Marcos 16

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 शब्बाथ संपल्यानंतर मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले.
1 Passado o sábado, Maria Madalena, Maria, mãe de Tiago, e Salomé compraram aromas para ungir Jesus.
2 आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस, सूर्योदय झाल्यावर त्या कबरेकडे जाण्यास निघाल्या.
2 E no primeiro dia da semana, foram muito cedo ao sepulcro, mal o sol havia despontado.
3 “आपल्यासाठी कबरेच्या द्वाराशी असलेली धोंड कोण बाजूला करेल?” याविषयी त्या आपसात चर्चा करीत होत्या.
3 E diziam entre si: Quem nos há de remover a pedra da entrada do sepulcro?
4 त्यांनी वर पाहिले तेव्हा जी धोंड अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे असे त्यांना दिसले.
4 Levantando os olhos, elas viram removida a pedra, que era muito grande.
5 त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तिथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या.
5 Entrando no sepulcro, viram, sentado do lado direito, um jovem, vestido de roupas brancas, e assustaram-se.
6 “भिऊ नका,” तो म्हणाला, “क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेवले होते ती जागा पाहा!
6 Ele lhes falou: Não tenhais medo. Buscais Jesus de Nazaré, que foi crucificado. Ele ressuscitou, já não está aqui. Eis o lugar onde o depositaram.
7 पण जा, ही बातमी त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, ‘ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. जसे त्यांनी तुम्हाला सांगितले होते तसे ते तिथे तुम्हाला भेटतील.’ ”
7 Mas ide, dizei a seus discípulos e a Pedro que ele vos precede na Galiléia. Lá o vereis como vos disse.
8 भयभीत होऊन व थरथर कापत त्या स्त्रिया कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या घाबरल्या होत्या.
8 Elas saíram do sepulcro e fugiram trêmulas e amedrontadas. E a ninguém disseram coisa alguma por causa do medo.
9 येशू आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे पुनरुत्थित झाले. ते सर्वप्रथम ज्या स्त्रीमधून त्यांनी सात भुते काढली होती त्या मग्दालिया मरीयेला प्रकट झाले.
9 Tendo Jesus ressuscitado de manhã, no primeiro dia da semana apareceu primeiramente a Maria de Magdala, de quem tinha expulsado sete demônios.
10 जे लोक येशूंबरोबर होते आणि जे शोक व विलाप करीत होते, त्यांच्याकडे जाऊन तिने हे वर्तमान त्यांना सांगितले.
10 Foi ela noticiá-lo aos que estiveram com ele, os quais estavam aflitos e chorosos.
11 येशू जिवंत आहे आणि तिने त्यांना प्रत्यक्ष बघितले होते, हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
11 Quando souberam que Jesus vivia e que ela o tinha visto, não quiseram acreditar.
12 नंतर त्याच दिवशी शहरातून चाललेल्या दोघांना येशूंनी वेगळ्या रूपात दर्शन दिले.
12 Mais tarde, ele apareceu sob outra forma a dois entre eles que iam para o campo.
13 ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही.
13 Eles foram anunciá-lo aos demais. Mas estes tampouco acreditaram.
14 नंतर अकरा शिष्य भोजन करण्यास बसले असताना, येशू त्यांना प्रकट झाले. ज्यांनी त्यांना मरणातून उठलेले पाहिले होते, त्यांच्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी अविश्वास व हृदयाच्या कठीणपणा बद्दल त्यांचा निषेध केला.
14 Por fim apareceu aos Onze, quando estavam sentados à mesa, e censurou-lhes a incredulidade e dureza de coração, por não acreditarem nos que o tinham visto ressuscitado.
15 ते त्यांना म्हणाले, “सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा.
15 E disse-lhes: Ide por todo o mundo e pregai o Evangelho a toda criatura.
16 जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील.
16 Quem crer e for batizado será salvo, mas quem não crer será condenado.
17 आणि विश्वास ठेवणार्‍याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील.
17 Estes milagres acompanharão os que crerem: expulsarão os demônios em meu nome, falarão novas línguas,
18 ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्‍यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.”
18 manusearão serpentes e, se beberem algum veneno mortal, não lhes fará mal; imporão as mãos aos enfermos e eles ficarão curados.
19 प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर, ते स्वर्गात वर घेतले गेले आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसले.
19 Depois que o Senhor Jesus lhes falou, foi levado ao céu e está sentado à direita de Deus.
20 मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.
20 Os discípulos partiram e pregaram por toda parte. O Senhor cooperava com eles e confirmava a sua palavra com os milagres que a acompanhavam.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Marcos 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.