Levítico 19

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 याहवेह मोशेला म्हणाले,
1 Disse o Senhor a Moisés:
2 “सर्व इस्राएली लोकांस सांग: ‘तुम्ही पवित्र असावे, कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, पवित्र आहे.
2 Fala a toda a congregação dos filhos de Israel e dize-lhes: Santos sereis, porque eu, o Senhor , vosso Deus, sou santo.
3 “ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
3 Cada um respeitará a sua mãe e o seu pai e guardará os meus sábados. Eu sou o Senhor , vosso Deus.
4 “ ‘मूर्तीकडे वळू नका आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
4 Não vos virareis para os ídolos, nem vos fareis deuses de fundição. Eu sou o Senhor , vosso Deus.
5 “ ‘जेव्हा तुम्ही याहवेहला शांत्यर्पणे करता, तेव्हा ती अशा प्रकारे अर्पण करा की तुमच्यावतीने मान्य करण्यात येतील.
5 Quando oferecerdes sacrifício pacífico ao Senhor , oferecê-lo-eis para que sejais aceitos.
6 तुम्ही अर्पिलेला यज्ञपशू त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी खावा; पण तिसर्‍या दिवशी उरलेले जाळूनच टाकले पाहिजे.
6 No dia em que o oferecerdes e no dia seguinte, se comerá; mas o que sobejar, ao terceiro dia, será queimado.
7 जर कोणी तिसर्‍या दिवशी त्यातील काही खाल्ले तर ते अशुद्ध आहे आणि ते स्वीकारले जाणार नाही.
7 Se alguma coisa dele for comida ao terceiro dia, é abominação; não será aceita.
8 जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे.
8 Qualquer que o comer levará a sua iniquidade, porquanto profanou coisa santa do Senhor ; por isso, será eliminado do seu povo.
9 “ ‘तुम्ही पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये आणि शेतात हंगामानंतर राहिलेला सरवा गोळा करू नये.
9 Quando também segares a messe da tua terra, o canto do teu campo não segarás totalmente, nem as espigas caídas colherás da tua messe.
10 तुमच्या द्राक्षमळ्यावर दुसर्‍यांदा जाऊ नका अथवा पडलेली द्राक्षे गोळा करू नका. गोरगरिबांसाठी आणि परदेशीयांसाठी ती तिथेच राहू द्यावी. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
10 Não rebuscarás a tua vinha, nem colherás os bagos caídos da tua vinha; deixá-los-ás ao pobre e ao estrangeiro. Eu sou o Senhor , vosso Deus.
11 “ ‘तुम्ही चोरी करू नये.
11 Não furtareis, nem mentireis, nem usareis de falsidade cada um com o seu próximo;
12 “ ‘तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहू नये आणि तुमच्या परमेश्वराचे नाव अपवित्र करू नये. मी याहवेह आहे.
12 nem jurareis falso pelo meu nome, pois profanaríeis o nome do vosso Deus. Eu sou o Senhor .
13 “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये.
13 Não oprimirás o teu próximo, nem o roubarás; a paga do jornaleiro não ficará contigo até pela manhã.
14 “ ‘तुम्ही बहिर्‍यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे.
14 Não amaldiçoarás o surdo, nem porás tropeço diante do cego; mas temerás o teu Deus. Eu sou o Senhor .
15 “ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्‍याचा योग्य न्याय करावा.
15 Não farás injustiça no juízo, nem favorecendo o pobre, nem comprazendo ao grande; com justiça julgarás o teu próximo.
16 “ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये.
16 Não andarás como mexeriqueiro entre o teu povo; não atentarás contra a vida do teu próximo. Eu sou o Senhor .
17 “ ‘तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली मनुष्याचा तुमच्या अंतःकरणात द्वेष करू नये. तुमच्या शेजार्‍याला उघडपणे ताकीद द्यावी म्हणजे तुम्ही त्यांच्या पापाचे सहभागी होणार नाही.
17 Não aborrecerás teu irmão no teu íntimo; mas repreenderás o teu próximo e, por causa dele, não levarás sobre ti pecado.
18 “ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे.
18 Não te vingarás, nem guardarás ira contra os filhos do teu povo; mas amarás o teu próximo como a ti mesmo. Eu sou o Senhor .
19 “ ‘माझ्या आज्ञा पाळा.
19 Guardarás os meus estatutos; não permitirás que os teus animais se ajuntem com os de espécie diversa; no teu campo, não semearás semente de duas espécies; nem usarás roupa de dois estofos misturados.
20 “ ‘एखादा मनुष्य एखाद्या गुलाम स्त्रीसोबत झोपेल जी एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, परंतु ज्याला खंडणी दिली गेली नाही किंवा तिला स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे. तरीही त्यांना मृत्युदंड दिला जाऊ नये, कारण तिला मुक्त केले गेले नाही.
20 Se alguém se deitar com uma mulher, se for escrava desposada com outro homem e não for resgatada, nem se lhe houver dado liberdade, então, serão açoitados; não serão mortos, pois não foi libertada.
21 त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे.
21 O homem, como oferta pela sua culpa, trará um carneiro ao Senhor , à porta da tenda da congregação.
22 त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
22 Com o carneiro da oferta pela culpa, o sacerdote fará expiação, por ele, perante o Senhor , pelo pecado que cometeu, e ser-lhe-á perdoado o pecado que cometeu.
23 “ ‘तुम्ही आपल्या देशात प्रवेश कराल व तिथे सर्व प्रकारची फळझाडे लावाल. तेव्हा पहिली तीन वर्षे त्या झाडांची फळे खाऊ नका, कारण ती बेसुंती समजावी व तुम्हाला निषिद्ध आहेत,
23 Quando entrardes na terra e plantardes toda sorte de árvore de comer, ser-vos-á vedado o seu fruto; três anos vos será vedado; dele não se comerá.
24 चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे.
24 Porém, no quarto ano, todo o seu fruto será santo, será oferta de louvores ao Senhor .
25 परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
25 No quinto ano, comereis fruto dela para que vos faça aumentar a sua produção. Eu sou o Senhor , vosso Deus.
26 “ ‘तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नये.
26 Não comereis coisa alguma com sangue; não agourareis, nem adivinhareis.
27 “ ‘तुम्ही आपले केस कापतांना बाजूचे केस कापून गोलाकार देऊ नये किंवा आपल्या दाढीचे टोक कापू नये.
27 Não cortareis o cabelo em redondo, nem danificareis as extremidades da barba.
28 “ ‘मृत्यू पावलेल्यासाठी तुम्ही आपल्या शरीरावर जखमा करून घेऊ नये किंवा शरीर गोंदून घेऊ नये. मी याहवेह आहे.
28 Pelos mortos não ferireis a vossa carne; nem fareis marca nenhuma sobre vós. Eu sou o Senhor .
29 “ ‘तुम्ही आपल्या कन्यांना वेश्याकर्माला लावून त्यांना भ्रष्ट करू नये, नाहीतर देश व्यभिचारी होऊन दुष्टाईने भरून जाईल.
29 Não contaminarás a tua filha, fazendo-a prostituir-se; para que a terra não se prostitua, nem se encha de maldade.
30 “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे.
30 Guardareis os meus sábados e reverenciareis o meu santuário. Eu sou o Senhor .
31 “ ‘तुम्ही शकुनविद्या, ज्योतिष किंवा चेटक्यांची सल्लामसलत घेऊन स्वतःला भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
31 Não vos voltareis para os necromantes, nem para os adivinhos; não os procureis para serdes contaminados por eles. Eu sou o Senhor , vosso Deus.
32 “ ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे.
32 Diante das cãs te levantarás, e honrarás a presença do ancião, e temerás o teu Deus. Eu sou o Senhor .
33 “ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये.
33 Se o estrangeiro peregrinar na vossa terra, não o oprimireis.
34 जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
34 Como o natural, será entre vós o estrangeiro que peregrina convosco; amá-lo-eis como a vós mesmos, pois estrangeiros fostes na terra do Egito. Eu sou o Senhor , vosso Deus.
35 “ ‘लांबी, वजन किंवा प्रमाण मापण्यात अप्रामाणिक मापे वापरू नका.
35 Não cometereis injustiça no juízo, nem na vara, nem no peso, nem na medida.
36 तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा आणि हीन उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे.
36 Balanças justas, pesos justos, efa justo e justo him tereis. Eu sou o Senhor , vosso Deus, que vos tirei da terra do Egito.
37 “ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ”
37 Guardareis todos os meus estatutos e todos os meus juízos e os cumprireis. Eu sou o Senhor .

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Levítico 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.