João 3
marc (MARC) vs VC
1 आता निकदेम नावाचा एक परूशी, जो यहूदी प्रतिनिधीमंडळाचा सभासद होता,
1 Havia um homem entre os fariseus, chamado Nicodemos, príncipe dos judeus.
2 तो रात्री येशूंकडे आला व म्हणाला, “गुरुजी, आपण शिक्षक आहात व परमेश्वराकडून आलेले आहात, हे आम्हास माहीत आहे. कारण ही जी चिन्हे आपण करत आहात, ती परमेश्वर बरोबर असल्याशिवाय करता येणार नाही.”
2 Este foi ter com Jesus, de noite, e disse-lhe: Rabi, sabemos que és um Mestre vindo de Deus. Ninguém pode fazer esses milagres que fazes, se Deus não estiver com ele.
3 त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.”
3 Jesus replicou-lhe: Em verdade, em verdade te digo: quem não nascer de novo não poderá ver o Reino de Deus.
4 तेव्हा निकदेमाने विचारले, “जे वृद्ध आहेत त्यांचा नव्याने जन्म कसा होऊ शकेल? त्यांना दुसर्या वेळी आपल्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेता येणे शक्य नाही!”
4 Nicodemos perguntou-lhe: Como pode um homem renascer, sendo velho? Porventura pode tornar a entrar no seio de sua mãe e nascer pela segunda vez?
5 येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही.
5 Respondeu Jesus: Em verdade, em verdade te digo: quem não renascer da água e do Espírito não poderá entrar no Reino de Deus.
6 शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो.
6 O que nasceu da carne é carne, e o que nasceu do Espírito é espírito.
7 ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही.
7 Não te maravilhes de que eu te tenha dito: Necessário vos é nascer de novo.
8 वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”
8 O vento sopra onde quer; ouves-lhe o ruído, mas não sabes de onde vem, nem para onde vai. Assim acontece com aquele que nasceu do Espírito.
9 तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?”
9 Replicou Nicodemos: Como se pode fazer isso?
10 “येशूंनी म्हटले, तुम्ही इस्राएलचे शिक्षक असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय?
10 Disse Jesus: És doutor em Israel e ignoras estas coisas!...
11 मी तुम्हाला निश्चित सांगतो की जे आम्हास समजले आहे ते आम्ही बोलतो आणि आम्ही जे काही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो आणि तरीही तुम्ही लोक आमची साक्ष मान्य करीत नाही.
11 Em verdade, em verdade te digo: dizemos o que sabemos e damos testemunho do que vimos, mas não recebeis o nosso testemunho.
12 मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही; तर मग स्वर्गीय गोष्टी तुम्हाला सांगितल्यास कसा विश्वास ठेवाल?
12 Se vos tenho falado das coisas terrenas e não me credes, como crereis se vos falar das celestiais?
13 स्वर्गातून आलेल्या मानवपुत्राशिवाय इतर कोणीही स्वर्गात गेला नाही.
13 Ninguém subiu ao céu senão aquele que desceu do céu, o Filho do Homem que está no céu.
14 जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल,
14 Como Moisés levantou a serpente no deserto, assim deve ser levantado o Filho do Homem,
15 जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.”
15 para que todo homem que nele crer tenha a vida eterna.
16 कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
16 Com efeito, de tal modo Deus amou o mundo, que lhe deu seu Filho único, para que todo o que nele crer não pereça, mas tenha a vida eterna.
17 परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे.
17 Pois Deus não enviou o Filho ao mundo para condená-lo, mas para que o mundo seja salvo por ele.
18 जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो दोषरहित ठरेल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही तो दोषी ठरविण्यात आला आहे, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याचे नाकारले.
18 Quem nele crê não é condenado, mas quem não crê já está condenado; por que não crê no nome do Filho único de Deus.
19 निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती.
19 Ora, este é o julgamento: a luz veio ao mundo, mas os homens amaram mais as trevas do que a luz, pois as suas obras eram más.
20 दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते.
20 Porquanto todo aquele que faz o mal odeia a luz e não vem para a luz, para que as suas obras não sejam reprovadas.
21 परंतु जो सत्याने जीवन जगतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जे काही त्यांनी केले ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे.
21 Mas aquele que pratica a verdade, vem para a luz. Torna-se assim claro que as suas obras são feitas em Deus.
22 त्यानंतर, येशू आणि त्यांचे शिष्य यहूदीया प्रांतात आले आणि तिथे थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालविला आणि बाप्तिस्मे केले.
22 Em seguida, foi Jesus com os seus discípulos para os campos da Judéia, e ali se deteve com eles, e batizava.
23 आता योहान शालिमाजवळ असलेले एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तिथे विपुल प्रमाणात पाणी असून, लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असत.
23 Também João batizava em Enon, perto de Salim, porque havia ali muita água, e muitos vinham e eram batizados.
24 त्या वेळेपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.
24 Pois João ainda não tinha sido lançado no cárcere.
25 कोणाएका यहूदी मनुष्याने योहानाच्या शिष्यांबरोबर शुद्धीकरणाच्या विधीबद्दल वादविवाद केला.
25 Ora, surgiu uma discussão entre os discípulos de João e um judeu, a respeito da purificação.
26 तेव्हा शिष्य योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरुजी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य आपल्याबरोबर होता व ज्यांच्याबद्दल आपण साक्ष दिली, ते बाप्तिस्मा करीत आहेत आणि पाहा, प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे.”
26 Foram e disseram-lhe: Mestre, aquele que estava contigo além do Jordão, de quem tu deste testemunho, ei-lo que está batizando e todos vão ter com ele...
27 त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल.
27 João replicou: Ninguém pode atribuir-se a si mesmo senão o que lhe foi dado do céu.
28 ‘मी ख्रिस्त नव्हे, परंतु त्यांच्यापुढे मला पाठविण्यात आले आहे,’ असे मी म्हटले होते याचे साक्षी तुम्हीच आहात.
28 Vós mesmos me sois testemunhas de que disse: Eu não sou o Cristo, mas fui enviado diante dele.
29 वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे.
29 Aquele que tem a esposa é o esposo. O amigo do esposo, porém, que está presente e o ouve, regozija-se sobremodo com a voz do esposo. Nisso consiste a minha alegria, que agora se completa.
30 ते अधिक थोर होवो आणि मी लहान व्हावे.”
30 Importa que ele cresça e que eu diminua.
31 जो स्वर्गातून आलेला आहे तो इतर सर्वांपेक्षा थोर आहे. जो जगापासून आहे तो जगाचा आहे; व जगातील विषयांच्या बाबतीत बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांहून थोर आहे.
31 Aquele que vem de cima é superior a todos. Aquele que vem da terra é terreno e fala de coisas terrenas. Aquele que vem do céu é superior a todos.
32 त्यांनी जे पाहिले व ऐकले त्याविषयी ते साक्ष देतात, परंतु त्यांची साक्ष कोणीच मान्य करत नाही.
32 Ele testemunha as coisas que viu e ouviu, mas ninguém recebe o seu testemunho.
33 जे कोणी त्यांची साक्ष स्वीकारतात, त्यांनी असे प्रमाणित केले की परमेश्वर सत्य आहे.
33 Aquele que recebe o seu testemunho confirma que Deus é verdadeiro.
34 ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात.
34 Com efeito, aquele que Deus enviou fala a linguagem de Deus, porque ele concede o Espírito sem medidas.
35 पिता पुत्रावर प्रीती करतात आणि त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती सोपविली आहे.
35 O Pai ama o Filho e confiou-lhe todas as coisas.
36 जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो कोणी पुत्राला नाकारतो, तो जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहील.
36 Aquele que crê no Filho tem a vida eterna; quem não crê no Filho não verá a vida, mas sobre ele pesa a ira de Deus.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar João 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.