Josué 23

marc (MARC) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 पुष्कळ काळ होऊन गेला होता आणि याहवेहने इस्राएली लोकास सभोवतालच्या सर्व शत्रूपासून विश्रांती दिली, तोपर्यंत यहोशुआ अतिशय वयस्कर झाला होता,
1 Muito tempo se passou depois de o S enhor ter concedido a Israel descanso de todos os seus inimigos. Josué, agora bastante idoso,
2 यहोशुआने सर्व इस्राएली लोकास, त्यांच्या वडीलजनास, पुढार्‍यांना, न्यायाधीशांना आणि अधिकार्‍यांना बोलाविले; आणि त्यांना म्हटले, “मी फार वृद्ध झालो आहे.
2 convocou todo o Israel, com seus líderes, chefes, juízes e oficiais, e disse: “Já estou bem idoso.
3 याहवेह, तुमचे परमेश्वरांनी तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचे जे काही केले, ते सर्वकाही तुम्ही स्वतःच पाहिले आहे. ते याहवेहच तुमचे परमेश्वर होते जे तुमच्यासाठी लढले.
3 Vocês viram tudo que o S enhor , seu Deus, fez por vocês. O S enhor , seu Deus, lutou em seu favor contra seus inimigos.
4 आठवण करा, कशाप्रकारे यार्देनपासून पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत या उर्वरित राष्ट्रांना मी जिंकले व ती तुमच्या गोत्रांना तुमचे वतन म्हणून वाटून दिले.
4 Eu reparti entre vocês como herança toda a terra das nações que ainda não foram conquistadas, bem como a terra das nações que já derrotamos desde o rio Jordão até o mar Mediterrâneo, a oeste.
5 याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यासाठी बाहेर हाकलून देतील. तुमच्यासमोर ते त्यांना बाहेर काढतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्यानुसार तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल.
5 Essa terra será de vocês, pois o S enhor , seu Deus, expulsará de diante de vocês os povos que habitam ali. Vocês tomarão posse da terra deles, conforme o S enhor , seu Deus, lhes prometeu.
6 “अत्यंत बलवान व्हा; मोशेच्या नियमशास्त्रात जे सर्व लिहिले आहे, त्याचे काळजीपूर्वक पालन करा, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.
6 “Por isso, esforcem-se ao máximo para cumprir cuidadosamente tudo que Moisés escreveu no Livro da Lei. Não se desviem dele, nem para um lado nem para o outro.
7 तुमच्यामध्ये जी उर्वरित राष्ट्रे आहेत त्यांच्याशी संगती करू नका; त्यांच्या दैवतांची नावे घेऊ नका किंवा त्यांची शपथही घेऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करू नये किंवा त्यांना नमन करू नये
7 Não se misturem com os povos que ainda restam na terra. Nem sequer mencionem o nome dos deuses deles e muito menos jurem por eles. Não sirvam nem adorem esses deuses,
8 परंतु आतापर्यंत जसे तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वर यांना धरून राहिलात तसेच राहा.
8 mas apeguem-se firmemente ao S enhor , seu Deus, como fizeram até hoje.
9 “याहवेहने तुमच्यापुढून महान आणि शक्तिशाली राष्ट्रे घालवून दिली आहेत, कोणतेही राष्ट्र आजपर्यंत तुमच्यापुढे टिकू शकले नाही.
9 “Pois o S enhor expulsou de diante de vocês grandes e poderosas nações e, até hoje, ninguém conseguiu lhes resistir.
10 तुमच्यातील एकजण हजारांना पळवून लावतो, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, याहवेह तुमच्यासाठी लढतात,
10 Cada um de vocês fará fugir mil homens do inimigo, porque o S enhor , seu Deus, luta por vocês, conforme prometeu.
11 म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करण्याबाबत फार सावध असा.
11 Portanto, dediquem-se com empenho a amar o S enhor , seu Deus.
12 “परंतु जर तुम्ही मागे फिराल आणि या राष्ट्रांतील उर्वरित जे लोक तुमच्यामध्ये राहतात त्यांच्याबरोबर स्वतःला जोडाल, त्यांच्याबरोबर सोयरीक कराल आणि त्यांची संगत धराल
12 “Mas, se vocês se desviarem dele e se apegarem aos costumes dos sobreviventes das nações que ainda restam no meio de vocês, e se casarem com eles, e eles com vocês,
13 तर खचित हे जाणून घ्या की, याहवेह तुमचे परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या समोरून आणखी घालवून देणार नाही. परंतु हा चांगला देश, जो याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिला आहे, त्यातून तुमचा नाश होईपर्यंत, ती राष्ट्रे तुमच्यासाठी पाश व सापळा अशी होतील, तुमच्या पाठीवर चाबूक आणि तुमच्या डोळ्यात काटे असतील.
13 saibam, com certeza, que o S enhor , seu Deus, não expulsará essas nações de diante de vocês. Ao contrário, elas serão isca e armadilha para vocês, chicote em suas costas e espinhos em seus olhos. E vocês desaparecerão para sempre desta boa terra que o S enhor , seu Deus, lhes deu.
14 “आता मी लवकरच सर्व जग जाते त्या वाटेने जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व हृदयाने व जिवाने माहीत आहे की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या अभिवचनातील एकही निष्फळ झाले नाही. प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले आहे; एकही निष्फळ झाले नाही.
14 “Em breve morrerei e irei pelo caminho de toda a terra. Vocês sabem, de todo o coração, que todas as boas promessas do S enhor , seu Deus, se cumpriram. Nenhuma delas falhou!
15 तर याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्याप्रमाणे सर्व चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याच प्रकारे याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला चेतावणी दिल्याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या या चांगल्या देशातून तुमचा समूळ नाश होईपर्यंत प्रत्येक वाईट गोष्ट याहवेह तुमच्यावर आणतील.
15 Mas, assim como o S enhor , seu Deus, lhes deu as coisas boas que ele prometeu, também fará vir calamidades sobre vocês se lhe desobedecerem. O S enhor , seu Deus, os eliminará completamente desta boa terra que lhes deu.
16 याहवेह तुमच्या परमेश्वरांनी जो करार तुम्हास आज्ञापिला आहे त्याचे जर तुम्ही उल्लंघन केले, आणि जाऊन इतर दैवतांची सेवा केली आणि त्यांना नमन केले, तर याहवेहचा क्रोध तुमच्याविरुद्ध भडकेल आणि या चांगल्या प्रदेशातून जो त्यांनी तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा लवकरच नाश होईल.”
16 Se vocês quebrarem a aliança do S enhor , seu Deus, servindo ou adorando outros deuses, a ira do S enhor arderá contra vocês, e desaparecerão rapidamente da boa terra que ele lhes deu”.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 23, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.