Hebreus 13

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 बंधुप्रीतिमध्ये जडून राहा.
1 Conserve-se entre vós a caridade fraterna.
2 अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.
2 Não vos esqueçais da hospitalidade, pela qual alguns, sem o saberem, hospedaram anjos.
3 तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.
3 Lembrai-vos dos encarcerados, como se vós mesmos estivésseis presos com eles. E dos maltratados, como se habitásseis no mesmo corpo com eles.
4 विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्‍यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल.
4 Vós todos considerai o matrimônio com respeito e conservai o leito conjugal imaculado, porque Deus julgará os impuros e os adúlteros.
5 द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे,
5 Vivei sem avareza. Contentai-vos com o que tendes, pois Deus mesmo disse: Não te deixarei nem desampararei {Dt 31,6}.
6 म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते:
6 Por isso é que podemos dizer com confiança: O Senhor é meu socorro, e nada tenho que temer. Que me poderá fazer o homem {Sl 117,6}?
7 तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्‍या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
7 Lembrai-vos de vossos guias que vos pregaram a palavra de Deus. Considerai como souberam encerrar a carreira. E imitai-lhes a fé.
8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत.
8 Jesus Cristo é sempre o mesmo: ontem, hoje e por toda a eternidade.
9 म्हणून कोणत्याही प्रकारच्या अनोळखी शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. जे खाऊन खाणार्‍याचा जीवनाला काहीच फायदा होत नाही असे विधिविषयक विशिष्ट पदार्थ खाण्याने नव्हे, तर तुमचे अंतःकरण कृपेने बळकट करणे चांगले आहे.
9 Não vos deixeis desviar pela diversidade de doutrinas estranhas. É muito melhor fortificar a alma pela graça do que por alimentos que nenhum proveito trazem aos que a eles se entregam.
10 आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा, मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही.
10 Temos um altar do qual não têm direito de comer os que se empregam no serviço do tabernáculo {mosaico}.
11 वधलेल्या पशूंचे रक्त पापार्पण म्हणून महायाजक नियमानुसार परमपवित्रस्थानात नेत असत व नंतर त्या पशूंची शरीरे छावणीबाहेर जाळून टाकीत.
11 Porque, quando o sumo sacerdote levava ao santuário o sangue dos animais imolados para a expiação do pecado, os corpos desses animais eram inteiramente consumidos fora da entrada.
12 लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले.
12 Por esta razão, Jesus, querendo purificar o povo pelo seu próprio sangue, padeceu fora das portas.
13 तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या.
13 Saiamos, pois, a ele fora da entrada, levando a sua ignomínia.
14 आपण तर स्वर्गातील भावी नगराची वाट पाहत आहोत, कारण आपल्याला या जगात स्थायी नगर नाही.
14 Aliás, não temos aqui cidade permanente, mas vamos em busca da futura.
15 तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या.
15 Por ele ofereçamos a Deus sem cessar sacrifícios de louvor, isto é, o fruto dos lábios que celebram o seu nome {Os 14,2}.
16 चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.
16 Não negligencieis a beneficência e a liberalidade. Estes são sacrifícios que agradam a Deus!
17 आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.
17 Sede submissos e obedecei aos que vos guiam {pois eles velam por vossas almas e delas devem dar conta}. Assim, eles o farão com alegria, e não a gemer, que isto vos seria funesto.
18 आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे.
18 Orai por nós. Estamos persuadidos de ter a consciência em paz, pois estamos decididos a procurar o bem em tudo.
19 तुमच्याकडे मी लवकर परत यावे म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची विशेष गरज आहे.
19 Com o maior encarecimento, porém, vos rogo que oreis, para que mais depressa eu vos seja restituído.
20 आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत,
20 E o Deus da paz que, no sangue da eterna aliança, ressuscitou dos mortos o grande pastor das ovelhas, nosso Senhor Jesus,
21 यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
21 queira dispor-vos ao bem e vos conceder que cumprais,a sua vontade, realizando ele próprio em vós o que é agradável aos seus olhos, por Jesus Cristo, a quem seja dada a glória por toda a eternidade. Amém.
22 बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे.
22 Rogo-vos, irmãos, que aceiteis de boa mente estas exortações, pois vos escrevi com brevidade.
23 बंधू तीमथ्य हा आता तुरुंगातून सुटला आहे, हे तुम्हाला माहीत असावे, अशी माझी इच्छा आहे; तो इकडे लवकर आला, तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन.
23 Sabei que nosso irmão Timóteo foi posto em liberdade; se ele voltar a tempo, irei com ele ver-vos.
24 मंडळीतील तुमच्या सर्व वडीलजनांस व तेथील इतर पवित्र जणांना माझ्या शुभेच्छा सांगा.
24 Saudai a todos os que vos guiam e a todos os santos. Os irmãos da Itália vos saúdam.
25 तुम्हा सर्वांवर परमेश्वराची कृपा असो.
25 A graça esteja com todos vós. Amém.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Hebreus 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.