Jeremias 32
marc (MARC) vs NVI
1 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या राजवटीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, याहवेहकडून यिर्मयाहला पुढील वचन प्राप्त झाले:
1 Esta é a palavra que o Senhor dirigiu a Jeremias no décimo ano do reinado de Zedequias, rei de Judá, que foi o ano décimo oitavo de Nabucodonosor.
2 यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता.
2 Naquela época, o exército do rei da Babilônia sitiava Jerusalém e o profeta Jeremias estava preso no pátio da guarda, no palácio real de Judá.
3 यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला कैदेत टाकले, असे म्हणून, “तू असा संदेश का देतोस? तू म्हणतोस याहवेह असे म्हणतात: ‘मी आता बाबेलच्या राजाच्या हातात हे नगर देणार आहे, आणि तो ते हस्तगत करणार आहे.
3 Zedequias, rei de Judá, havia aprisionado Jeremias acusando-o de profetizar que o Senhor iria entregar a cidade nas mãos do rei da Babilônia, e que este a conquistaria;
4 यहूदीयाचा राजा सिद्कीयाहची खास्द्यांच्या हातून सुटका होणार नाही, पण तो निश्चितच बाबेलच्या राजाच्या हातात पडेल व त्याच्याशी तो समोरासमोर बोलेल आणि सर्व स्वतःच्या डोळ्याने बघेल.
4 que Zedequias, rei de Judá, não escaparia das mãos dos babilônios, mas certamente seria entregue nas mãos do rei da Babilônia, falaria com ele face a face, e o veria com os próprios olhos;
5 तो राजा सिद्कीयाहला खास्द्यांच्या येथे नेईल व मी येऊन तुझी भेट घेईपर्यंत तो तिथेच राहील, असे याहवेह जाहीर करतात. जर तू बाबेलांशी युद्ध केलेस तरी तुला विजय मिळणार नाही.’ ”
5 e que ele levaria Zedequias para a Babilônia, onde este ficaria até que o Senhor cuidasse da situação dele; e, ainda, que se eles lutassem contra os babilônios não seriam bem-sucedidos.
6 यिर्मयाह म्हणाला, याहवेहकडून मला हे वचन आले आहे:
6 E Jeremias disse: "O Senhor dirigiu-me a palavra nos seguintes termos:
7 शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’
7 Hanameel, filho de seu tio Salum, virá ao seu encontro e dirá: ‘Compre a propriedade que tenho em Anatote, porque, sendo o parente mais próximo, você tem o direito e o dever de comprá-la’.
8 “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’
8 "Conforme o Senhor tinha dito, meu primo Hanameel veio ao meu encontro no pátio da guarda e disse: ‘Compre a propriedade que tenho em Anatote, no território de Benjamim, porque é seu o direito de posse e de resgate. Compre-a! ’ "Então, compreendi que essa era a palavra do Senhor.
9 मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले.
9 Assim, comprei do meu primo Hanameel a propriedade que ele possuía em Anatote. Pesei a prata e lhe paguei dezessete peças de prata.
10 साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली.
10 Assinei e selei a escritura, e pesei a prata na balança, diante de testemunhas por mim chamadas.
11 नंतर मी शर्ती व अटी नमूद केलेले—मोहोरबंद केलेले खरेदीखत घेतले, तसेच त्या खतपत्राची मोहोर न केलेली प्रत घेतली—
11 Peguei a escritura, a cópia selada com os termos e condições da compra, bem como a cópia não selada,
12 आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली.
12 e entreguei essa escritura de compra a Baruque, filho de Nerias, filho de Maaséias, na presença de meu primo Hanameel, das testemunhas que tinham assinado a escritura e de todos os judeus que estavam sentados no pátio da guarda.
13 “सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या:
13 "Na presença deles dei as seguintes instruções a Baruque:
14 ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव.
14 ‘Assim diz o Senhor dos Exércitos, Deus de Israel: Tome estes documentos, tanto a cópia selada como a não selada da escritura de compra, e coloque-os num jarro de barro para que se conservem por muitos anos.
15 कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’
15 Porque assim diz o Senhor dos Exércitos, Deus de Israel: Casas, campos e vinhas tornarão a ser comprados nesta terra.
16 “मग खरेदीखत नेरीयाहचा पुत्र, नेरीयाहचा पुत्र बारूखच्या हवाली केल्यावर मी याहवेहकडे प्रार्थना केली.
16 "Depois que entreguei a escritura de compra a Baruque, filho de Nerias, orei ao Senhor:
17 “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.
17 "Ah! Soberano Senhor, tu fizeste os céus e a terra pelo teu grande poder e por teu braço estendido. Nada é difícil demais para ti.
18 तुम्ही हजारांवर प्रीती करता, परंतु वडिलांच्या पापांसाठी मुलांना शिक्षा होतेच. परमथोर आणि सामर्थ्यवान, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे.
18 Mostras bondade até mil gerações, mas lanças os pecados dos pais sobre os seus filhos. Ó grande e poderoso Deus, cujo nome é o Senhor dos Exércitos,
19 तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता.
19 grandes são os teus propósitos e poderosos os teus feitos. Os teus olhos estão atentos aos atos dos homens; tu retribuis a cada um de acordo com a sua conduta, de acordo com os efeitos das suas obras.
20 तुम्ही इजिप्त देशात, इस्राएलमध्ये व सर्व मानवजातीत चिन्हे व चमत्कार केले व आजही करीत आहात, त्यामुळे तुमच्या नावाला आजतागायत महान थोरवी लाभली आहे.
20 Realizaste sinais e maravilhas no Egito e continuas a fazê-los até hoje, tanto em Israel como entre toda a humanidade, e alcançaste o renome que hoje tens.
21 चिन्ह व चमत्कारांनी आणि सशक्त बाहूंनी व विस्तारलेल्या भुजांनी, तसेच मोठी दहशत बसवून तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले.
21 Tiraste o teu povo do Egito com sinais e maravilhas, com mão poderosa e braço estendido, causando grande pavor.
22 आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला.
22 Deste a eles esta terra, que sob juramento prometeste aos seus antepassados; uma terra onde manam leite e mel.
23 ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे.
23 Eles vieram e tomaram posse dela, mas não te obedeceram nem seguiram a tua lei. Não fizeram nada daquilo que lhes ordenaste. Por isso trouxeste toda esta desgraça sobre eles.
24 “पाहा, वेढा घालणार्यांनी शहराचा ताबा घेण्यासाठी भिंत बांधली आहे. तलवार, दुष्काळ व मरी यांच्यामुळे हे शहर हल्ला करणाऱ्या खास्द्यांच्या हाती पडेल. तुम्ही जे होईल असे म्हटले होते, तेच आता घडतांना तुम्ही बघू शकता.
24 "As rampas de cerco são erguidas pelos inimigos para tomarem a cidade, e pela guerra, pela fome e pela peste, ela será entregue nas mãos dos babilônios que a atacam. Cumpriu-se aquilo que disseste, como vês.
25 सार्वभौम याहवेह, खास्द्यांच्या हाती हे नगर दिले जाणार असूनही तुम्ही मला म्हणता, ‘चांदीची नाणी देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांच्या सहीने खरेदीखत तयार कर.’ ”
25 Ainda assim, ó Soberano Senhor, tu me mandaste comprar a propriedade e convocar testemunhas do negócio, embora a cidade esteja entregue nas mãos dos babilônios! "
26 नंतर यिर्मयाहला याहवेहचे पुढील वचन आले:
26 A palavra do Senhor veio a mim, dizendo:
27 “मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का?
27 "Eu sou o Senhor, o Deus de toda a humanidade. Há alguma coisa difícil demais para mim?
28 म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल.
28 Portanto, assim diz o Senhor: ‘Estou entregando esta cidade nas mãos dos babilônios e de Nabucodonosor, rei da Babilônia, que a conquistará.
29 हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.
29 Os babilônios, que estão atacando esta cidade, entrarão e a incendiarão. Eles a queimarão juntamente com as casas nas quais o povo provocou a minha ira queimando incenso a Baal nos seus terraços, e derramando ofertas de bebida em honra de outros deuses.
30 “त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात.
30 "Desde a sua juventude o povo de Israel e de Judá nada tem feito senão aquilo que eu considero mau; de fato, o povo de Israel nada tem feito além de provocar-me à ira", declara o Senhor.
31 हे शहर बांधले त्या दिवसापासून आतापर्यंत या शहराने माझा क्रोध व संताप इतका भडकविला आहे की या शहराला मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकणार आहे.
31 Desde o dia em que foi construída até hoje, esta cidade tem despertado o meu furor de tal forma que tenho que tirá-la da minha frente.
32 इस्राएली व यहूदीयाच्या लोकांनी—ते, त्यांचे राजे व अधिकारी, त्यांचे याजक व संदेष्टे, यरुशलेम नगरात व यहूदीयात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुष्कर्माने मला अत्यंत संताप आणला आहे.
32 O povo de Israel e de Judá tem provocado a minha ira por causa de todo o mal que tem feito, tanto eles como os seus reis e os seus líderes, os seus sacerdotes e os seus profetas, os homens de Judá e os habitantes de Jerusalém.
33 त्यांनी माझ्याकडे त्यांचे मुख नव्हे तर पाठ फिरविली आहे; परत परत मी त्यांना शिक्षण दिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही किंवा माझ्या शिस्तीस प्रतिसाद दिला नाही.
33 Voltaram as costas para mim e não o rosto; embora eu os tenha ensinado vez após vez, não quiseram ouvir-me nem aceitaram a correção.
34 माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे.
34 Profanaram o templo que leva o meu nome, colocando nele as imagens de seus ídolos.
35 बेन हिन्नोम खोर्यांमध्ये त्यांनी बआल दैवतासाठी उंच उंच वेद्या बांधल्या आहेत. तिथे त्यांनी त्यांचे पुत्र व कन्या मोलख मूर्तीस अर्पण केले, हे करण्याचे मी त्यांना कधीही आज्ञापिले नव्हते—असे माझ्या मनातही कधी आले नव्हते—की ते अशी घृणास्पद कृत्ये करतील व यहूदीयास पाप करण्यास लावतील.
35 Construíram o alto para Baal no vale de Ben-Hinom, para sacrificarem a Moloque os seus filhos e as suas filhas, coisa que nunca ordenei, prática repugnante que jamais imaginei; e, assim, levaram Judá a pecar".
36 “या नगराबद्धल तुम्ही असे म्हणता, ‘तलवार, दुष्काळ व मरी यामुळे हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती पडेल, परंतु याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:
36 Portanto, assim diz o Senhor a esta cidade, sobre a qual vocês estão dizendo que será entregue nas mãos dos babilônios por meio da guerra, da fome e da peste:
37 परंतु माझ्या महाक्रोधाने व उग्र कोपाने मी त्यांना ज्या देशात हाकलून दिले, त्या सर्व देशातून मी माझ्या लोकांना एकत्र करेन; मी त्यांना याच ठिकाणी परत आणेन आणि ते सुरक्षितपणे वस्ती करतील.
37 "Certamente eu os reunirei de todas as terras para onde os dispersei na minha ardente ira e no meu grande furor; eu os trarei de volta a este lugar e permitirei que vivam em segurança.
38 मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
38 Eles serão o meu povo, e eu serei o seu Deus.
39 मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल.
39 Darei a eles um só pensamento e uma só conduta, para que me temam durante toda a sua vida, para o seu próprio bem e o de seus filhos e descendentes.
40 मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत.
40 Farei com eles uma aliança permanente: Jamais deixarei de fazer o bem a eles, e farei com que me temam de coração, para que jamais se desviem de mim.
41 त्यांचे कल्याण करण्यात मला आनंद वाटेल व माझ्या पूर्ण मनाने व आत्म्याने मी त्यांना या देशामध्ये पुन्हा स्थापन करेन.
41 Terei alegria em fazer-lhes o bem, e os plantarei firmemente nesta terra de todo o meu coração e de toda a minha alma. Sim, é o que farei.
42 “याहवेह म्हणतात ते असे: ही सर्व भयंकर संकटे मी या लोकांवर आणली, म्हणून आता मी त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे समृद्धी देईन.
42 "Assim diz o Senhor: Assim como eu trouxe toda esta grande desgraça sobre este povo, também lhes darei a prosperidade que lhes prometo.
43 या देशाबद्दल तुम्ही म्हणत, ‘हा देश उजाड झाला आहे, इथे माणसे आणि पशू यांचा मागमूस राहिलेला नाही, कारण हा बाबिलोनचे लोकांच्या हाती देण्यात आला होता,’ तिथे शेतांची खरेदी पुन्हा सुरू होईल.
43 De novo serão compradas propriedades nesta terra da qual vocês dizem: ‘É uma terra arrasada, sem homens nem animais, pois foi entregue nas mãos dos babilônios’.
44 बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”
44 Propriedades serão compradas por prata e escrituras serão assinadas, seladas diante de testemunhas no território de Benjamim, nos povoados ao redor de Jerusalém, nas cidades de Judá, e nas cidades dos montes, da Sefelá e do Neguebe, porque eu restaurarei a sorte deles", declara o Senhor.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 32, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.