Levítico 9

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन आणि त्याचे पुत्र व इस्राएलच्या पुढाऱ्यांना बोलाविले.
1 Oito dias depois Moisés convocou Arão e seus filhos e as autoridades de Israel.
2 तो अहरोनाला म्हणाला, “तुझ्या पापार्पणासाठी व्यंग नसलेला एक गोर्‍हा व होमार्पणासाठी व्यंग नसलेला एक मेंढा घेऊन याहवेहसमोर अर्पण कर.
2 E disse a Arão: "Traga um bezerro para a oferta pelo pecado e um carneiro para o holocausto, ambos sem defeito, e apresente-os ao Senhor.
3 मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत,
3 Depois diga aos israelitas: Tragam um bode para oferta pelo pecado, um bezerro e um cordeiro, ambos de um ano de idade e sem defeito, para holocausto;
4 आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्‍हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.”
4 e um boi e um carneiro para oferta de comunhão, para os sacrificar perante o Senhor, juntamente com a oferta de cereal amassada com óleo; pois hoje o Senhor aparecerá a vocês".
5 म्हणून मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सभामंडपापुढे सर्वकाही आणले आणि संपूर्ण मंडळी याहवेहसमोर येऊन उभी राहिली.
5 Levaram então tudo o que Moisés determinou para a frente da Tenda do Encontro, e a comunidade inteira aproximou-se e ficou de pé perante o Senhor.
6 तेव्हा मोशे म्हणाला, “हे करण्याची आज्ञा तुम्हाला याहवेहनी दिली आहे, जेणेकरून याहवेहचे गौरव तुम्हाला प्रकट व्हावे.”
6 Disse-lhes Moisés: "Foi isso que o Senhor ordenou que façam, para que a glória do Senhor apareça a vocês".
7 मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ ये आणि तुझे पापार्पण आणि तुझे होमार्पण यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर; लोकांसाठी बलीचे अर्पण कर आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर, याहवेहने आज्ञा दिली त्याप्रमाणे ते कर.”
7 Disse Moisés a Arão: "Venha até o altar e ofereça o seu sacrifício pelo pecado e o seu holocausto, e faça propiciação por você mesmo e pelo povo; ofereça o sacrifício pelo povo e faça propiciação por ele, conforme o Senhor ordenou".
8 तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला आणि त्याने स्वतःच्या पापासाठी गोर्‍ह्याचा वध केला.
8 Arão foi até o altar e ofereceu o bezerro como sacrifício pelo pecado por si mesmo.
9 मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्‍ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले.
9 Seus filhos levaram-lhe o sangue, e ele molhou o dedo no sangue e o pôs nas pontas do altar; então derramou o restante do sangue na base do altar,
10 याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला.
10 onde queimou a gordura, os rins e o lóbulo do fígado da oferta pelo pecado, conforme o Senhor tinha ordenado a Moisés;
11 कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले.
11 a carne e o couro, porém, queimou fora do acampamento.
12 मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले.
12 Depois sacrificou o holocausto. Seus filhos lhe entregaram o sangue, e ele o derramou nos lados do altar.
13 मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला.
13 Entregaram-lhe em seguida o holocausto pedaço por pedaço, inclusive a cabeça, e ele os queimou no altar.
14 त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला.
14 Lavou as vísceras e as pernas e as queimou em cima do holocausto sobre o altar.
15 मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला.
15 Depois Arão apresentou a oferta pelo povo. Pegou o bode para a oferta pelo pecado do povo e o ofereceu como sacrifício pelo pecado, como fizera com o primeiro.
16 नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले.
16 Apresentou o holocausto e ofereceu-o conforme fora prescrito.
17 मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले.
17 Também apresentou a oferta de cereal, pegou um punhado dela e a queimou no altar, além do holocausto da manhã.
18 यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले.
18 Matou o boi e o carneiro como sacrifício de comunhão pelo povo. Seus filhos levaram-lhe o sangue, e ele o derramou nos lados do altar.
19 परंतु त्याने गोर्‍ह्याची व मेंढ्याची चरबी, म्हणजे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा
19 Mas as porções de gordura do boi e do carneiro, a cauda gorda, a gordura que cobre as vísceras, os rins e o lóbulo do fígado,
20 त्या बलींच्या उरांवर ठेवली, मग अहरोनाने त्या सर्वांचा वेदीवर होम केला.
20 puseram em cima do peito; e Arão as queimou no altar.
21 मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले.
21 Em seguida, Arão moveu o peito e a coxa direita do animal perante o Senhor como gesto ritual de apresentação, conforme Moisés tinha ordenado.
22 मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला.
22 Depois Arão ergueu as mãos em direção ao povo e o abençoou. E, tendo oferecido o sacrifício pelo pecado, o holocausto e o sacrifício de comunhão, desceu.
23 नंतर मोशे व अहरोन सभामंडपात गेले. ते परत बाहेर आले, तेव्हा त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला आणि याहवेहचे वैभव सर्वांना प्रकट झाले.
23 Assim Moisés e Arão entraram na Tenda do Encontro. Quando saíram, abençoaram o povo; e a glória do Senhor apareceu a todo o povo.
24 याहवेहपासून अग्नी येऊन त्याने वेदीवरील होमार्पण व चरबीही भस्म केली. जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने जयजयकार केला आणि जमिनीवर लोटांगण घातले.
24 Saiu fogo da presença do Senhor e consumiu o holocausto e as porções de gordura sobre o altar. E, quando todo o povo viu isso, gritou de alegria e prostrou-se rosto em terra.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Levítico 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.