Lucas 11

marc (MARC) vs ACF

Sair da comparação
ACF Almeida Corrigida Fiel
1 एके दिवशी येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होते. प्रार्थना संपल्यावर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना म्हटले, “प्रभूजी, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले, त्याप्रमाणे तुम्हीही आम्हास शिकवा.”
1 E aconteceu que, estando ele a orar num certo lugar, quando acabou, lhe disse um dos seus discípulos: Senhor, ensina-nos a orar, como também João ensinou aos seus discípulos.
2 येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा:
2 E ele lhes disse: Quando orardes, dizei: Pai nosso, que estás nos céus, santificado seja o teu nome; venha o teu reino; seja feita a tua vontade, assim na terra, como no céu.
3 आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या.
3 Dá-nos cada dia o nosso pão cotidiano;
4 कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो;
4 E perdoa-nos os nossos pecados, pois também nós perdoamos a qualquer que nos deve, e não nos conduzas à tentação, mas livra-nos do mal.
5 येशू त्यांना म्हणाले, “समजा तुमचा एक मित्र आहे, मध्यरात्री तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे;
5 Disse-lhes também: Qual de vós terá um amigo, e, se for procurá-lo à meia-noite, e lhe disser: Amigo, empresta-me três pães,
6 माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’
6 Pois que um amigo meu chegou a minha casa, vindo de caminho, e não tenho que apresentar-lhe;
7 समजा तुमचा मित्र आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नको. दार बंद झाले आहे आणि मी व माझी मुले अंथरुणात आहोत आणि आता मी उठून तुला काही देऊ शकत नाही.’
7 Se ele, respondendo de dentro, disser: Não me importunes; já está a porta fechada, e os meus filhos estão comigo na cama; não posso levantar-me para tos dar;
8 परंतु मी तुम्हाला सांगतो की, जरी मैत्रीमुळे तो उठून त्याला भाकर देणार नाही, तरी तुमच्या आग्रहामुळे तो नक्कीच उठेल आणि जितकी तुमची गरज आहे तितके तो तुम्हाला देईल.
8 Digo-vos que, ainda que não se levante a dar-lhos, por ser seu amigo, levantar-se-á, todavia, por causa da sua importunação, e lhe dará tudo o que houver mister.
9 “मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.
9 E eu vos digo a vós: Pedi, e dar-se-vos-á; buscai, e achareis; batei, e abrir-se-vos-á;
10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
10 Porque qualquer que pede recebe; e quem busca acha; e a quem bate abrir-se-lhe-á.
11 “तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल?
11 E qual o pai de entre vós que, se o filho lhe pedir pão, lhe dará uma pedra? Ou, também, se lhe pedir peixe, lhe dará por peixe uma serpente?
12 किंवा जर त्याने अंडे मागितले, तर त्याला विंचू द्याल?
12 Ou, também, se lhe pedir um ovo, lhe dará um escorpião?
13 तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!”
13 Pois se vós, sendo maus, sabeis dar boas dádivas aos vossos filhos, quanto mais dará o Pai celestial o Espírito Santo àqueles que lho pedirem?
14 येशू एका मुक्या दुरात्म्याला काढत होते, तो दुरात्मा निघून गेल्यानंतर, त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित झाले.
14 E estava ele expulsando um demônio, o qual era mudo. E aconteceu que, saindo o demônio, o mudo falou; e maravilhou-se a multidão.
15 पण काहीजण म्हणाले, “हा बालजबूल, भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने भुतांना घालवित असतो.”
15 Mas alguns deles diziam: Ele expulsa os demônios por Belzebu, príncipe dos demônios.
16 दुसर्‍यांनी परीक्षा पाहण्याकरिता आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी केली.
16 E outros, tentando-o, pediam-lhe um sinal do céu.
17 त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “ज्या राज्यात फूट पडलेली आहे, त्या राज्याचा नाश होतो आणि आपसात फूट पडलेले घर कोसळून पडते.
17 Mas, conhecendo ele os seus pensamentos, disse-lhes: Todo o reino, dividido contra si mesmo, será assolado; e a casa, dividida contra si mesma, cairá.
18 जर सैतानातच फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?” कारण तुम्ही असा दावा करता की मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो,
18 E, se também Satanás está dividido contra si mesmo, como subsistirá o seu reino? Pois dizeis que eu expulso os demônios por Belzebu.
19 आता मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? मग तेच तुमचे न्यायाधीश असतील.
19 E, se eu expulso os demônios por Belzebu, por quem os expulsam vossos filhos? Eles, pois, serão os vossos juízes.
20 परंतु मी जर परमेश्वराच्या शक्तीने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.
20 Mas, se eu expulso os demônios pelo dedo de Deus, certamente a vós é chegado o reino de Deus.
21 “जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.
21 Quando o valente guarda, armado, a sua casa, em segurança está tudo quanto tem;
22 पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सर्व मालमत्ता लुटतो व वाटून देतो.
22 Mas, sobrevindo outro mais valente do que ele, e vencendo-o, tira-lhe toda a sua armadura em que confiava, e reparte os seus despojos.
23 “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.
23 Quem não é comigo é contra mim; e quem comigo não ajunta, espalha.
24 “एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो आणि ती त्याला सापडत नाही. त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’
24 Quando o espírito imundo tem saído do homem, anda por lugares secos, buscando repouso; e, não o achando, diz: Tornarei para minha casa, de onde saí.
25 तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.
25 E, chegando, acha-a varrida e adornada.
26 नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
26 Então vai, e leva consigo outros sete espíritos piores do que ele e, entrando, habitam ali; e o último estado desse homem é pior do que o primeiro.
27 येशू बोलत असताना त्या गर्दीतील एक स्त्री ओरडून म्हणाली, “धन्य तुझी माता, जिने तुला जन्म दिला, दूध पाजले व तुझे पोषण केले!”
27 E aconteceu que, dizendo ele estas coisas, uma mulher dentre a multidão, levantando a voz, lhe disse: Bem-aventurado o ventre que te trouxe e os peitos em que mamaste.
28 त्याने उत्तर दिले, “परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत.”
28 Mas ele disse: Antes bemaventurados os que ouvem a palavra de Deus e a guardam.
29 आपल्या भोवती लोकांची खूपच गर्दी वाढली हे पाहून येशू म्हणाले, “ही दुष्ट पिढी चिन्ह मागते पण योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे चिन्ह या पिढीला दिले जाणार नाही.
29 E, ajuntando-se a multidão, começou a dizer: Maligna é esta geração; ela pede um sinal; e não lhe será dado outro sinal, senão o sinal do profeta Jonas;
30 कारण ज्याप्रमाणे योनाह निनवेहच्या लोकांना चिन्ह होता, तसेच मानवपुत्र या पिढीला चिन्ह असा होईल.
30 Porquanto, assim como Jonas foi sinal para os ninivitas, assim o Filho do homem o será também para esta geração.
31 दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.
31 A rainha do sul se levantará no juízo com os homens desta geração, e os condenará; pois até dos confins da terra veio ouvir a sabedoria de Salomão; e eis aqui está quem é maior do que Salomão.
32 न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.
32 Os homens de Nínive se levantarão no juízo com esta geração, e a condenarão; pois se converteram com a pregação de Jonas; e eis aqui está quem é maior do que Jonas.
33 “कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट दिवठणीवर ठेवतात, यासाठी की आत येणार्‍यांनाही प्रकाश मिळावा.
33 E ninguém, acendendo uma candeia, a põe em oculto, nem debaixo do alqueire, mas no velador, para que os que entram vejam a luz.
34 तुझा डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले म्हणजे तुझे सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण जर ते दोषी असतील तर तुझे शरीरही अंधकारमय असेल.
34 A candeia do corpo é o olho. Sendo, pois, o teu olho simples, também todo o teu corpo será luminoso; mas, se for mau, também o teu corpo será tenebroso.
35 म्हणून तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे, तो अंधार तर नाही ना, याविषयी काळजी घे.
35 Vê, pois, que a luz que em ti há não sejam trevas.
36 यास्तव, जर तुझे सर्व शरीर प्रकाशाने भरलेले असले आणि कोणताही भाग अंधकारमय नसला, तर दिव्याचा प्रकाश तुझ्यावर पडेल तसे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
36 Se, pois, todo o teu corpo é luminoso, não tendo em trevas parte alguma, todo será luminoso, como quando a candeia te ilumina com o seu resplendor.
37 येशूंनी आपले बोलणे संपविले, त्यावेळी एका परूश्याने त्यांना भोजनास यावे अशी विनंती केली; त्याप्रमाणे ते गेले व मेजाभोवती बसले.
37 E, estando ele ainda falando, rogou-lhe um fariseu que fosse jantar com ele; e, entrando, assentou-se à mesa.
38 परंतु जेव्हा त्याने पाहिले की येशूंनी जेवणासाठी प्रथम हात धुतले नाहीत तेव्हा त्या परूश्याला आश्चर्य वाटले.
38 Mas o fariseu admirou-se, vendo que não se lavara antes de jantar.
39 ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात.
39 E o Senhor lhe disse: Agora vós, os fariseus, limpais o exterior do copo e do prato; mas o vosso interior está cheio de rapina e maldade.
40 अहो मूर्ख लोकांनो! ज्याने बाहेरील भाग घडविला त्यानेच अंतर्भाग सुद्धा घडविला नाही काय?
40 Loucos! Quem fez o exterior não fez também o interior?
41 तुमच्या अंतर्भागाबद्धल बोलायचे तर गरिबांना उदारता दाखवा म्हणजे तुम्हाला सर्वकाही शुद्ध असल्याचे आढळेल.
41 Antes dai esmola do que tiverdes, e eis que tudo vos será limpo.
42 “तुम्हा परूश्यांना धिक्कार असो! तुम्ही पुदिना, शेपू व बागेतील प्रत्येक प्रकारची भाजी यांचा दशांश देत असला, तरी तुम्ही न्याय आणि परमेश्वराची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही दशांश निश्चितच द्यावा, पण ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडू नयेत.
42 Mas ai de vós, fariseus, que dizimais a hortelã, e a arruda, e toda a hortaliça, e desprezais o juízo e o amor de Deus. Importava fazer estas coisas, e não deixar as outras.
43 “अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे.
43 Ai de vós, fariseus, que amais os primeiros assentos nas sinagogas, e as saudações nas praças.
44 “तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात, लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.”
44 Ai de vós, escribas e fariseus, hipócritas! que sois como as sepulturas que não aparecem, e os homens que sobre elas andam não o sabem.
45 त्यावेळी तिथे असलेला एक नियमशास्त्रज्ञ म्हणाला, “गुरुजी, तुम्ही आता जे बोलला, त्यामुळे तुम्ही आमचा सुद्धा अपमान करीत आहात.”
45 E, respondendo um dos doutores da lei, disse-lhe: Mestre, quando dizes isso, também nos afrontas a nós.
46 येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही जे नियमशास्त्रतज्ञ आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांच्या खांद्यावर अशी अवघड ओझी लादता, जी ते वाहू शकत नाहीत, परंतु त्यांना मदत करण्यासाठी स्वतःचे एकही बोट लावण्याची तुमची इच्छा नसते.
46 E ele lhe disse: Ai de vós também, doutores da lei, que carregais os homens com cargas difíceis de transportar, e vós mesmos nem ainda com um dos vossos dedos tocais essas cargas.
47 “तुम्हाला धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता ज्यांना तुमच्या पूर्वजांनी मारून टाकले.
47 Ai de vós que edificais os sepulcros dos profetas, e vossos pais os mataram.
48 म्हणून तुमच्या पूर्वजांनी जे काही केले ते योग्यच होते अशी तुम्ही साक्ष देत आहात; त्यांनी संदेष्ट्यांचा वध केला आणि तुम्ही त्यांच्या कबरा बांधता.
48 Bem testificais, pois, que consentis nas obras de vossos pais; porque eles os mataram, e vós edificais os seus sepulcros.
49 याकारणास्तव परमेश्वर त्यांच्या ज्ञानाप्रमाणे म्हणतात, ‘मी तुमच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवेन आणि त्यांच्यापैकी काहींचा तुम्ही वध कराल आणि इतरांचा छळ कराल.’
49 Por isso diz também a sabedoria de Deus: Profetas e apóstolos lhes mandarei; e eles matarão uns, e perseguirão outros;
50 म्हणून जगाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांचे जे रक्त सांडण्यात आले, त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल.
50 Para que desta geração seja requerido o sangue de todos os profetas que, desde a fundação do mundo, foi derramado;
51 हाबेलाच्या रक्तापासून तर जखर्‍याहच्या रक्तापर्यंत जो मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये वधला गेला होता. त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल हे मी तुम्हाला सांगतो.
51 Desde o sangue de Abel, até ao sangue de Zacarias, que foi morto entre o altar e o templo; assim, vos digo, será requerido desta geração.
52 “तुम्हा नियमशास्त्र तज्ञांना धिक्कार असो, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली. तुम्ही स्वतः प्रवेश करत नाही व जे प्रवेश करू पाहतात त्यांनाही अडखळण करता.”
52 Ai de vós, doutores da lei, que tirastes a chave da ciência; vós mesmos não entrastes, e impedistes os que entravam.
53 येशू बाहेर गेल्यानंतर, परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांना उग्रपणाने विरोध करण्यास सुरुवात केली आणि त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
53 E, dizendo-lhes ele isto, começaram os escribas e os fariseus a apertá-lo fortemente, e a fazê-lo falar acerca de muitas coisas,
54 त्यांना शब्दात धरण्याची ते संधी शोधू लागले.
54 Armando-lhe ciladas, e procurando apanhar da sua boca alguma coisa para o acusarem.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Lucas 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.