João 12

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते तो लाजर जिथे राहत होता त्या बेथानी गावी येशू आले.
1 Seis dias antes da Páscoa, foi Jesus a Betânia, onde vivia Lázaro, que ele ressuscitara.
2 तिथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता.
2 Deram ali uma ceia em sua honra. Marta servia e Lázaro era um dos convivas.
3 मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि तिने त्यांचे पाय आपल्या केसांनी पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.
3 Tomando Maria uma libra de bálsamo de nardo puro, de grande preço, ungiu os pés de Jesus e enxugou-os com seus cabelos. A casa encheu-se do perfume do bálsamo.
4 परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदाह इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला,
4 Mas Judas Iscariotes, um dos seus discípulos, aquele que o havia de trair, disse:
5 “वास्तविक ते तेल विकून येणारे पैसे गोरगरिबांना देता आले नसते का? त्या तेलाचे मोल एका वर्षाच्या मजुरीएवढे होते.”
5 Por que não se vendeu este bálsamo por trezentos denários e não se deu aos pobres?
6 त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला नाही, तर तो चोर होता; व पैशाच्या पिशवीचा मालक असून, जे काही त्यात टाकले जाई त्यातून स्वतःसाठी काढून घेत असे.
6 Dizia isso não porque ele se interessasse pelos pobres, mas porque era ladrão e, tendo a bolsa, furtava o que nela lançavam.
7 त्यावर येशू म्हणाले, “तिला असू दे, माझ्या उत्तरक्रियेसाठी सुगंधी तेल तिने बचत करून ठेवले होते.
7 Jesus disse: Deixai-a; ela guardou este perfume para o dia da minha sepultura.
8 गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर राहतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.”
8 Pois sempre tereis convosco os pobres, mas a mim nem sempre me tereis.
9 तितक्यात येशू तिथे आले आहेत हे कळल्यावर यहूदी लोकांचा समुदाय तिथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्या लाजराला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली.
9 Uma grande multidão de judeus veio a saber que Jesus lá estava; e chegou, não somente por causa de Jesus, mas ainda para ver Lázaro, que ele ressuscitara.
10 हे पाहून मुख्य याजकांनी लाजराला देखील जिवे मारण्याची योजना केली.
10 Mas os príncipes dos sacerdotes resolveram tirar a vida também a Lázaro,
11 यासाठी की अनेक यहूदी लोक लाजरामुळे येशूंवर विश्वास ठेवू लागले होते.
11 porque muitos judeus, por causa dele, se afastavam e acreditavam em Jesus.
12 दुसर्‍या दिवशी येशू यरुशलेमला येत आहेत ही बातमी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या समुदायाने ऐकली.
12 No dia seguinte, uma grande multidão que tinha vindo à festa em Jerusalém ouviu dizer que Jesus se ia aproximando.
13 त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले,
13 Saíram-lhe ao encontro com ramos de palmas, exclamando: Hosana! Bendito o que vem em nome do Senhor, o rei de Israel!
14 येशूंना एक गाढवीचे शिंगरू सापडले व ते त्यावर बसले, शास्त्रलेखात असे लिहिले आहे:
14 Tendo Jesus encontrado um jumentinho, montou nele, segundo o que está escrito:
15 “सीयोनकन्ये भिऊ नको;
15 Não temas, filha de Sião, eis que vem o teu rei montado num filho de jumenta {Zc 9,9}.
16 हे प्रथम त्यांच्या शिष्यांना समजले नाही; परंतु येशूंचे गौरव झाल्यानंतर त्यांना समजून आले की, ज्यागोष्टी येशूंबद्दल लिहिल्या गेल्या होत्या त्याच गोष्टी त्यांच्यासाठी करण्यात आल्या होत्या.
16 Os seus discípulos a princípio não compreendiam essas coisas, mas, quando Jesus foi glorificado, então se lembraram de que isto estava escrito a seu respeito e de que assim lho fizeram.
17 येशूंनी लाजराला कबरेमधून बाहेर बोलाविले व मरणातून उठविले, त्यावेळेस जो लोकसमुदाय तिथे होता त्यांनी वचनाचा प्रचार करणे सुरू ठेवले.
17 A multidão, pois, que se achava com ele, quando chamara Lázaro do sepulcro e o ressuscitara, aclamava-o.
18 ज्यांनी त्या चिन्हाबद्दल ऐकले होते, असे अनेक लोक येशूंना भेटण्यासाठी गेले.
18 Por isso o povo lhe saía ao encontro, porque tinha ouvido que Jesus fizera aquele milagre.
19 यास्तव परूशी एकमेकांना म्हणू लागले, “आपण काहीच साध्य केले नाही. पाहा, सारे जग कसे त्याच्यामागे जात आहे!”
19 Mas os fariseus disseram entre si: Vede! Nada adiantamos! Reparai que todo mundo corre após ele!
20 सणाच्या उपासनेला हजर राहण्यासाठी जे ग्रीक लोक आले होते,
20 Havia alguns gregos entre os que subiram para adorar durante a festa.
21 ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, “महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे.”
21 Estes se aproximaram de Filipe {aquele de Betsaida da Galiléia} e rogaram-lhe: Senhor, quiséramos ver Jesus.
22 तेव्हा फिलिप्पाने त्याबद्दल आंद्रियाला सांगितले; मग त्या दोघांनी येशूंना सांगितले.
22 Filipe foi e falou com André. Então André e Filipe o disseram ao Senhor.
23 येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
23 Respondeu-lhes Jesus: É chegada a hora para o Filho do Homem ser glorificado.
24 मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला तर बहुत पीक देतो.
24 Em verdade, em verdade vos digo: se o grão de trigo, caído na terra, não morrer, fica só; se morrer, produz muito fruto.
25 जो कोणी आपल्या जिवावर प्रीती करतो, तो आपल्या जीवास मुकेल आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करेल, तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखेल.
25 Quem ama a sua vida, perdê-la-á; mas quem odeia a sua vida neste mundo, conservá-la-á para a vida eterna.
26 जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील.
26 Se alguém me quer servir, siga-me; e, onde eu estiver, estará ali também o meu servo. Se alguém me serve, meu Pai o honrará.
27 “आता माझा जीव अस्वस्थ झाला आहे, मी काय म्हणू? ‘हे पित्या, या घटकेपासून मला वाचव?’ नाही, केवळ याच कारणासाठी मी या घटकेस आलो आहे.
27 Presentemente, a minha alma está perturbada. Mas que direi?... Pai, salva-me desta hora... Mas é exatamente para isso que vim a esta hora.
28 हे पित्या, आपल्या नावाचे गौरव करा!”
28 Pai, glorifica o teu nome! Nisto veio do céu uma voz: Já o glorifiquei e tornarei a glorificá-lo.
29 जो लोकसमुदाय तिथे उभा असून ऐकत होता तो म्हणाला, ही गर्जना झाली; इतर म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला.
29 Ora, a multidão que ali estava, ao ouvir isso, dizia ter havido um trovão. Outros replicavam: Um anjo falou-lhe.
30 तेव्हा येशू म्हणाले, “ती वाणी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी होती.
30 Jesus disse: Essa voz não veio por mim, mas sim por vossa causa.
31 आता या जगाचा न्यायनिवाडा होण्याची वेळ आहे आणि जगाच्या अधिपतीला बाहेर टाकण्यात येईल.
31 Agora é o juízo deste mundo; agora será lançado fora o príncipe deste mundo.
32 आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन.”
32 E quando eu for levantado da terra, atrairei todos os homens a mim.
33 आपण कोणत्या प्रकारे मरणार आहोत हे सुचविण्यासाठी येशू असे बोलले.
33 Dizia, porém, isto, significando de que morte havia de morrer.
34 जमावाने म्हटले, “नियमशास्त्रामधून आम्ही ऐकले आहे की ‘ख्रिस्त सर्वदा राहील, तर मानवपुत्राला उंच केले पाहिजेत’ असे तुम्ही कसे म्हणता? हा ‘मानवपुत्र’ कोण आहे?”
34 A multidão respondeu-lhe: Nós temos ouvido da lei que o Cristo permanece para sempre. Como dizes tu: Importa que o Filho do Homem seja levantado? Quem é esse Filho do Homem?
35 तेव्हा येशूंनी त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्याबरोबर राहील. तुम्हावर अंधकाराने मात करण्यापूर्वी प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा, कारण जो कोणी अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही.
35 Respondeu-lhes Jesus: Ainda por pouco tempo a luz estará em vosso meio. Andai enquanto tendes a luz, para que as trevas não vos surpreendam; e quem caminha nas trevas não sabe para onde vai.
36 तुम्ही प्रकाशाची मुले व्हावी म्हणून जोपर्यंत तुम्हाबरोबर प्रकाश आहे, तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलले व तिथून निघून त्यांच्यापासून गुप्त राहिले.
36 Enquanto tendes a luz, crede na luz, e assim vos tornareis filhos da luz. Jesus disse essas coisas, retirou-se e ocultou-se longe deles.
37 येशूंनी अनेक चिन्हे त्यांच्यासमोर केली असतानाही, ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते.
37 Embora tivesse feito tantos milagres na presença deles, não acreditavam nele.
38 नेमके हेच भविष्य यशायाह संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले:
38 Assim se cumpria o oráculo do profeta Isaías: Senhor, quem creu em nossa pregação? E a quem foi revelado o braço do Senhor {Is 53,1}?
39 परंतु या कारणाने ते विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण, यशायाहने इतरत्र असेही म्हटले आहे:
39 Aliás, não podiam crer, porque outra vez disse Isaías:
40 “म्हणून परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत
40 Ele cegou-lhes os olhos, endureceu-lhes o coração, para que não vejam com os olhos nem entendam com o coração e se convertam e eu os sare {Is 6,10}.
41 यशायाहने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.
41 Assim se exprimiu Isaías, quando teve a visão de sua glória e dele falou.
42 त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्‍यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते;
42 Não obstante, também muitos dos chefes creram nele, mas por causa dos fariseus não o manifestavam, para não serem expulsos da sinagoga.
43 कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या स्तुतीपेक्षा त्यांना मानवाकडून मिळणारी स्तुती अधिक प्रिय होती.
43 Assim preferiram a glória dos homens àquela que vem de Deus.
44 नंतर येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी मजवर विश्वास ठेवतात ते फक्त मजवरच विश्वास ठेवतात असे नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर ठेवतात;
44 Entretanto, Jesus exclamou em voz alta: Aquele que crê em mim, crê não em mim, mas naquele que me enviou;
45 जे मला पाहतात ते वास्तविक ज्यांनी मला पाठविले त्यांनाच पाहतात.
45 e aquele que me vê, vê aquele que me enviou.
46 मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये.
46 Eu vim como luz ao mundo; assim, todo aquele que crer em mim não ficará nas trevas.
47 “जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.
47 Se alguém ouve as minhas palavras e não as guarda, eu não o condenarei, porque não vim para condenar o mundo, mas para salvá-lo.
48 जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील.
48 Quem me despreza e não recebe as minhas palavras, tem quem o julgue; a palavra que anunciei julgá-lo-á no último dia.
49 कारण मी माझे स्वतःचे बोलत नाही, ज्या पित्याने मला पाठविले, त्यांनी मी काय सांगावे व काय बोलावे याची मला आज्ञा दिली आहे.
49 Em verdade, não falei por mim mesmo, mas o Pai, que me enviou, ele mesmo me prescreveu o que devo dizer e o que devo ensinar.
50 त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्‍या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
50 E sei que o seu mandamento é vida eterna. Portanto, o que digo, digo-o segundo me falou o Pai.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar João 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.