Juízes 2

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 याहवेहचा दूत गिलगालहून वर बोखीम येथे गेला आणि म्हणाला, “मी तुम्हाला इजिप्त देशातून काढून तुमच्या पूर्वजास शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात आणले. मी म्हणालो, ‘तुमच्याशी केलेला करार मी कधी मोडणार नाही,
1 O anjo do Senhor subiu de Gilgal a Boquim e disse: "Tirei vocês do Egito e os trouxe para a terra que prometi com juramento que daria a seus antepassados. Eu disse: Jamais quebrarei a minha aliança com vocês.
2 आणि तुम्ही या देशातील लोकांशी कोणतेही करार करू नका, परंतु तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका.’ तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही हे का केले?
2 E vocês não farão acordo com o povo desta terra, mas demolirão os altares deles. Por quê vocês não me obedeceram?
3 आणि मी हे देखील म्हणालो, ‘मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देणार नाही; ते तुम्हाला काट्यांसारखे होतील आणि त्यांची दैवते तुम्हाला सापळे होतील.’ ”
3 Portanto, agora lhes digo que não os expulsarei da presença de vocês; eles serão seus adversários, e os deuses deles serão uma armadilha para vocês".
4 जेव्हा याहवेहचा दूत या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, ते लोक मोठ्याने रडू लागले,
4 Quando o anjo do Senhor acabou de falar a todos os israelitas, o povo chorou em alta voz,
5 आणि म्हणून त्या ठिकाणाचे नाव “बोखीम” असे ठेवले. तिथे त्यांनी याहवेहला यज्ञ अर्पण केले.
5 e ao lugar chamaram Boquim. Ali ofereceram sacrifícios ao Senhor.
6 नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले.
6 Depois que Josué despediu os israelitas, eles saíram para ocupar a terra, cada um a sua herança.
7 लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेली महान कृत्ये ज्यांनी पाहिली त्यांनी याहवेहची सेवा केली.
7 O povo prestou culto ao Senhor durante toda a vida de Josué e dos líderes que continuaram vivos depois de Josué e que tinham visto todos os grandes feitos que o Senhor realizara em favor de Israel.
8 नूनाचा पुत्र यहोशुआ, याहवेहचा सेवक, वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला.
8 Josué, filho de Num, servo do Senhor, morreu com a idade de cento e dez anos.
9 आणि गाश पर्वताच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या प्रदेशात त्यांनी त्याचे दफन केले.
9 Foi sepultado na terra de sua herança, em Timnate-Heres, nos montes de Efraim, ao norte do monte Gaás.
10 नंतर ती संपूर्ण पिढी त्यांच्या पूर्वजांना मिळाल्यानंतर, दुसरी पिढी उदयास आली, ज्यांना याहवेहबद्धल किंवा त्यांनी इस्राएलसाठी काय केले हे माहीत नव्हते.
10 Depois que toda aquela geração foi reunida a seus antepassados, surgiu uma nova geração que não conhecia o Senhor e o que ele havia feito por Israel.
11 तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली.
11 Então os israelitas fizeram o que o Senhor reprova e prestaram culto aos baalins.
12 त्यांच्या पूर्वजांच्या ज्या याहवेह परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले होते, त्यांनी त्यांचा त्याग केला. त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या अन्य दैवतांचे अनुसरण केले आणि त्यांची उपासना केली. त्यांनी याहवेहचा क्रोध भडकाविला
12 Abandonaram o Senhor, o Deus dos seus antepassados, que os havia tirado do Egito, e seguiram e adoraram vários deuses dos povos ao seu redor, provocando a ira do Senhor.
13 कारण त्यांनी याहवेहला सोडून बआल आणि अष्टारोथची उपासना केली.
13 Abandonaram o Senhor e prestaram culto a Baal e aos postes sagrados.
14 याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले.
14 A ira do Senhor se acendeu contra Israel, e ele os entregou nas mãos de invasores que os saquearam. Ele os entregou aos inimigos ao seu redor, aos quais já não conseguiam resistir.
15 जेव्हा इस्राएली राष्ट्र त्यांच्या शत्रूविरुद्ध लढण्यास जात असे, तेव्हा याहवेहचा हात त्यांच्याविरुद्ध असून त्यांचा पराभव होत असे, जसे याहवेहने त्यांना वचन दिले होते. ते भयंकर संकटात होते.
15 Sempre que os israelitas saíam para a batalha, a mão do Senhor era contra eles para derrotá-los, conforme lhes havia advertido e jurado. Grande angústia os dominava.
16 तेव्हा याहवेहने त्यांना लुटारूंच्या हातून वाचविण्यासाठी शास्ते उभे केले.
16 Então o Senhor levantou juízes, que os libertaram das mãos daqueles que os atacavam.
17 तरी देखील त्यांनी आपल्या शास्त्यांचे ऐकले नाही, परंतु व्यभिचारी मनाने इतर दैवतांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना करू लागले. त्वरेने ते आपल्या पूर्वजांच्या मार्गापासून बहकले, ज्यांनी याहवेहच्या आज्ञांचे पालन केले होते.
17 Mesmo assim eles não quiseram ouvir os juízes, antes se prostituíram com outros deuses e os adoraram. Ao contrário dos seus antepassados, logo se desviaram do caminho pelo qual os seus antepassados tinham andado, o caminho da obediência aos mandamentos do Senhor.
18 जेव्हा याहवेहने त्यांच्यासाठी शास्ते उभे केले होते, ते शास्त्यांबरोबर होते आणि शास्तेच्या जीवनभर ते त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून त्यांना सोडवित होते; कारण जुलूम व त्रास देणाऱ्यांमुळे इस्राएली लोक विव्हळत असल्यामुळे याहवेहला त्यांची दया येऊ लागली होती.
18 Sempre que o Senhor lhes levantava um juiz, ele estava com o juiz e os salvava das mãos de seus inimigos enquanto o juiz vivia; pois o Senhor tinha misericórdia por causa dos gemidos deles diante daqueles que os oprimiam e os afligiam.
19 परंतु शास्ते मरण पावले की लोक योग्य ते करण्याचे सोडून त्यांचे पूर्वज करीत त्यापेक्षा अधिक वाईट आचरण करू लागले. ते इतर दैवतांची उपासना करीत व त्यांच्या पापी चालीरीतींकडे हट्टाने पुन्हा वळत.
19 Mas, quando o juiz morria, o povo voltava a caminhos ainda piores do que os caminhos dos seus antepassados, seguindo outros deuses, prestando-lhes culto e adorando-os. Recusavam-se a abandonar suas práticas e seu caminho obstinado.
20 यासाठी याहवेहचा क्रोध इस्राएलविरुद्ध भडकला आणि त्यांनी जाहीर केले, “कारण या इस्राएली राष्ट्राने त्यांच्या पूर्वजांशी मी केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे आणि माझे ऐकले नाही,
20 Por isso a ira do Senhor acendeu-se contra Israel, e ele disse: "Como este povo violou a aliança que fiz com os seus antepassados e não tem ouvido a minha voz,
21 यहोशुआ मरण पावल्यावर, यापुढे मी घालविलेल्या राष्ट्रांपैकी कोणतेही राष्ट्र त्यांच्यापुढून घालविणार नाही.
21 não expulsarei de diante deles nenhuma das nações que Josué deixou quando morreu.
22 इस्राएली लोकांची मी परीक्षा घेईन आणि त्यांच्या पूर्वजांप्रमाणे याहवेहच्या आज्ञेचे पालन ते करतात की नाही हे पाहण्यासाठी या राष्ट्रांचा मी उपयोग करेन.”
22 Eu as usarei para pôr Israel à prova e ver se guardarão o caminho do Senhor e se andarão nele como o fizeram os seus antepassados".
23 याहवेहने त्या राष्ट्रांना तिथेच राहू दिले; यहोशुआच्या हातात देऊनही त्यांना एकदम घालवून दिले नाही.
23 O Senhor havia permitido que essas nações permanecessem; não as expulsou de imediato, e não as entregou nas mãos de Josué.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.