Jeremias 26

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी यिर्मयाहला याहवेहकडून हा संदेश मिळाला:
1 No começo do reinado de Joaquim, filho de Josias, rei de Judá, foi dirigida a Jeremias a palavra do Senhor nestes termos:
2 याहवेह असे म्हणतात, “यहूदीया प्रांताच्या विविध नगरातून लोक उपासना करावयास आले आहेत, तेव्हा तू याहवेहच्या मंदिरासमोर उभा राहा आणि यहूदीया नगरातील सर्व लोकांना जे याहवेहच्या मंदिरात उपासना करण्यास आले त्यांच्याशी बोल. मी तुला सांगितलेले सर्व त्यांना सांग; त्यातील एकही शब्द कमी करू नकोस.
2 Eis o que disse o Senhor: coloca-te no átrio do templo e a toda a gente de Judá, que vier prosternar-se no templo do Senhor, repete todas as palavras que te ordenei dizer, sem deixar nenhuma.
3 कारण कदाचित ते ऐकतील आणि आपल्या कुमार्गापासून मागे वळतील; मग त्यांच्या कुकर्माबद्दल मी त्यांना करणार होतो तो विनाश आवरून धरेन.
3 Talvez as ouçam eles e renunciem ao perverso comportamento. Arrepender-me-ei, então, dos males que cogito desencadear sobre eles por motivo da perversidade de sua vida.
4 त्यांना सांग, ‘याहवेह म्हणतात: जर तुम्ही माझे ऐकणार नाही व मी तुमच्यापुढे ठेवलेले नियम तुम्ही पाळणार नाही,
4 E então tu lhes dirás: eis o que diz o Senhor: Se não me escutardes, se não obedecerdes à lei que vos impus,
5 आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही),
5 e não ouvirdes as palavras dos profetas, meus servos, que não cessei de vos enviar continuamente, sem que delas vos importásseis,
6 तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ”
6 farei deste edifício o que fiz de Silo e desta cidade um exemplo que todos os povos da terra citarão em suas maldições.
7 याजक, संदेष्टे व सर्व लोकांनी यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगितलेले ऐकले.
7 Os sacerdotes, os profetas e todo o povo ouviram Jeremias pronunciar essas palavras no templo.
8 यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगणे संपविताच याजक, संदेष्टे व मंदिरातील सर्व लोकांनी त्याला घेरून त्याला म्हटले “तू मेलाच पाहिजे!
8 Mal, porém, acabara de repetir o que o Senhor lhe ordenara dizer ao povo, lançaram-se sobre ele os sacerdotes, os profetas e a multidão, exclamando: À morte!
9 तू याहवेहच्या नावाने का भविष्यवाणी करतोस, की हे भवन शिलोहसारखे होईल व हे नगर निर्जन व उजाड होईल?” मग सर्व लोकांनी याहवेहच्या मंदिरात यिर्मयाहभोवती गर्दी केली.
9 Por que proferes, em nome do Senhor, este oráculo: a este templo: o mesmo acontecerá que a Silo e se transformará em deserto sem habitantes esta cidade? Ajuntou-se então a multidão no templo em torno de Jeremias.
10 जेव्हा यहूदीयाच्या अधिकार्‍यांनी हे ऐकले, तेव्हा ते राजवाड्यातून निघून मंदिराच्या दरवाजापाशी आले व याहवेहच्या मंदिराच्या देवडीत बसले.
10 Ao saberem do que ocorria, acorreram do palácio real ao templo os oficiais de Judá e se postaram no umbral da Porta Nova do templo do Senhor.
11 मग याजक व संदेष्टे, अधिकारी व लोकांस म्हणाले, “या मनुष्यास मरणदंड दिलाच पाहिजे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला आहे, तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे!”
11 Então, os sacerdotes e os profetas clamaram aos oficiais e à multidão: Este homem merece a morte porque profetizou contra esta cidade, como todos ouvistes com vossos próprios ouvidos.
12 मग यिर्मयाह सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व लोकांना म्हणाला: “या मंदिराविरुद्ध आणि या शहराविरुद्ध तुम्ही ऐकलेल्या सर्व गोष्टीसाठी भविष्यवाणी करण्यासाठी याहवेहने मला पाठविले आहे.
12 Jeremias, porém, retrucou aos oficiais e ao povo: Foi o Senhor quem me deu o encargo de proferir contra este povo e esta cidade os oráculos que ouvistes.
13 आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील.
13 Reformai, portanto, vossa vida e modo de agir, escutando a voz do Senhor, vosso Deus, a fim de que afaste de vós o mal de que vos ameaça.
14 माझ्याबाबतीत म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुमच्यामते जे योग्य व वाजवी आहे ते येईल माझे करा.
14 Quanto a mim entrego-me nas vossas mãos. Fazei de mim o que quiserdes e que melhor se vos afigure.
15 परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही मला ठार केले, तर एका निरपराध मनुष्याला ठार केल्याचा ठपका तुमच्यावर, या नगरावर व येथील प्रत्येक रहिवाशावर येईल; कारण तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द तुम्हाला सांगण्यासाठी याहवेहने मला पाठविले, हे अगदी सत्य आहे.”
15 Sabei, porém, que se me condenardes à morte, será de sangue inocente que maculareis esta cidade e seus habitantes; pois, na verdade, foi o Senhor quem me ordenou vos transmitisse estes oráculos.
16 यावर अधिकारी व लोक, याजकांना आणि संदेष्ट्यांना उद्देशून म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडाला पात्र नाही, कारण तो आमचे परमेश्वर याहवेहच्या नावाने आमच्याशी बोलला आहे.”
16 Disseram, então, os oficiais e a multidão aos sacerdotes e profetas: Este homem não merece a morte! Foi em nome do Senhor, nosso Deus, que nos falou.
17 नंतर काही वडीलजन पुढे आले व संपूर्ण सभेतील लोकांना उद्देशून बोलू लागले,
17 Ante a multidão tomaram a palavra alguns dos anciãos:
18 “यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात:
18 Miquéias de Morechet, disseram eles, que profetizava no tempo de Ezequias, rei de Judá, assim falou ao povo: isto diz o Senhor dos exércitos: Sião será como um campo lavrado. Jerusalém será um montão de escombros, e a colina do templo, um morro cheio de mato.
19 “परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”
19 Ezequias, rei de Judá, e o povo de Judá condenaram-no por isso à morte! Não temeram eles o Senhor? Não lhe imploraram o favor, a ponto de se arrepender do mal com que os ameaçava? E nós poderíamos arcar com a responsabilidade de tão grande crime?
20 (आता किर्याथ-यआरीम येथील शमायाहचा पुत्र उरीयाह हा याहवेहच्या नावाने संदेश देणारा दुसरा संदेष्टा होता. त्यानेही यिर्मयाहप्रमाणे नगरांविरुद्ध व देशाविरुद्ध या सारखाच संदेश दिला.
20 Houve também um homem que proferia oráculos em nome do Senhor: Urias, filho de Semei, de Cariatiarim. Contra a cidade e o país anunciara os mesmos flagelos que Jeremias.
21 परंतु यहोयाकीम राजा, सेनाधिकारी व इतर अधिकारी वर्ग यांनी त्याचे शब्द ऐकले. तेव्हा राजाने त्याला मारण्याचे ठरविले. ही बातमी उरीयाहाला कळताच तो घाबरून इजिप्त देशात पळून गेला.
21 Chegaram suas palavras aos ouvidos do rei Joaquim e de seus oficiais e chefes, tendo o rei procurado meios de condená-lo à morte. Urias, informado do que se passava, teve medo e fugiu, refugiando-se no Egito.
22 तेव्हा यहोयाकीम राजाने अकबोरचा पुत्र एलनाथान व बरोबर काही माणसे देऊन त्यांना इजिप्त देशी पाठविले.
22 Mas Joaquim enviou ao Egito Elnatã, filho de Acobor, acompanhado de alguns homens.
23 इजिप्त देशातून त्यांनी उरीयाहला परत आणले, त्याला राजा यहोयाकीम राजाकडे परत आणले, त्याने त्याला तलवारीने ठार मारले आणि ज्या ठिकाणी सामान्य लोक पुरले होते तिथे त्याचा मृतदेह फेकून दिला.)
23 Estes trouxeram o profeta do Egito e entregaram-no ao rei, o qual o mandou degolar, jogando seu cadáver na fossa comum.
24 परंतु शाफानचा पुत्र हा अहीकाम यिर्मयाहच्या बाजूने उभा राहिला व त्याला मारण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आले नाही.
24 Contudo, a influência de Aicã, filho de Safã, protegeu Jeremias, impedindo que fosse entregue ao povo e condenado à morte.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 26, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.