João 16
marc (MARC) vs ARA
1 “तुम्ही बहकविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे.
1 Tenho-vos dito estas coisas para que não vos escandalizeis.
2 कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल.
2 Eles vos expulsarão das sinagogas; mas vem a hora em que todo o que vos matar julgará com isso tributar culto a Deus.
3 ते अशा गोष्टी करतील कारण त्यांनी कधीही पित्याला किंवा मला ओळखले नाही.
3 Isto farão porque não conhecem o Pai, nem a mim.
4 मी तुम्हाला हे सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की मी आधी तुम्हाला त्यासंबंधी इशारा दिला होता. मी या गोष्टी यापूर्वी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी प्रत्यक्ष तुम्हाबरोबर होतो,
4 Ora, estas coisas vos tenho dito para que, quando a hora chegar, vos recordeis de que eu vo-las disse. Não vo-las disse desde o princípio, porque eu estava convosco.
5 परंतु आता ज्यांनी मला पाठविले त्यांच्याकडे मी परत जात आहे. तरी तुम्हापैकी कोणीही, ‘आपण कुठे जाता?’ असे विचारीत नाही
5 Mas, agora, vou para junto daquele que me enviou, e nenhum de vós me pergunta: Para onde vais?
6 खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत.
6 Pelo contrário, porque vos tenho dito estas coisas, a tristeza encheu o vosso coração.
7 परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन.
7 Mas eu vos digo a verdade: convém-vos que eu vá, porque, se eu não for, o Consolador não virá para vós outros; se, porém, eu for, eu vo-lo enviarei.
8 जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल.
8 Quando ele vier, convencerá o mundo do pecado, da justiça e do juízo:
9 पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;
9 do pecado, porque não creem em mim;
10 नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही;
10 da justiça, porque vou para o Pai, e não me vereis mais;
11 न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.
11 do juízo, porque o príncipe deste mundo já está julgado.
12 “मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही.
12 Tenho ainda muito que vos dizer, mas vós não o podeis suportar agora;
13 परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल.
13 quando vier, porém, o Espírito da verdade, ele vos guiará a toda a verdade; porque não falará por si mesmo, mas dirá tudo o que tiver ouvido e vos anunciará as coisas que hão de vir.
14 कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.
14 Ele me glorificará, porque há de receber do que é meu e vo-lo há de anunciar.
15 पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.”
15 Tudo quanto o Pai tem é meu; por isso é que vos disse que há de receber do que é meu e vo-lo há de anunciar.
16 येशू वारंवार म्हणत होते, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल.”
16 Um pouco, e não mais me vereis; outra vez um pouco, e ver-me-eis.
17 यावरून, त्यांचे काही शिष्य एकमेकास विचारू लागले, “मी पित्याकडे जातो म्हणून थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल याचा अर्थ काय?”
17 Então, alguns dos seus discípulos disseram uns aos outros: Que vem a ser isto que nos diz: Um pouco, e não mais me vereis, e outra vez um pouco, e ver-me-eis; e: Vou para o Pai?
18 तेव्हा ते विचारू लागले, “थोड्या वेळाने, असे जे येशू म्हणत आहेत, हे आम्हास समजत नाही.”
18 Diziam, pois: Que vem a ser esse — um pouco? Não compreendemos o que quer dizer.
19 त्यांना याविषयी काही विचारायचे आहे हे ओळखून येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला जे सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय की ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.’
19 Percebendo Jesus que desejavam interrogá-lo, perguntou-lhes: Indagais entre vós a respeito disto que vos disse: Um pouco, e não me vereis, e outra vez um pouco, e ver-me-eis?
20 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जग आनंद करेल पण तुम्ही रडाल व शोक कराल. तुम्ही दुःख कराल परंतु तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात होईल.
20 Em verdade, em verdade eu vos digo que chorareis e vos lamentareis, e o mundo se alegrará; vós ficareis tristes, mas a vossa tristeza se converterá em alegria.
21 जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते.
21 A mulher, quando está para dar à luz, tem tristeza, porque a sua hora é chegada; mas, depois de nascido o menino, já não se lembra da aflição, pelo prazer que tem de ter nascido ao mundo um homem.
22 त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.
22 Assim também agora vós tendes tristeza; mas outra vez vos verei; o vosso coração se alegrará, e a vossa alegria ninguém poderá tirar.
23 त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल.
23 Naquele dia, nada me perguntareis. Em verdade, em verdade vos digo: se pedirdes alguma coisa ao Pai, ele vo-la concederá em meu nome.
24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.
24 Até agora nada tendes pedido em meu nome; pedi e recebereis, para que a vossa alegria seja completa.
25 “जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन.
25 Estas coisas vos tenho dito por meio de figuras; vem a hora em que não vos falarei por meio de comparações, mas vos falarei claramente a respeito do Pai.
26 त्या दिवसात तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन.
26 Naquele dia, pedireis em meu nome; e não vos digo que rogarei ao Pai por vós.
27 नाही, पिता स्वतःही तुमच्यावर प्रीती करतात, कारण तुम्ही मजवर प्रीती केली व मी परमेश्वरापासून आलो आहे असा विश्वास ठेवला.
27 Porque o próprio Pai vos ama, visto que me tendes amado e tendes crido que eu vim da parte de Deus.
28 मी पित्यापासून आलो आणि या जगात प्रवेश केला आणि मी हे जग सोडून पित्याकडे परत जात आहे.”
28 Vim do Pai e entrei no mundo; todavia, deixo o mundo e vou para o Pai.
29 तेव्हा येशूंचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता तुम्ही स्पष्ट बोलत आहात, अलंकारिक भाषेत काही सांगत नाही.
29 Disseram os seus discípulos: Agora é que falas claramente e não empregas nenhuma figura.
30 आता आम्हास कळले की, तुम्हाला सर्वगोष्टी ठाऊक आहेत, म्हणून कोणासही आपणास प्रश्न विचारण्याची गरज नाही. यावरून आपण परमेश्वरापासून आला आहात असा आम्ही विश्वास ठेवतो.”
30 Agora, vemos que sabes todas as coisas e não precisas de que alguém te pergunte; por isso, cremos que, de fato, vieste de Deus.
31 येशूंनी उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास ठेवता काय?
31 Respondeu-lhes Jesus: Credes agora?
32 अशी वेळ येत आहे आणि आलीच आहे की तुमची पांगापांग होईल व तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी परत जाल. तुम्ही मला एकटे सोडाल, तरीसुद्धा मी एकटा नसेन, कारण माझे पिता मजबरोबर आहेत.
32 Eis que vem a hora e já é chegada, em que sereis dispersos, cada um para sua casa, e me deixareis só; contudo, não estou só, porque o Pai está comigo.
33 “मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे.”
33 Estas coisas vos tenho dito para que tenhais paz em mim. No mundo, passais por aflições; mas tende bom ânimo; eu venci o mundo.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?
Estude este capítulo no WhatsApp
Peça à IA da Bíblia Fala para explicar João 16, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.