Juízes 6

marc (MARC) vs ARIB

Sair da comparação
ARIB Almeida Revisada Imprensa Bíblica
1 इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले.
1 Mas os filhos de Israel fizeram o que era mau aos olhos do Senhor, e o Senhor os entregou na mão de Midiã por sete anos.
2 कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले.
2 Prevalecia, pois, a mão de Midiã sobre Israel e, por causa de Midiã, fizeram os filhos de Israel para si as covas que estão nos montes, as cavernas e as fortalezas.
3 जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत.
3 Porque sucedia que, havendo Israel semeado, subiam contra ele os midianitas, os amalequitas e os filhos do oriente;
4 त्यांनी तेथील जमिनीवर तळ ठोकला आणि गाझापर्यंत पिकांची नासाडी केली आणि इस्राएलसाठी मेंढ्या, गुरे, गाढवेही त्यांनी जिवंत ठेवली नाहीत.
4 e, acampando-se contra ele, destruíam o produto da terra até chegarem a Gaza, e não deixavam mantimento em Israel, nem ovelhas, nem bois, nem jumentos.
5 ते टोळांच्या समुहासारखे त्याचे तंबू आणि त्यांचे पशुधन घेऊन आले. त्यांना किंवा त्यांचे उंट मोजणे शक्य नव्हते; त्यांनी ती भूमी उद्ध्वस्त करण्यासाठी आक्रमण केले.
5 Porque subiam com os seus rebanhos e tendas; vinham em multidão, como gafanhotos; tanto eles como os seus camelos eram inumeráveis; e entravam na terra, para a destruir.
6 अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले.
6 Assim Israel se enfraqueceu muito por causa dos midianitas; então os filhos de Israel clamaram ao Senhor.
7 मिद्यान्यांमुळे जेव्हा इस्राएली लोक मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले,
7 E sucedeu que, clamando eles ao Senhor por causa dos midianitas,
8 त्यांनी एक संदेष्टा पाठवला, तो म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले.
8 enviou-lhes o Senhor um profeta, que lhes disse: Assim diz o Senhor, Deus de Israel: Do Egito eu vos fiz subir, e vos tirei da casa da servidão;
9 मी तुम्हाला इजिप्तमधील लोकांच्या हातातून सोडविले आणि जे तुमच्याशी क्रूरपणे वागत, त्या सर्व लोकांच्या हातून सोडविले आणि तुमच्या शत्रूंना तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हाला दिला.
9 livrei-vos da mão dos egípcios, e da mão de todos quantos vos oprimiam, e os expulsei de diante de vós, e a vós vos dei a sua terra.
10 मी तुम्हाला म्हटले, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता, त्यांच्या दैवतांची उपासना करू नका. परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.”
10 Também eu vos disse: Eu sou o Senhor vosso Deus; não temais aos deuses dos amorreus, em cuja terra habitais. Mas não destes ouvidos à minha voz.
11 याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.
11 Então o anjo do Senhor veio, e sentou-se debaixo do carvalho que estava em Ofra e que pertencia a Joás, abiezrita, cujo filho Gideão estava malhando o trigo no lagar para o esconder dos midianitas.
12 जेव्हा याहवेहचा दूत गिदोनाच्या पुढे प्रगट झाला आणि त्यास म्हणाला, “हे बलवान सैनिका, याहवेह तुझ्याबरोबर आहेत.”
12 Apareceu-lhe então o anjo do Senhor e lhe disse: O Senhor é contigo, ó homem valoroso.
13 गिदोन त्यास म्हणाला, “महाराज, मला माफ करा, परंतु जर याहवेह आमच्यासह असते तर हे सर्व आमच्यासोबत का घडले? आमच्या पूर्वजांनी सांगितलेले त्यांचे सर्व चमत्कार कुठे आहेत, जेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले नाही का?’ पण आता याहवेहने आम्हाला सोडून दिले आहे आणि आम्हाला मिद्यानच्या हाती दिले आहे.”
13 Gideão lhe respondeu: Ai, senhor meu, se o Senhor é conosco, por que tudo nos sobreveio? e onde estão todas as suas maravilhas que nossos pais nos contaram, dizendo: Não nos fez o Senhor subir do Egito? Agora, porém, o Senhor nos desamparou, e nos entregou na mão de Midiã.
14 याहवेह त्याच्याकडे वळून म्हणाले, “आपल्या बळाचा उपयोग कर आणि जा इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवित नाही का?”
14 Virou-se o Senhor para ele e lhe disse: Vai nesta tua força, e livra a Israel da mão de Midiã; porventura não te envio eu?
15 गिदोनाने उत्तर दिले, “महाराज, मला माफ करा, मी इस्राएली लोकांना कसा काय सोडविणार? माझे कुटुंब संपूर्ण मनश्शेह गोत्रातील अत्यंत दुर्बल असे कुटुंब आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजले जाते.”
15 Replicou-lhe Gideão: Ai, senhor meu, com que livrarei a Israel? eis que a minha família é a mais pobre em Manassés, e eu o menor na casa de meu pai.
16 याहवेहने उत्तर दिले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि तू सर्व मिद्यान्यांचा असा नायनाट करशील की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही.”
16 Tornou-lhe o Senhor: Porquanto eu hei de ser contigo, tu ferirás aos midianitas como a um só homem.
17 गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा.
17 Prosseguiu Gideão: Se agora tenho achado graça aos teus olhos, dá-me um sinal de que és tu que falas comigo.
18 मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.”
18 Rogo-te que não te apartes daqui até que eu volte trazendo do meu presente e o ponha diante de ti. Respondeu ele: Esperarei até que voltes.
19 गिदोन आत गेला, त्याने एक करडू कापून कालवण तयार केले आणि पिठाच्या एक एफापासून खमीर नसलेली भाकर केली. टोपलीत मांस आणि त्याचा रस्सा एका भांड्यात ठेवून त्याने ते बाहेर आणले आणि एलाच्या वृक्षाखाली त्याला अर्पण केले.
19 Entrou, pois, Gideão, preparou um cabrito e fez, com uma e efa de farinha, bolos ázimos; pôs a carne num cesto e o caldo numa panela e, trazendo para debaixo do carvalho, lho apresentou.
20 परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले,
20 Mas o anjo de Deus lhe disse: Toma a carne e os bolos ázimos, e põe-nos sobre esta rocha e derrama-lhes por cima o caldo. E ele assim fez.
21 तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला.
21 E o anjo do Senhor estendeu a ponta do cajado que tinha na mão, e tocou a carne e os bolos ázimos; então subiu fogo da rocha, e consumiu a carne e os bolos ázimos; e o anjo do Senhor desapareceu-lhe da vista.
22 जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!”
22 Vendo Gideão que era o anjo do Senhor, disse: Ai de mim, Senhor Deus! pois eu vi o anjo do Senhor face a face.
23 परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.”
23 Porém o Senhor lhe disse: Paz seja contigo, não temas; não morrerás.
24 म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे.
24 Então Gideão edificou ali um altar ao Senhor, e lhe chamou Jeová-Salom; e ainda até o dia de hoje está o altar em Ofra dos abiezritas.
25 त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्‍हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्‍या अशेरा देवीचा खांब तोडून टाक.
25 Naquela mesma noite, disse o Senhor a Gidão: Toma um dos bois de teu pai, a saber, o segundo boi de sete anos, e derriba o altar de Baal, que é de teu pai, e corta a asera que está ao pé dele.
26 नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्‍हा अर्पण कर.”
26 Edifica ao Senhor teu Deus um altar no cume deste lugar forte, na forma devida; toma o segundo boi, e o oferece em holocausto, com a lenha da asera que cortares
27 यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले.
27 Então Gideão tomou dez homens dentre os seus servos, e fez como o Senhor lhe dissera; porém, temendo ele a casa de seu pai e os homens daquela cidade, não o fez de dia, mas de noite.
28 दुसर्‍या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्‍या गोर्‍ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले!
28 Levantando-se, pois, os homens daquela cidade, de madrugada, eis que estava o altar de Baal derribado, cortada a asera que estivera ao pé dele, e o segundo boi oferecido no altar que fora edificado.
29 ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?”
29 Pelo que disseram uns aos outros: Quem fez isto? E, depois de investigarem e inquirirem, disseram: Gideão, filho de Joás, é quem fez isto.
30 योआशाला नगरवासी मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “तुझ्या पुत्राला बाहेर आण; बआल दैवताच्या वेदीचा अपमान केल्याबद्दल व तिच्याजवळील अशेरामूर्ती फोडल्याबद्दल त्याने मेलेच पाहिजे.”
30 Então os homens daquela cidade disseram a Joás: Tira para fora teu filho, para que morra, porque derribou o altar de Baal e cortou a asera que estava ao pé dele.
31 परंतु योआशाने त्याच्या आजूबाजूच्या विरोधी जमावाला उत्तर दिले, “तुम्ही बआलची बाजू मांडणार आहात का? तुम्ही त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहात का? जो कोणी त्याच्यासाठी लढेल त्याला सकाळपर्यंत जिवे मारावे! जर बआल खरोखरच देव असता तर, जेव्हा कोणी त्याची वेदी तोडतो तेव्हा तो स्वतःचा बचाव करू शकला असता.”
31 Joás, porém, disse a todos os que se puseram contra ele: Contendereis vós por Baal? livrá-lo-eis vós? Qualquer que por ele contender, ainda esta manhã será morto; se ele é deus, por si mesmo contenda, pois foi derribado o seu altar.
32 म्हणून गिदोनाने बआल दैवताची वेदी विध्वंस केली, त्या दिवशी त्यांनी त्याला “यरूब्बआल” असे नाव दिले, त्याचा अर्थ, “बआल दैवतानेच त्याचा विरोध करावा,” असा होता.
32 Pelo que naquele dia chamaram a Gidão Jerubaal, dizendo: Baal contenda contra ele, pois derribou o seu altar.
33 त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्‍यात तळ दिला.
33 Então todos os midianitas, os amalequitas e os filhos do oriente se ajuntaram e, passando o Jordão, acamparam no vale de Jizreel.
34 तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले.
34 Mas o Espírito do Senhor apoderou-se de Gideão; e tocando ele a trombeta, os abiezritas se ajuntaram após ele.
35 त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.
35 E enviou mensageiros por toda a tribo de Manassés, que também se ajuntou após ele; e ainda enviou mensageiros a Aser, a Zebulom e a Naftali, que lhe saíram ao encontro.
36 गिदोन परमेश्वराला म्हणाला, “जर तुम्ही इस्राएलला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या हातांनी वाचवाल—
36 Disse Gideão a Deus: Se hás de livrar a Israel por minha mão, como disseste,
37 पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.”
37 eis que eu porei um velo de lã na eira; se o orvalho estiver somente no velo, e toda a terra ficar enxuta, então conhecerei que hás de livrar a Israel por minha mão, como disseste.
38 आणि अगदी तसेच घडून आले. दुसर्‍या दिवशी सकाळी गिदोन उठला; त्याने ती लोकर दाबली आणि तिच्यातील दहिवर पिळले—एक वाटीभर पाणी काढले.
38 E assim foi; pois, levantando-se de madrugada no dia seguinte, apertou o velo, e espremeu dele o orvalho, que encheu uma taça.
39 नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.”
39 Disse mais Gideão a Deus: Não se acenda contra mim a tua ira se ainda falar só esta vez. Permite que só mais esta vez eu faça prova com o velo; rogo-te que só o velo fique enxuto, e em toda a terra haja orvalho.
40 त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली.
40 E Deus assim fez naquela noite; pois só o velo estava enxuto, e sobre toda a terra havia orvalho.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.