Lucas 22

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 आता वल्हांडण सण जवळ आला होता. यालाच बेखमीर भाकरीचा सण म्हणत असत.
1 Estava próxima a Festa dos Pães sem Fermento, chamada Páscoa.
2 प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक आता येशूंना कसे ठार करावे याचा विचार करू लागले. कारण ते लोकांना भीत होते.
2 Os principais sacerdotes e os escribas procuravam uma forma de matar Jesus; porque temiam o povo.
3 तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला.
3 Ora, Satanás entrou em Judas, chamado Iscariotes, que era um dos doze.
4 तो प्रमुख याजकवर्ग आणि मंदिराचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडे गेला आणि येशूंना विश्वासघाताने कसे धरून देता येईल, याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली.
4 Judas foi entender-se com os principais sacerdotes e os capitães sobre como lhes entregaria Jesus.
5 त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला मोबदला देण्याचे मान्य केले.
5 Eles se alegraram e combinaram em lhe dar dinheiro.
6 या गोष्टीला त्याने मान्यता दिली आणि येशूंभोवती समुदाय नसताना त्यांना त्यांच्या हाती देण्याची योग्य संधी तो शोधू लागला.
6 Judas concordou e buscava uma boa ocasião para lhes entregar Jesus, longe da multidão.
7 आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्‍याचा बळी दिला जाणार होता.
7 Chegou o dia da Festa dos Pães sem Fermento, em que era necessário fazer o sacrifício do cordeiro pascal.
8 येशूंनी पेत्र आणि योहान यांना पुढे पाठविले व म्हणाले, “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.”
8 Então Jesus enviou Pedro e João, dizendo:
9 तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कुठे तयारी करावी?”
9 Eles lhe perguntaram: — Onde o senhor quer que a preparemos?
10 येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. ज्या घरात तो जाईल तिथे त्याच्यामागे जा.
10 Jesus lhes explicou:
11 त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’
11 e digam ao dono da casa: “O Mestre pergunta: ‘Onde fica o aposento no qual comerei a Páscoa com os meus discípulos?’”
12 तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार असलेली एक खोली दाखवेल. तिथे तयारी करा.”
12 Ele lhes mostrará um espaçoso cenáculo mobiliado; ali façam os preparativos.
13 ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
13 E, indo, acharam tudo como Jesus lhes tinha dito e prepararam a Páscoa.
14 जेव्हा ती वेळ आली तेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य मेजावर टेकून भोजन करण्यास बसले.
14 Chegada a hora, Jesus se pôs à mesa, e os apóstolos estavam com ele.
15 मग ते शिष्यांना म्हणाले, “माझ्या दुःख सहन करण्यापूर्वी तुमच्याबरोबर हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी फार इच्छा होती.
15 Então Jesus lhes disse:
16 कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात याची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”
16 Pois eu lhes digo que nunca mais a comerei, até que ela se cumpra no Reino de Deus.
17 नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा.
17 E, pegando um cálice, depois de ter dado graças, disse:
18 मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.”
18 Pois eu digo a vocês que, de agora em diante, não mais beberei do fruto da videira, até que venha o Reino de Deus.
19 नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”
19 E, pegando um pão, tendo dado graças, o partiu e lhes deu, dizendo:
20 भोजन झाल्यानंतर येशूंनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे, जे रक्त पुष्कळांसाठी ओतले जात आहे.
20 Do mesmo modo, depois da ceia, pegou o cálice, dizendo:
21 पण पाहा, जो माझा विश्वासघात करणार आहे त्याचा हात माझ्याबरोबर या मेजावर आहे.
21 — Mas eis que a mão do traidor está comigo à mesa.
22 परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे मानवपुत्र जातो खरा, पण जो मनुष्य त्यांना विश्वासघाताने धरून देत आहे त्याचा धिक्कार असो.”
22 Pois o Filho do Homem vai segundo o que está determinado, mas ai daquele por quem ele está sendo traído!
23 हे ऐकून असे कृत्य करणारा आपल्यापैकी कोण असेल, असा प्रश्न ते आपसात विचारू लागले.
23 Então começaram a perguntar entre si qual deles seria o que estava para fazer isso.
24 नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला.
24 Houve também entre eles uma discussão sobre qual deles parecia ser o maior.
25 येशू त्यांना म्हणाले, “गैरयहूदी लोकांचे राजे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांच्यावर अधिकार गाजविणारे स्वतःला त्यांचे उपकारकर्ते म्हणतात.
25 Mas Jesus lhes disse:
26 परंतु तुम्ही त्यांच्यासारखे असू नये. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने लहानासारखे झाले पाहिजे आणि जो अधिकार चालवितो त्याने तुमचा सेवक असावे.
26 Mas vocês não são assim; pelo contrário, o maior entre vocês seja como o menor; e aquele que dirige seja como o que serve.
27 श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्‍यासारखा मी तुम्हामध्ये आहे.
27 Pois qual é maior: aquele que está à mesa ou aquele que serve? Não é verdade que é aquele que está à mesa? Pois, no meio de vocês, eu sou como quem serve.
28 माझ्या परीक्षामध्ये माझ्या बाजूने जे उभे राहिले, ते तुम्हीच आहात.
28 Vocês são os que têm permanecido comigo nas minhas tentações.
29 मी तुम्हाला राज्य बहाल करतो, ज्याप्रमाणे माझ्या पित्याने मला एक राज्य बहाल केले आहे,
29 E eu confio a vocês um reino, assim como o meu Pai confiou a mim,
30 तसेच माझ्या राज्यामध्ये माझ्याबरोबर बसून खातापिता येईल आणि तुम्ही सिंहासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.
30 para que comam e bebam à minha mesa no meu Reino; e vocês se assentarão em tronos para julgar as doze tribos de Israel.
31 “शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे.
31 — Simão, Simão, eis que Satanás pediu para peneirar vocês como trigo!
32 परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.”
32 Eu, porém, orei por você, para que a sua fé não desfaleça. E você, quando voltar para mim, fortaleça os seus irmãos.
33 शिमोन म्हणाला, “प्रभूजी, आपल्याबरोबर तुरुंगात जाण्यास व जीव देण्याचीही माझी तयारी आहे.”
33 Porém Pedro respondeu: — Estou pronto para ir com o Senhor, tanto para a prisão como para a morte.
34 तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “पेत्रा, मी तुला निश्चित सांगतो, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”
34 Mas Jesus lhe disse:
35 नंतर येशूंनी त्यांना विचारले, “मी तुम्हाला झोळी, पिशवी किंवा पायतणे न घेता पाठविले, तेव्हा तुम्हाला काही कमी पडले का?”
35 A seguir, Jesus perguntou aos discípulos: Eles responderam: — Não faltou nada!
36 यावर येशू त्यांना म्हणाले, “पण आता तुमच्याजवळ झोळी असल्यास ती घ्या आणि पिशवी पण घ्या. तुमच्याजवळ तरवार नसली, तर आपली वस्त्रे विका व ती विकत घ्या.
36 Então Jesus lhes disse:
37 कारण माझ्याविषयीचे भविष्य पूर्ण होण्याचा समय आला आहे. ते भविष्य हे: ‘अधर्मी लोकांत त्याची गणना झाली.’ संदेष्ट्यांनी माझ्याविषयी जे काही लिहून ठेवले आहे; ते सर्व पूर्णतेस जाईल.”
37 Pois eu lhes digo que é preciso que se cumpra em mim o que está escrito: “Ele foi contado com os malfeitores.” Pois o que a mim se refere está sendo cumprido.
38 तेव्हा शिष्य त्यांना म्हणाले, “हे पाहा प्रभू, येथे दोन तरवारी आहेत.”
38 Então lhe disseram: — Senhor, aqui estão duas espadas! Jesus lhes respondeu:
39 नेहमीप्रमाणे जैतून डोंगराकडे जाण्यासाठी येशू बाहेर पडले आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मागोमाग गेले.
39 E, saindo, Jesus foi, como de costume, para o monte das Oliveiras; e os discípulos o acompanharam.
40 तिथे पोहोचल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
40 Chegando ao lugar escolhido, Jesus lhes disse:
41 नंतर ते त्यांच्यापासून सुमारे दगड फेकला जाईल इतक्या अंतरावर गेले, त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.
41 Ele, por sua vez, se afastou um pouco, e, de joelhos, orava,
42 “हे पित्या, जर तुमची इच्छा असेल, तर हा प्याला माझ्यापासून दूर करा; तरी माझी इच्छा नाही तर तुमची पूर्ण होऊ द्या.”
42 dizendo:
43 तेव्हा स्वर्गातून एक देवदूत त्यांच्यापुढे प्रकट झाला आणि त्यांना सामर्थ्य पुरविले.
43 Então lhe apareceu um anjo do céu que o confortava.
44 येशू आत्म्यामध्ये इतके व्याकूळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
44 E, estando em agonia, orava mais intensamente. E aconteceu que o suor dele se tornou como gotas de sangue caindo sobre a terra.
45 शेवटी प्रार्थना करून उठल्यानंतर, ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण तेही दुःखामुळे झोपी गेले होते असे त्यांना आढळले.
45 Levantando-se da oração, Jesus foi até onde os discípulos estavam, e os encontrou dormindo de tristeza.
46 “तुम्ही झोप का घेत आहात?” येशू त्यांना म्हणाले, “उठा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
46 E disse:
47 ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तिथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदाह म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवित होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला,
47 Enquanto Jesus ainda falava, eis que chegou uma multidão. E um dos doze, que se chamava Judas, vinha à frente deles e se aproximou de Jesus para o beijar.
48 तेव्हा येशूने त्याला विचारले, “यहूदा, चुंबन घेऊन तू मानवपुत्राचा विश्वासघात करतो काय?”
48 Jesus, porém, lhe disse:
49 आता काय होणार हे शिष्यांनी ओळखले आणि येशूंना विचारले, “प्रभूजी, आम्ही तरवार चालवावी काय?”
49 Os que estavam ao redor de Jesus, vendo o que estava por acontecer, perguntaram: — Senhor, devemos atacar com as espadas?
50 तेवढ्यात त्यांच्यातील एकाने महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला.
50 Um deles golpeou o servo do sumo sacerdote e cortou-lhe a orelha direita.
51 येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला.
51 Mas Jesus interveio, dizendo: E, tocando na orelha do homem, o curou.
52 नंतर मुख्य याजक, मंदिराच्या द्वारपालांचे अधिकारी आणि वडीलजन यांना येशूंनी म्हटले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय की तुम्ही तरवारी व लाठ्या घेऊन आला आहात?
52 Então Jesus disse aos principais sacerdotes, capitães do templo e anciãos que vieram prendê-lo:
53 मी दररोज मंदिराच्या परिसरात तुमच्याबरोबर होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. परंतु आता हीच तुमची वेळ आहे, येथे अंधाराची सत्ता आहे.”
53 Todos os dias, estando eu com vocês no templo, vocês não tentaram me prender. Esta, porém, é a hora de vocês e a hora do poder das trevas.
54 शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफाच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत होता.
54 Então, prendendo Jesus, levaram-no e o introduziram na casa do sumo sacerdote. Pedro seguia de longe.
55 आणि जेव्हा काहीजणांनी तिथे अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली होती आणि एकत्रित खाली बसले होते, पेत्र त्यांच्याबरोबर खाली बसला.
55 Quando acenderam um fogo no meio do pátio e se assentaram juntos, Pedro tomou lugar entre eles.
56 एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.”
56 Uma empregada, vendo-o sentado perto do fogo, fixou os olhos nele e disse: — Este também estava com ele.
57 पेत्र नकार देत म्हणाला, “बाई, मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”
57 Mas Pedro negou, dizendo: — Mulher, não o conheço.
58 थोड्या वेळाने दुसर्‍या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.”
58 Pouco depois, outro homem, ao ver Pedro, disse: — Você também é um deles. Mas Pedro disse: — Homem, eu não sou um deles.
59 सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा मनुष्य त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!”
59 E, tendo passado cerca de uma hora, outro afirmou, dizendo: — Com certeza este também estava com ele, porque também é galileu.
60 हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.
60 Mas Pedro insistiu: — Homem, não sei do que você está falando. E logo, enquanto Pedro ainda falava, o galo cantou.
61 प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”
61 Então, o Senhor voltou-se e fixou os olhos em Pedro. E Pedro se lembrou da palavra do Senhor, como lhe tinha dito: “Hoje, antes que o galo cante, você me negará três vezes.”
62 पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.
62 E Pedro, saindo dali, chorou amargamente.
63 मग पहारेकर्‍यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली.
63 Os homens que detinham Jesus zombavam dele, davam-lhe pancadas e,
64 त्यांनी त्यांचे डोळे बांधले आणि म्हटले, “अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी चापट मारली?”
64 colocando uma venda sobre os olhos dele, diziam: — Profetize! Quem foi que bateu em você?
65 आणि त्यांनी त्यांची वाटेल तशी निंदा केली व अपमान केला.
65 E muitas outras coisas diziam contra ele, blasfemando.
66 प्रातःकाळ झाल्यावर, लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि दोघेही मुख्य याजक एकत्रित भेटले आणि येशूंना त्यांच्यासमोर आणण्यात आले.
66 Logo que amanheceu, reuniu-se a assembleia dos anciãos do povo, tanto os principais sacerdotes como os escribas, e o conduziram ao Sinédrio, onde lhe disseram:
67 ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर तसे आम्हाला सांग.”
67 — Se você é o Cristo, diga-nos. Então Jesus lhes respondeu:
68 आणि जर मी तुम्हाला विचारले, तर तुम्ही उत्तर देणार नाही.
68 E, se eu perguntar, vocês não me darão resposta.
69 परंतु येथून पुढे मानवपुत्राला सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”
69 Desde agora, o Filho do Homem estará sentado à direita do Deus Todo-Poderoso.
70 त्या सर्वांनी विचारले, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस काय?”
70 Todos perguntaram: — Então você é o Filho de Deus? Jesus respondeu:
71 तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीदारांची काय गरज आहे?” ते आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.
71 Eles disseram: — Que necessidade ainda temos de testemunho? Porque nós mesmos ouvimos o que ele falou.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Lucas 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.