Lucas 23
marc (MARC) vs VC
1 नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूंना पिलाताकडे नेले.
1 Levantou-se a sessão e conduziram Jesus diante de Pilatos,
2 त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”
2 e puseram-se a acusá-lo: Temos encontrado este homem excitando o povo à revolta, proibindo pagar imposto ao imperador e dizendo-se Messias e rei.
3 तेव्हा पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
3 Pilatos perguntou-lhe: És tu o rei dos judeus? Jesus respondeu: Sim.
4 तेव्हा पिलात मुख्य याजकांकडे आणि जमावाकडे वळून म्हणाला, “या माणसामध्ये मला कोणताही दोष दिसत नाही.”
4 Declarou Pilatos aos príncipes dos sacerdotes e ao povo: Eu não acho neste homem culpa alguma.
5 तेव्हा ते अधिकच आग्रह करून म्हणाले, “पण हा मनुष्य सर्व यहूदीया प्रांतातील लोकांस त्याच्या शिकवणीद्वारे भडकावित आहे आणि गालीलापासून सुरुवात करून तो येथे आला आहे.”
5 Mas eles insistiam fortemente: Ele revoluciona o povo ensinando por toda a Judéia, a começar da Galiléia até aqui.
6 हे ऐकल्यावर पिलाताने विचारले, “तो गालीली आहे काय?”
6 A estas palavras, Pilatos perguntou se ele era galileu.
7 तो गालीली असल्याचे समजल्यावर, पिलाताने येशूंना हेरोद राजाकडे घेऊन जाण्यास सांगितले, कारण गालील प्रांत हेरोदाच्या अधिकारकक्षेत होता आणि स्वतः हेरोद त्यावेळी यरुशलेमात होता.
7 E, quando soube que era da jurisdição de Herodes, enviou-o a Herodes, pois justamente naqueles dias se achava em Jerusalém.
8 येशूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे हेरोद आनंदित झाला. कारण येशूंविषयी त्याने पुष्कळ ऐकले होते आणि त्याने केलेला एखादा चमत्कार डोळ्यांनी पाहण्याची त्याची फार इच्छा होती.
8 Herodes alegrou-se muito em ver Jesus, pois de longo tempo desejava vê-lo, por ter ouvido falar dele muitas coisas, e esperava presenciar algum milagre operado por ele.
9 त्याने येशूंना अनेक प्रश्न विचारले, परंतु येशूंनी त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
9 Dirigiu-lhe muitas perguntas, mas Jesus nada respondeu.
10 इकडे मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक उभे राहून आवेशाने येशूंवर आरोप करीत राहिले.
10 Ali estavam os príncipes dos sacerdotes e os escribas, acusando-o com violência.
11 त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले.
11 Herodes, com a sua guarda, tratou-o com desprezo, escarneceu dele, mandou revesti-lo de uma túnica branca e reenviou-o a Pilatos.
12 त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते.
12 Naquele mesmo dia, Pilatos e Herodes fizeram as pazes, pois antes eram inimigos um do outro.
13 नंतर पिलाताने प्रमुख याजक, अधिकारी आणि लोक यांना एकत्र बोलावून म्हटले,
13 Pilatos convocou então os príncipes dos sacerdotes, os magistrados e o povo, e disse-lhes:
14 “तुम्ही या मनुष्याला, तो लोकांना बंड करावयास चिथावीतो म्हणून माझ्याकडे आणले. मी त्याची तुमच्यासमोर कसून चौकशी केली आणि तो निर्दोष आहे, असे मला आढळून आले.
14 Apresentastes-me este homem como agitador do povo, mas, interrogando-o eu diante de vós, não o achei culpado de nenhum dos crimes de que o acusais.
15 हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही.
15 Nem tampouco Herodes, pois no-lo devolveu. Portanto, ele nada fez que mereça a morte.
16 म्हणून मी याला फटके मारतो आणि नंतर त्याला सोडून देतो.”
16 Por isso, soltá-lo-ei depois de o castigar.
17 कारण या सणात त्यांच्यासाठी त्याला एका गुन्हेगाराला सोडावे लागत असे.
17 {Acontecia que em cada festa ele era obrigado a soltar-lhes um preso.}
18 परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
18 Todo o povo gritou a uma voz: À morte com este, e solta-nos Barrabás.
19 बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते.
19 {Este homem fora lançado ao cárcere devido a uma revolta levantada na cidade, por causa de um homicídio.}
20 येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला
20 Pilatos, porém, querendo soltar Jesus, falou-lhes de novo,
21 पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!”
21 mas eles vociferavam: Crucifica-o! Crucifica-o!
22 तरीही आणखी एकदा तिसर्या खेपेस पिलाताने खुलासा विचारला, “या मनुष्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला क्रूसखांबावर खिळावे असा कोणताही दोष त्याच्यामध्ये मला आढळला नाही, मी त्याला फटके मारून सोडून देतो.”
22 Pela terceira vez, Pilatos ainda interveio: Mas que mal fez ele, então? Não achei nele nada que mereça a morte; irei, portanto, castigá-lo e, depois, o soltarei.
23 परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले,
23 Mas eles instavam, reclamando em altas vozes que fosse crucificado, e os seus clamores recrudesciam.
24 आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले.
24 Pilatos pronunciou então a sentença que lhes satisfazia o desejo.
25 तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे, बंडाळी आणि खून करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना क्रूसावर खिळावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले.
25 Soltou-lhes aquele que eles reclamavam e que havia sido lançado ao cárcere por causa do homicídio e da revolta, e entregou Jesus à vontade deles.
26 ते येशूंना घेऊन जात असताना, कुरेने गावचा रहिवासी शिमोन नावाचा एक मनुष्य रानातून परत येत होता. त्याला त्यांनी धरले व येशूंचा क्रूसखांब त्याच्यावर ठेवला व त्याला तो येशूंच्या मागोमाग वाहून नेण्यास भाग पाडले.
26 Enquanto o conduziam, detiveram um certo Simão de Cirene, que voltava do campo, e impuseram-lhe a cruz para que a carregasse atrás de Jesus.
27 येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्या स्त्रियाही होत्या.
27 Seguia-o uma grande multidão de povo e de mulheres, que batiam no peito e o lamentavam.
28 तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा.
28 Voltando-se para elas, Jesus disse: Filhas de Jerusalém, não choreis sobre mim, mas chorai sobre vós mesmas e sobre vossos filhos.
29 कारण असे दिवस येत आहेत की, त्या दिवसात तुम्ही म्हणाल, ‘लेकरे न झालेल्या स्त्रिया, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने धन्य आहेत.’ ”
29 Porque virão dias em que se dirá: Felizes as estéreis, os ventres que não geraram e os peitos que não amamentaram!
30 त्यावेळी,
30 Então dirão aos montes: Caí sobre nós! E aos outeiros: Cobri-nos!
31 कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?”
31 Porque, se eles fazem isto ao lenho verde, que acontecerá ao seco?
32 येशूंबरोबर आणखी दोन माणसे, दोघेही अपराधी होते, त्यांनाही जिवे मारण्याकरिता नेण्यात आले.
32 Eram conduzidos ao mesmo tempo dois malfeitores para serem mortos com Jesus.
33 जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.
33 Chegados que foram ao lugar chamado Calvário, ali o crucificaram, como também os ladrões, um à direita e outro à esquerda.
34 तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
34 E Jesus dizia: Pai, perdoa-lhes; porque não sabem o que fazem. Eles dividiram as suas vestes e as sortearam.
35 लोक उभे राहून पाहत होते आणि शासक त्यांची थट्टा करीत होते. ते म्हणत होते, “त्याने दुसर्यांचे तारण केले, तो परमेश्वराचा निवडलेला म्हणजे ख्रिस्त असेल तर त्याने स्वतःचा बचाव करावा.”
35 A multidão conservava-se lá e observava. Os príncipes dos sacerdotes escarneciam de Jesus, dizendo: Salvou a outros, que se salve a si próprio, se é o Cristo, o escolhido de Deus!
36 सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला.
36 Do mesmo modo zombavam dele os soldados. Aproximavam-se dele, ofereciam-lhe vinagre e diziam:
37 ते त्याला म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.”
37 Se és o rei dos judeus, salva-te a ti mesmo.
38 त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते:
38 Por cima de sua cabeça pendia esta inscrição: Este é o rei dos judeus.
39 गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.”
39 Um dos malfeitores, ali crucificados, blasfemava contra ele: Se és o Cristo, salva-te a ti mesmo e salva-nos a nós!
40 पण दुसर्या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस?
40 Mas o outro o repreendeu: Nem sequer temes a Deus, tu que sofres no mesmo suplício?
41 आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही.”
41 Para nós isto é justo: recebemos o que mereceram os nossos crimes, mas este não fez mal algum.
42 मग तो येशूंना म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.”
42 E acrescentou: Jesus, lembra-te de mim, quando tiveres entrado no teu Reino!
43 येशूंनी त्याला उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
43 Jesus respondeu-lhe: Em verdade te digo: hoje estarás comigo no paraíso.
44 आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.
44 Era quase à hora sexta e em toda a terra houve trevas até a hora nona.
45 सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.
45 Escureceu-se o sol e o véu do templo rasgou-se pelo meio.
46 तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
46 Jesus deu então um grande brado e disse: Pai, nas tuas mãos entrego o meu espírito. E, dizendo isso, expirou.
47 काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”
47 Vendo o centurião o que acontecia, deu glória a Deus e disse: Na verdade, este homem era um justo.
48 क्रूसावर खिळण्याचा प्रसंग पाहण्याकरिता आलेल्या जमावाने घडलेल्या घटना पाहिल्या, तेव्हा ते शोकाकुल होऊन छाती बडवित घरी परतले.
48 E toda a multidão dos que assistiam a este espetáculo e viam o que se passava, voltou batendo no peito.
49 परंतु जे सर्व येशूंना ओळखत होते, त्यामध्ये गालीलाहून त्यांच्यामागे आलेल्या अनेक स्त्रिया काही अंतरावर थांबल्या आणि या गोष्टी पाहत होत्या.
49 Os amigos de Jesus, como também as mulheres que o tinham seguido desde a Galiléia, conservavam-se a certa distância, e observavam estas coisas.
50 यहूदीयातील अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून चांगला व नीतिमान होता.
50 Havia um homem, por nome José, membro do conselho, homem reto e justo.
51 त्याने त्यांच्या या निर्णयाला आणि कारवाईला संमती दिली नव्हती. तो यहूदीयातील अरिमथिया नगरातून आला असून, तो स्वतः परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता.
51 Ele não havia concordado com a decisão dos outros nem com os atos deles. Originário de Arimatéia, cidade da Judéia, esperava ele o Reino de Deus.
52 पिलाताकडे जाऊन त्याने येशूंचे शरीर मिळण्यासाठी विनंती केली.
52 Foi ter com Pilatos e lhe pediu o corpo de Jesus.
53 त्याने येशूंचे शरीर क्रूसावरून खाली घेतले आणि ते तागाच्या वस्त्रात गुंडाळून खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले, ज्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.
53 Ele o desceu da cruz, envolveu-o num pano de linho e colocou-o num sepulcro, escavado na rocha, onde ainda ninguém havia sido depositado.
54 हे सर्व संस्कार शब्बाथाची तयारी करण्याच्या दिवशी करण्यात आले.
54 Era o dia da Preparação e já ia principiar o sábado.
55 येशूंबरोबर गालीलाहून आलेल्या स्त्रियांनी मागोमाग येऊन ती कबर पाहिली आणि येशूंचे शरीर कबरेत कसे ठेवले हे पाहिले.
55 As mulheres, que tinham vindo com Jesus da Galiléia, acompanharam José. Elas viram o túmulo e o modo como o corpo de Jesus ali fora depositado.
56 नंतर त्या घरी गेल्या आणि त्यांनी मसाले आणि सुगंधी द्रव्ये तयार केली. परंतु यहूदी नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी शब्बाथाच्या दिवशी विसावा घेतला.
56 Elas voltaram e prepararam aromas e bálsamos. No dia de sábado, observaram o preceito do repouso.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Lucas 23, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.