João 13

marc (MARC) vs NAA

Sair da comparação
NAA Nova Almeida Atualizada 2017
1 वल्हांडण सण सुरू होण्यास थोडा अवधी होता. येशूंना माहीत होते की हे जग सोडून पित्याकडे जाण्याची त्यांची वेळ जवळ आली आहे. जगात जे त्यांचे लोक होते, त्यांच्यावर त्यांनी प्रीती केली व शेवटपर्यंत प्रीती केली.
1 Antes da Festa da Páscoa, sabendo Jesus que era chegada a sua hora de passar deste mundo para o Pai, tendo amado os seus que estavam no mundo, amou-os até o fim.
2 संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता.
2 Durante a ceia, tendo já o diabo posto no coração de Judas, filho de Simão Iscariotes, que traísse Jesus,
3 येशूंना माहीत होते की, पित्याने सर्वगोष्टी त्यांच्या सत्तेखाली ठेवल्या आहेत आणि ते परमेश्वरापासून आले आहेत व त्यांच्याकडे परत जाणार आहेत;
3 sabendo este que o Pai tinha confiado tudo às suas mãos, e que ele tinha vindo de Deus e voltava para Deus,
4 म्हणून येशू भोजनावरून उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला.
4 levantou-se da ceia, tirou a vestimenta de cima e, pegando uma toalha, cingiu-se com ela.
5 त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.
5 Em seguida Jesus pôs água numa bacia e começou a lavar os pés dos discípulos e a enxugá-los com a toalha com que estava cingido.
6 ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?”
6 Quando se aproximou de Simão Pedro, este lhe perguntou: — Vai lavar os meus pés, Senhor?
7 येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, पण नंतर कळेल.”
7 Jesus respondeu:
8 पेत्र म्हणाला, “नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.”
8 Então Pedro disse: — O senhor nunca lavará os meus pés! Ao que Jesus respondeu:
9 शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!”
9 Então Pedro lhe pediu: — Senhor, não somente os pés, mas também as mãos e a cabeça.
10 यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत.”
10 Jesus respondeu:
11 आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही.
11 Pois ele sabia quem era o traidor. Foi por isso que disse: “Nem todos estão limpos.”
12 त्यांचे पाय धुतल्यावर त्यांनी कपडे पुन्हा अंगावर घातले आणि आपल्या जागी परत आले व आपल्या शिष्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला समजले का?
12 Depois de lhes ter lavado os pés, Jesus pôs de novo as suas vestimentas e, voltando à mesa, perguntou-lhes:
13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे.
13 Vocês me chamam de Mestre e de Senhor e fazem bem, porque eu o sou.
14 आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.
14 Ora, se eu, sendo Senhor e Mestre, lavei os pés de vocês, também vocês devem lavar os pés uns dos outros.
15 जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे.
15 Porque eu lhes dei o exemplo, para que, como eu fiz, vocês façam também.
16 मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही.
16 Em verdade, em verdade lhes digo que o servo não é maior do que seu senhor, nem o enviado é maior do que aquele que o enviou.
17 आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही त्याप्रमाणे कराल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल.
17 Se vocês sabem estas coisas, bem-aventurados serão se as praticarem.
18 “मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.’ हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.
18 Não falo a respeito de todos vocês, pois eu conheço aqueles que escolhi. Mas é para que se cumpra a Escritura: “Aquele que come do meu pão levantou contra mim o seu calcanhar.”
19 “मी तुम्हाला हे आताच, घडून येण्यापूर्वी सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा तसे घडून येईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे.
19 Desde já lhes digo isso, antes que aconteça, para que, quando acontecer, vocês creiam que
20 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जे कोणी ज्याला मी पाठविले त्याला स्वीकारतात, ते मला स्वीकारतात आणि जे कोणी मला स्वीकारतात ते ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतात.”
20 Em verdade, em verdade lhes digo: quem recebe aquele que eu enviar recebe a mim; e quem recebe a mim recebe aquele que me enviou.
21 असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकूळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.”
21 Depois de dizer isso, Jesus se angustiou em espírito e afirmou:
22 त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना.
22 Então os discípulos olharam uns para os outros, sem saber a quem ele se referia.
23 त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता.
23 Ao lado de Jesus estava reclinado um dos seus discípulos, aquele a quem ele amava.
24 “कोणाविषयी सांगत आहे हे विचारून आम्हास सांग,” असे शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावून विचारले.
24 Simão Pedro fez um sinal a esse, para que perguntasse a quem Jesus se referia.
25 तो येशूंच्या उराशी टेकलेला असता, म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”
25 Então aquele discípulo, reclinando-se sobre o peito de Jesus, perguntou: — Senhor, quem é?
26 येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतला दिला.
26 Jesus respondeu: Então Jesus pegou um pedaço de pão e, tendo-o molhado, deu-o a Judas, filho de Simão Iscariotes.
27 यहूदाहने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला.
27 E, depois que Judas recebeu o pedaço de pão, imediatamente Satanás entrou nele. Então Jesus disse a Judas:
28 येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.
28 Nenhum dos que estavam à mesa entendeu por que Jesus tinha dito isso.
29 काहींना वाटले की यहूदाहच्या हाती पैशाचा कारभार असल्यामुळे सणासाठी काही विकत घ्यावे किंवा गरिबांना काही द्यावे म्हणून येशूने सांगितले असेल.
29 Pois, como Judas era quem trazia a bolsa do dinheiro, alguns pensaram que Jesus tinha dito a ele: “Compre o que precisamos para a festa” ou, então, que havia solicitado que desse alguma coisa aos pobres.
30 मग तो भाकरीचा तुकडा घेतल्याबरोबर, यहूदाह बाहेर निघून गेला. तेव्हा रात्र होती.
30 Assim, tendo recebido o pedaço de pão, Judas logo saiu. E era noite.
31 तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे;
31 Quando Judas saiu, Jesus disse:
32 जर परमेश्वराचे गौरव त्यांच्यामध्ये झाले तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करतील आणि लवकरच गौरव करतील.
32 Se Deus foi glorificado nele, também Deus o glorificará nele mesmo; e ele o glorificará imediatamente.
33 “माझ्या मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. मग तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूदी पुढार्‍यांना सांगितले, तसेच आता तुम्हालाही सांगतो: मी जिथे जाणार, तिथे तुम्हाला येता येणार नाही.
33 Filhinhos, ainda por um pouco estou com vocês. Vocês vão me procurar, mas o que eu disse aos judeus também agora digo a vocês: para onde eu vou vocês não podem ir.
34 “मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे.
34 Eu lhes dou um novo mandamento: que vocês amem uns aos outros. Assim como eu os amei, que também vocês amem uns aos outros.
35 तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”
35 Nisto todos conhecerão que vocês são meus discípulos: se tiverem amor uns aos outros.
36 शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?”
36 Simão Pedro perguntou a Jesus: — Para onde o Senhor vai? Jesus respondeu:
37 त्यावर पेत्र म्हणाला, “प्रभू, मला आताच तुम्हाला का अनुसरता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा प्राण देईन.”
37 Pedro disse: — Senhor, por que não posso segui-lo agora? Darei a minha vida pelo senhor.
38 येशूंनी उत्तर दिले, “माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय? मी तुला निश्चित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील!
38 Jesus respondeu:

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar João 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.