावर टांगलेल्या येशूंवर पहारा करीत ते जवळच बसले.
36 Sentaram-se e montaram guarda.
37 त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते:
37 Por cima de sua cabeça penduraram um escrito trazendo o motivo de sua crucificação: Este é Jesus, o rei dos judeus.
38 त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.
38 Ao mesmo tempo foram crucificados com ele dois ladrões, um à sua direita e outro à sua esquerda.
39 जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, ते डोकी हालवीत
39 Os que passavam o injuriavam, sacudiam a cabeça e diziam:
40 म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव.”
40 Tu, que destróis o templo e o reconstróis em três dias, salva-te a ti mesmo! Se és o Filho de Deus, desce da cruz!
41 त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली.
41 Os príncipes dos sacerdotes, os escribas e os anciãos também zombavam dele:
42 ते म्हणाले, “त्याने दुसर्यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा आहे! मग त्याला क्रूसावरून खाली उतरून येऊ दे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
42 Ele salvou a outros e não pode salvar-se a si mesmo! Se é rei de Israel, desça agora da cruz e nós creremos nele!
43 तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ”
43 Confiou em Deus, Deus o livre agora, se o ama, porque ele disse: Eu sou o Filho de Deus!
44 त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.
44 E os ladrões, crucificados com ele, também o ultrajavam.
45 त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला.
45 Desde a hora sexta até a nona, cobriu-se toda a terra de trevas.
46 दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एली, एली,लमा सबकतनी,” म्हणजे, “माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”
46 Próximo da hora nona, Jesus exclamou em voz forte: Eli, Eli, lammá sabactáni? - o que quer dizer: Meu Deus, meu Deus, por que me abandonaste?
47 तिथे उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले की तो, “एलीयाहला बोलावित आहे.”
47 A estas palavras, alguns dos que lá estavam diziam: Ele chama por Elias.
48 लागलीच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन शिरक्यात भिजविलेला एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला,
48 Imediatamente um deles tomou uma esponja, embebeu-a em vinagre e apresentou-lha na ponta de uma vara para que bebesse.
49 इतर म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरावयास व तारावयास येतो की काय हे आपण पाहू!”
49 Os outros diziam: Deixa! Vejamos se Elias virá socorrê-lo.
50 मग येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारली आणि आपला प्राण सोडला.
50 Jesus de novo lançou um grande brado, e entregou a alma.
51 त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले
51 E eis que o véu do templo se rasgou em duas partes de alto a baixo, a terra tremeu, fenderam-se as rochas.
52 आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली.
52 Os sepulcros se abriram e os corpos de muitos justos ressuscitaram.
53 येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले.
53 Saindo de suas sepulturas, entraram na Cidade Santa depois da ressurreição de Jesus e apareceram a muitas pessoas.
54 जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपायांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि त्यांनी उद्गार काढले, “खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!”
54 O centurião e seus homens que montavam guarda a Jesus, diante do estremecimento da terra e de tudo o que se passava, disseram entre si, possuídos de grande temor: Verdadeiramente, este homem era Filho de Deus!
55 अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या.
55 Havia ali também algumas mulheres que de longe olhavam; tinham seguido Jesus desde a Galiléia para o servir.
56 त्या स्त्रियांमध्ये मरीया मग्दालिया; याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहानाची आई होती.
56 Entre elas se achavam Maria Madalena e Maria, mãe de Tiago e de José, e a mãe dos filhos de Zebedeu.
57 संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य,
57 À tardinha, um homem rico de Arimatéia, chamado José, que era também discípulo de Jesus,
58 पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली.
58 foi procurar Pilatos e pediu-lhe o corpo de Jesus. Pilatos cedeu-o.
59 योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले,
59 José tomou o corpo, envolveu-o num lençol branco
60 आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला.
60 e o depositou num sepulcro novo, que tinha mandado talhar para si na rocha. Depois rolou uma grande pedra à entrada do sepulcro e foi-se embora.
61 मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या.
61 Maria Madalena e a outra Maria ficaram lá, sentadas defronte do túmulo.
62 सणाच्या तयारीच्या दुसर्या दिवशी, वल्हांडण सणाचा पहिला दिवस संपताना, प्रमुख याजकवर्ग आणि परूशी लोक पिलाताकडे गेले.
62 No dia seguinte - isto é, o dia seguinte ao da Preparação -, os príncipes dos sacerdotes e os fariseus dirigiram-se todos juntos à casa de Pilatos.
63 “महाराज,” ते म्हणाले, “आम्हाला आठवण आहे की तो लबाड जिवंत असताना म्हणाला होता की, ‘तीन दिवसानंतर मी पुन्हा जिवंत होईन’
63 E disseram-lhe: Senhor, nós nos lembramos de que aquele impostor disse, enquanto vivia: Depois de três dias ressuscitarei.
64 यास्तव त्याची कबर तीन दिवसापर्यंत सुरक्षित ठेवण्याचा हुकूम आपण द्यावा. नाही तर त्याचे शिष्य येऊन शरीर चोरून नेतील आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे, असे लोकांना सांगतील. असे झाले तर ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”
64 Ordena, pois, que seu sepulcro seja guardado até o terceiro dia. Os seus discípulos poderiam vir roubar o corpo e dizer ao povo: Ressuscitou dos mortos. E esta última impostura seria pior que a primeira.
65 पिलाताने उत्तर दिले, “सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा.”
65 Respondeu Pilatos: Tendes uma guarda. Ide e guardai-o como o entendeis.
66 याप्रमाणे ते गेले आणि कबरेवरील शिला शिक्कामोर्तब करून त्यांनी ती सुरक्षित केली व पहारेकरीही ठेवले.
66 Foram, pois, e asseguraram o sepulcro, selando a pedra e colocando guardas.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Mateus 27, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.