Mateus 20

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.
1 Com efeito, o Reino dos céus é semelhante a um pai de família que saiu ao romper da manhã, a fim de contratar operários para sua vinha.
2 एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.
2 Ajustou com eles um denário por dia e enviou-os para sua vinha.
3 “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.
3 Cerca da terceira hora, saiu ainda e viu alguns que estavam na praça sem fazer nada.
4 त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’
4 Disse-lhes ele: - Ide também vós para minha vinha e vos darei o justo salário.
5 म्हणून ते गेले.
5 Eles foram. À sexta hora saiu de novo e igualmente pela nona hora, e fez o mesmo.
6 पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’
6 Finalmente, pela undécima hora, encontrou ainda outros na praça e perguntou-lhes: - Por que estais todo o dia sem fazer nada?
7 “ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले.
7 Eles responderam: - É porque ninguém nos contratou. Disse-lhes ele, então: - Ide vós também para minha vinha.
8 “संध्याकाळी धन्याने आपल्या मुकादमाला सांगितले, ‘द्राक्षमळ्यामध्ये आलेल्या मजुरांना बोलवा आणि जे शेवटी आले होते त्यांच्यापासून आरंभ करून जे प्रथम आले होते त्या सर्वांना मजुरी द्या.’
8 Ao cair da tarde, o senhor da vinha disse a seu feitor: - Chama os operários e paga-lhes, começando pelos últimos até os primeiros.
9 “तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.
9 Vieram aqueles da undécima hora e receberam cada qual um denário.
10 त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली.
10 Chegando por sua vez os primeiros, julgavam que haviam de receber mais. Mas só receberam cada qual um denário.
11 जेव्हा त्यांना ती मिळाली, तेव्हा त्यांनी धन्याविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली.
11 Ao receberem, murmuravam contra o pai de família, dizendo:
12 ‘त्या माणसांनी फक्त एकच तास काम केले, तरी त्यांना तुम्ही दिवसभराची मजुरी दिली आणि आम्ही येथे सकाळपासून उन्हात दिवसभर राबलो, तरी आम्हाला तुम्ही त्यांच्यासारखेच केले.’
12 - Os últimos só trabalharam uma hora... e deste-lhes tanto como a nós, que suportamos o peso do dia e do calor.
13 “त्याने त्यांच्यापैकी एकाला म्हटले, ‘मित्रा, तुझ्यावर मी कोणताही अन्याय केलेला नाही; याच मजुरीत दिवसभर काम करण्याचे तू कबूल केले होतेस की नाही?
13 O senhor, porém, observou a um deles: - Meu amigo, não te faço injustiça. Não contrataste comigo um denário?
14 मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते.
14 Toma o que é teu e vai-te. Eu quero dar a este último tanto quanto a ti.
15 माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’
15 Ou não me é permitido fazer dos meus bens o que me apraz? Porventura vês com maus olhos que eu seja bom?
16 “याप्रमाणे जे शेवटचे ते पहिले, आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”
16 Assim, pois, os últimos serão os primeiros e os primeiros serão os últimos. { Muitos serão os chamados, mas poucos os escolhidos.}
17 येशू यरुशलेमला जात होते. वाटेत त्यांनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला घेतले आणि त्यांना म्हटले,
17 Subindo para Jerusalém, durante o caminho, Jesus tomou à parte os Doze e disse-lhes:
18 “आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल.
18 Eis que subimos a Jerusalém, e o Filho do Homem será entregue aos príncipes dos sacerdotes e aos escribas. Eles o condenarão à morte.
19 ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील व क्रूसावर खिळतील; परंतु तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हा उठेल.”
19 E o entregarão aos pagãos para ser exposto às suas zombarias, açoitado e crucificado; mas ao terceiro dia ressuscitará.
20 मग जब्दीच्या पुत्रांची आई तिच्या मुलांना घेऊन येशूंकडे आली. तिने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्याजवळ एक कृपादान मागितले.
20 Nisso aproximou-se a mãe dos filhos de Zebedeu com seus filhos e prostrou-se diante de Jesus para lhe fazer uma súplica.
21 येशूंनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
21 Perguntou-lhe ele: Que queres? Ela respondeu: Ordena que estes meus dois filhos se sentem no teu Reino, um à tua direita e outro à tua esquerda.
22 यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?”
22 Jesus disse: Não sabeis o que pedis. Podeis vós beber o cálice que eu devo beber? Sim, disseram-lhe.
23 “त्या प्याल्यातून तुम्ही प्याल यात शंका नाही,” येशूंनी त्यांना म्हटले, “परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केल्या आहेत, त्यांनाच मिळतील.”
23 De fato, bebereis meu cálice. Quanto, porém, ao sentar-vos à minha direita ou à minha esquerda, isto não depende de mim vo-lo conceder. Esses lugares cabem àqueles aos quais meu Pai os reservou.
24 हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना त्या दोन्ही भावांचा खूप राग आला.
24 Os dez outros, que haviam ouvido tudo, indignaram-se contra os dois irmãos.
25 हे पाहून येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदी लोकांचे शासक त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे.
25 Jesus, porém, os chamou e lhes disse: Sabeis que os chefes das nações as subjugam, e que os grandes as governam com autoridade.
26 पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.
26 Não seja assim entre vós. Todo aquele que quiser tornar-se grande entre vós, se faça vosso servo.
27 आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे.
27 E o que quiser tornar-se entre vós o primeiro, se faça vosso escravo.
28 मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
28 Assim como o Filho do Homem veio, não para ser servido, mas para servir e dar sua vida em resgate por uma multidão.
29 येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती.
29 Ao sair de Jericó, uma grande multidão o seguiu.
30 दोन आंधळी माणसे रस्त्याच्या कडेला बसली होती. येशू आपल्या बाजूने येत आहेत, हे त्यांनी ऐकले, तेव्हा ते मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र! आम्हावर दया करा!”
30 Dois cegos, sentados à beira do caminho, ouvindo dizer que Jesus passava, começaram a gritar: Senhor, filho de Davi, tem piedade de nós!
31 गर्दीतील लोकांनी त्यांना धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, तर ते अधिक मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अहो प्रभू, दावीदाचे, पुत्र, आम्हावर दया करा!”
31 A multidão, porém, os repreendia para que se calassem. Mas eles gritavam ainda mais forte: Senhor, filho de Davi, tem piedade de nós!
32 येशू थांबले आणि त्यांनी आंधळ्यांना बोलाविले व ते म्हणाले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
32 Jesus parou, chamou-os e perguntou-lhes: Que quereis que eu vos faça?
33 “प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.”
33 Senhor, que nossos olhos se abram!
34 येशूंना त्यांचा कळवळा आला; त्यांनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; ताबडतोब त्यांना दिसू लागले आणि ते त्यांच्यामागे चालू लागले.
34 Jesus, cheio de compaixão, tocou-lhes os olhos. Instantaneamente recobraram a vista e puseram-se a segui-lo.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Mateus 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.