Mateus 18
marc (MARC) vs VC
1 त्याच सुमारास शिष्य येशूंकडे आले आणि त्यांना विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण आहे?”
1 Neste momento os discípulos aproximaram-se de Jesus e perguntaram-lhe: Quem é o maior no Reino dos céus?
2 तेव्हा येशूंनी एका लहान लेकराला जवळ बोलाविले आणि त्या लेकराला त्यांच्यामध्ये उभे केले.
2 Jesus chamou uma criancinha, colocou-a no meio deles e disse:
3 मग येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही.
3 Em verdade vos declaro: se não vos transformardes e vos tornardes como criancinhas, não entrareis no Reino dos céus.
4 म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल.
4 Aquele que se fizer humilde como esta criança será maior no Reino dos céus.
5 आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.
5 E o que recebe em meu nome a um menino como este, é a mim que recebe.
6 “जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्या अशा लहानातील एकालाही अडखळण आणतो, तर त्यांच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून समुद्रात फेकून देणे हे त्यांच्यासाठी अधिक हिताचे ठरेल.
6 Mas, se alguém fizer cair em pecado um destes pequenos que crêem em mim, melhor fora que lhe atassem ao pescoço a mó de um moinho e o lançassem no fundo do mar.
7 ज्याच्यामुळे लोकांना अडखळण येतात त्या जगाचा धिक्कार असो! अडखळण येणारच नाही हे अशक्य आहे, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याला धिक्कार असो.
7 Ai do mundo por causa dos escândalos! Eles são inevitáveis, mas ai do homem que os causa!
8 तुझा हात किंवा पाय तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो कापून टाकून दे. दोन पाय असून शाश्वत अग्नीत टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे
8 Por isso, se tua mão ou teu pé te fazem cair em pecado, corta-os e lança-os longe de ti: é melhor para ti entrares na vida coxo ou manco que, tendo dois pés e duas mãos, seres lançado no fogo eterno.
9 जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने जीवनात जाणे उत्तम आहे.
9 Se teu olho te leva ao pecado, arranca-o e lança-o longe de ti: é melhor para ti entrares na vida cego de um olho que seres jogado com teus dois olhos no fogo da geena.
10 “या लहान बालकांपैकी एकालाही तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या पित्याचे मुख निरंतर पाहत असतात.
10 Guardai-vos de menosprezar um só destes pequenos, porque eu vos digo que seus anjos no céu contemplam sem cessar a face de meu Pai que está nos céus.
11 मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे.
11 {Porque o Filho do Homem veio salvar o que estava perdido.}
12 “तुम्हाला काय वाटते? एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर तो मनुष्य काय करेल? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय?
12 Que vos parece? Um homem possui cem ovelhas: uma delas se desgarra. Não deixa ele as noventa e nove na montanha, para ir buscar aquela que se desgarrou?
13 आणि मी तुम्हाला खचित सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करेल.
13 E se a encontra, sente mais júbilo do que pelas noventa e nove que não se desgarraram.
14 त्याच प्रकारे या लहान बालकातील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे.
14 Assim é a vontade de vosso Pai celeste, que não se perca um só destes pequeninos.
15 “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस.
15 Se teu irmão tiver pecado contra ti, vai e repreende-o entre ti e ele somente; se te ouvir, terás ganho teu irmão.
16 जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’
16 Se não te escutar, toma contigo uma ou duas pessoas, a fim de que toda a questão se resolva pela decisão de duas ou três testemunhas.
17 यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग.
17 Se recusa ouvi-los, dize-o à Igreja. E se recusar ouvir também a Igreja, seja ele para ti como um pagão e um publicano.
18 “मी तुम्हाला खरोखर सांगतो, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
18 Em verdade vos digo: tudo o que ligardes sobre a terra será ligado no céu, e tudo o que desligardes sobre a terra será também desligado no céu.
19 “मी तुम्हाला पुन्हा निश्चितपणे सांगतो की, या पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे एकचित्त होऊन कोणतीही मागणी करतील, तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल.
19 Digo-vos ainda isto: se dois de vós se unirem sobre a terra para pedir, seja o que for, consegui-lo-ão de meu Pai que está nos céus.
20 कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.”
20 Porque onde dois ou três estão reunidos em meu nome, aí estou eu no meio deles.
21 मग पेत्र येशूंकडे आला आणि त्याने त्यांना विचारले, “प्रभूजी, माझ्या भावाने अथवा बहिणीने माझ्याविरुद्ध पाप केले, तर मी त्यांना किती वेळा क्षमा करावी? सात वेळेस का?”
21 Então Pedro se aproximou dele e disse: Senhor, quantas vezes devo perdoar a meu irmão, quando ele pecar contra mim? Até sete vezes?
22 येशूंनी उत्तर दिले, “सात नाही तर साताच्या सत्तर वेळा!
22 Respondeu Jesus: Não te digo até sete vezes, mas até setenta vezes sete.
23 “म्हणून स्वर्गाचे राज्य त्या राजासारखे आहे, ज्याला आपल्या नोकरांकडून हिशोब घ्यायचा होता.
23 Por isso, o Reino dos céus é comparado a um rei que quis ajustar contas com seus servos.
24 हिशोब घेत असताना, ज्या नोकरावर राजाचे दहा हजार तालांतचे कर्ज होते, त्याला राजापुढे आणण्यात आले.
24 Quando começou a ajustá-las, trouxeram-lhe um que lhe devia dez mil talentos.
25 त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली.
25 Como ele não tinha com que pagar, seu senhor ordenou que fosse vendido, ele, sua mulher, seus filhos e todos os seus bens para pagar a dívida.
26 “तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’
26 Este servo, então, prostrou-se por terra diante dele e suplicava-lhe: Dá-me um prazo, e eu te pagarei tudo!
27 तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले.
27 Cheio de compaixão, o senhor o deixou ir embora e perdoou-lhe a dívida.
28 “पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली.
28 Apenas saiu dali, encontrou um de seus companheiros de serviço que lhe devia cem denários. Agarrou-o na garganta e quase o estrangulou, dizendo: Paga o que me deves!
29 “त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’
29 O outro caiu-lhe aos pés e pediu-lhe: Dá-me um prazo e eu te pagarei!
30 “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले.
30 Mas, sem nada querer ouvir, este homem o fez lançar na prisão, até que tivesse pago sua dívida.
31 जेव्हा इतर नोकरांनी हे पाहिले, तेव्हा ते क्रोधाने भरून प्रभूकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले.”
31 Vendo isto, os outros servos, profundamente tristes, vieram contar a seu senhor o que se tinha passado.
32 तेव्हा प्रभूने ज्या नोकराला क्षमा केली होती, त्या नोकराला बोलाविले. राजा त्याला म्हणाला, “अरे दुष्ट माणसा, मी तुझे सर्व कर्ज माफ केले, कारण तू मला तशी विनंती केलीस;
32 Então o senhor o chamou e lhe disse: Servo mau, eu te perdoei toda a dívida porque me suplicaste.
33 ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय?
33 Não devias também tu compadecer-te de teu companheiro de serviço, como eu tive piedade de ti?
34 मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले.
34 E o senhor, encolerizado, entregou-o aos algozes, até que pagasse toda a sua dívida.
35 “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”
35 Assim vos tratará meu Pai celeste, se cada um de vós não perdoar a seu irmão, de todo seu coração.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Mateus 18, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.