Juízes 3
marc (MARC) vs VC
1 कनानमधील युद्धांमध्ये भाग न घेतलेल्या इस्राएली लोकांची परीक्षा घेण्यासाठी याहवेहने या राष्ट्रांना त्या देशात राहण्याची परवानगी दिली
1 Estas são as nações que o Senhor deixou subsistir para provar por meio delas os israelitas, todos aqueles que não tinham visto as guerras de Canaã,
2 (हे केवळ यासाठी की ज्यांना युद्धाचा पूर्वी कोणताही अनुभव नव्हता, त्या इस्राएली लोकांच्या वंशजांना हा अनुभव यावा):
2 e isso tão-somente para instrução das novas gerações israelitas, a fim de lhes ensinar a combater, ao menos àqueles que não o tinham feito antes.
3 ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.
3 Eram os cinco príncipes dos filisteus, todos os cananeus, os sidônios, os heveus que habitavam os montes do Líbano, desde a montanha de Baal-Hermon até a entrada de Hamat.
4 याहवेहने मोशेद्वारे त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञांचे पालन ते करतील की नाही याबाबत परीक्षा पाहण्यासाठी इस्राएली लोकांना मागे राहू दिले होते.
4 Essas nações ficaram para provar Israel, e ver se eles obedeceriam aos mandamentos que o Senhor havia prescrito aos seus pais por intermédio de Moisés.
5 इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले.
5 Os filhos de Israel habitaram no meio dos cananeus, dos hiteus, dos amorreus, dos ferezeus, dos heveus e dos jebuseus.
6 इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.
6 Tomaram por mulheres suas filhas e eles mesmos deram suas filhas aos filhos deles, e serviram os seus deuses.
7 इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले.
7 Os israelitas fizeram o mal aos olhos do Senhor, esqueceram-se do Senhor, seu Deus, e serviram aos baal e às asserá.
8 याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला म्हणून त्यांनी, जिथे इस्राएली लोक आठ वर्षे गुलामगिरीत होते त्या अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईमच्या हाती त्यांना विकले.
8 A ira do Senhor inflamou-se contra Israel, e ele entregou-os nas mãos de Cusã-Rasataim, rei da Mesopotâmia, a quem ficaram sujeitos durante oito anos.
9 परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.
9 Os israelitas clamaram ao Senhor, que lhes suscitou um libertador para salvá-los: Otoniel, filho de Cenez, irmão mais novo de Caleb.
10 याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला.
10 O Espírito do Senhor desceu sobre ele: ele julgou Israel e saiu para a guerra. O Senhor entregou-lhe Cusã-Rasataim, rei da Mesopotâmia, e sua mão triunfou sobre ele.
11 त्यामुळे केनाजचा पुत्र ओथनिएल मरेपर्यंत देशात चाळीस वर्षे शांतता होती.
11 A terra teve quarenta anos de descanso, e Otoniel, filho de Cenez, morreu.
12 एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले.
12 Os israelitas fizeram de novo o mal aos olhos do Senhor, e o Senhor excitou contra eles Eglon, rei de Moab, porque tinham feito o mal aos seus olhos.
13 एग्लोन अम्मोनी व अमालेकींना सोबत घेऊन आला आणि त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला आणि त्यांनी खजुरीच्या झाडांचे शहर ताब्यात घेतले.
13 Eglon aliou-se aos filhos de Amon e de Amalec, e pôs-se em marcha contra Israel; derrotou-o e apoderou-se da cidade das Palmeiras.
14 इस्राएली लोक अठरा वर्षे मोआबचा राजा एग्लोनचे गुलाम होते.
14 E os israelitas estiveram sujeitos a Eglon, rei de Moab, por dezoito anos.
15 इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले.
15 Os filhos de Israel clamaram ao Senhor, que lhes suscitou um libertador na pessoa de Aod, o canhoto, filho de Gera, benjaminita. Os filhos de Israel mandaram, por meio dele, um presente a Eglon, rei de Moab.
16 आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली.
16 Aod mandou fazer para si uma espada de dois gumes, de um côvado de comprimento, e a levava debaixo de suas vestes, apoiada na coxa direita.
17 त्याने मोआबच्या राजा एग्लोनाच्या समोर रसद सादर केली, जो खूप गलेलठ्ठ मनुष्य होता.
17 Ele veio e ofereceu o presente a Eglon, rei de Moab, que era muito gordo.
18 एहूदाने रसद सादर केल्यानंतर, ज्यांनी ते वाहून नेले होते त्यांना त्यांच्या मार्गावर परत पाठविले.
18 Terminada a cerimônia, levou os homens que tinham trazido o presente
19 परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.”
19 até as estelas próximas de Gálgala. Voltou ao rei e disse-lhe: Senhor, tenho uma palavra a dizer-te. Silêncio, ordenou o rei; e todos os seus familiares se retiraram.
20 मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच,
20 Aod entrou; o rei estava assentado, só, no seu quarto de verão. Tenho a dizer-te uma palavra da parte do Senhor, disse Aod. O rei levantou-se do seu trono.
21 एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली.
21 E logo tomou Aod com a mão esquerda a espada que trazia na coxa direita e mergulhou-lha no ventre
22 पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती.
22 com tanta força que o próprio cabo entrou após a lâmina, e ficou coberto pela muita gordura. E não retirou do ventre sua espada, cuja lâmina saía por detrás.
23 मग एहूद बाहेर ओसरीत गेला; त्याने त्याच्यामागे वरच्या खोलीचे दरवाजे बंद केले आणि त्यांना कुलूप लावले.
23 Aod saiu pela galeria, depois de ter fechado bem atrás de si as portas do quarto de cima, deixando-as trancadas.
24 तो गेल्यानंतर सेवक आले आणि त्यांना वरच्या खोलीचे दरवाजे कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. ते म्हणाले, “महाराज राजवाड्याच्या आतील खोलीत आराम करण्यास गेले असावे.”
24 E, tendo ele partido, notaram os servos do rei que as portas estavam fechadas: Sem dúvida, disseram, estará fazendo necessidade, em seu quarto de verão.
25 ते लाजिरवाणे वाटेपर्यंत थांबले, परंतु जेव्हा त्यांनी खोलीचे दार उघडले नाही, तेव्हा त्यांनी किल्ली घेतली आणि दार उघडले. तिथे त्यांना आपला स्वामी जमिनीवर मरून पडलेला दिसला.
25 Mas, depois de esperarem muito tempo, ficaram alarmados, e, vendo que a porta do apartamento não se abria, tomaram a chave, abriram-na e encontraram o seu senhor morto e estendido por terra.
26 ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला.
26 Enquanto isso, Aod fugiu para além das estelas, e foi para Seirat.
27 तो तिथे गेल्यावर त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले आणि इस्राएली लोक त्याच्यासोबत डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि त्याने त्यांचे नेतृत्व केले.
27 Logo que chegou à montanha de Efraim, tocou a trombeta e os filhos de Israel desceram da montanha com ele.
28 त्याने आदेश दिला, “माझ्यामागे या, कारण याहवेहने तुमचे शत्रू मोआबी लोक तुमच्या हाती दिले आहेत.” मग ते त्याच्या पाठोपाठ खाली गेले आणि त्यांनी मोआब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणासही पलीकडे जाऊ दिले नाही.
28 Segui-me, disse-lhes ele, porque o Senhor entregou-vos os moabitas, vossos inimigos. Eles o seguiram e ocuparam os vaus do Jordão, por onde se vai a Moab, de modo a não deixar passar ninguém.
29 त्यावेळी त्यांनी सुमारे दहा हजार मोआबी लोक मारले. हे सर्व धिप्पाड आणि बलवान पुरुष होते; त्यापैकी एकही सुटू शकला नाही.
29 Mataram então cerca de dez mil homens, todo o escol e todo o vigor de Moab; ninguém escapou.
30 त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली.
30 Naquele dia foi Moab humilhado sob a mão de Israel. E a terra teve um descanso de oitenta anos.
31 एहूदनंतर अनथाचा पुत्र शमगार आला, त्याने बैलाच्या अंकुशाने सहाशे पलिष्ट्यांना मारले. त्यानेही इस्राएलला वाचविले.
31 Depois de Aod, Samgar, filho de Anat, derrotou seiscentos filisteus com um aguilhão de bois. Samgar também foi um libertador para Israel.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.