Josué 22

marc (MARC) vs NVT

Sair da comparação
NVT Nova Versão Transformadora
1 नंतर यहोशुआने रऊबेन, गाद व मनश्शेहचे अर्धे गोत्र यांना बोलाविले
1 Então Josué convocou as tribos de Rúben e Gade e a meia tribo de Manassés
2 आणि त्यांना म्हटले, “याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले आहे आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली आहे.
2 e lhes disse: “Vocês fizeram tudo que Moisés, servo do S enhor , mandou e obedeceram a todas as minhas ordens.
3 कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे.
3 Durante todo esse tempo e até hoje, não abandonaram seus irmãos das outras tribos e tiveram o cuidado de obedecer a tudo que o S enhor , seu Deus, ordenou.
4 आता याहवेह तुमच्या परमेश्वरांनी अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा दिला आहे. तर आता यार्देनेच्या पलीकडे याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या प्रदेशातील तुमच्या घरी तुम्ही परत जा.
4 Agora o S enhor , seu Deus, concedeu descanso a seus irmãos, como prometeu a eles. Portanto, voltem para casa, para a terra que Moisés, servo do S enhor , lhes deu como sua propriedade do outro lado do rio Jordão.
5 परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”
5 Mas tenham muito cuidado de cumprir todos os mandamentos e a lei que Moisés, servo do S enhor , lhes deu. Amem o S enhor , seu Deus, andem em todos os seus caminhos, obedeçam a seus mandamentos, apeguem-se a ele firmemente e sirvam-no de todo o coração e de toda a alma”.
6 तेव्हा यहोशुआने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या घरी रवाना झाले.
6 Então Josué os abençoou e se despediu deles, e eles foram para casa.
7 (मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला मोशेने बाशान प्रदेशात वतन दिले होते, तर यहोशुआने त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या गोत्राला त्यांच्या सहइस्राएली लोकांबरोबर यार्देनेच्या पश्चिमेस वतन दिले होते.) जेव्हा यहोशुआने त्यांना घरी पाठवले, तेव्हा त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला,
7 Moisés tinha dado o território de Basã, a leste do rio Jordão, à meia tribo de Manassés. À outra metade da tribo, Josué deu terras a oeste do Jordão. Quando Josué se despediu deles e os abençoou,
8 “तुमची मोठी संपत्ती घेऊन घरी जा—गुरांचा मोठा कळप, चांदी, सोने, कास्य आणि लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे आणि तुमच्या शत्रूपासून मिळालेली लूट आपल्या इस्राएली बांधवांसह वाटून घ्या.”
8 disse: “Voltem para casa com toda a riqueza que tomaram de seus inimigos: grandes rebanhos, prata, ouro, bronze, ferro e muitas roupas. Repartam os despojos com seus parentes”.
9 तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.
9 Assim, os homens de Rúben e Gade e da meia tribo de Manassés deixaram os outros israelitas em Siló, na terra de Canaã, e partiram para sua própria terra em Gileade, da qual haviam tomado posse de acordo com a ordem do S enhor , por meio de Moisés.
10 जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.
10 Enquanto ainda estavam em Canaã, chegaram a um lugar chamado Gelilote, perto do rio Jordão. Ali os homens de Rúben e Gade e da meia tribo de Manassés pararam e construíram um altar grande e imponente.
11 आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,
11 Os outros israelitas souberam que os membros das tribos de Rúben e Gade e da meia tribo de Manassés haviam construído um altar em Gelilote, nos limites da terra de Canaã, do lado oeste do Jordão.
12 तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले.
12 Por isso, toda a comunidade de Israel se reuniu em Siló e se preparou para guerrear contra eles.
13 म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.
13 Antes, porém, enviaram à terra de Gileade uma delegação liderada por Fineias, filho do sacerdote Eleazar, para conversar com as tribos de Rúben e Gade e a meia tribo de Manassés.
14 त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले.
14 A delegação era formada por dez líderes de Israel, um de cada uma das dez tribos, e todos eles eram chefes de suas famílias dentro dos clãs de Israel.
15 जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:
15 Quando chegaram à terra de Gileade, disseram às tribos de Rúben e Gade e à meia tribo de Manassés:
16 “याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता?
16 “Toda a comunidade do S enhor quer saber por que vocês foram tão infiéis ao Deus de Israel! Como puderam se afastar tanto do S enhor ? Vocês construíram para si um altar, rebelando-se contra ele!
17 पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही.
17 Não bastou o pecado do incidente em Peor? Até hoje, não estamos completamente purificados dele, mesmo depois que a praga feriu toda a comunidade do S enhor .
18 आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय?
18 E, ainda assim, vocês abandonam o S enhor . Se hoje vocês se rebelarem contra o S enhor , amanhã ele voltará sua ira contra toda a comunidade de Israel!
19 जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.
19 “Se a porção de terra que receberam como herança está impura, passem para o nosso lado, para a terra do S enhor , onde está o tabernáculo do S enhor , e tomem posse de um território entre nós. Mas não se rebelem contra o S enhor nem contra nós, construindo para si um altar que não seja o verdadeiro altar do S enhor , nosso Deus.
20 जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ”
20 Quando Acã, descendente de Zerá, foi infiel ao S enhor , roubando as coisas separadas para o S enhor , a ira divina não caiu sobre toda a comunidade de Israel? E Acã não foi o único que morreu por causa do seu pecado!”.
21 तेव्हा रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी इस्राएलच्या कुटुंबप्रमुखांना उत्तर दिले:
21 Então os membros das tribos de Rúben e Gade e da meia tribo de Manassés responderam aos chefes dos clãs de Israel:
22 “याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! त्यांना माहीत आहे! आणि हे सर्व इस्राएलच्या लोकांना माहीत व्हावे! जर हे, याहवेहविरुद्ध बंड करण्यासाठी किंवा आज्ञाभंग असे असेल तर आज आम्हाला जिवंत सोडू नका.
22 “O S enhor , o Poderoso, é Deus! O S enhor , o Poderoso, é Deus! Ele sabe a verdade, e que Israel a saiba também! Não construímos o altar por rebeldia nem por infidelidade ao S enhor . Se o fizemos, não poupem nossa vida hoje.
23 जर याहवेहपासून दूर जाण्यासाठी, आणि होमार्पण आणि अन्नार्पण किंवा शांत्यर्पण त्यावर करावे म्हणून आम्ही आमची स्वतःची वेदी बांधली असेल तर याहवेह स्वतः त्याचा हिशोब आमच्याकडून घेवो.
23 Se construímos o altar para nos afastarmos do S enhor ou para apresentarmos holocaustos, ofertas de cereal ou ofertas de paz, que o próprio S enhor nos castigue.
24 “नाही! आम्ही या भयाने हे केले की जर कधी तुमच्या वंशजांनी आमच्या वंशजांना विचारले, ‘याहवेह इस्राएलच्या परमेश्वराशी तुमचा काय संबंध आहे?
24 “A verdade é que construímos este altar por medo de que, no futuro, seus descendentes digam aos nossos: ‘Que direito vocês têm de adorar o S enhor , o Deus de Israel?
25 आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील.
25 O S enhor pôs o rio Jordão como barreira entre o nosso povo e o povo de Rúben e Gade. Vocês não têm parte com o S enhor ’. Então seus descendentes poderão impedir os nossos de adorarem o S enhor .
26 “म्हणूनच आम्ही म्हणालो, ‘चला आपण तयार होऊन वेदी बांधू या, परंतु होमार्पणासाठी किंवा यज्ञासाठी नाही.’
26 “Por isso, resolvemos construir o altar, não para oferecer holocaustos ou sacrifícios,
27 तर ती आमच्या आणि तुमच्या आणि पुढच्या पिढ्यांमध्ये साक्ष असावी, यासाठी की आम्ही होमार्पण, यज्ञे व शांत्यर्पणे करून याहवेहच्या पवित्रस्थानी सेवा करावी, म्हणजे ‘याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही’ असे भविष्यात तुमचे वंशज आमच्या वंशजांना म्हणू शकणार नाहीत.
27 mas como testemunho. Ele lembrará os nossos e os seus descendentes de que nós também temos o direito de servir ao S enhor em seu santuário com holocaustos, sacrifícios e ofertas de paz. Então seus descendentes não poderão dizer aos nossos: ‘Vocês não têm parte com o S enhor ’.
28 “आणि आम्ही म्हणालो, ‘जर ते आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तर आम्ही उत्तर देऊ: आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या याहवेहच्या वेदीचा हा नमुना पाहा, होमार्पणे किंवा यज्ञांसाठी नाही, परंतु आमच्या आणि तुमच्यामध्ये ही साक्ष म्हणून असावी.’
28 “Se disserem isso, nossos descendentes responderão: ‘Vejam esta réplica do altar do S enhor que nossos antepassados fizeram. Não é para holocaustos nem sacrifícios; é uma lembrança do relacionamento que vocês e nós temos com o S enhor ’.
29 “याहवेहच्या विरुद्ध बंड करणे आणि त्यांच्या निवासमंडपासमोर उभ्या असलेल्या याहवेह आपल्या परमेश्वराची होमवेदी सोडून धान्यार्पण आणि यज्ञांसाठी दुसरी वेदी बांधून त्यांच्यापासून दूर जाणे हे आमच्याकडून कधी ना होवो.”
29 Longe de nós nos rebelarmos contra o S enhor , ou nos afastarmos dele, construindo nosso próprio altar para holocaustos, ofertas de cereal ou sacrifícios. Somente o altar do S enhor , nosso Deus, que está diante do seu tabernáculo pode ser usado para esse fim”.
30 जेव्हा फिनहास याजक आणि समाजाचे पुढारी; इस्राएलच्या कुळांच्या कुटुंबप्रमुखांनी रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना जे म्हणायचे होते ते ऐकले, तेव्हा त्यांचे समाधान झाले.
30 Quando o sacerdote Fineias e os líderes da comunidade, os chefes dos clãs de Israel, ouviram o que os membros das tribos de Rúben e Gade e da meia tribo de Manassés disseram, ficaram satisfeitos.
31 मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”
31 Fineias, filho do sacerdote Eleazar, lhes respondeu: “Hoje sabemos que o S enhor está no meio de nós, pois vocês não foram infiéis ao S enhor , como havíamos imaginado. Ao contrário, livraram Israel de ser destruído pela mão do S enhor ”.
32 मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.
32 Então Fineias, filho do sacerdote Eleazar, e os outros líderes deixaram as tribos de Rúben e Gade em Gileade e voltaram à terra de Canaã para relatar aos israelitas o que havia acontecido.
33 तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही.
33 Todos os israelitas ficaram satisfeitos, louvaram a Deus e não falaram mais em guerrear contra Rúben e Gade.
34 रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले.
34 Os membros das tribos de Rúben e Gade chamaram o altar de “Testemunho”, pois disseram: “É um testemunho entre nós e eles de que o S enhor é, também, o nosso Deus”.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Josué 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.