João 11

marc (MARC) vs NVI

Sair da comparação
NVI Nova Versão Internacional
1 आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.
1 Havia um homem chamado Lázaro. Ele era de Betânia, do povoado de Maria e de sua irmã Marta. E aconteceu que Lázaro ficou doente.
2 ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते.
2 Maria, sua irmã, era a mesma que derramara perfume sobre o Senhor e lhe enxugara os pés com os cabelos.
3 तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.”
3 Então as irmãs de Lázaro mandaram dizer a Jesus: "Senhor, aquele a quem amas está doente".
4 येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.”
4 Ao ouvir isso, Jesus disse: "Essa doença não acabará em morte; é para a glória de Deus, para que o Filho de Deus seja glorificado por meio dela".
5 मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती,
5 Jesus amava Marta, a irmã dela e Lázaro.
6 तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तिथेच अधिक दोन दिवस राहिले.
6 No entanto, quando ouviu falar que Lázaro estava doente, ficou mais dois dias onde estava.
7 यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.”
7 Depois disse aos seus discípulos: "Vamos voltar para a Judéia".
8 परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तिथे जाता काय?”
8 Estes disseram: "Mestre, há pouco os judeus tentaram apedrejar-te e assim mesmo vais voltar para lá? "
9 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते.
9 Jesus respondeu: "O dia não tem doze horas? Quem anda de dia não tropeça, pois vê a luz deste mundo.
10 जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.”
10 Quando anda de noite, tropeça, pois nele não há luz".
11 असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.”
11 Depois de dizer isso, prosseguiu dizendo-lhes: "Nosso amigo Lázaro adormeceu, mas vou até lá para acordá-lo".
12 त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभूजी तो झोपला असेल, तर बरा होईल.”
12 Seus discípulos responderam: "Senhor, se ele dorme, vai melhorar".
13 येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत.
13 Jesus tinha falado de sua morte, mas os seus discípulos pensaram que ele estava falando simplesmente do sono.
14 मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे,
14 Então lhes disse claramente: "Lázaro morreu,
15 तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”
15 e para o bem de vocês estou contente por não ter estado lá, para que vocês creiam. Mas, vamos até ele".
16 परंतु दिदुम म्हटलेला थोमा इतर शिष्यांना म्हणाला, “चला, आपणही त्यांच्याबरोबर मरू.”
16 Então Tomé, chamado Dídimo, disse aos outros discípulos: "Vamos também para morrermos com ele".
17 ते तिथे पोहोचल्यावर, येशूंना समजले की, लाजराला कबरेत ठेऊन चार दिवस झाले होते.
17 Ao chegar, Jesus verificou que Lázaro já estava no sepulcro havia quatro dias.
18 बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते.
18 Betânia distava cerca de três quilômetros de Jerusalém,
19 आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.
19 e muitos judeus tinham ido visitar Marta e Maria para confortá-las pela perda do irmão.
20 येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली.
20 Quando Marta ouviu que Jesus estava chegando, foi encontrá-lo, mas Maria ficou em casa.
21 “प्रभूजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.
21 Disse Marta a Jesus: "Senhor, se estivesses aqui meu irmão não teria morrido.
22 परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे.”
22 Mas sei que, mesmo agora, Deus te dará tudo o que pedires".
23 त्यावर येशूंनी तिला सांगितले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
23 Disse-lhe Jesus: "O seu irmão vai ressuscitar".
24 मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.”
24 Marta respondeu: "Eu sei que ele vai ressuscitar na ressurreição, no último dia".
25 येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल;
25 Disse-lhe Jesus: "Eu sou a ressurreição e a vida. Aquele que crê em mim, ainda que morra, viverá;
26 जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?”
26 e quem vive e crê em mim, não morrerá eternamente. Você crê nisso? "
27 “होय, प्रभूजी,” ती म्हणाली, “या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसिहा), परमेश्वराचे पुत्र आपण आहात यावर माझा विश्वास आहे.”
27 Ela lhe respondeu: "Sim, Senhor, eu tenho crido que tu és o Cristo, o Filho de Deus que devia vir ao mundo".
28 ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीयेला बाजूला बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत.”
28 E depois de dizer isso, foi para casa e, chamando à parte Maria, disse-lhe: "O Mestre está aqui e está chamando você".
29 मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली.
29 Ao ouvir isso, Maria levantou-se depressa e foi ao encontro dele.
30 येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जिथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते.
30 Jesus ainda não tinha entrado no povoado, mas estava no lugar onde Marta o encontrara.
31 जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले.
31 Quando notaram que ela se levantou depressa e saiu, os judeus, que a estavam confortando em casa, seguiram-na, supondo que ela ia ao sepulcro, para ali chorar.
32 येशू जिथे होते तिथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.”
32 Chegando ao lugar onde Jesus estava e vendo-o, Maria prostrou-se aos seus pés e disse: "Senhor, se estivesses aqui meu irmão não teria morrido".
33 येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकूळ व अस्वस्थ झाले.
33 Ao ver chorando Maria e os judeus que a acompanhavam, Jesus agitou-se no espírito e perturbou-se.
34 येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?”
34 "Onde o colocaram? ", perguntou ele. "Vem e vê, Senhor", responderam eles.
35 येशू रडले.
35 Jesus chorou.
36 नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!”
36 Então os judeus disseram: "Vejam como ele o amava! "
37 परंतु काहीजण म्हणाले, “ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाहीत का?”
37 Mas alguns deles disseram: "Ele, que abriu os olhos do cego, não poderia ter impedido que este homem morresse? "
38 येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती.
38 Jesus, outra vez profundamente comovido, foi até o sepulcro. Era uma gruta com uma pedra colocada à entrada.
39 येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.”
39 "Tirem a pedra", disse ele. Disse Marta, irmã do morto: "Senhor, ele já cheira mal, pois já faz quatro dias".
40 तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?”
40 Disse-lhe Jesus: "Não lhe falei que, se você cresse, veria a glória de Deus? "
41 यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो.
41 Então tiraram a pedra. Jesus olhou para cima e disse: "Pai, eu te agradeço porque me ouviste.
42 मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.”
42 Eu sabia que sempre me ouves, mas disse isso por causa do povo que está aqui, para que creia que tu me enviaste".
43 हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!”
43 Depois de dizer isso, Jesus bradou em alta voz: "Lázaro, venha para fora! "
44 लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते.
44 O morto saiu, com as mãos e os pés envolvidos em faixas de linho, e o rosto envolto num pano. Disse-lhes Jesus: "Tirem as faixas dele e deixem-no ir".
45 यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला.
45 Muitos dos judeus que tinham vindo visitar Maria, vendo o que Jesus fizera, creram nele.
46 परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले.
46 Mas alguns deles foram contar aos fariseus o que Jesus tinha feito.
47 मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली.
47 Então os chefes dos sacerdotes e os fariseus convocaram uma reunião do Sinédrio. "O que estamos fazendo? ", perguntaram eles. "Aí está esse homem realizando muitos sinais miraculosos.
48 जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”
48 Se o deixarmos, todos crerão nele, e então os romanos virão e tirarão tanto o nosso lugar como a nossa nação".
49 त्यांच्यापैकी कयफा नावाचा मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही!
49 Então um deles, chamado Caifás, que naquele ano era o sumo sacerdote, tomou a palavra e disse: "Nada sabeis!
50 तुम्ही हे देखील लक्षात आणत नाही की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होणे यापेक्षा लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे तुमच्या हिताचे आहे.”
50 Não percebeis que vos é melhor que morra um homem pelo povo, e que não pereça toda a nação".
51 हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत,
51 Ele não disse isso de si mesmo, mas, sendo o sumo sacerdote naquele ano, profetizou que Jesus morreria pela nação judaica,
52 हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव.
52 e não somente por aquela nação, mas também pelos filhos de Deus que estão espalhados, para reuni-los num povo.
53 मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.
53 E daquele dia em diante, resolveram tirar-lhe a vida.
54 यामुळे येशू यहूदीया प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले.
54 Por essa razão, Jesus não andava mais publicamente entre os judeus. Ao invés disso, retirou-se para uma região próxima do deserto, para um povoado chamado Efraim, onde ficou com os seus discípulos.
55 जेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, तेव्हा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धीकरणाचा विधी पार पाडावा म्हणून देशातील अनेक लोक वर यरुशलेममध्ये आले होते
55 Ao se aproximar a Páscoa judaica, muitos foram daquela região para Jerusalém a fim de participarem das purificações cerimoniais antes da Páscoa.
56 येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?”
56 Continuavam procurando Jesus e, no templo, perguntavam uns aos outros: "O que vocês acham? Será que ele virá à festa? "
57 इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील.
57 Mas os chefes dos sacerdotes e os fariseus tinham ordenado que, se alguém soubesse onde Jesus estava, o denunciasse, para que o pudessem prender.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar João 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.