Juízes 1

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?”
1 Depois da morte de Josué, os israelitas consultaram o Senhor: Quem dentre nós será o primeiro a combater os cananeus?
2 याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने पुढे जावे; ही भूमी मी त्यांच्या हातात दिली आहे.”
2 O Senhor respondeu: Judá, pois eu entregarei a terra nas suas mãos.
3 मग यहूदीयाच्या पुरुषांनी इस्राएली बांधव शिमओनीना म्हणाले, “कनानविरुद्ध लढण्यासाठी आमच्यासोबत मिळालेल्या वतनात वर चला. तुमच्या वतनात आम्ही तुमच्यासोबत येऊ.” तेव्हा शिमओनी त्यांच्याबरोबर गेले.
3 Então Judá disse a Simeão, seu irmão: Vem comigo à terra que me coube por sorte, para combatermos contra os cananeus. Depois irei contigo à tua terra. Simeão partiu com ele.
4 जेव्हा यहूदाहने आक्रमण केले, याहवेहने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी बेजेक इथे दहा हजार लोकांचा वध केला.
4 Judá travou combate e o Senhor entregou-lhe os cananeus e os ferezeus; derrotaram dez mil homens em Bezec.
5 बेजेक इथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध युद्ध करून कनानी आणि परिज्जी लोकांचा नायनाट केला.
5 Ali encontraram Adoni-Bezec, atacaram-no e derrotaram os cananeus e os ferezeus.
6 अदोनी-बेजेक पळून गेला, परंतु त्यांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडले आणि त्याच्या हातांचे आणि पायांचे आंगठे कापले.
6 Adoni-Bezec fugiu, mas eles o perseguiram, prenderam-no e cortaram-lhe os polegares das mãos e os hálux dos pés.
7 त्यानंतर अदोनी-बेजेक म्हणाला, “ज्या सत्तर राजांच्या हातापायांचे आंगठे कापून टाकले आणि ते माझ्या मेजाखालचे तुकडे उचलतात. आता परमेश्वराने मला त्याची परतफेड दिली आहे.” त्यांनी त्याला यरुशलेमला आणले आणि तिथे तो मरण पावला.
7 Adoni-Bezec disse: Setenta reis, com os polegares das mãos e os hálux dos pés cortados, apanhavam debaixo de minha mesa os sobejos da comida. Como eu fiz, assim Deus me faz. E conduziram-no a Jerusalém, onde morreu.
8 यहूदाह गोत्राच्या लोकांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि ते देखील जिंकून घेतले. तेथील लोकांची तलवारीने कत्तल केली आणि त्या शहराला आग लावून दिली.
8 Os juditas atacaram Jerusalém e tomaram-na. Passaram os seus habitantes ao fio da espada e incendiaram a cidade.
9 त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले.
9 Desceram dali e combateram os cananeus das montanhas, do meio-dia e da planície.
10 मग त्या हेब्रोनात (ज्याला पूर्वी किर्याथ-अर्बा म्हणत) राहणार्‍या कनान्यांवर यहूदाहने हल्ला केला आणि त्यांनी शेशय, अहीमान, व तलमय यांचा पराभव केला.
10 Judá marchou contra os cananeus de Hebron {chamada antigamente Cariat-Arbé}, e derrotou Sesai, Aimã e Tolmai.
11 तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला.
11 Marchou depois contra os habitantes de Dabir, que antigamente se chamava Cariat-Sefer.
12 कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.”
12 Caleb tinha dito: Àquele que combater e tomar Cariat-Sefer darei por mulher minha filha Axa.
13 कालेबाचा लहान भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले; म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह पत्नी म्हणून त्याला दिली.
13 Otoniel, filho de Cenez, irmão mais novo de Caleb, tomou a cidade; e Caleb deu-lhe sua filha Axa por mulher.
14 एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”
14 Chegando Axa à casa de seu marido, ele moveu-a a que pedisse um campo ao seu pai. {E pela segunda vez} ela saltou de seu jumento, e Caleb disse-lhe: Que tens?
15 तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले.
15 Dá-me, respondeu ela, um presente. Instalaste-me em uma terra árida; dá-me também fontes de água! E Caleb deu-lhe as fontes superiores e inferiores.
16 मोशेच्या सासर्‍याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले.
16 Os filhos de Hobab, o quenita, cunhado de Moisés, subiram da cidade das Palmeiras com os juditas, no deserto de Judá, ao sul de Arad, e vieram estabelecer-se com o povo.
17 नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्‍या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह असे म्हणतात.
17 Judá prosseguiu sua marcha com Simeão, seu irmão, e derrotaram os cananeus de Sefaat. Votaram a cidade ao interdito e ela recebeu o nome de Horma.
18 यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.
18 Judá tomou também Gaza e seu território, bem como Ascalon e Acaron com seus territórios.
19 याहवेह यहूदाहच्या लोकांसह होते. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील देशांचा पूर्णपणे ताबा घेतला, परंतु खोर्‍यात राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना ते हाकलू शकले नाहीत.
19 O Senhor estava com Judá, e ele conquistou a montanha; porém, não pôde despojar os habitantes da planície que possuíam carros de ferro.
20 मोशेने अभिवचन दिल्याप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आले, ज्याने अनाकाच्या तीन पुत्रांना हाकलून लावले.
20 Conforme o que Moisés tinha dito, deram Hebron a Caleb, que expulsou dela os três filhos de Enac.
21 तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्‍या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत.
21 Os benjaminitas não exterminaram os jebuseus de Jerusalém; por isso, os jebuseus habitaram em Jerusalém com os benjaminitas até o presente.
22 योसेफाच्या गोत्रांच्या लोकांनी बेथेलवर स्वारी केली आणि याहवेह त्यांच्याबरोबर होते.
22 A família de José marchou também contra Betel, e o Senhor esteve com eles.
23 जेव्हा योसेफाच्या घराण्याने बेथेल नगरीची (ज्याला पूर्वी लूज असे म्हणत) हेरगिरी करण्यासाठी पुरुष पाठविले,
23 E quando exploravam Betel, que antes se chamava Luz,
24 एका मनुष्याला शहरातून बाहेर येताना हेरांनी पाहिले आणि ते त्याला म्हणाले, “नगरात कसे जायचे ते आम्हाला दाखव आणि आम्ही पाहू की तुझ्याशी चांगले वागले जाईल.”
24 viram um homem que saía da cidade, e disseram-lhe: Mostra-nos por onde se pode entrar na cidade e usaremos de misericórdia contigo.
25 म्हणून त्याने त्यांना दाखविले आणि त्यांनी तलवारीच्या बळावर पूर्ण शहर नष्ट केले, परंतु त्या मनुष्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाचविले.
25 Ele indicou-lhes a entrada, e passaram a localidade ao fio da espada, poupando, porém, aquele homem com a sua família.
26 त्यानंतर तो हिथी लोकांच्या देशात गेला, तिथे त्याने एक शहर निर्माण केले आणि त्याचे नाव लूज ठेवले, जे नाव आजपर्यंत आहे.
26 Este emigrou para a terra dos hiteus, onde construiu uma cidade, à qual pôs o nome de Luz, nome que ela conserva ainda hoje.
27 परंतु मनश्शेहने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम किंवा मगिद्दो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना घालविले नाही, कारण कनानी लोकांनी त्या देशात राहण्याचा निश्चय केला होता.
27 Manassés não expulsou os habitantes de Betsã com suas aldeias, nem os de Tanac, de Dor, de Jeblaão, de Magedo, com suas aldeias, porque os cananeus estavam decididos a ocupar essa terra.
28 जेव्हा इस्राएली प्रबळ झाले, त्यांनी कनानी लोकांना गुलाम म्हणून काम करण्यास लावले, परंतु त्यांना कधीही पूर्णपणे हाकलून दिले नाही.
28 Quando se tornaram mais fortes, os israelitas fizeram-nos tributários, mas não os despojaram.
29 तसेच एफ्राईमने गेजेर येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून दिले नाही, परंतु कनानी लोक त्यांच्यामध्येच राहिले.
29 Efraim não expulsou os cananeus de Geser, os quais continuaram a habitar em Geser, no meio de Efraim.
30 जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले.
30 Zabulon não expulsou os habitantes de Cetron, nem os de Naalol; e os cananeus continuaram a habitar no meio de Zabulon, embora sujeitos ao tributo.
31 आशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोबातील रहिवाशांस हाकलून दिले नाही.
31 Aser não expulsou os habitantes de Aco, nem os de Sidon, nem os de Aalab, de Acasib, de Helba, de Afec e de Roob;
32 आशेरी लोक त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते, कारण त्यांनी त्यांना हाकलून दिले नाही.
32 os filhos de Aser estabeleceram-se entre os cananeus, habitantes daquela terra; não os despojaram.
33 नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्‍यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले.
33 Neftali não expulsou os habitantes de Bet-Sames, nem os de Bet-Anat, e estabeleceu-se entre os cananeus, habitantes daquela terra; os betsamitas e os betanitas ficaram-lhe tributários.
34 अमोरी लोकांनी दान गोत्राच्या लोकांना डोंगराळ प्रदेशात पळवून लावले, त्यांना खाली खोर्‍यात येऊ दिले नाही.
34 Os amorreus repeliram os danitas para a montanha, e não os deixaram descer para a planície.
35 आणि अमोरी लोकांनी हेरेस, अय्यालोन आणि शालब्बीम पर्वतावर देखील थांबण्याचा निर्धार केला होता, परंतु जेव्हा योसेफाच्या गोत्रांचे लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांच्यावर देखील जबरदस्तीने मजुरकामासाठी दबाव टाकण्यात आला.
35 Persistiram em ficar em Har-Harés, em Ajalon e em Salebim; mas a mão da casa de José prevaleceu sobre eles, e tiveram de pagar o tributo.
36 अमोरी लोकांची सीमा अक्राब्बीमच्या चढावापासून सेला आणि त्यापलीकडे होती.
36 O território dos amorreus estendia-se desde a costa de Acrabim e de Sela, para o norte.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.