Marcos 14
marc (MARC) vs VC
1 वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते.
1 Ora, dali a dois dias seria a festa da Páscoa e dos {pães} Ázimos; e os sumos sacerdotes e os escribas buscavam algum meio de prender Jesus à traição para matá-lo.
2 ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
2 Mas não durante a festa, diziam eles, para não haver talvez algum tumulto entre o povo.
3 येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली.
3 Jesus se achava em Betânia, em casa de Simão, o leproso. Quando ele se pôs à mesa, entrou uma mulher trazendo um vaso de alabastro cheio de um perfume de nardo puro, de grande preço, e, quebrando o vaso, derramou-lho sobre a cabeça.
4 तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला?
4 Alguns, porém, ficaram indignados e disseram entre si: Por que este desperdício de bálsamo?
5 एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला.
5 Poder-se-ia tê-lo vendido por mais de trezentos denários, e os dar aos pobres. E irritavam-se contra ela.
6 “तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
6 Mas Jesus disse-lhes: Deixai-a. Por que a molestais? Ela me fez uma boa obra.
7 गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.
7 Vós sempre tendes convosco os pobres e, quando quiserdes, podeis fazer-lhes bem; mas a mim não me tendes sempre.
8 तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे.
8 Ela fez o que pode: embalsamou-me antecipadamente o corpo para a sepultura.
9 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”
9 Em verdade vos digo: onde quer que for pregado em todo o mundo o Evangelho, será contado para sua memória o que ela fez.
10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला.
10 Judas Iscariotes, um dos Doze, foi avistar-se com os sumos sacerdotes para lhes entregar Jesus.
11 तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
11 A esta notícia, eles alegraram-se e prometeram dar-lhe dinheiro. E ele buscava ocasião oportuna para o entregar.
12 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रीतीप्रमाणे ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे?”
12 No primeiro dia dos Ázimos, em que se imolava a Páscoa, perguntaram-lhe os discípulos: Onde queres que preparemos a refeição da Páscoa?
13 तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल, त्याच्यामागे जा.
13 Ele enviou dois dos seus discípulos, dizendo: Ide à cidade, e sair-vos-á ao encontro um homem, carregando um cântaro de água.
14 तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’
14 Segui-o e, onde ele entrar, dizei ao dono da casa: O Mestre pergunta: Onde está a sala em que devo comer a Páscoa com os meus discípulos?
15 तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.”
15 E ele vos mostrará uma grande sala no andar superior, mobiliada e pronta. Fazei ali os preparativos.
16 ते शिष्य नगरात गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
16 Partiram os discípulos para a cidade e acharam tudo como Jesus lhes havia dito, e prepararam a Páscoa.
17 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले,
17 Chegando a tarde, dirigiu-se ele para lá com os Doze.
18 ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.”
18 E enquanto estavam sentados à mesa e comiam, Jesus disse: Em verdade vos digo: um de vós que come comigo me há de entregar.
19 ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?”
19 Começaram a entristecer-se e a perguntar-lhe, um após outro: Porventura sou eu?
20 “तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे.
20 Respondeu-lhes ele: É um dos Doze, que se serve comigo do mesmo prato.
21 कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”
21 O Filho do homem vai, segundo o que dele está escrito, mas ai daquele homem por quem o Filho do homem for traído! Melhor lhe seria que nunca tivesse nascido...
22 भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.”
22 Durante a refeição, Jesus tomou o pão e, depois de o benzer, partiu-o e deu-lho, dizendo: Tomai, isto é o meu corpo.
23 त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले.
23 Em seguida, tomou o cálice, deu graças e apresentou-lho, e todos dele beberam.
24 मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे
24 E disse-lhes: Isto é o meu sangue, o sangue da aliança, que é derramado por muitos.
25 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
25 Em verdade vos digo: já não beberei do fruto da videira, até aquele dia em que o beberei de novo no Reino de Deus.
26 मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.
26 Terminado o canto dos Salmos, saíram para o monte das Oliveiras.
27 “तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे:
27 E Jesus disse-lhes: Vós todos vos escandalizareis, pois está escrito: Ferirei o pastor, e as ovelhas serão dispersas {Zac 13,7}.
28 परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.”
28 Mas depois que eu ressurgir, eu vos precederei na Galiléia.
29 पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.”
29 Entretanto, Pedro lhe respondeu: Ainda que todos se escandalizem de ti, eu, porém, nunca!
30 “पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”
30 Jesus disse-lhe: Em verdade te digo: hoje, nesta mesma noite, antes que o galo cante duas vezes, três vezes me terás negado.
31 परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले.
31 Mas Pedro repetia com maior ardor: Ainda que seja preciso morrer contigo, não te renegarei.E todos disseram o mesmo.
32 आता ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले. येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी प्रार्थना करेपर्यंत येथे थांबा.”
32 Foram em seguida para o lugar chamado Getsêmani, e Jesus disse a seus discípulos: Sentai-vos aqui, enquanto vou orar.
33 त्यांनी पेत्र, याकोब आणि योहान यांना बरोबर घेतले आणि ते अत्यंत अस्वस्थ आणि व्याकूळ होऊ लागले.
33 Levou consigo Pedro, Tiago e João; e começou a ter pavor e a angustiar-se.
34 ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकूळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.”
34 Disse-lhes: A minha alma está numa tristeza mortal; ficai aqui e vigiai.
35 थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडले आणि त्यांनी प्रार्थना केली की शक्य असल्यास ही घटका त्यांच्यापासून टळून जावी.
35 Adiantando-se alguns passos, prostrou-se com a face por terra e orava que, se fosse possível, passasse dele aquela hora.
36 “अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.”
36 Aba! {Pai!}, suplicava ele. Tudo te é possível; afasta de mim este cálice! Contudo, não se faça o que eu quero, senão o que tu queres.
37 नंतर ते शिष्यांकडे परत आले, तेव्हा ते झोपी गेले आहेत, असे त्यांना आढळले. “शिमोना,” ते पेत्राला म्हणाले, “तू झोपी गेला आहेस काय? एक तासभरही तू जागे राहू शकला नाही का?
37 Em seguida, foi ter com seus discípulos e achou-os dormindo. Disse a Pedro: Simão, dormes? Não pudeste vigiar uma hora!
38 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”
38 Vigiai e orai, para que não entreis em tentação. Pois o espírito está pronto, mas a carne é fraca.
39 येशू पुन्हा गेले आणि त्यांनी तीच प्रार्थना केली.
39 Afastou-se outra vez e orou, dizendo as mesmas palavras.
40 नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे समजले नाही.
40 Voltando, achou-os de novo dormindo, porque seus olhos estavam pesados; e não sabiam o que lhe responder.
41 मग ते तिसर्या वेळेस परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पुरे झाले! पाहा वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.
41 Voltando pela terceira vez, disse-lhes: Dormi e descansai. Basta! Veio a hora! O Filho do homem vai ser entregue nas mãos dos pecadores.
42 उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
42 Levantai-vos e vamos! Aproxima-se o que me há de entregar.
43 ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला.
43 Ainda falava, quando chegou Judas Iscariotes, um dos Doze, e com ele um bando armado de espadas e cacetes, enviado pelos sumos sacerdotes, escribas e anciãos.
44 आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.”
44 Ora, o traidor tinha-lhes dado o seguinte sinal: Aquele a quem eu beijar é ele. Prendei-o e levai-o com cuidado.
45 तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.
45 Assim que ele se aproximou de Jesus, disse: Rabi!, e o beijou.
46 त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले.
46 Lançaram-lhe as mãos e o prenderam.
47 पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
47 Um dos circunstantes tirou da espada, feriu o servo do sumo sacerdote e decepou-lhe a orelha.
48 येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात?
48 Mas Jesus tomou a palavra e disse-lhes: Como a um bandido, saístes com espadas e cacetes para prender-me!
49 मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.”
49 Entretanto, todos os dias estava convosco, ensinando no templo, e não me prendestes. Mas isso acontece para que se cumpram as Escrituras.
50 मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले.
50 Então todos o abandonaram e fugiram.
51 मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला,
51 Seguia-o um jovem coberto somente de um pano de linho; e prenderam-no.
52 परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला.
52 Mas, lançando ele de si o pano de linho, escapou-lhes despido.
53 येशूंना महायाजक कयफाकडे नेण्यात आले. लवकरच दुसरे सर्व मुख्य याजक व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक गोळा झाले.
53 Conduziram Jesus à casa do sumo sacerdote, onde se reuniram todos os sacerdotes, escribas e anciãos.
54 पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला.
54 Pedro o foi seguindo de longe até dentro do pátio. Sentou-se junto do fogo com os servos e aquecia-se.
55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही.
55 Os sumos sacerdotes e todo o conselho buscavam algum testemunho contra Jesus, para o condenar à morte, mas não o achavam.
56 नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता.
56 Muitos diziam falsos testemunhos contra ele, mas seus depoimentos não concordavam.
57 नंतर काहींनी उठून त्यांच्याविरुद्ध ही खोटी साक्ष दिली:
57 Levantaram-se, então, alguns e deram esse falso testemunho contra ele:
58 “आम्ही त्याला बोलताना ऐकले, ‘मनुष्यांनी बांधलेले हे परमेश्वराचे मंदिर मी उद्ध्वस्त करेन आणि तीन दिवसात हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर पुन्हा उभे करेन.’ ”
58 Ouvimo-lo dizer: Eu destruirei este templo, feito por mãos de homens, e em três dias edificarei outro, que não será feito por mãos de homens.
59 तरीपण त्यांच्या साक्षीमध्येही काही ताळमेळ नव्हता.
59 Mas nem neste ponto eram coerentes os seus testemunhos.
60 हे ऐकून महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय?” हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?
60 O sumo sacerdote levantou-se no meio da assembléia e perguntou a Jesus: Não respondes nada? O que é isto que dizem contra ti?
61 पण ख्रिस्त शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही.
61 Mas Jesus se calava e nada respondia. O sumo sacerdote tornou a perguntar-lhe: És tu o Cristo, o Filho de Deus bendito?
62 “मी आहे,” येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही मानवपुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”
62 Jesus respondeu: Eu o sou. E vereis o Filho do Homem sentado à direita do poder de Deus, vindo sobre as nuvens do céu.
63 महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो म्हणाला, “आता आणखी साक्षीदारांची आपल्याला काय गरज आहे?
63 O sumo sacerdote rasgou então as suas vestes. Para que desejamos ainda testemunhas?!, exclamou ele.
64 तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे, आता तुम्हाला काय वाटते?”
64 Ouvistes a blasfêmia! Que vos parece? E unanimemente o julgaram merecedor da morte.
65 त्यांच्यापैकी काहीजण येशूंवर थुंकू लागले. त्यांनी त्यांचे डोळे बांधले, त्यांना बुक्क्या मारल्या आणि म्हटले, “भविष्यवाणी करा!” मग पहारेकर्यांनी त्यांना चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.
65 Alguns começaram a cuspir nele, a tapar-lhe o rosto, a dar-lhe socos e a dizer-lhe: Adivinha! Os servos igualmente davam-lhe bofetadas.
66 हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तिथे महायाजकाची एक दासी आली.
66 Estando Pedro embaixo, no pátio, veio uma das criadas do sumo sacerdote.
67 तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले.
67 Ela fixou os olhos em Pedro, que se aquecia, e disse: Também tu estavas com Jesus de Nazaré.
68 पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला.
68 Ele negou: Não sei, nem compreendo o que dizes. E saiu para a entrada do pátio; e o galo cantou.
69 त्याला तिथे उभे असलेल्या दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा मनुष्य त्यांच्यापैकी एक आहे!”
69 A criada, que o vira, começou a dizer aos circunstantes: Este faz parte do grupo deles.
70 पेत्राने ते पुन्हा नाकारले.
70 Mas Pedro negou outra vez. Pouco depois, os que ali estavam diziam de novo a Pedro: Certamente tu és daqueles, pois és galileu.
71 हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.”
71 Então ele começou a praguejar e a jurar: Não conheço esse homem de quem falais.
72 तेवढ्यात कोंबडा दुसर्या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.
72 E imediatamente cantou o galo pela segunda vez. Pedro lembrou-se da palavra que Jesus lhe havia dito: Antes que o galo cante duas vezes, três vezes me negarás. E, lembrando-se disso, rompeu em soluços.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Marcos 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.