João 1

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता.
1 No princípio era aquele que é a Palavra. Ele estava com Deus, e era Deus.
2 तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता.
2 Ela estava com Deus no princípio.
3 शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही.
3 Todas as coisas foram feitas por intermédio dele; sem ele, nada do que existe teria sido feito.
4 त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते.
4 Nele estava a vida, e esta era a luz dos homens.
5 तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले नाही.
5 A luz brilha nas trevas, e as trevas não a derrotaram.
6 परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले.
6 Surgiu um homem enviado por Deus, chamado João.
7 तो त्या प्रकाशाविषयी प्रमाण पटावे व साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की त्यांच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.
7 Ele veio como testemunha, para testificar acerca da luz, a fim de que por meio dele todos os homens cressem.
8 तो स्वतः प्रकाश नव्हता; तो केवळ त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला होता.
8 Ele próprio não era a luz, mas veio como testemunha da luz.
9 जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता.
9 Estava chegando ao mundo a verdadeira luz, que ilumina todos os homens.
10 तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही.
10 Aquele que é a Palavra estava no mundo, e o mundo foi feito por intermédio dele, mas o mundo não o reconheceu.
11 ते स्वतःच्या लोकांकडे आले, परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही.
11 Veio para o que era seu, mas os seus não o receberam.
12 परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—
12 Contudo, aos que o receberam, aos que creram em seu nome, deu-lhes o direito de se tornarem filhos de Deus,
13 ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.
13 os quais não nasceram por descendência natural, nem pela vontade da carne nem pela vontade de algum homem, mas nasceram de Deus.
14 शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.
14 Aquele que é a Palavra tornou-se carne e viveu entre nós. Vimos a sua glória, glória como do Unigênito vindo do Pai, cheio de graça e de verdade.
15 योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, “ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जो माझ्यानंतर येणार आहे तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता.’ ”
15 João dá testemunho dele. Ele exclama: "Este é aquele de quem eu falei: Aquele que vem depois de mim é superior a mim, porque já existia antes de mim".
16 त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे.
16 Todos recebemos da sua plenitude, graça sobre graça.
17 कारण मोशेद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते; परंतु येशू ख्रिस्ताद्वारे कृपा व सत्य देण्यात आले आहे.
17 Pois a Lei foi dada por intermédio de Moisés; a graça e a verdade vieram por intermédio de Jesus Cristo.
18 परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.
18 Ninguém jamais viu a Deus, mas o Deus Unigênito, que está junto do Pai, o tornou conhecido.
19 जेव्हा यहूदी पुढार्‍यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय.
19 Esse foi o testemunho de João, quando os judeus de Jerusalém enviaram sacerdotes e levitas para lhe perguntarem quem ele era.
20 तो कबूल करण्यास कचरला नाही, त्याने मोकळेपणाने सांगितले, तो म्हणाला, “मी ख्रिस्त नाही.”
20 Ele confessou e não negou; declarou abertamente: "Não sou o Cristo".
21 त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीयाह आहात काय?”
21 Perguntaram-lhe: "E então, quem é você? É Elias? " Ele disse: "Não sou". "É o Profeta? " Ele respondeu: "Não".
22 शेवटी ते म्हणाले, “तर मग आपण आहात तरी कोण? आम्हाला सांगा, म्हणजे ज्यांनी आम्हाला हे विचारण्यास पाठविले आहे त्यांना उत्तर देता येईल.”
22 Finalmente perguntaram: "Quem é você? Dê-nos uma resposta, para que a levemos àqueles que nos enviaram. Que diz você acerca de si próprio? "
23 यशायाह संदेष्ट्याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी आहे, जी म्हणते, “ ‘प्रभूचा मार्ग सरळ करा.’ ”
23 João respondeu com as palavras do profeta Isaías: "Eu sou a voz do que clama no deserto: ‘Façam um caminho reto para o Senhor’ ".
24 आता ज्या परूश्यांनी त्यांना पाठविले होते,
24 Alguns fariseus que tinham sido enviados
25 त्यांनी प्रश्न विचारला, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीयाह नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?”
25 interrogaram-no: "Então, por que você batiza, se não é o Cristo, nem Elias, nem o Profeta? "
26 तेव्हा योहान उत्तरला, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु तुम्हामध्ये एकजण असा आहे की, ज्याला तुम्ही ओळखत नाही.
26 Respondeu João: "Eu batizo com água, mas entre vocês está alguém que vocês não conhecem.
27 तो हाच आहे जो माझ्यानंतर येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासाठी एक दास होण्याची देखील माझी पात्रता नाही.”
27 Ele é aquele que vem depois de mim, cujas correias das sandálias não sou digno de desamarrar".
28 हे सर्व यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे घडले, जिथे योहान बाप्तिस्मा देत होता.
28 Tudo isso aconteceu em Betânia, do outro lado do Jordão, onde João estava batizando.
29 दुसर्‍या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा!
29 No dia seguinte João viu Jesus aproximando-se e disse: "Vejam! É o Cordeiro de Deus, que tira o pecado do mundo!
30 ते हेच आहेत, ज्यांच्या संदर्भात मी म्हणत होतो, ‘हा मनुष्य जो माझ्यानंतर येणार आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे कारण तो माझ्यापूर्वी होता.’
30 Este é aquele a quem eu me referi, quando disse: Vem depois de mim um homem que é superior a mim, porque já existia antes de mim.
31 मला स्वतः त्यांची ओळख नव्हती, पण मी याच कारणासाठी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो की त्यांनी इस्राएली लोकांस प्रकट व्हावे.”
31 Eu mesmo não o conhecia, mas por isso é que vim batizando com água: para que ele viesse a ser revelado a Israel".
32 मग योहानाने अशी साक्ष दिली: “स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा खाली आला व त्यांच्यावर स्थिरावला.
32 Então João deu o seguinte testemunho: "Eu vi o Espírito descer do céu como pomba e permanecer sobre ele.
33 मी स्वतः त्यांना ओळखत नव्हतो, परंतु ज्यांनी मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी पाठविले त्यांनी मला सांगितले होते की, ‘ज्या मनुष्यावर आत्मा उतरतांना आणि स्थिरावताना तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’
33 Eu não o teria reconhecido, se aquele que me enviou para batizar com água não me tivesse dito: ‘Aquele sobre quem você vir o Espírito descer e permanecer, esse é o que batiza com o Espírito Santo’.
34 हे घडताना मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष देतो की हे परमेश्वराचे पुत्र आहेत.”
34 Eu vi e testifico que este é o Filho de Deus".
35 दुसर्‍या दिवशी योहान आपल्या दोन शिष्यांसह उभा असताना,
35 No dia seguinte João estava ali novamente com dois dos seus discípulos.
36 येशूंना जाताना पाहून योहानाने म्हटले, “हा पाहा, परमेश्वराचा कोकरा!”
36 Quando viu Jesus passando, disse: "Vejam! É o Cordeiro de Deus! "
37 त्या दोन शिष्यांनी त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा ते येशूंना अनुसरले.
37 Ouvindo-o dizer isso, os dois discípulos seguiram a Jesus.
38 येशूंनी मागे वळून ते आपल्याला अनुसरत आहेत हे पाहून विचारले, “तुम्हाला काय पाहिजे?”
38 Voltando-se e vendo Jesus que os dois o seguiam, perguntou-lhes: "O que vocês querem? " Eles disseram: "Rabi", ( que significa Mestre ), "onde estás hospedado? "
39 येशूंनी म्हटले, “या आणि पाहा.”
39 Respondeu ele: "Venham e verão". Então foram, por volta das quatro horas da tarde, viram onde ele estava hospedado e passaram com ele aquele dia.
40 योहानाचे बोलणे ऐकून ज्यांनी येशूंना अनुसरले होते, त्या दोन शिष्यांमधील एक आंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ होता.
40 André, irmão de Simão Pedro, era um dos dois que tinham ouvido o que João dissera e que haviam seguido a Jesus.
41 आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की त्याने त्याचा भाऊ शिमोन याला शोधले आणि त्याला सांगितले, “आम्हाला मसिहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे.”
41 O primeiro que ele encontrou foi Simão, seu irmão, e lhe disse: "Achamos o Messias" ( isto é, o Cristo ).
42 मग तो त्याला येशूंकडे घेऊन आला.
42 E o levou a Jesus. Jesus olhou para ele e disse: "Você é Simão, filho de João. Será chamado Cefas" ( que significa Pedro ).
43 दुसर्‍या दिवशी येशूंनी गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. त्यांना फिलिप्प सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.”
43 No dia seguinte Jesus decidiu partir para a Galiléia. Quando encontrou Filipe, disse-lhe: "Siga-me".
44 आंद्रिया आणि पेत्र यांच्याप्रमाणेच फिलिप्प बेथसैदा नगरचा रहिवासी होता.
44 Filipe, como André e Pedro, era da cidade de Betsaida.
45 मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.”
45 Filipe encontrou Natanael e lhe disse: "Achamos aquele sobre quem Moisés escreveu na Lei, e a respeito de quem os profetas também escreveram: Jesus de Nazaré, filho de José".
46 त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?”
46 Perguntou Natanael: "Nazaré? Pode vir alguma coisa boa de lá? " Disse Filipe: "Venha e veja".
47 आपल्याकडे नाथानाएल येताना पाहून, येशू म्हणाले, “हा खरा इस्राएली असून याच्यामध्ये फसवणूक आढळत नाही.”
47 Ao ver Natanael se aproximando, disse Jesus: "Aí está um verdadeiro israelita, em quem não há falsidade".
48 तेव्हा नाथानाएलाने विचारले, “तुम्ही मला कसे ओळखता?”
48 Perguntou Natanael: "De onde me conheces? " Jesus respondeu: "Eu o vi quando você ainda estava debaixo da figueira, antes de Filipe o chamar".
49 नाथानाएलाने जाहीर केले, “गुरुजी, आपण परमेश्वराचे पुत्र; आपण इस्राएलचे राजे आहात.”
49 Então Natanael declarou: "Mestre, tu és o Filho de Deus, tu és o Rei de Israel! "
50 त्यावर येशू म्हणाले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस. परंतु यापेक्षा अधिक मोठ्या गोष्टी तू पाहशील.”
50 Jesus disse: "Você crê porque eu disse que o vi debaixo da figueira. Você verá coisas maiores do que essa! "
51 ते पुढे असेही म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, की तुम्ही स्वर्ग उघडलेला आणि परमेश्वराचे स्वर्गदूत वर चढताना व मानवपुत्रावर उतरतांना पाहाल.”
51 E então acrescentou: "Digo-lhes a verdade: Vocês verão o céu aberto e os anjos de Deus subindo e descendo sobre o Filho do homem".

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar João 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.