Marcos 15

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
1 Logo pela manhã se reuniram os sumos sacerdotes com os anciãos, os escribas e com todo o conselho. E tendo amarrado Jesus, levaram-no e entregaram-no a Pilatos.
2 पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
2 Este lhe perguntou: És tu o rei dos judeus? Ele lhe respondeu: Sim.
3 प्रमुख याजक आणि यहूदी पुढार्‍यांनी येशूंवर अनेक आरोप केले.
3 Os sumos sacerdotes acusavam-no de muitas coisas.
4 म्हणून पिलाताने येशूंना विचारले, “तू त्यांना उत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर कितीतरी गोष्टींचा दोषारोप करीत आहे.”
4 Pilatos perguntou-lhe outra vez: Nada respondes? Vê de quantos delitos te acusam!
5 परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले.
5 Mas Jesus nada mais respondeu, de modo que Pilatos ficou admirado.
6 आता सणामध्ये एका कैद्याला लोकांच्या विनंतीप्रमाणे सोडून देण्याची प्रथा होती.
6 Ora, costumava ele soltar-lhes em cada festa qualquer dos presos que pedissem.
7 बरब्बा म्हटलेला एक मनुष्य त्यावेळी बंडखोरांबरोबर तुरुंगात शिक्षा भोगत होता, त्याने उठाव करून खून केला होता.
7 Havia na prisão um, chamado Barrabás, que fora preso com seus cúmplices, o qual na sedição perpetrara um homicídio.
8 आता जसे पिलात रीतीप्रमाणे करीत असे, तसे त्याने करावे अशी मागणी समुदाय त्याला करू लागला.
8 O povo que tinha subido começou a pedir-lhe aquilo que sempre lhes costumava conceder.
9 “तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” पिलाताने विचारले,
9 Pilatos respondeu-lhes: Quereis que vos solte o rei dos judeus?
10 प्रमुख याजकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले हे पिलाताच्या लक्षात आले होते.
10 {Porque sabia que os sumos sacerdotes o haviam entregue por inveja.}
11 पण तेवढ्यात येशूंच्या ऐवजी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्यासाठी प्रमुख याजकांनी समुदायास चिथाविले.
11 Mas os pontífices instigaram o povo para que pedissem de preferência que lhes soltasse Barrabás.
12 पिलाताने विचारले, “ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?”
12 Pilatos falou-lhes outra vez: E que quereis que eu faça daquele a quem chamais o rei dos judeus?
13 लोक ओरडून म्हणाले, “त्याला क्रूसावर खिळा!”
13 Eles tornaram a gritar: Crucifica-o!
14 “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?”
14 Pilatos replicou: Mas que mal fez ele? Eles clamavam mais ainda: Crucifica-o!
15 लोकांना खुश करण्याच्या विचाराने, पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
15 Querendo Pilatos satisfazer o povo, soltou-lhes Barrabás e entregou Jesus, depois de açoitado, para que fosse crucificado.
16 मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलाविले.
16 Os soldados conduziram-no ao interior do pátio, isto é, ao pretório, onde convocaram toda a coorte.
17 त्यांनी त्यांना जांभळा झगा घातला आणि काट्यांचा एक मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकावर ठेवला.
17 Vestiram Jesus de púrpura, teceram uma coroa de espinhos e a colocaram na sua cabeça.
18 नंतर ते त्याला प्रणाम करून म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”
18 E começaram a saudá-lo: Salve, rei dos judeus!
19 त्यांनी त्यांच्या मस्तकांवर काठीने वारंवार मारले व ते त्यांच्या तोंडावर थुंकले. त्यांच्यासमोर त्यांनी गुडघे टेकून त्यांची उपासना केली.
19 Davam-lhe na cabeça com uma vara, cuspiam nele e punham-se de joelhos como para homenageá-lo.
20 येशूंची अशी थट्टा केल्यावर, त्यांनी त्याला घातलेला जांभळा झगा काढून घेतला आणि त्यांचे कपडे पुन्हा त्यांच्या अंगावर चढविले. मग त्यांना क्रूसावर खिळण्याकरिता बाहेर घेऊन गेले.
20 Depois de terem escarnecido dele, tiraram-lhe a púrpura, deram-lhe de novo as vestes e conduziram-no fora para o crucificar.
21 कुरेने गावचा एक रहिवासी, आलेक्सांद्र व रूफस यांचा पिता शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.
21 Passava por ali certo homem de Cirene, chamado Simão, que vinha do campo, pai de Alexandre e de Rufo, e obrigaram-no a que lhe levasse a cruz.
22 मग त्यांनी येशूंना गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्‍या जागी आणले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे.
22 Conduziram Jesus ao lugar chamado Gólgota, que quer dizer lugar do crânio.
23 त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.
23 Deram-lhe de beber vinho misturado com mirra, mas ele não o aceitou.
24 मग त्यांनी त्याला क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांची वस्त्रे वाटून, प्रत्येकाला काय मिळेल हे पाहण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.
24 Depois de o terem crucificado, repartiram as suas vestes, tirando a sorte sobre elas, para ver o que tocaria a cada um.
25 त्यांना क्रूसावर खिळले त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते.
25 Era a hora terceira quando o crucificaram.
26 एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता:
26 A inscrição que motivava a sua condenação dizia: O rei dos judeus.
27 त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.
27 Crucificaram com ele dois bandidos: um à sua direita e outro à esquerda.
28 अशा रीतीने, “अपराधी लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला.
28 {Cumpriu-se assim a passagem da Escritura que diz: Ele foi contado entre os malfeitores {Is 53,12}.}
29 जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना,
29 Os que iam passando injuriavam-no e abanavam a cabeça, dizendo: Olá! Tu que destróis o templo e o reedificas em três dias,
30 तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव!”
30 salva-te a ti mesmo! Desce da cruz!
31 त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षकांनीही त्यांची थट्टा केली. ते म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही.
31 Desta maneira, escarneciam dele também os sumos sacerdotes e os escribas, dizendo uns para os outros: Salvou a outros e a si mesmo não pode salvar!
32 तो इस्राएलाचा राजा व ख्रिस्त आहे, त्याला आता क्रूसावरून खाली उतरून येऊ दे, म्हणजे आम्ही पाहू आणि विश्वास ठेवू.” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्यांनीही त्यांच्यावर अपमानाची रास केली.
32 Que o Cristo, rei de Israel, desça agora da cruz, para que vejamos e creiamos! Também os que haviam sido crucificados com ele o insultavam.
33 संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.
33 Desde a hora sexta até a hora nona, houve trevas por toda a terra.
34 आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”
34 E à hora nona Jesus bradou em alta voz: Elói, Elói, lammá sabactáni?, que quer dizer: Meu Deus, meu Deus, por que me abandonaste?
35 तिथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाहला बोलावित आहे.”
35 Ouvindo isto, alguns dos circunstantes diziam: Ele chama por Elias!
36 कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला व तो म्हणाला, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!”
36 Um deles correu e ensopou uma esponja em vinagre e, pondo-a na ponta de uma vara, deu-lho para beber, dizendo: Deixai, vejamos se Elias vem tirá-lo.
37 मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला.
37 Jesus deu um grande brado e expirou.
38 तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.
38 O véu do templo rasgou-se então de alto a baixo em duas partes.
39 जेव्हा येशूंच्या समोर उभे असलेल्या शताधिपतीने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”
39 O centurião que estava diante de Jesus, ao ver que ele tinha expirado assim, disse: Este homem era realmente o Filho de Deus.
40 अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब व योसेफ यांची आई मरीया, सलोमी होत्या.
40 Achavam-se ali também umas mulheres, observando de longe, entre as quais Maria Madalena, Maria, mãe de Tiago, o Menor, e de José, e Salomé,
41 गालीलामध्ये असताना या स्त्रिया येशूंना अनुसरून त्यांची सेवा करीत असत. यरुशलेममधून त्यांच्याबरोबर आलेल्या इतर अनेक स्त्रियाही तिथे होत्या.
41 que o tinham seguido e o haviam assistido, quando ele estava na Galiléia; e muitas outras que haviam subido juntamente com ele a Jerusalém.
42 हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना,
42 Quando já era tarde - era a Preparação, isto é‚ é a véspera do sábado -,
43 सभेचा एक सन्मान्य सभासद अरिमथियाकर योसेफ, स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले.
43 veio José de Arimatéia, ilustre membro do conselho, que também esperava o Reino de Deus; ele foi resoluto à presença de Pilatos e pediu o corpo de Jesus.
44 येशू इतक्या लवकर मरण पावले हे ऐकून पिलाताला नवल वाटले. त्याने शताधिपतीला बोलाविले आणि विचारले, येशूंचा मृत्यू आधी झाला आहे की काय?
44 Pilatos admirou-se de que ele tivesse morrido tão depressa. E, chamando o centurião, perguntou se já havia muito tempo que Jesus tinha morrido.
45 ते खरे असल्याचे शताधिपतीकडून समजल्यावर, त्याने येशूंचे शरीर योसेफाच्या ताब्यात दिले.
45 Obtida a resposta afirmativa do centurião, mandou dar-lhe o corpo.
46 योसेफाने एक तागाचे कापड विकत आणले, येशूंचे शरीर खाली काढले, तागाच्या वस्त्राने गुंडाळले आणि खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने शिळा लोटून ठेवली.
46 Depois de ter comprado um pano de linho, José tirou-o da cruz, envolveu-o no pano e depositou-o num sepulcro escavado na rocha, rolando uma pedra para fechar a entrada.
47 त्यांना कबरेत कुठे ठेवले हे, मरीया मग्दालिया आणि योसेफाची आई मरीया यांनी पाहिले.
47 Maria Madalena e Maria, mãe de José, observavam onde o depositavam.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Marcos 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.