Hebreus 11

marc (MARC) vs VC

Sair da comparação
VC Versão Católica
1 विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्‍या गोष्टींबद्दलची खात्री आहे.
1 A fé é o fundamento da esperança, é uma certeza a respeito do que não se vê.
2 पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते.
2 Foi ela que fez a glória dos nossos, antepassados.
3 विश्वासाद्वारे आपल्याला कळते की सर्व जग परमेश्वराच्या शब्दाने निर्माण झाले; म्हणजे जे दिसते ते दृश्य गोष्टींपासून निर्माण झालेले नाही.
3 Pela fé reconhecemos que o mundo foi formado pela palavra de Deus e que as coisas visíveis se originaram do invisível.
4 विश्वासाद्वारे हाबेलाने काईनापेक्षा उत्तम अर्पण परमेश्वराकडे आणले. परमेश्वराने त्याची प्रशंसा करून त्याला नीतिमान गणले, आणि हाबेल जरी मरण पावला आहे, तरी विश्वासाद्वारे तो आजही बोलतो.
4 Pela fé Abel ofereceu a Deus um sacrifício bem superior ao de Caim, e mereceu ser chamado justo, porque Deus aceitou as suas ofertas. Graças a ela é que, apesar de sua morte, ele ainda fala.
5 विश्वासाद्वारे हनोख जिवंत असताना परमेश्वराने त्याला स्वर्गात नेले, त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही: “तो एकाएकी दिसेनासा झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.” हे घडण्यापूर्वी परमेश्वर म्हणाले होते की ते हनोखाच्या बाबतीत अतिशय संतुष्ट होते.
5 Pela fé Henoc foi arrebatado, sem ter conhecido a morte: e não foi achado, porquanto Deus o arrebatou; mas a Escritura diz que, antes de ser arrebatado, ele tinha agradado a Deus {Gn 5,24}.
6 विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध घेणार्‍यांना ते प्रतिफळ देतात.
6 Ora, sem fé é impossível agradar a Deus, pois para se achegar a ele é necessário que se creia primeiro que ele existe e que recompensa os que o procuram.
7 विश्वासाद्वारे नोआहने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोआहने विश्वासामुळेच जगाचा धिक्कार केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले.
7 Pela fé na palavra de Deus, Noé foi avisado a respeito de acontecimentos imprevisíveis; cheio de santo temor, construiu a arca para salvar a sua família. Pela fé ele condenou o mundo e se tornou o herdeiro da justificação mediante a fé.
8 जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले.
8 Foi pela fé que Abraão, obedecendo ao apelo divino, partiu para uma terra que devia receber em herança. E partiu não sabendo para onde ia.
9 तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.
9 Foi pela fé que ele habitou na terra prometida, como em terra estrangeira, habitando aí em tendas com Isaac e Jacó, co-herdeiros da mesma promessa.
10 विश्वासाद्वारे अब्राहाम परमेश्वराने योजलेल्या व पाया बांधून घडविलेल्या शहराची आशेने वाट पाहत होता.
10 Porque tinha a esperança fixa na cidade assentada sobre os fundamentos {eternos}, cujo arquiteto e construtor é Deus.
11 विश्वासाद्वारे सारा देखील वृद्धापकाळात माता होऊ शकली. परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणे करतीलच हे तिला माहीत होते.
11 Foi pela fé que a própria Sara cobrou o vigor de conceber, apesar de sua idade avançada, porque acreditou na fidelidade daquele que lhe havia prometido.
12 आणि याप्रमाणे वृद्धापकाळामुळे मूल होण्याची शक्यता नसलेल्या अब्राहामापासून आकाशातील तारे व समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित संख्या असलेल्या वंशजांचा जन्म झाला.
12 Assim, de um só homem quase morto nasceu uma posteridade tão numerosa como as estrelas do céu e inumerável como os grãos de areia da praia do mar.
13 ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते.
13 Foi na fé que todos {nossos pais} morreram. Embora sem atingir o que lhes tinha sido prometido, viram-no e o saudaram de longe, confessando que eram só estrangeiros e peregrinos sobre a terra {Gn 23,4}.
14 त्यांच्या या बोलण्यावरून ते आपल्या खर्‍या देशाची वाट पाहत होते असे ते दाखवितात.
14 Dizendo isto, declaravam que buscavam uma pátria.
15 त्यांची इच्छा असती तर त्यांनी मागे सोडलेल्या देशात ते परत जाऊ शकले असते,
15 E se se referissem àquela donde saíram, ocasião teriam de tornar a ela...
16 पण ते त्यापेक्षाही उत्तम अशा स्वर्गीय देशाची आशा धरून होते आणि म्हणून मी त्यांचा परमेश्वर आहे, असे म्हणण्याची परमेश्वराला लाज वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक शहर सिद्ध केलेले आहे.
16 Mas não. Eles aspiravam a uma pátria melhor, isto é, à celestial. Por isso, Deus não se dedigna de ser chamado o seu Deus; de fato, ele lhes preparou uma cidade.
17 परमेश्वर अब्राहामाची परीक्षा घेत असताना त्याने इसहाकाचे अर्पण केले आणि ज्याला वारसाचे वचन प्राप्त झाले होते तो अब्राहाम यज्ञवेदीवर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध करण्यासाठी सिद्ध झाला;
17 Foi pela sua fé que Abraão, submetido à prova, ofereceu Isaac, seu único filho,
18 जरी परमेश्वराने अभिवचन दिले होते: “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.”
18 depois de ter recebido a promessa e ouvido as palavras: Uma posteridade com o teu nome te será dada em Isaac {Gn 21,12}.
19 अब्राहामाने तर्क केला की इसहाक मरण पावला तरी परमेश्वर त्याला पुन्हा जिवंत करतील; आणि तसे म्हणावे तर त्याला इसहाक मरणातून पुन्हा जिवंत मिळाला.
19 Estava ciente de que Deus é poderoso até para ressuscitar alguém dentre os mortos. Assim, ele conseguiu que seu filho lhe fosse devolvido. E isso é um ensinamento para nós!
20 विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला.
20 Foi inspirado pela fé que Isaac deu a Jacó e a Esaú uma bênção em vista de acontecimentos futuros.
21 याकोबानेही, तो वृद्ध झालेला व मृत्युशय्येवर असतानाही उठून व आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने उपासना केली व विश्वासाने प्रार्थना करून योसेफाच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला.
21 Foi pela fé que Jacó, estando para morrer, abençoou cada um dos filhos de José e venerou a extremidade do seu bastão.
22 जेव्हा योसेफाचा शेवट जवळ आला, तेव्हा तोही विश्वासाद्वारे बोलला की परमेश्वर इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करतील; त्याने त्याच्या अस्थी संस्काराबद्दल सूचना दिली!
22 Foi pela fé que José, quando estava para morrer, fez menção da partida dos filhos de Israel e dispôs a respeito dos seus despojos.
23 विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही.
23 Foi pela fé que os pais de Moisés, vendo nele uma criança encantadora, o esconderam durante três meses e não temeram o edito real.
24 मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले,
24 Foi pela fé que Moisés, uma vez crescido, renunciou a ser tido como filho da filha do faraó,
25 व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले.
25 preferindo participar da sorte infeliz do povo de Deus, a fruir dos prazeres culpáveis e passageiros.
26 इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता.
26 Com os olhos fixos na recompensa, considerava os ultrajes por amor de Cristo como um bem mais precioso que todos os tesouros dos egípcios.
27 विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले.
27 Foi pela fé que deixou o Egito, não temendo a cólera do rei, com tanta segurança como estivesse vendo o invisível.
28 म्हणूनच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वल्हांडण सण विश्वासाद्वारे साजरा केला आणि कोकराचे रक्त लावले, यासाठी की मृत्युदूताने इस्राएली लोकांच्या ज्येष्ठ मुलांना स्पर्श न करता निघून जावे.
28 Foi pela fé que mandou celebrar a Páscoa e aspergir {os portais} com sangue, para que o anjo exterminador dos primogênitos poupasse os dos filhos de Israel.
29 विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले.
29 Foi pela fé que os fez atravessar o mar Vermelho, como por terreno seco, ao passo que os egípcios que se atreveram a persegui-los foram afogados.
30 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्‍या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली.
30 Foi pela fé que desabaram as muralhas de Jericó, depois de rodeadas por sete dias.
31 विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्‍या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही.
31 Foi pela fé que Raab, a meretriz, não pereceu com aqueles que resistiram, por ter dado asilo aos espias.
32 तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही.
32 Que mais direi? Faltar-me-á o tempo, se falar de Gedeão, Barac, Sansão, Jefté, Davi, Samuel e dos profetas.
33 विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली;
33 Graças à sua fé conquistaram reinos, praticaram a justiça, viram se realizar as promessas. Taparam bocas de leões,
34 आणि अग्निज्वालांच्या प्रकोपाला थंड केले; काहींचा तलवारीच्या धारेपासून बचाव झाला; काहीजण जे अशक्त होते, ते सबळ झाले; इतरांना लढाईमध्ये मोठे बळ प्राप्त झाले; त्यांनी परकीय सैन्ये परतवून व पळवून लावली.
34 extinguiram a violência do fogo, escaparam ao fio de espada, triunfaram de enfermidades, foram corajosos na guerra e puseram em debandada exércitos estrangeiros.
35 काही स्त्रियांना विश्वासाद्वारे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत मिळाले. पण दुसर्‍या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत छळ सोसावा लागला, तरीही सुटका करून घेण्यापेक्षा पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल, असा त्यांचा विश्वास होता.
35 Devolveram vivos às suas mães os filhos mortos. Alguns foram torturados, por recusarem ser libertados, movidos pela esperança de uma ressurreição mais gloriosa.
36 काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून तुरुंगात टाकण्यात आले.
36 Outros sofreram escárnio e açoites, cadeias e prisões.
37 काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण मेंढरांची व बकर्‍याची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले होते.
37 Foram apedrejados, massacrados, serrados ao meio, mortos a fio de espada. Andaram errantes, vestidos de pele de ovelha e de cabra, necessitados de tudo, perseguidos e maltratados,
38 हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहेत आणि बिळात राहत असत.
38 homens de que o mundo não era digno! Refugiaram-se nas solidões das montanhas, nas cavernas e em antros subterrâneos.
39 या माणसांनी विश्वासाद्वारे परमेश्वराची मान्यता मिळविली, तरीपण त्यांच्यापैकी कोणालाही परमेश्वराच्या वचनांची फळे मिळाली नाहीत;
39 E, no entanto, todos estes mártires da fé não conheceram a realização das promessas!
40 कारण परमेश्वराने आपल्यासाठी ज्या अधिक चांगल्या गोष्टी सिद्ध केल्या आहेत त्यामध्ये त्यांनीही वाटेकरी व्हावे, अशी परमेश्वराची योजना होती.
40 Porque Deus, que tinha para nós uma sorte melhor, não quis que eles chegassem sem nós à perfeição {da felicidade}.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Hebreus 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.