Marcos 10

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 येशू कफर्णहूम प्रांत सोडून यार्देनेच्या यहूदीया प्रांतात आले. त्यांच्यामागे लोकांची गर्दी होती आणि रीतीप्रमाणे त्यांना त्यांनी शिक्षण दिले.
1 Então Jesus saiu dali e foi para a região da Judéia e para o outro lado do Jordão. Novamente uma multidão veio a ele e, segundo o seu costume, ele a ensinava.
2 काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”
2 Alguns fariseus aproximaram-se dele para pô-lo à prova, perguntando: "É permitido ao homem divorciar-se de sua mulher? "
3 त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?”
3 "O que Moisés lhes ordenou? ", perguntou ele.
4 ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.”
4 Eles disseram: "Moisés permitiu que o homem desse uma certidão de divórcio e a mandasse embora".
5 येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले.
5 Respondeu Jesus: "Moisés escreveu essa lei por causa da dureza de coração de vocês.
6 परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले.
6 Mas no princípio da criação Deus ‘os fez homem e mulher’.
7 ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील,
7 ‘Por esta razão, o homem deixará pai e mãe e se unirá à sua mulher,
8 आणि ते दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत.
8 e os dois se tornarão uma só carne’. Assim, eles já não são dois, mas sim uma só carne.
9 म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”
9 Portanto, o que Deus uniu, ninguém o separe".
10 नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले.
10 Quando estava em casa novamente, os discípulos interrogaram Jesus sobre o mesmo assunto.
11 त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.
11 Ele respondeu: "Todo aquele que se divorciar de sua mulher e se casar com outra mulher, estará cometendo adultério contra ela.
12 आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.”
12 E se ela se divorciar de seu marido e se casar com outro homem, estará cometendo adultério".
13 लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.
13 Alguns traziam crianças a Jesus para que ele tocasse nelas, mas os discípulos os repreendiam.
14 जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
14 Quando Jesus viu isso, ficou indignado e lhes disse: "Deixem vir a mim as crianças, não as impeçam; pois o Reino de Deus pertence aos que são semelhantes a elas.
15 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.”
15 Digo-lhes a verdade: Quem não receber o Reino de Deus como uma criança, nunca entrará nele".
16 नंतर त्यांनी बालकांना कवेत घेतले, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
16 Em seguida, tomou as crianças nos braços, impôs-lhes as mãos e as abençoou.
17 येशू वाटेला लागणार तोच, एक मनुष्य त्यांच्याकडे धावत आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून त्यांना म्हणाला, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?”
17 Quando Jesus ia saindo, um homem correu em sua direção, pôs-se de joelhos diante dele e lhe perguntou: "Bom mestre, que farei para herdar a vida eterna? "
18 येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही.
18 Respondeu-lhe Jesus: "Por que você me chama bom? Ninguém é bom, a não ser um, que é Deus.
19 तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ”
19 Você conhece os mandamentos: ‘não matarás, não adulterarás, não furtarás, não darás falso testemunho, não enganarás ninguém, honra teu pai e tua mãe’".
20 “गुरुजी” तो तरुण जाहीरपणे म्हणाला, “मी बालक होतो तेव्हापासूनच या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.”
20 E ele declarou: "Mestre, a tudo isso tenho obedecido desde a minha adolescência".
21 येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. “तू एका गोष्टीत उणा आहेस,” तो म्हणाला. जा, “तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”
21 Jesus olhou para ele e o amou. "Falta-lhe uma coisa", disse ele. "Vá, venda tudo o que você possui e dê o dinheiro aos pobres, e você terá um tesouro no céu. Depois, venha e siga-me".
22 यावर त्या तरुणाचा चेहरा पडला. तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.
22 Diante disso ele ficou abatido e afastou-se triste, porque tinha muitas riquezas.
23 येशूंनी सभोवती पाहिले व आपल्या शिष्यांना म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती अवघड आहे!”
23 Jesus olhou ao redor e disse aos seus discípulos: "Como é difícil aos ricos entrar no Reino de Deus! "
24 हे ऐकून त्यांच्या बोलण्याचे शिष्यांना आश्चर्य वाटले. मग येशू पुन्हा म्हणाले, “मुलांनो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी अवघड आहे.
24 Os discípulos ficaram admirados com essas palavras. Mas Jesus repetiu: "Filhos, como é difícil entrar no Reino de Deus!
25 श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
25 É mais fácil passar um camelo pelo fundo de uma agulha do que um rico entrar no Reino de Deus".
26 शिष्य आणखी चकित झाले व ते एकमेकास म्हणू लागले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”
26 Os discípulos ficaram perplexos, e perguntavam uns aos outros: "Neste caso, quem pode ser salvo? "
27 येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही; परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”
27 Jesus olhou para eles e respondeu: "Para o homem é impossível, mas para Deus não; todas as coisas são possíveis para Deus".
28 पेत्र बोलला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!”
28 Então Pedro começou a dizer-lhe: "Nós deixamos tudo para seguir-te".
29 येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, ज्यांनी मला अनुसरण्यासाठी व शुभवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहीण, आई, पिता, मुले आणि जमिनीचा त्याग केला आहे.
29 Respondeu Jesus: "Digo-lhes a verdade: Ninguém que tenha deixado casa, irmãos, irmãs, mãe, pai, filhos, ou campos, por causa de mim e do evangelho,
30 या वर्तमान युगात त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, घरे, भाऊ बहीण, आई, मुले आणि जमीन आणि याबरोबरच छळ आणि येणार्‍या युगात त्याला सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही.
30 deixará de receber cem vezes mais já no tempo presente casas, irmãos, irmãs, mães, filhos e campos, e com eles perseguição; e, na era futura, a vida eterna.
31 पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”
31 Contudo, muitos primeiros serão últimos, e os últimos serão primeiros".
32 ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले.
32 Eles estavam subindo para Jerusalém, e Jesus ia à frente. Os discípulos estavam admirados, enquanto os que o seguiam estavam com medo. Novamente ele chamou à parte os Doze e lhes disse o que haveria de lhe acontecer:
33 “आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील.
33 "Estamos subindo para Jerusalém e o Filho do homem será entregue aos chefes dos sacerdotes e aos mestres da lei. Eles o condenarão à morte e o entregarão aos gentios,
34 ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील; परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”
34 que zombarão dele, cuspirão nele, o açoitarão e o matarão. Três dias depois ele ressuscitará".
35 नंतर जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान येशूंकडे आले. “गुरुजी,” ते म्हणाले, “आम्ही आपल्याजवळ जे काही मागतो, ते आपण आमच्यासाठी करावे.”
35 Nisso Tiago e João, filhos de Zebedeu, aproximaram-se dele e disseram: "Mestre, queremos que nos faças o que vamos te pedir".
36 “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” येशूंनी विचारले.
36 "O que vocês querem que eu lhes faça? ", perguntou ele.
37 ते म्हणाले, “आपण आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला डावीकडे बसू द्यावे.”
37 Eles responderam: "Permite que, na tua glória, nos assentemos um à tua direita e o outro à tua esquerda".
38 “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही,” येशू म्हणाले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही पिऊ शकाल काय किंवा ज्या बाप्तिस्माने मी बाप्तिस्मा पावलो आहे तो बाप्तिस्मा तुम्ही घेऊ शकाल का?”
38 Disse-lhes Jesus: "Vocês não sabem o que estão pedindo. Podem vocês beber o cálice que eu estou bebendo ou ser batizados com o batismo com que estou sendo batizado? "
39 ते उत्तरले, “आम्ही तो पिऊ शकू.”
39 "Podemos", responderam eles. Jesus lhes disse: "Vocês beberão o cálice que estou bebendo e serão batizados com o batismo com que estou sendo batizado;
40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा ज्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्यांनाच त्या मिळतील.”
40 mas o assentar-se à minha direita ou à minha esquerda não cabe a mim conceder. Esses lugares pertencem àqueles para quem foram preparados".
41 हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा ते याकोब आणि योहानवर रागावले.
41 Quando os outros dez ouviram essas coisas, ficaram indignados com Tiago e João.
42 येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदीयांवर शासन करणारे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे.
42 Jesus os chamou e disse: "Vocês sabem que aqueles que são considerados governantes das nações as dominam, e as pessoas importantes exercem poder sobre elas.
43 पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.
43 Não será assim entre vocês. Pelo contrário, quem quiser tornar-se importante entre vocês deverá ser servo;
44 आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, तो सर्वांचा गुलाम झाला पाहिजे.
44 e quem quiser ser o primeiro deverá ser escravo de todos.
45 मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
45 Pois nem mesmo o Filho do homem veio para ser servido, mas para servir e dar a sua vida em resgate por muitos".
46 मग येशू यरीहो शहरात आले. तिथे येशू आणि त्यांचे शिष्य, मोठ्या समुदायासह शहर सोडून जात असताना, तीमयाचा पुत्र बार्तीमय हा आंधळा, येशू ज्या रस्त्याने चालले होते, त्या रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता.
46 Então chegaram a Jericó. Quando Jesus e seus discípulos, juntamente com uma grande multidão, estavam saindo da cidade, o filho de Timeu, Bartimeu, que era cego, estava sentado à beira do caminho pedindo esmolas.
47 जेव्हा हे नासरेथकर येशू जात आहेत असे त्याने ऐकले, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
47 Quando ouviu que era Jesus de Nazaré, começou a gritar: "Jesus, Filho de Davi, tem misericórdia de mim! "
48 अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
48 Muitos o repreendiam para que ficasse quieto, mas ele gritava ainda mais: "Filho de Davi, tem misericórdia de mim! "
49 येशू थांबले आणि म्हणाले, “त्याला इकडे बोलवा.”
49 Jesus parou e disse: "Chamem-no". E chamaram o cego: "Ânimo! Levante-se! Ele o está chamando".
50 हे ऐकताच बार्तीमयने आपला अंगरखा भिरकावून दिला, उडी मारून तो उठला आणि येशूंकडे आला.
50 Lançando sua capa para o lado, de um salto, pôs-se de pé e dirigiu-se a Jesus.
51 “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” येशूंनी त्याला विचारले.
51 "O que você quer que eu lhe faça? ", perguntou-lhe Jesus. O cego respondeu: "Mestre, eu quero ver! "
52 येशू म्हणाले, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि तो रस्त्याने येशूंच्या मागे चालू लागला.
52 "Vá", disse Jesus, "a sua fé o curou". Imediatamente ele recuperou a visão e seguia a Jesus pelo caminho.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Marcos 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.