Juízes 13
marc (MARC) vs NVI
1 पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, म्हणून याहवेहने त्यांना चाळीस वर्षे पलिष्टी लोकांच्या अंमलाखाली ठेवले.
1 Os israelitas voltaram a fazer o que o Senhor reprova, e por isso o Senhor os entregou nas mãos dos filisteus durante quarenta anos.
2 दान कुळातील सोराह येथील एक मनुष्य होता, ज्याचे नाव मानोहा होते, त्याची पत्नी होती, जी वांझ असून ती लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती.
2 Certo homem de Zorá, chamado Manoá, do clã da tribo de Dã, tinha mulher estéril.
3 याहवेहच्या दूताने तिला दर्शन दिले आणि म्हणाला, “तू वांझ आहे आणि तुला मूल नाही, तरीपण तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील.
3 Certo dia o anjo do Senhor apareceu a ela e lhe disse: "Você é estéril, não tem filhos, mas engravidará e dará à luz um filho.
4 तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस.
4 Todavia, tenha cuidado, não beba vinho nem outra bebida fermentada, e não coma nada impuro;
5 कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.”
5 e não se passará navalha na cabeça do filho que você vai ter, porque o menino será nazireu, consagrado a Deus desde o nascimento; ele iniciará a libertação de Israel das mãos dos filisteus".
6 तेव्हा ती स्त्री आपल्या पतीकडे गेली आणि त्याला सांगितले, “परमेश्वराचा एक पुरुष माझ्याकडे आला. तो परमेश्वराच्या दूतासारखा दिसत होता, अतिशय अद्भुत. तो कुठून आला होता हे मी त्याला विचारले नाही आणि त्याने आपले नावही मला सांगितले नाही.
6 Então a mulher foi contar tudo ao seu marido: "Um homem de Deus veio falar comigo. Era como um anjo de Deus, de aparência impressionante. Não lhe perguntei de onde tinha vindo, e ele não me disse o seu nome,
7 परंतु त्याने मला सांगितले, ‘तू गर्भवती होशील आणि एक पुत्रास जन्म देशील. आतापासून द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नको, अशुद्ध असे काहीही खाऊ नको, कारण ते बाळ, तो पुत्र गर्भावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत परमेश्वराचा नाजीर होईल.’ ”
7 mas ele me assegurou: ‘Você engravidará e dará à luz um filho. Todavia, não beba vinho nem outra bebida fermentada, e não coma nada impuro, porque o menino será nazireu, consagrado a Deus, desde o nascimento até o dia da sua morte’ ".
8 तेव्हा मानोहाने याहवेहला प्रार्थना केली: “हे प्रभू, तुमच्या सेवकाला क्षमा करा. परमेश्वराचा दूत पुन्हा आमच्याकडे येईल असे करा म्हणजे जे बाळ जन्मास येणार आहे त्याचे संगोपन कसे करावे तो आम्हास शिकवेल.”
8 Então Manoá orou ao Senhor: "Senhor, eu te imploro que o homem de Deus que enviaste volte para nos instruir sobre o que fazer com o menino que vai nascer".
9 परमेश्वराने मानोहानाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि परमेश्वराचा दूत परत त्या स्त्रीकडे आला, जेव्हा ती शेतात बसलेली होती; परंतु तिचा पती मानोहा तिच्याबरोबर नव्हता
9 Deus ouviu a oração de Manoá, e o anjo de Deus veio novamente falar com a mulher quando ela estava sentada no campo; Manoá, seu marido, não estava com ela.
10 म्हणून ती स्त्री लगबगीने आपल्या पतीस सांगण्यास गेली, “जो पुरुष त्या दिवशी माझ्या दृष्टीस पडला होता तो इथे आहे!”
10 Mas ela foi correndo contar ao marido: "O homem que me apareceu outro dia está aqui! "
11 मानोहा उठला आणि आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी गेला, तो त्या पुरुषाजवळ गेला व त्याला विचारले, “त्या दिवशी माझ्या पत्नीशी बोलणारे आपणच आहात का?”
11 Manoá levantou-se e seguiu a mulher. Quando se aproximou do homem, perguntou: "És tu o que falaste com a minha mulher? " "Sim", disse ele.
12 “तेव्हा मानोहाने त्याला विचारले, जेव्हा तुमचे शब्द पूर्ण होतील तेव्हा त्या बाळाच्या कार्यासाठी व जीवनासाठी कोणते नियम असावे?”
12 "Quando as suas palavras se cumprirem", Manoá perguntou, "como devemos criar o menino? O que ele deverá fazer? "
13 याहवेहच्या दूताने मानोहाला उत्तर दिले, “मी तुझ्या पत्नीला जे सांगितले आहे ते सर्व तिने करावे.
13 O Anjo do Senhor respondeu: "Sua mulher terá que seguir tudo o que eu lhe ordenei.
14 तिने द्राक्षाच्या वेलीतून आलेले कोणतेही उपज खाऊ नये, द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये किंवा जे अशुद्ध आहे असे काहीही खाऊ नये. ज्या सर्व आज्ञा तिला दिल्या आहेत त्या तिने पाळाव्या.”
14 Ela não poderá comer nenhum produto da videira, nem vinho ou bebida fermentada, nem comer nada impuro. Terá que obedecer a tudo o que lhe ordenei".
15 मानोहा याहवेहच्या दूतास म्हणाला, “आम्ही आपणासाठी करडू तयार करेपर्यंत आपण येथेच थांबावे.”
15 Manoá disse ao Anjo do Senhor: "Gostaríamos que ficasses conosco; queremos oferecer-te um cabrito".
16 याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तुम्ही मला रोखून धरले तरी मी तुमचे भोजन खाणार नाही. पण जर तुम्ही होमार्पण तयार केले तर ते याहवेहला अर्पण करा.” (हा याहवेहचा दूत आहे, हे अद्यापही मानोहाला समजले नव्हते.)
16 O anjo do Senhor respondeu: "Se eu ficar, não comerei nada. Mas, se você preparar um holocausto, ofereça-o ao Senhor". Manoá não sabia que ele era o anjo do Senhor.
17 नंतर मानोहाने याहवेहच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? म्हणजे तुमचे शब्द खरे ठरल्यानंतर आम्ही तुमचा सत्कार करू.”
17 Então Manoá perguntou ao anjo do Senhor: "Qual é o teu nome, para que te prestemos homenagem quando se cumprir a tua palavra? "
18 याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तू माझे नाव का विचारतो? हे समजण्यापलीकडे आहे.”
18 Ele respondeu: "Por que pergunta o meu nome? Meu nome está além do entendimento".
19 मग मानोहाने एक तरुण करडू घेतले आणि ते अन्नबलीसह याहवेहला एका खडकावर अर्पिले आणि जेव्हा मानोहा आणि त्याची पत्नी हे पाहत असताना याहवेहने आश्चर्यकारक कृत्ये केली:
19 Então Manoá apanhou um cabrito e a oferta de cereal, e os ofereceu ao Senhor sobre uma rocha. E o Senhor fez algo estranho enquanto Manoá e sua mulher observavam:
20 मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना वेदीवरून आकाशाकडे उफाळून वर जाणार्या अग्नीच्या ज्वालेवर याहवेहच्या दूताने आरोहण केले. ते पाहून मानोहा आणि त्याची पत्नी यांनी दंडवत घातले.
20 Quando a chama do altar subiu ao céu, o Anjo do Senhor subiu na chama. Vendo isso, Manoá e à sua mulher prostraram-se, rosto em terra.
21 जेव्हा याहवेहचा दूत मानोहा आणि त्याच्या पत्नीला परत प्रकट झाला नाही, तेव्हा मानोहाला हे कळले की तो याहवेहचा दूत होता.
21 Como o Anjo do Senhor não voltou a manifestar-se a Manoá e à sua mulher, Manoá percebeu que era o Anjo do Senhor.
22 “आता आपला मृत्यू निश्चित आहे!” मानोहा त्याच्या पत्नीला म्हणाला. “आम्ही परमेश्वराला पाहिले आहे!”
22 "Sem dúvida vamos morrer! " disse ele à mulher, "pois vimos a Deus! "
23 परंतु त्याची पत्नीने उत्तर दिले, “जर याहवेहला आपल्याला मारून टाकावयाचे असते, तर त्यांनी आपल्या हातांनी होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपल्याला या सर्व अद्भुत गोष्ट प्रकट केली नसती वा आपल्याला सांगितलीही नसती.”
23 Mas a sua mulher respondeu: "Se o Senhor tivesse a intenção de nos matar, não teria aceitado o holocausto e a oferta de cereal das nossas mãos, nem nos teria mostrado todas essas coisas, nem nos teria revelado o que agora nos revelou".
24 मग त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव शमशोन ठेवले. तो वाढत गेला आणि याहवेहने त्याला आशीर्वाद दिला,
24 A mulher deu à luz um menino e pôs-lhe o nome de Sansão. Ele cresceu, e o Senhor o abençoou,
25 सोराह आणि एष्टाओल यांच्यामध्ये महनेह दान येथे असताना याहवेहचा आत्मा त्याला प्रवृत्त करू लागला.
25 e o Espírito do Senhor começou a agir nele quando ele se achava em Maané-Dã, entre Zorá e Estaol.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Juízes 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.