Josué 5

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.
1 Quando todos os reis dos amorreus, a ocidente do Jordão, e todos os reis dos cananeus, para as bandas do mar, souberam que o Senhor tinha secado as águas do Jordão diante dos israelitas, até que passassem, seu coração desfaleceu e perderam toda a coragem diante dos israelitas.
2 त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्‍या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.”
2 Então o Senhor disse a Josué: Faze facas de pedras, e circuncida de novo os israelitas.
3 तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्‍या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली.
3 Josué fez as facas de pedra e circuncidou os israelitas na colina de Aralot.
4 यहोशुआने सुंता यासाठी केली की: इजिप्त देश सोडून जे सर्व बाहेर आले—युद्धाचे वय असलेले सर्व पुरुष—इजिप्त सोडून येत असताना रानामध्ये मरण पावले.
4 A causa dessa circuncisão é a seguinte: todos os varões dentre o povo que tinham saído do Egito - todos os homens de guerra - tinham morrido em caminho, no deserto, depois que haviam partido do Egito.
5 बाहेर पडलेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, परंतु इजिप्त सोडल्यानंतरच्या प्रवासाच्या काळात जे सर्व पुरुष जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती.
5 Ora, todos eles tinham sido circuncidados. A multidão, porém, nascida no deserto durante a viagem depois do êxodo, não o tinha sido.
6 इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही.
6 Os israelitas tinham marchado pelo deserto durante quarenta anos, até o desaparecimento completo dessa massa de homens de guerra escapados do Egito, mas infiéis à voz do Senhor. O Senhor havia-lhes jurado que não veriam a terra prometida a seus pais, terra que mana leite e mel.
7 म्हणून जी मुले आपल्या वडिलांची जागा घेण्यायोग्य झाली होती, यहोशुआने त्यांची सुंता केली. ते अजूनही बेसुंती होते कारण वाटेत त्यांची सुंता झाली नव्हती
7 Seus filhos foram postos em seu lugar. Foi essa a geração que Josué circuncidou. Eles tinham o seu prepúcio, porque não tinham sido circuncidados durante sua viagem.
8 सुंतेच्या विधीनंतर जखमा बर्‍या होईपर्यंत संपूर्ण इस्राएली राष्ट्राने छावणीत विश्रांती घेतली.
8 Depois que foram todos circuncidados, permaneceram acampados até sararem.
9 मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुमच्यापासून इजिप्तचा कलंक दूर लोटून दिला आहे,” यास्तव त्या ठिकाणाला गिलगाल असे नाव देण्यात आले आणि आज देखील ते ठिकाण त्याच नावाने ओळखले जाते.
9 O Senhor disse a Josué: Hoje tirei de cima de vós o opróbrio do Egito. E deu-se àquele lugar o nome de Gálgala, nome que subsiste ainda.
10 यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला.
10 Os israelitas acamparam em Gálgala, e celebraram a Páscoa no décimo quarto dia do mês, pela tarde, na planície de Jericó.
11 वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य.
11 No dia seguinte à Páscoa comeram os produtos da região, pães sem fermento e trigo tostado.
12 त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला.
12 E o maná cessou {de cair} no dia seguinte àquele em que comeram os produtos da terra. Os israelitas não tiveram mais o maná. Naquele ano alimentaram-se da colheita da terra de Canaã.
13 आता यहोशुआ जेव्हा यरीहोजवळ होता, त्याने वर पाहिले आणि त्याला दिसले की त्याच्यासमोर एक पुरुष तलवार हातात घेऊन त्याच्यासमोर उभा आहे. यहोशुआ त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारले, “तू आमच्या बाजूने आहेस की आमच्या शत्रूच्या बाजूने आहेस?”
13 Josué encontrava-se nas proximidades de Jericó. Levantando os olhos, viu diante de si um homem de pé, com uma espada desembainhada na mão. Josué foi contra ele: És dos nossos, disse ele, ou dos nossos inimigos?
14 “कोणाच्याही बाजूचा नाही,” त्याने उत्तर दिले, “परंतु याहवेहचा सेनानायक म्हणून मी आलो आहे.” तेव्हा यहोशुआने आदराने त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि त्याला विचारले, “माझ्या प्रभूकडून त्याच्या सेवकासाठी काय आदेश आहे?”
14 Ele respondeu: Não; venho como chefe do exército do Senhor. Josué prostrou-se com o rosto por terra, e disse-lhe: Que ordena o meu Senhor a seu servo?
15 याहवेहच्या सेनानायकाने उत्तर दिले, “तुझ्या पायातील पायतण काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशुआने त्याप्रमाणे केले.
15 E o chefe do exército do Senhor respondeu: Tira o calçado de teus pés, porque o lugar em que te encontras é santo. Assim fez Josué.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 5, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.