João 6
marc (MARC) vs NVT
1 काही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला (तिबिर्यास सरोवर) असेही म्हणत
1 Depois disso, Jesus atravessou o mar da Galileia, conhecido também como mar de Tiberíades.
2 लोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्यांना अद्भुत चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते.
2 Uma grande multidão o seguia por toda parte, pois tinham visto os sinais que ele havia realizado ao curar os enfermos.
3 यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले.
3 Então Jesus subiu a um monte e sentou-se com seus discípulos.
4 यहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता.
4 Era quase tempo da festa judaica da Páscoa.
5 जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?”
5 Jesus logo viu uma grande multidão que vinha a seu encontro. Voltando-se para Filipe, perguntou: “Onde podemos comprar pão para alimentar toda essa gente?”.
6 ते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात आधी ठरविले होते.
6 Disse isso para pôr Filipe à prova, pois já sabia o que ia fazer.
7 फिलिप्पाने उत्तर दिले, “प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक तरी लागेल!”
7 Filipe respondeu: “Mesmo que trabalhássemos vários meses, não teríamos dinheiro suficiente para dar alimento a todos!”.
8 मग शिमोन पेत्र जो येशूंचा शिष्य होता, त्याचा भाऊ आंद्रिया म्हणाला,
8 Então um de seus discípulos, André, irmão de Simão Pedro, falou:
9 “येथे एक मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच लहान भाकरी आणि दोन लहान मासे आहेत, परंतु त्या इतक्या लोकांना कशा काय पुरतील?”
9 “Aqui está um rapaz com cinco pães de cevada e dois peixes. Mas que adianta isso para tanta gente?”.
10 येशूंनी म्हटले, “लोकांना खाली गटागटाने बसावयास सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत होते व ते खाली बसले. तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती.
10 Jesus respondeu: “Digam ao povo que se sente”. Todos se sentaram na grama que cobria o monte. Só os homens eram cerca de cinco mil.
11 मग येशूंनी त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व जे बसले होते ते खाऊन तृप्त होईपर्यंत वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले.
11 Então Jesus tomou os pães, agradeceu a Deus e os repartiu entre o povo. Em seguida, fez o mesmo com os peixes. E todos comeram à vontade.
12 सर्वांनी भरपूर जेवण केल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “आता उरलेले तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
12 Depois que todos estavam satisfeitos, Jesus disse a seus discípulos: “Agora juntem os pedaços que sobraram, para que nada se desperdice”.
13 मग त्यांनी उरलेले तुकडे गोळा केले आणि जवाच्या पाच भाकरींपैकी जेवून उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या.
13 Eles juntaram o que restou e encheram doze cestos com as sobras.
14 येशूंनी हे चिन्ह केल्याचे पाहून लोक म्हणू लागले, “खरोखर, या जगात जो येणार होता तो संदेष्टा हाच आहे.”
14 Quando o povo viu Jesus fazer esse sinal, exclamou: “Sem dúvida ele é o profeta que haveria de vir ao mundo!”.
15 लोक आपल्याला जबरदस्तीने राजा करण्याच्या उद्देशाने आले आहेत हे येशूंना माहीत होते, तेव्हा ते पुन्हा एकटेच डोंगरावर निघून गेले.
15 Jesus sabia que pretendiam obrigá-lo a ser rei deles, de modo que se retirou, sozinho, para o monte.
16 संध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले,
16 Ao entardecer, os discípulos de Jesus desceram à praia,
17 ते होडीत बसून सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यपि त्यांच्याकडे परतले नव्हते.
17 entraram no barco e atravessaram o mar em direção a Cafarnaum. Quando escureceu, porém, Jesus ainda não tinha vindo se encontrar com eles.
18 परंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या.
18 Logo, um vento forte veio sobre eles, e o mar ficou muito agitado.
19 ते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले.
19 Depois de remarem cinco ou seis quilômetros, de repente viram Jesus caminhando sobre o mar, em direção ao barco. Ficaram aterrorizados,
20 परंतु ते त्यांना म्हणाले, “मीच आहे; भिऊ नका.”
20 mas ele lhes disse: “Sou eu! Não tenham medo”.
21 ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्यास पोहोचली.
21 Eles o receberam no barco e, logo em seguida, chegaram a seu destino.
22 मग दुसर्या दिवशी सकाळी सरोवराच्या पलीकडच्या किनार्यावर लोकांचा समुदाय थांबला होता, तिथे केवळ एक होडी होती आणि येशू शिष्यांसहित त्यामध्ये गेले नव्हते, तरी शिष्य होडीत बसून निघून गेले होते.
22 No dia seguinte, a multidão que tinha ficado do outro lado do mar viu que os discípulos haviam pegado o único barco dali e que Jesus não fora com eles.
23 काही होड्या तिबिर्याहून ज्या ठिकाणी आभार मानून प्रभूने त्यांना भाकर खाऊ घातली होती त्या ठिकाणी आल्या.
23 Alguns barcos de Tiberíades se aproximaram do lugar onde o povo tinha comido os pães depois que o Senhor os abençoou.
24 समुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तिथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले.
24 Quando a multidão viu que nem Jesus nem os discípulos estavam ali, todos entraram nos barcos e atravessaram para Cafarnaum, a fim de procurá-lo.
25 ते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?”
25 Encontraram-no do outro lado do mar e lhe perguntaram: “Rabi, quando o senhor chegou aqui?”.
26 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात.
26 Jesus respondeu: “Eu lhes digo a verdade: vocês querem estar comigo não porque entenderam os sinais, mas porque lhes dei alimento.
27 नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.”
27 Não se preocupem tanto com coisas que se estragam, como a comida, mas usem suas energias buscando o alimento que permanece para a vida eterna, o qual o Filho do Homem pode lhes dar. Pois Deus, o Pai, colocou em mim seu selo de aprovação”.
28 त्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?”
28 “Nós também queremos realizar as obras de Deus”, disseram eles. “O que devemos fazer?”
29 येशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्यांना त्यांनी पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
29 Jesus lhes disse: “Esta é a única obra que Deus quer de vocês: creiam naquele que ele enviou”.
30 त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल?
30 Eles responderam: “Se deseja que creiamos no senhor, mostre-nos um sinal. O que o senhor pode fazer?
31 आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’”
31 Afinal, nossos antepassados comeram maná no deserto! As Escrituras dizem: ‘Moisés lhes deu de comer pão do céu’”.
32 येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे.
32 Jesus disse: “Eu lhes digo a verdade: não foi Moisés quem lhes deu pão do céu. É meu Pai quem dá o verdadeiro pão do céu a vocês.
33 ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”
33 O verdadeiro pão de Deus é aquele que desce do céu e dá vida ao mundo”.
34 ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.”
34 “Senhor, dê-nos desse pão todos os dias”, disseram eles.
35 त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
35 Jesus respondeu: “Eu sou o pão da vida. Quem vem a mim nunca mais terá fome. Quem crê em mim nunca mais terá sede.
36 परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही.
36 Mas vocês não creram em mim, embora me tenham visto.
37 जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही.
37 Contudo, aqueles que o Pai me dá virão a mim, e eu jamais os rejeitarei.
38 कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे.
38 Pois desci do céu para fazer a vontade daquele que me enviou, e não minha própria vontade.
39 आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे.
39 E esta é a vontade de Deus: que eu não perca um sequer de todos que ele me deu, mas que ressuscite todos no último dia.
40 कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”
40 Pois é a vontade de meu Pai que todo aquele que olhar para o Filho e nele crer tenha a vida eterna, e eu o ressuscitarei no último dia”.
41 मी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.
41 Então os judeus começaram a criticá-lo, pois ele havia afirmado: “Eu sou o pão que desceu do céu”.
42 ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?”
42 Diziam: “Este não é Jesus, filho de José? Conhecemos seu pai e sua mãe. Como ele pode dizer: ‘Desci do céu?’”.
43 हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका,
43 Jesus, porém, respondeu: “Parem de me criticar.
44 ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.
44 Pois ninguém pode vir a mim se o Pai, que me enviou, não o trouxer a mim; e no último dia eu o ressuscitarei.
45 संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो.
45 Como dizem as Escrituras: ‘Todos eles serão ensinados por Deus’. Todo aquele que ouve o Pai e aprende dele vem a mim.
46 जो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही.
46 Não que alguém tenha visto o Pai; somente eu, que fui enviado por Deus, o vi.
47 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे.
47 “Eu lhes digo a verdade: quem crê tem a vida eterna.
48 मीच जीवनाची भाकर आहे.
48 Sim, eu sou o pão da vida!
49 तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले.
49 Seus antepassados comeram maná no deserto, mas morreram;
50 परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही.
50 quem comer o pão do céu, no entanto, jamais morrerá.
51 मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”
51 Eu sou o pão vivo que desceu do céu. Quem comer deste pão viverá para sempre; e este pão, que eu oferecerei para que o mundo viva, é a minha carne”.
52 यास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?”
52 Então os judeus começaram a discutir entre si a respeito do que ele queria dizer. “Como pode esse homem nos dar sua carne para comer?”, perguntavam.
53 येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही.
53 Então Jesus disse novamente: “Eu lhes digo a verdade: se vocês não comerem a carne do Filho do Homem e não beberem o seu sangue, não terão a vida em si mesmos.
54 जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.
54 Mas quem come minha carne e bebe meu sangue terá a vida eterna, e eu o ressuscitarei no último dia.
55 कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे.
55 Pois minha carne é a verdadeira comida, e meu sangue é a verdadeira bebida.
56 जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो.
56 Quem come minha carne e bebe meu sangue permanece em mim, e eu nele.
57 मला पाठविणार्या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल.
57 Eu vivo por causa do Pai, que vive e me enviou; da mesma forma, quem se alimenta de mim viverá por minha causa.
58 मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.”
58 Eu sou o verdadeiro pão que desceu do céu. Seus antepassados comeram maná e morreram; quem comer este pão não morrerá, mas viverá para sempre”.
59 येशूंनी हे शिक्षण कफर्णहूमातील सभागृहामध्ये दिले.
59 Ele disse essas coisas quando ensinava na sinagoga de Cafarnaum.
60 हे ऐकून, त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळजण म्हणाले, “ही शिकवण अवघड आहे. हे कोण स्वीकारू शकेल?”
60 Muitos de seus discípulos disseram: “Sua mensagem é dura. Quem é capaz de aceitá-la?”.
61 त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का?
61 Jesus, sabendo que seus discípulos reclamavam, disse: “Isso os ofende?
62 तर मग मानवपुत्राला, जिथे ते पूर्वी होते तिथे वर चढून जाताना पाहाल!
62 Então o que pensarão se virem o Filho do Homem subir ao céu, onde estava antes?
63 फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.
63 Somente o Espírito dá vida. A natureza humana não realiza coisa alguma. E as palavras que eu lhes disse são espírito e vida.
64 तरी, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” आपणावर कोण विश्वास ठेवतो व कोण आपला विश्वासघात करणार हे येशूंना सुरुवातीपासून माहीत होते.
64 Mas alguns de vocês não creem em mim”. Pois Jesus sabia, desde o princípio, quem não acreditava nele e quem iria traí-lo.
65 पुढे येशू म्हणाले, “यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की, पित्याने शक्य केल्याशिवाय कोणालाही माझ्याकडे येता येत नाही.”
65 E acrescentou: “Por isso eu disse que ninguém pode vir a mim a menos que o Pai o dê a mim”.
66 हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत.
66 Nesse momento, muitos de seus discípulos se afastaram dele e o abandonaram.
67 येशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?”
67 Então Jesus se voltou para os Doze e perguntou: “Vocês também vão embora?”.
68 त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.
68 Simão Pedro respondeu: “Senhor, para quem iremos? O senhor tem as palavras da vida eterna.
69 आम्ही विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही परमेश्वराचे पवित्र पुरुष आहात हे ओळखले आहे.”
69 Nós cremos e sabemos que o senhor é o Santo de Deus”.
70 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांस निवडून घेतले नव्हते काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे!”
70 Então Jesus disse: “Eu escolhi vocês doze, mas um de vocês é um diabo”.
71 हे शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदाह याच्यासंबंधात ते बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून त्यांचा विश्वासघात करणार होता.
71 Ele se referia a Judas, filho de Simão Iscariotes, um dos Doze, que mais tarde o trairia.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar João 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.