Lucas 19

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 येशू यरीहोत प्रवेश करून त्यातून जात होते,
1 Entrando em Jericó, Jesus atravessava a cidade.
2 तिथे जक्कय नावाचा एक मनुष्य होता; तो प्रमुख जकातदार होता आणि श्रीमंत होता.
2 Eis que um homem rico, chamado Zaqueu, chefe dos publicanos,
3 येशू कोण आहे हे पाहण्याची त्याची उत्कट इच्छा होती, परंतु तो ठेंगणा असल्यामुळे गर्दीतून पाहणे त्याला शक्य नव्हते.
3 procurava ver quem era Jesus, mas não podia, por causa da multidão, por ser ele de pequena estatura.
4 तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते.
4 Então, correndo adiante, subiu num sicômoro a fim de ver Jesus, porque ele havia de passar por ali.
5 येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, “जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे.”
5 Quando Jesus chegou àquele lugar, olhando para cima, disse:
6 तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने त्यांचे आनंदाने स्वागत केले.
6 Zaqueu desceu depressa e o recebeu com alegria.
7 सर्व लोकांनी हे पाहिले आणि ते कुरकुर करू लागले, “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणा म्हणून गेला आहे.”
7 Todos os que viram isto murmuravam, dizendo que Jesus tinha se hospedado com um homem pecador.
8 पण जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, आताच मी माझी अर्धी धनसंपत्ती गरिबांना देऊन टाकतो आणि मी फसवणूक करून कोणाचे काही घेतले असेल, तर चौपट रक्कम परत करतो.”
8 Zaqueu, por sua vez, se levantou e disse ao Senhor: — Senhor, vou dar a metade dos meus bens aos pobres. E, se roubei alguma coisa de alguém, vou restituir quatro vezes mais.
9 येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे.
9 Então Jesus lhe disse:
10 मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे.”
10 Porque o Filho do Homem veio buscar e salvar o perdido.
11 ते ऐकत असतानाच, येशूंनी त्यांना पुढे एक दाखला सांगितला, कारण ते यरुशलेमजवळ होते आणि लोकांना असे वाटले की परमेश्वराचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे.
11 Ouvindo eles estas coisas, Jesus contou uma parábola, visto estar perto de Jerusalém e lhes parecer que o Reino de Deus havia de manifestar-se imediatamente.
12 येशू म्हणाले, “प्रतिष्ठित समाजातील एक मनुष्य राजा म्हणून नियुक्त करून घेण्यासाठी दूर देशी गेला आणि परत येणार होता.
12 Por isso, Jesus disse:
13 त्याने आपल्या दहा दासांना बोलाविले व त्यांना दहा मीना दिल्या व म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’
13 Chamou dez dos seus servos, confiou-lhes dez minas e disse-lhes: “Negociem até que eu volte.”
14 “परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधीमंडळ हे सांगण्यासाठी पाठविले, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’
14 Mas os seus concidadãos o odiavam e enviaram após ele uma embaixada, dizendo: “Não queremos que este reine sobre nós.”
15 “तरीपण त्याचा राज्याभिषेक करण्यात येऊन तो घरी परतला. मग त्याने ज्या दासांना पैसे दिले होते, त्यांनी त्या पैशावर किती नफा मिळविला, हे पाहण्याकरिता बोलाविले.
15 — Quando ele voltou, depois de ter tomado posse do reino, mandou chamar os servos a quem tinha dado o dinheiro, a fim de saber quanto tinham conseguido ganhar em seus negócios.
16 “पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मीनावर आणखी दहा मीना मिळविल्या आहेत.’
16 — O primeiro se apresentou e disse: “Senhor, a sua mina rendeu dez.”
17 “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या दासा! अतिशय थोडक्या बाबतीत तू विश्वासू राहिलास, म्हणून तू दहा शहरांची जबाबदारी घे.’
17 O senhor lhe disse: “Muito bem, servo bom! E porque você foi fiel no pouco, terá autoridade sobre dez cidades.”
18 “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’
18 — O segundo servo veio e disse: “Senhor, a sua mina rendeu cinco.”
19 “त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’
19 A este o senhor disse: “Você terá autoridade sobre cinco cidades.”
20 “मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मीना घ्या; मी ती एका कापडात गुंडाळून जपून ठेवली होती,
20 — Então veio outro servo, dizendo: “Senhor, aqui está a sua mina, que eu guardei embrulhada num lenço.
21 तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’
21 Porque tive medo do senhor, que é homem rigoroso. O senhor retira o que não depositou e colhe o que não semeou.”
22 “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो,
22 Mas o senhor respondeu: “Servo mau, eu o julgarei usando as suas próprias palavras. Você sabia que eu sou homem rigoroso, que retiro o que não depositei e colho o que não semeei.
23 तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’
23 Por que você não pôs o meu dinheiro no banco? E, então, na minha vinda, eu o receberia com juros.”
24 “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’
24 — E disse aos que estavam ali: “Tirem dele a mina e deem ao que tem as dez.”
25 “पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ आधीच दहा मीना आहेत.’
25 Eles ponderaram: “Senhor, ele já tem dez.”
26 “यावर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याला आहे त्याला अधिक दिले जाईल व ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.’
26 Ao que o senhor respondeu: “Pois eu declaro a vocês que a todo o que tem será dado ainda mais; mas ao que não tem, até o que tem lhe será tirado.
27 आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.”
27 Mas quanto a esses meus inimigos, que não quiseram que eu reinasse sobre eles, tragam-nos aqui e os matem na minha presença.”
28 हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते.
28 E, depois de dizer isto, Jesus prosseguia a sua viagem para Jerusalém.
29 जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावाजवळ ते आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले की:
29 E aconteceu que, ao aproximar-se de Betfagé e de Betânia, junto ao monte das Oliveiras, Jesus enviou dois dos seus discípulos,
30 “समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून इकडे आणा.
30 dizendo-lhes:
31 ‘तुम्ही हे शिंगरू का सोडीत आहात?’ असे कोणी तुम्हाला विचारले, तर त्याला सांगा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’ ”
31 Se alguém perguntar: “Por que o estão desprendendo?”, respondam assim: “Porque o Senhor precisa dele.”
32 ज्यांना पुढे पाठविले होते, ते तिथे गेल्यावर त्यांना सांगितल्याप्रमाणेच आढळून आले.
32 E, indo os que foram mandados, acharam tudo conforme Jesus lhes tinha dito.
33 ते शिंगरू सोडीत असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही शिंगरू का सोडीत आहात?”
33 Quando eles estavam soltando o jumentinho, os donos do animal disseram: — Por que estão desprendendo o jumentinho?
34 त्यांनी उत्तर दिले, “प्रभूला याची गरज आहे.”
34 Eles responderam: — Porque o Senhor precisa dele.
35 त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले, त्यांनी त्यांची वस्त्रे, शिंगराच्या पाठीवर घातली आणि येशूंना त्याच्यावर बसविले.
35 Então trouxeram o jumentinho até Jesus e, pondo as suas capas sobre o animal, ajudaram Jesus a montar.
36 जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी आपले अंगरखे रस्त्यावर पसरले.
36 À medida que Jesus avançava, as pessoas estendiam as suas capas no caminho.
37 जैतून डोंगराच्या उतरणीवरून सुरू होणार्‍या रस्त्यावर त्यांच्या शिष्यांचा समुदाय होता, ज्यांनी येशूंचे जे अद्भुत चमत्कार पाहिले होते, त्याबद्दल ते परमेश्वराची स्तुती करीत घोषणा देऊ लागले:
37 E, quando Jesus se aproximava da descida do monte das Oliveiras, toda a multidão dos discípulos começou, com muita alegria, a louvar a Deus em alta voz, por todos os milagres que tinham visto.
38 “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!”
38 Diziam: “Bendito é o Rei que vem em nome do Senhor! Paz no céu e glória nas maiores alturas!”
39 गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.”
39 Alguns dos fariseus lhe disseram em meio à multidão: — Mestre, repreenda os seus discípulos!
40 पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.”
40 Mas Jesus respondeu:
41 जसे ते यरुशलेमजवळ आले आणि ते शहर पाहिले, त्यावरून ते रडले आणि म्हणाले,
41 Quando Jesus ia chegando a Jerusalém, vendo a cidade, chorou por ela,
42 “जर तू, हो तू सुद्धा, आज या दिवशी फक्त शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर! पण आता त्या तुझ्या दृष्टिआड झाल्या आहेत.
42 dizendo:
43 कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील.
43 Pois virão dias em que os seus inimigos cercarão você de trincheiras e apertarão o cerco por todos os lados;
44 ते तुला जमीनदोस्त करून टाकतील, तुला आणि तुझ्या मुलांना भिंतींमध्ये गाडतील. ते एका दगडावर दुसरा दगड राहू देणार नाहीत, कारण परमेश्वराची तुझ्याकडे येण्याची वेळ तू ओळखली नाहीस.”
44 e vão arrasar você e matar todos os seus moradores. Não deixarão pedra sobre pedra, porque você não reconheceu o tempo em que Deus veio visitá-la.
45 नंतर येशू मंदिराच्या अंगणात आले आणि तिथे विक्री करणार्‍यास बाहेर घालवून देऊ लागले.
45 Depois, entrando no templo, Jesus começou a expulsar os que ali vendiam,
46 ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’ पण तुम्ही ते ‘एक लुटारूंची गुहा केली आहे.’”
46 dizendo-lhes:
47 त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते.
47 Diariamente, Jesus ensinava no templo. Os principais sacerdotes, os escribas e os maiorais do povo procuravam tirar-lhe a vida,
48 परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.
48 mas não achavam uma forma de fazer isso, porque todo o povo, ao ouvi-lo, era cativado por ele.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Lucas 19, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.