Levítico 17

marc (MARC) vs ARA

Sair da comparação
ARA Almeida Revista e Atualizada 1993
1 याहवेह मोशेला म्हणाले,
1 Disse o Senhor a Moisés:
2 “अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत:
2 Fala a Arão, e a seus filhos, e a todos os filhos de Israel e dize-lhes: Isto é o que o Senhor ordenou, dizendo:
3 इस्राएलाच्या घराण्यातील कोणत्याही मनुष्याने बैल, कोकरू किंवा शेळी यांचा छावणीत किंवा छावणीबाहेर वध केला,
3 Qualquer homem da casa de Israel que imolar boi, ou cordeiro, ou cabra, no arraial ou fora dele,
4 परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे.
4 e os não trouxer à porta da tenda da congregação, como oferta ao Senhor diante do seu tabernáculo, a tal homem será imputada a culpa do sangue; derramou sangue, pelo que esse homem será eliminado do seu povo;
5 या आज्ञेचा उद्देश असा आहे की, इस्राएली लोक जे उघड्या मैदानात यज्ञपशू मारीत होते, ते त्यांनी सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे याहवेहपुढे आणावे आणि शांत्यर्पणाचे यज्ञ म्हणून याहवेहला अर्पण करावे.
5 para que os filhos de Israel, trazendo os seus sacrifícios, que imolam em campo aberto, os apresentem ao Senhor , à porta da tenda da congregação, ao sacerdote, e os ofereçam por sacrifícios pacíficos ao Senhor .
6 याजकाने सभामंडपाच्या दाराशी असलेल्या याहवेहच्या वेदीवर रक्त शिंपडून याहवेहला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
6 O sacerdote aspergirá o sangue sobre o altar do Senhor , à porta da tenda da congregação, e queimará a gordura de aroma agradável ao Senhor .
7 यापुढे ज्यांच्याबरोबर ते स्वतःच व्यभिचार करतात, त्या बोकडाच्या मूर्तींना, त्यांचे कोणतेही अर्पण करू नये. हा नियम त्यांच्यासाठी आणि येणार्‍या पिढ्यांसाठी लागू आहे.”
7 Nunca mais oferecerão os seus sacrifícios aos demônios, com os quais eles se prostituem; isso lhes será por estatuto perpétuo nas suas gerações.
8 तू त्यांना सांग: इस्राएली किंवा तुमच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी यांनी होमार्पण किंवा यज्ञार्पण केले,
8 Dize-lhes, pois: Qualquer homem da casa de Israel ou dos estrangeiros que peregrinam entre vós que oferecer holocausto ou sacrifício
9 आणि याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी तो प्राणी अर्पण करण्यास आणला नाही, तर त्याला आपल्या लोकांमधून बहिष्कृत करावे.
9 e não o trouxer à porta da tenda da congregação, para oferecê-lo ao Senhor , esse homem será eliminado do seu povo.
10 इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन.
10 Qualquer homem da casa de Israel ou dos estrangeiros que peregrinam entre vós que comer algum sangue, contra ele me voltarei e o eliminarei do seu povo.
11 कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते.
11 Porque a vida da carne está no sangue. Eu vo-lo tenho dado sobre o altar, para fazer expiação pela vossa alma, porquanto é o sangue que fará expiação em virtude da vida.
12 म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.”
12 Portanto, tenho dito aos filhos de Israel: nenhuma alma de entre vós comerá sangue, nem o estrangeiro que peregrina entre vós o comerá.
13 “ ‘इस्राएली किंवा तुमच्यामध्ये असलेला कोणीही विदेशी शिकारीला गेला असता, त्याने खाण्यास योग्य असलेला पशू किंवा पक्षी यांची शिकार केली, तर त्याचे रक्त जमिनीवरच ओतून मातीने झाकून टाकावे,
13 Qualquer homem dos filhos de Israel ou dos estrangeiros que peregrinam entre vós que caçar animal ou ave que se come derramará o seu sangue e o cobrirá com pó.
14 कारण रक्त हे प्रत्येक प्राण्याचे जीवन आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुम्ही कोणत्याही प्राण्याचे रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचे जीवन हे त्याचे रक्त आहे; जो कोणी रक्ताचे सेवन करेल त्याला बहिष्कृत केलेच पाहिजे.”
14 Portanto, a vida de toda carne é o seu sangue; por isso, tenho dito aos filhos de Israel: não comereis o sangue de nenhuma carne, porque a vida de toda carne é o seu sangue; qualquer que o comer será eliminado.
15 “ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल.
15 Todo homem, quer natural, quer estrangeiro, que comer o que morre por si ou dilacerado lavará as suas vestes, banhar-se-á em água e será imundo até à tarde; depois, será limpo.
16 पण जर त्याने आपली वस्त्रे धुतली नाहीत व स्नान केले नाही, तर तो दोषीच राहील.’ ”
16 Mas, se não as lavar, nem banhar o corpo, levará sobre si a sua iniquidade.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Levítico 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.