Levítico 25

marc (MARC) vs BKJ

Sair da comparação
1 सीनाय पर्वतावर याहवेहनी मोशेला सांगितले,
1 E o SENHOR falou a Moisés, no monte Sinai, dizendo:
2 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा.
2 Fala aos filhos de Israel, e dize-lhes: Quando entrardes na terra que eu vos dou, então a terra guardará um shabat ao SENHOR.
3 सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे.
3 Seis anos semearás o teu campo, e seis anos podarás a tua vinha, e colherás o seu fruto;
4 पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.
4 mas, no sétimo ano, haverá um shabat de descanso para a terra, um shabat ao SENHOR; tu não semearás o teu campo, nem podarás a tua vinha.
5 आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील.
5 Não ceifarás o que nascer espontaneamente depois da tua colheita, não colherás as uvas de tua vinha descoberta, porque este será o ano de descanso para a terra.
6 त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे.
6 E o shabat da terra será alimento para vós, para ti, para o teu servo, para tua serva, para o teu servo contratado, e para o estrangeiro que peregrina contigo;
7 तसेच जनावरे, वनपशू या दोघांनाही तिथे चरावयाची मोकळीक आहे.
7 e para o teu gado, e para os animais que estão na tua terra, todo o seu incremento será para alimento.
8 “ ‘तुम्ही सात शब्बाथ वर्षे मोजावे; म्हणजेच सात वेळा सात वर्षे; म्हणजे सात शब्बाथ वर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होईल.
8 E tu contarás sete shabats de anos, sete vezes sete anos, e o espaço dos sete shabats de anos serão para ti quarenta e nove anos.
9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे.
9 Então tu farás tocar a trombeta do jubileu, no décimo dia do sétimo mês, no dia da expiação; fareis tocar a trombeta por toda a vossa terra.
10 पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे.
10 E santificareis o ano quinquagésimo, e proclamareis liberdade em toda a terra a todos os seus habitantes; isto será o jubileu para vós, cada homem retornará à sua possessão, cada homem retornará à sua família.
11 पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.
11 Esse quinquagésimo ano será para vós o jubileu; não semeareis, nem colhereis o que nele crescer de si mesmo, nem vindimareis as uvas da tua vinha descoberta.
12 कारण हे योबेल वर्ष असेल आणि हे तुमच्याकरिता पवित्र असेल; शेतात आपोआप उगविलेले पीक तुम्ही खावे.
12 Pois isto é o jubileu, santo será para vós; comereis o acréscimo do campo.
13 “ ‘या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपल्या स्वतःच्या वतनात परत जावे.
13 Neste ano de jubileu, retornareis cada homem à sua possessão.
14 “ ‘यासाठी की तुम्ही जेव्हा आपल्या लोकांना जमीन विकाल किंवा त्याच्याकडून विकत घ्याल, तेव्हा तुमच्याकडून अन्यायाचा व्यवहार होऊ नये.
14 E se vós venderdes alguma coisa ao teu próximo ou comprardes alguma coisa da mão do teu próximo, não oprimais uns aos outros.
15 योबेल वर्षानंतरच्या वर्षांच्या संख्येच्या आधारावर तुम्ही तुमच्या लोकांकडून विकत घ्यावयाची आणि पीक कापणीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत या आधारावर त्याची तुम्हाला विक्री करावयाची आहे.
15 Conforme o número dos anos após o jubileu, tu comprarás do teu próximo; e conforme o número dos anos dos frutos, ele venderá a ti.
16 जर वर्षे अनेक असतील तर जमिनीची किंमत त्या मानाने जास्त असेल, परंतु ही वर्षे थोडी असल्यास तिची किंमत त्या मानाने कमी असेल; कारण खरोखर विक्री जमिनीची होत नाही, तर ती जमीन किती वेळा पिके देऊ शकेल यावर तिची किंमत अवलंबून राहील.
16 Conforme a multidão dos anos, aumentarás o seu preço; e conforme a diminuição dos anos, abaixarás o seu preço; porque, conforme o número dos anos dos frutos ele vende para ti.
17 एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
17 Portanto, ninguém oprima um ao outro; mas tu temerás o teu Deus; porque eu sou o SENHOR vosso Deus.
18 “ ‘माझ्या आज्ञांचे पालन करा आणि माझे विधीचे पालन करण्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही देशात सुरक्षितपणे राहाल.
18 Portanto, fazei os meus estatutos, e guardai os meus juízos, e fazei-os; e habitareis na terra em segurança.
19 भूमी भरपूर पीक देईल आणि तुम्ही भरपूर खाल आणि सुरक्षित राहाल.
19 E a terra dará o seu fruto, e comereis até vos fartar, e nela habitareis em segurança.
20 तुम्ही असे विचाराल, “जर आम्ही झाडे लावली नाही किंवा आमच्या पिकांची कापणी केली नाही, तर आम्ही सातव्या वर्षी काय खावे?”
20 E se disserdes: O que comeremos no sétimo ano? Eis que não havemos de semear, nem colher o nosso incremento.
21 मी तुम्हाला असे आशीर्वादित करेन की जमीन सहाव्या वर्षी तीन वर्षापर्यंत पर्याप्‍त असे पीक देईल.
21 Então eu mandarei a minha bênção sobre vós no sexto ano, para que dê fruto por três anos.
22 आठव्या वर्षी जेव्हा तुम्ही बी पेराल, तेव्हा तुम्ही मागच्या वर्षात गोळा केलेले पीक खात राहाल आणि नवव्या वर्षाचे पीक येईपर्यंत तुम्ही ते खाऊ शकाल.
22 E, no oitavo ano semeareis e comereis do fruto velho até ao ano nono; até que venha o seu fruto, comereis da fartura antiga.
23 “ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात.
23 A terra não se venderá para sempre, porque a terra é minha; pois vós sois estrangeiros e peregrinos comigo.
24 तुमच्या ताब्यात असलेली संपूर्ण जमीन, तुम्ही त्या जमिनीला सोडविण्याची तरतूद केली पाहिजे.
24 E em toda a terra da vossa possessão concedereis redenção à terra.
25 “ ‘तुमचा इस्राएली सहकारी गरीब झाला आणि त्याने त्यांची काही मालमत्ता विकली, तर त्यांच्या जवळच्या नातलगाने ती खंडणी भरून सोडवून घ्यावी.
25 Se teu irmão empobrecer e vender certa quantidade da sua possessão, e se algum parente vier para a redimir, então ele resgatará o que vendeu seu irmão.
26 जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली,
26 E se o homem não tiver ninguém para a redimir, e ele mesmo for capaz de redimi-la,
27 तर योबेल वर्षापर्यंत जमीन आणखी किती वर्षे पीक देऊ शकेल हे पाहून त्या प्रमाणात तिची किंमत भरावी. जमिनीच्या सध्याच्या मालकाने तितके पैसे घेऊन तिच्या मूळ मालकाला ती परत करावी.
27 então ele contará os anos desde a sua venda, e restituirá o excesso ao homem a quem a vendeu, para que retorne à sua possessão.
28 पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे.
28 Mas se ele não for capaz de restaurar-lhe, então, o que foi vendido permanecerá na mão do comprador até ao ano do jubileu; e no jubileu sairá, e ele tornará à sua possessão.
29 “ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.
29 E se um homem vender uma casa de moradia em cidade murada, então ele poderá resgatá-la dentro de um ano inteiro após a sua venda; durante um ano inteiro, ele poderá resgatá-la.
30 नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही.
30 Mas se não for resgatada no espaço de um ano inteiro, então a casa que estiver na cidade murada pertencerá para sempre àquele que a comprou, por todas as suas gerações; não sairá no jubileu.
31 पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे.
31 Mas as casas das aldeias que não têm muro em volta serão consideradas como os campos da região; elas poderão ser resgatadas, e sairão no jubileu.
32 “ ‘लेवी वंशातील मनुष्याचे घर तटबंदी असलेल्या शहरात असले तरी ते त्याला केव्हाही खंडणी भरून सोडवून घेता येईल.
32 Contudo, as cidades dos levitas, e as casas das cidades de sua possessão, os levitas poderão resgatá-las a qualquer tempo.
33 म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे.
33 E se um homem comprar dos levitas, então a casa que foi vendida e a cidade da sua possessão sairão no ano do jubileu; porque as casas das cidades dos levitas são a sua possessão entre os filhos de Israel.
34 लेव्यांना त्यांच्या शहराभोवती असलेली कुरणे विकण्यास परवानगी नाही, कारण ती त्यांची कायमचीच मालमत्ता आहे.
34 Mas o campo dos arredores das suas cidades não se poderá vender, porque é a sua possessão perpétua.
35 “ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील.
35 E se teu irmão empobrecer, e as suas forças decaírem, então tu o socorrerás, sim, embora seja um estrangeiro ou um peregrino, para que viva contigo.
36 परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.
36 Não tomarás dele com usura, nem ganho; mas temerás o teu Deus, para que teu irmão possa viver contigo.
37 तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.
37 Não lhe darás teu dinheiro com usura, nem emprestarás os teus mantimentos por ganância.
38 ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
38 Eu sou o SENHOR vosso Deus, que vos tirei da terra do Egito, para vos dar a terra de Canaã, e para ser vosso Deus.
39 “ ‘जर तुमच्यापैकी कोणी इस्राएली गरीब झाला असेल आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर तुम्ही त्यांना गुलामासारखे कामे करावयास लावू नये.
39 E se teu irmão que habita contigo empobrecer, e se vender a ti, não o obrigarás servir como um escravo;
40 तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल.
40 mas como um servo contratado, e como um peregrino ele estará contigo; e te servirá até ao ano do jubileu.
41 त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील.
41 E então ele partirá de ti, ele e seus filhos com ele, e retornará à sua própria família, e à possessão de seus pais retornará.
42 कारण इस्राएली तर माझे सेवक आहेत, मी त्याला इजिप्त देशातून बाहेर आणले आहे. म्हणून त्याची सर्वसाधारण गुलामाप्रमाणे विक्री केली जाऊ नये.
42 Porque eles são meus servos, que eu tirei da terra do Egito; eles não serão vendidos como escravos.
43 त्यांना जुलमाने वागविले जाऊ नये, परंतु तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे.
43 Tu não governarás sobre ele com rigor, mas temerás o teu Deus.
44 “ ‘तुमचे पुरुष आणि स्त्री गुलाम तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांमधून यावेत; तुम्ही त्यांच्याकडून गुलाम विकत घेऊ शकता.
44 Quanto aos escravos, e às escravas que tiveres, serão dos pagãos que estão ao redor de vós; deles comprareis escravos e escravas.
45 तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे काही तात्पुरते रहिवासी आणि तुमच्या देशात जन्मलेल्या त्यांच्या कुळातील सदस्यांना देखील विकत घेऊ शकता आणि ते तुमची मालमत्ता बनतील.
45 Também dos filhos dos estrangeiros que peregrinam entre vós comprareis, deles e das suas famílias que estiverem convosco, que tiverem gerado na vossa terra; e vos serão por possessão.
46 तुम्ही ते तुमच्या मुलांना वारसाहक्कात देऊ शकता आणि त्यांना आयुष्यभर गुलाम बनवू शकता, पण तुमच्या इस्राएली बांधवांना अशा प्रकारची कठोर वागणूक तुम्ही देऊ नये.
46 E os possuireis por herança para vossos filhos depois de vós, para os herdarem por possessão; eles serão vossos servos para sempre, mas sobre vossos irmãos, os filhos de Israel, não governareis uns sobre os outros com rigor.
47 “ ‘तुमच्यात राहणारा एखादा परदेशी श्रीमंत झाला व इस्राएली वंशातील कोणी आपल्या दारिद्र्यामुळे स्वतःला त्या परदेश्याला वा परदेशी कुटुंबाला विकून टाकले,
47 E se um peregrino ou estrangeiro que está contigo alcançar riqueza, e teu irmão, que está com ele, empobrecer e se vender ao peregrino ou estrangeiro que está contigo, ou a um membro da família do estrangeiro,
48 तर त्याची विक्री झाल्यावरही त्याच्या घराण्यापैकी कोणालाहीः
48 depois de se vender, ele poderá ser resgatado novamente, um de seus irmãos poderá resgatá-lo;
49 त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल.
49 ou seu tio ou o filho de seu tio o resgatará; ou qualquer um dos seus parentes, alguém da sua família, poderá resgatá-lo; ou, se ele for capaz, poderá resgatar-se a si mesmo.
50 त्याने स्वतःला विकले त्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे राहिली असतील तितकी मोजून याकाळात एका मजुराला जितकी मजुरी द्यावी लागेल तितका पैसा भरून त्याची सुटका करावी.
50 E ele contará com aquele que o comprou, desde o ano que foi vendido a ele até o ano do jubileu; e o preço da sua venda será conforme o número dos anos, conforme o tempo que o servo contratado estará com ele.
51 जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा.
51 Se ainda muitos anos faltarem, de acordo com esses anos ele dará o preço de sua redenção, segundo o dinheiro pelo qual foi comprado.
52 जर योबेल वर्षाला थोडीच वर्षे राहिली असतील तर त्यांनी हिशोब करावा आणि त्यांच्या सुटकेसाठी नियमाप्रमाणे किंमत द्यावी.
52 E se ainda restarem poucos anos até ao ano do jubileu, então os calculará com ele; e segundo os seus anos, ele lhe dará de novo o preço de sua redenção.
53 तो दरवर्षी मजुराच्या हिशोबाप्रमाणे त्याच्याबरोबर वागणूक करेल आणि ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्यांना कठोर वागणूक देऊ नये.
53 E como servo contratado anualmente estará com ele; e o outro não governará sobre ele com rigor diante dos teus olhos.
54 “ ‘योबेल वर्षापर्यंतही तो मुक्त झाला नसेल, तर तो व त्याची मुलेबाळे योबेल वर्षी मुक्त होतील,
54 E se ele não for resgatado nestes anos, então ele sairá no ano do jubileu, tanto ele como seus filhos.
55 कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
55 Pois para mim os filhos de Israel são servos; eles são os meus servos que eu tirei da terra do Egito. Eu sou o SENHOR vosso Deus.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Levítico 25, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.