Levítico 11

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
1 O senhor disse a Moisés e a Aarão: "Dize aos israelitas o seguinte:
2 “इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता.
2 entre todos os animais da terra, eis o que podereis comer:
3 ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.
3 podereis comer todo animal que tem a unha fendida e o casco dividido, e que rumina.
4 “जे प्राणी फक्त रवंथ करतात किंवा त्यांचे फक्त खूर दुभागलेले आहेत, ते तुम्ही खाऊ नयेत. उंट जरी रवंथ करतात तरी त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
4 Mas não comereis aqueles que só ruminam ou só têm a unha fendida. A estes, tê-los-eis por impuros: tal como o camelo, que rumina mas não tem o casco fendido.
5 रानससा जरी रवंथ करतो तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.
5 E como o coelho igualmente, que rumina mas não tem a unha fendida; tê-los-eis por impuros.
6 ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.
6 E como a lebre também, que rumina, mas não tem a unha fendida; tê-la-eis por impura,
7 डुकरे देखील अशुद्ध आहेत; जरी त्यांचे दुभागलेले खूर आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत.
7 E enfim, como o porco, que tem a unha fendida e o pé dividido, mas não rumina; tê-lo-eis por impuro.
8 त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
8 Não comereis da sua carne e não tocareis nos seus cadáveres: vós os tereis por impuros.
9 “समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता.
9 Entre os animais que vivem na água, eis que podereis comer: podereis comer tudo o que tem barbatanas e escamas, nas águas, no mar e nos rios.
10 पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत.
10 Mas tereis em abominação todos os que não têm barbatanas nem escama, nos mares e nos rios, entre todos os animais que vivem nas águas e entre todos os seres vivos que nelas se encontram.
11 तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये.
11 A estes, tê-los-eis em abominação: não comereis de sua carne e tereis em abominação os seus cadáveres.
12 ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे.
12 Todos os que nas águas não têm barbatanas nem escamas, tê-los-eis em abominação.
13 “जे पक्षी तुम्ही अशुद्ध समजावेत आणि ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते अशुद्ध आहेत ते हे: गरुड, गिधाड, काळे गिधाड,
13 "Entre as aves, eis as que tereis abominação e de cuja carne não comereis, porque é uma abominação:
14 लाल पतंग, कोणत्याही जातीचे काळे पतंग,
14 a águia, o falcão e o abutre, o milhafre e toda variedade de falcões,
15 कोणत्याही जातीचे कावळे,
15 toda espécie de corvo,
16 शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे,
16 a avestruz, a andorinha, a gaivota e toda espécie de gavião,
17 लहान घुबड, करढोक, मोठे घुबड,
17 o mocho, a coruja e o íbis,
18 पांढरे घुबड, वाळवंटी घुबड, कुरर,
18 o cisne, o pelicano, o alcatraz
19 करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.”
19 e a cegonha, toda variedade de garça, a poupa e o morcego.
20 चार पाय असलेले उडणारे कीटक तुम्ही खाऊ नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध समजले जातात.
20 Todo volátil que anda sobre quatro pés vos será uma abominação.
21 तरीसुद्धा उडणारे कीटक, जे त्यांच्या चारही पायांवर चालतातः जमिनीवर उड्या मारण्याकरिता ज्यांच्या पायांवर एकजोड असतो, ते तुम्ही खाऊ शकता.
21 Todavia, entre os insetos voláteis que andam sobre quatro pés podereis comer aqueles que, além de seus quatro pés, têm pernas para saltar em cima da terra.
22 उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत.
22 Eis, pois, os que podereis comer: toda espécie de gafanhotos, assim como as variedades de solam, de hargol e de hagab.
23 मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत.
23 Qualquer outro volátil que tenha quatro pés vos será uma abominação.
24 वर उल्लेखलेल्या प्राण्यांमुळे तुम्ही अशुद्ध व्हाल, जो कोणी त्यांच्या मृतशरीराना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
24 Tornar-vos-eis imundos se os tocardes: se alguém tocar os seus cadáveres será impuro até a tarde,
25 जे कोणी त्यांचे मृतदेह उचलतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि ते संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहतील.
25 e aquele que levar os seus cadáveres lavará suas vestes e será impuro até a tarde.
26 ज्या प्राण्यांचे खूर अर्धवट दुभागलेले आहेत किंवा जे प्राणी रवंथ करीत नाहीत, अशा प्राण्यांच्या मृतशरीरांना तुम्ही स्पर्श केलात, तर तुम्ही अशुद्ध व्हाल.
26 Tereis por impuro todo animal que tenha a unha fendida, mas que não tem o pé dividido e não rumina; se alguém o tocar será imundo.
27 पंजांवर चालणारा प्रत्येक प्राणी खाण्यास तुम्हाला मनाई आहे. अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
27 Tereis também por impuros todos os quadrúpedes que andam nas plantas dos pés; se alguém tocar seus cadáveres será impuro até a tarde;
28 जो कोणी त्याचे मृतदेह उचलून नेईल त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. तो प्राणी तुम्ही अशुद्ध समजावा.
28 e aquele que levar os seus cadáveres lavará suas vestes e será impuro até a tarde. Tereis esses animais por impuros.
29 जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे,
29 Entre os animais que se movem em cima da terra, eis os que tereis por impuro: a toupeira, o rato e toda variedade de lagartos,
30 घोरपड, घुशी, पाल, मगर, गोगलगाय व गुहिर्‍या सरडा.
30 o musaranho, a rã, a tartaruga, a lagartixa e o camaleão.
31 जमिनीवर सरपटणार्‍यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
31 Tais são os répteis que tereis por impuros, quem os tocar mortos será impuro até a tarde.
32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; काष्ठपात्रे, वस्त्रे, कातडे, गोणपाट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; नंतर ते शुद्ध होईल.
32 Todo objeto o qual caírem os seus cadáveres será impuro: vasos de madeira, vestes, peles, sacos e qualquer outro utensílio. Por-se-á esse objeto na água e ele será imundo até a tarde; depois disso será puro.
33 त्यापैकी एखादा प्राणी मातीच्या पात्रात पडला, तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
33 Se cair uma parte desses cadáveres num vaso de terra, tudo o que se encontrar nele será impuro, e quebrareis esse vaso.
34 अशाप्रकारे अशुद्ध झालेली वस्तू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा जर एखाद्या पदार्थाला स्पर्श झाला, तर ते सर्व अशुद्ध समजावे. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध आहे.
34 Todo alimento preparado com água {desse vaso} será impuro; toda bebida, seja qual for o recipiente que a contenha, será impura.
35 अशा प्राण्यांच्या मृत शरीराचा स्पर्श चुलीला किंवा एखाद्या भांड्याला झाला तर ते अशुद्ध होय. अशा अशुद्ध चुलीचा व भांड्याचा नाश करावा.
35 Todo objeto sobre o qual cair alguma coisa dos seus cadáveres será impuro; o forno e o fogão serão destruídos: serão impuros, e vós os tereis como tais.
36 जर एखाद्या प्राण्याचे मृतदेह पाणी असलेल्या एखाद्या झर्‍यात किंवा हौदात पडले, तरी ते पाणी शुद्धच राहते. तरीपण जो त्या मृत शरीराला स्पर्श करेल त्याला अशुद्ध समजावे.
36 Contudo, as fontes e as cisternas em que há depósito de água ficarão puras, mas aquele que tocar os cadáveres será impuro.
37 जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते;
37 Se cair alguma coisa dos seus cadáveres sobre uma semente qualquer, esta ficará pura.
38 पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
38 Mas se se derramar água sobre a semente e alguma coisa dos seus cadáveres cair sobre ela, tê-la-eis por impura.
39 तुम्हाला खाण्यास मोकळीक असलेला प्राणी आजारी पडून मेला, तर अशा प्राण्याच्या मृत शरीराला जो कोणी स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
39 Se morrer algum animal que vos é lícito comer, aquele que tocar o seu cadáver será impuro até a tarde.
40 त्याचप्रमाणे जो कोणी त्या प्राण्याचे मांस खाईल किंवा त्याचे मृतदेह वाहून नेईल, त्याने आपली वस्त्रे धुवावीत; तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
40 Quem comer de sua carne lavará suas vestes e será impuro até a tarde; e aquele que levar esse cadáver lavará suas vestes e ficará impuro até a tarde.
41 जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत. ते खाऊ नयेत.
41 Todo animal que se arrasta sobre a terra vos será uma coisa abominável: não se comerá dele.
42 जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत.
42 Não comereis animal algum que se arrasta sobre a terra, tanto aqueles que se arrastam sobre o ventre como aqueles que andam sobre quatro ou mais pés: tê-los-eis em abominação.
43 झुंडीने राहणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करून तुम्ही अशुद्ध होऊ नये. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका.
43 Não vos torneis abomináveis, comendo um desses répteis, e não vos façais impuros por eles, porque vos tornaríeis imundos.
44 मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.
44 Pois eu sou o Senhor, vosso Deus. Vós vos santificareis e sereis santos, porque eu sou santo. Não vos contaminareis com esses animais que se arrastam sobre a terra,
45 मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.
45 porque eu sou o Senhor que vos tirou da terra do Egito para ser o vosso Deus. Sereis santos porque eu sou santo.
46 “पशू, पक्षी, प्रत्येक जलचर आणि प्रत्येक प्राणी जे जमिनीवर सरपटणारे आहेत त्यांच्यासंबंधी हे नियम आहेत.
46 Tal é a lei relativa aos quadrúpedes, às aves, a todos os seres vivos que se movem na águas e a todos aqueles que se arrastam sobre a terra.
47 शुद्ध व अशुद्ध प्राणी तुम्ही खावे वा खाऊ नये यामधील फरक दाखविण्यासाठी हे नियम आहेत.”
47 Essa lei vos fará discernir o que é puro do que é impuro, o animal que pode ser comido do que não pode."

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Levítico 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.