João 4
marc (MARC) vs VC
1 येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहेत असे परूश्यांच्या कानावर गेले आहे असे येशूंना समजले—
1 O Senhor soube que os fariseus tinham ouvido dizer que ele recrutava e batizava mais discípulos que João
2 वास्तविक पाहता येशू बाप्तिस्मा देत नव्हते, परंतु त्यांचे शिष्यच बाप्तिस्मा देत असत.
2 {se bem que não era Jesus quem batizava, mas os seus discípulos}.
3 तेव्हा यहूदीया प्रांत सोडून ते पुन्हा गालील प्रांतामध्ये गेले.
3 Deixou a Judéia e voltou para a Galiléia.
4 त्यासाठी त्यांना शोमरोन प्रांतामधून जावे लागले.
4 Ora, devia passar por Samaria.
5 मग ते शोमरोनातील सूखार नावाच्या नगरास आले; ते याकोबाने आपला पुत्र योसेफास दिलेल्या शेताजवळ होते.
5 Chegou, pois, a uma localidade da Samaria, chamada Sicar, junto das terras que Jacó dera a seu filho José.
6 तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती.
6 Ali havia o poço de Jacó. E Jesus, fatigado da viagem, sentou-se à beira do poço. Era por volta do meio-dia.
7 तेव्हा एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी आली, येशूंनी तिला म्हटले, “तू मला पाणी प्यावयास देशील का?”
7 Veio uma mulher da Samaria tirar água. Pediu-lhe Jesus: Dá-me de beber.
8 त्यांचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेलेले होते.
8 {Pois os discípulos tinham ido à cidade comprar mantimentos.}
9 तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध ठेवीत नसत.)
9 Aquela samaritana lhe disse: Sendo tu judeu, como pedes de beber a mim, que sou samaritana!... {Pois os judeus não se comunicavam com os samaritanos.}
10 येशू तिला म्हणाले, “परमेश्वराचे वरदान आणि मला प्यावयाला पाणी दे असे म्हणणारा कोण, हे जर तुला कळले असते तर तू त्यांच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिले असते.”
10 Respondeu-lhe Jesus: Se conhecesses o dom de Deus, e quem é que te diz: Dá-me de beber, certamente lhe pedirias tu mesma e ele te daria uma água viva.
11 “महाराज,” ती स्त्री म्हणाली, “परंतु आपल्याजवळ पाणी काढण्यासाठी पोहरा नाही आणि विहीर तर खूप खोल आहे. हे जिवंत पाणी आपणाकडे कुठून येणार?
11 A mulher lhe replicou: Senhor, não tens com que tirá-la, e o poço é fundo... donde tens, pois, essa água viva?
12 आमचा पिता याकोबाने आम्हाला ही विहीर दिली होती व ते स्वतः, त्यांची गुरे आणि त्याचे पुत्रही हे पाणी पीत असत, त्यांच्यापेक्षा आपण थोर आहात काय?”
12 És, porventura, maior do que o nosso pai Jacó, que nos deu este poço, do qual ele mesmo bebeu e também os seus filhos e os seus rebanhos?
13 येशूंनी तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल,
13 Respondeu-lhe Jesus: Todo aquele que beber desta água tornará a ter sede,
14 परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”
14 mas o que beber da água que eu lhe der jamais terá sede. Mas a água que eu lhe der virá a ser nele fonte de água, que jorrará até a vida eterna.
15 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला हे पाणी द्या, म्हणजे मला तहान लागणार नाही आणि सतत पाणी काढण्यासाठी येथे येण्याची गरजही पडणार नाही.”
15 A mulher suplicou: Senhor, dá-me desta água, para eu já não ter sede nem vir aqui tirá-la!
16 येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.”
16 Disse-lhe Jesus: Vai, chama teu marido e volta cá.
17 परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”
17 A mulher respondeu: Não tenho marido. Disse Jesus: Tens razão em dizer que não tens marido.
18 कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.”
18 Tiveste cinco maridos, e o que agora tens não é teu. Nisto disseste a verdade.
19 “महाराज,” ती स्त्री उद्गारली, “आपण खरोखर संदेष्टे आहात असे मला दिसते.
19 Senhor, disse-lhe a mulher, vejo que és profeta!...
20 आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर परमेश्वराची उपासना केली, परंतु तुम्ही यहूदी, उपासनेचे स्थान यरुशलेममध्येच आहे असा आग्रह धरता.”
20 Nossos pais adoraram neste monte, mas vós dizeis que é em Jerusalém que se deve adorar.
21 येशू तिला म्हणाले, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही.
21 Jesus respondeu: Mulher, acredita-me, vem a hora em que não adorareis o Pai, nem neste monte nem em Jerusalém.
22 तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे.
22 Vós adorais o que não conheceis, nós adoramos o que conhecemos, porque a salvação vem dos judeus.
23 अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे.
23 Mas vem a hora, e já chegou, em que os verdadeiros adoradores hão de adorar o Pai em espírito e verdade, e são esses adoradores que o Pai deseja.
24 परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”
24 Deus é espírito, e os seus adoradores devem adorá-lo em espírito e verdade.
25 ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसिहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.”
25 Respondeu a mulher: Sei que deve vir o Messias {que se chama Cristo}; quando, pois, vier, ele nos fará conhecer todas as coisas.
26 यावर येशूंनी जाहीरपणे सांगितले, “मी, तुजबरोबर बोलत आहे तोच मी आहे.”
26 Disse-lhe Jesus: Sou eu, quem fala contigo.
27 त्यांचे शिष्य परतले आणि ते एका बाईशी बोलत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु, “तुम्हाला काय हवे आहे?” किंवा “तिच्याबरोबर कसला संवाद करीत होते?” असे त्यांना त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.
27 Nisso seus discípulos chegaram e maravilharam-se de que estivesse falando com uma mulher. Ninguém, todavia, perguntou: Que perguntas? Ou: Que falas com ela?
28 मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली,
28 A mulher deixou o seu cântaro, foi à cidade e disse àqueles homens:
29 “चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?”
29 Vinde e vede um homem que me contou tudo o que tenho feito. Não seria ele, porventura, o Cristo?
30 तेव्हा ते नगरातून बाहेर आले व त्यांच्याकडे वाटचाल करू लागले.
30 Eles saíram da cidade e vieram ter com Jesus.
31 “गुरुजी, आपण काही खावे,” म्हणून शिष्य त्यांना आग्रह करू लागले.
31 Entretanto, os discípulos lhe pediam: Mestre, come.
32 पण ते त्यांना म्हणाले, “माझ्याजवळ असे अन्न आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊक नाही.”
32 Mas ele lhes disse: Tenho um alimento para comer que vós não conheceis.
33 त्यावर शिष्य एकमेकांना विचारू लागले, “यांना कोणी अन्न आणून दिले का?”
33 Os discípulos perguntavam uns aos outros: Alguém lhe teria trazido de comer?
34 येशूंनी म्हटले, “ज्याने मला पाठविले त्यांच्या इच्छेप्रमाणे करणे व त्यांचे कार्य पूर्ण करणे हेच माझे अन्न.
34 Disse-lhes Jesus: Meu alimento é fazer a vontade daquele que me enviou e cumprir a sua obra.
35 ‘चार महिन्यांचा अवधी कापणी करण्यासाठी आहे असे तुमचे म्हणणे आहे ना?’ तर मी तुम्हाला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा! ती कापणीसाठी तयार आहेत.
35 Não dizeis vós que ainda há quatro meses e vem a colheita? Eis que vos digo: levantai os vossos olhos e vede os campos, porque já estão brancos para a ceifa.
36 आता कापणार्याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्याने व कापणार्यानेही एकत्रित मिळून आनंद करावा.
36 O que ceifa recebe o salário e ajunta fruto para a vida eterna; assim o semeador e o ceifador juntamente se regozijarão.
37 ‘एक पेरतो व दुसरा कापणी करतो,’ अशी जी म्हण आहे ती खरी आहे.
37 Porque eis que se pode dizer com toda verdade: Um é o que semeia outro é o que ceifa.
38 जिथे तुम्ही पेरणी केली नाही, तिथे कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले; इतरांनी पेरणी करण्याचे कष्ट केले होते आणि त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ तुम्हाला मिळाले आहे.”
38 Enviei-vos a ceifar onde não tendes trabalhado; outros trabalharam, e vós entrastes nos seus trabalhos.
39 “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली,” या तिच्या साक्षीवरून शोमरोन नगरातील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
39 Muitos foram os samaritanos daquela cidade que creram nele por causa da palavra da mulher, que lhes declarara: Ele me disse tudo quanto tenho feito.
40 म्हणून शोमरोनी लोक येशूंकडे आल्यावर त्यांनी येशूंना नगरात राहण्याची विनंती केली. तेव्हा ते तिथे दोन दिवस राहिले.
40 Assim, quando os samaritanos foram ter com ele, pediram que ficasse com eles. Ele permaneceu ali dois dias.
41 याकाळात त्यांच्या वचनामुळे आणखी पुष्कळ लोक विश्वासू झाले.
41 Ainda muitos outros creram nele por causa das suas palavras.
42 मग ते त्या बाईला म्हणाले, “तू सांगितले म्हणून नव्हे, तर आम्ही प्रत्यक्ष त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि आम्हाला माहीत आहे की हा मनुष्य खरोखर जगाचा तारणारा आहे.”
42 E diziam à mulher: Já não é por causa da tua declaração que cremos, mas nós mesmos ouvimos e sabemos ser este verdadeiramente o Salvador do mundo.
43 दोन दिवसानंतर ते गालील प्रांतात गेले.
43 Passados os dois dias, Jesus partiu para a Galiléia.
44 कारण येशूंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.
44 {Ele mesmo havia declarado que um profeta não é honrado na sua pátria.}
45 ते गालीलात आले, तेव्हा गालिलकरांनी त्यांचे स्वागत केले. कारण वल्हांडण सणाच्या वेळी, ते तिथे उपस्थित होते व यरुशलेममध्ये जे काही येशूंनी केले ते त्यांनी पाहिले होते.
45 Chegando à Galiléia, acolheram-no os galileus, porque tinham visto tudo o que fizera durante a festa em Jerusalém; pois também eles tinham ido à festa.
46 गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तिथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्याचा मुलगा आजारी होता.
46 Ele voltou, pois, a Caná da Galiléia, onde transformara água em vinho. Havia então em Cafarnaum um oficial do rei, cujo filho estava doente.
47 येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता.
47 Ao ouvir que Jesus vinha da Judéia para a Galiléia, foi a ele e rogou-lhe que descesse e curasse seu filho, que estava prestes a morrer.
48 तेव्हा येशू म्हणाले, “मी अद्भुते व चिन्हे केल्याशिवाय तुम्ही लोक मजवर विश्वास ठेवणार नाही.”
48 Disse-lhe Jesus: Se não virdes milagres e prodígios, não credes...
49 तो शासकीय अधिकारी म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी येण्याची कृपा करा.”
49 Pediu-lhe o oficial: Senhor, desce antes que meu filho morra!
50 येशू त्याला म्हणाले, “जा, तुझा मुलगा जगेल, तो मरणार नाही.”
50 Vai, disse-lhe Jesus, o teu filho está passando bem! O homem acreditou na palavra de Jesus e partiu.
51 तो मार्गावर असतानाच, त्याचे काही दास त्याला भेटले आणि आपला मुलगा जिवंत आहे अशी बातमी त्यांनी त्याला दिली.
51 Enquanto ia descendo, os criados vieram-lhe ao encontro e lhe disseram: Teu filho está passando bem.
52 मुलाला कोणत्या वेळेपासून बरे वाटू लागले, अशी त्याने त्यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप नाहीसा झाला.”
52 Indagou então deles a hora em que se sentira melhor. Responderam-lhe: Ontem à sétima hora a febre o deixou.
53 तेव्हा त्या पित्याला उमगले की त्याच घटकेस येशूंनी, “तुझा मुलगा जगेल तो मरणार नाही.” हे शब्द उच्चारले होते. मग तो व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशूंवर विश्वास ठेवला.
53 Reconheceu o pai ser a mesma hora em que Jesus dissera: Teu filho está passando bem. E creu tanto ele como toda a sua casa.
54 येशूंनी यहूदीयातून गालीलात आल्यानंतर हे दुसरे चिन्ह केले होते.
54 Esse foi o segundo milagre que Jesus fez, depois de voltar da Judéia para a Galiléia.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar João 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.